मल्ल प्रेमयुध्द
शेजारी समीर बसला होता.
"तू???"
"हो मी... तुझ्याबरोबर असायला हवं होतं असं वाटत होतं. पण तिथे येणं योग्य नव्हतं. म्हणून इथे येऊन थांबलो आणि हे बघ तिकीट पण काढले."
"समीर कशाला दगदग करायची... तुझी प्रॅक्टिस बुडती ना..."
"हे असं अख्या रस्त्याने तू रडत बसणार हे माहीत होतं म्हणून मग मी आलो."
"नाही रडत मी..."
"मग हे डोळ्यात भरलेलं पाणी का?"
"कारण ज्या माणसावर आपण निस्वार्थ प्रचंड प्रेम करतो त्याने अचानक आपल्या आयुष्यातन निघून जायचं ते पण असं... नाय रे सहन होत."
"अग समोरच्यावर आपण प्रचंड प्रेम करतो पण आपल्यावर कोण प्रेम करत आणि किती? ह्याला त्यापेक्षाही जास्त महत्व असत. तेंव्हा आपण डोळे मिटून घेतलेत याला जागीच अर्थ नसतो. मग हे अस होत."
"पण मग मला तेंव्हा असच वाटत होतं की वीर माझ्यावर माझ्यापेक्षा जास्ती प्रेम करत्यात... मग हा इचार कारण चूक व्हत का?जो माणूस आपल्या स्वप्नांचा इचार करतो अस वाटतं की तो फक्त आपल्यासाठी जगतोय तवा हा इचार येईलच कसा की तो आपल्याला फसवतोय. मी मात्र निस्वार्थ पर्वम करत राहिले अन पुढ फक्त अंधार हाय हे डोळ उघड असूनसुद्धा समजलं न्हय का लक्षात आलं न्हाय."
"अंधार कुठं व्हता. आज तू इंटरनॅशनल प्लेयर आहेस. हे बळ कदाचित तुला ठेच लागली म्हणून आलं असेल. म्हणून तू जिंकलीस.."
"आपल्या माणसांनी केलेला विश्वासघात मनाला लै लागतो. तो भरून यायला बराच काळ पुढं सर्कव लागत व्हय ना.."
"हा विचार आता मनातन काढून टाक आणि पुढच्या कॉम्पिटिशच्या तयारीचा विचार कर. रडून वीर परत तुझ्याकडे येणार आहे का आणि आला तरी पुन्हा तसाच आयुष्यबजागू शकणार आहेत का?"
"नाही मी त्यांच्यासाठी नाही रडत मला आई दादासाठी रडायला येतंय. किती स्वप्न बघितली व्हती त्यांनी जावई आणि लेकीसाठी... मी पण आयुष्यात कधी एवढी खुश नव्हते जेवढं वीर माझ्या आयुष्यात आलं तवापासन व्हते. आणि आज काय झालं? दादा आई माझ्यामुळं नाराज झालं. मी पुढं हुन एकदा वीरबर बोलायला पाहिजे व्हत का? माझ्यासाठी न्हय तर आई दादांसाठी मी परत इचार करायला पाहिजे व्हता का? आता याची बातमी इल का पेपरात. एक इंटरनॅशनल जिंकली म्हणून क्रांतीला माज आला आणि नवऱ्याला डीओर्स दिला."
"लोक काय म्हणतात याचा विचार नको करू क्रांती एक चांगला मित्र म्हणून सांगतो आयुष्यात जी स्वप्नबघितले आहेस ना त्याचा पाठलाग सोडू नकोस. ते ही हरवून बसलीस ना की आयुष्यात तुझ्याकडे काहीही नसेल."
"समीर... मनापासून आभार मानते रे तुझे बर झालं तू आलास न्हायतर मी इतकी खचून गेले होते की मी मुंबईत यावं का नको याचा इचार करत व्हते."
"आणि म्हणूनच मी आलो."
समीर फक्त बडबड करून तिला हसवत होता. त्याची बडबड एकता एकता क्रांतीला कधी झोप लागली समजलं नाही. समीरच्या खांद्यावर डोकं ठेवून ती निवांत झोपून गेली.
भूषणला स्वप्नाकडे पोहचायला रात्र झाली होती. घरातले सगळे केक कापायला थांबले होते. स्वप्ना केक कापायला तयार न्हवती कारण भूषण फोन उचलत नव्हता.
"अग कामात असतील भूषण तू काप केक सगळ्यांना भूक लागलेत." आई मुद्दाम म्हणाली.
"आई प्लिज पाच मिनिटं थांब फक्त एकदा ट्राय करते."स्वप्नाने फोन हातात घेतला. तेवढ्यात ऋषीने आवाज दिला.
"ताई.."
वीर, भूषण, आई, चिनू, तेजश्री, संग्रामला दारात बघून स्वप्ना मोठ्याने ओरडली. जवळ जाऊन आईच्या पाय पडली. सगळ्यांना भेटली पण वीरकडे साधं पाहिलं सुद्धा नाही.
केक कापला. सगळ्यांची जेवण झाली. गप्पा मारायला सुरुवात झाली. भूषणच्या आईने थेट मुद्याला हात घातला.
"स्वप्नाची आई मला वाटतं लग्नाची तारीख काढू उद्या."
"म्हणजे बोलणी ???" स्वप्नाच्या वडिलांनी प्रश्न केला.
"अहो काय बोलणी करायची. स्वप्ना आमच्या घरात मुलगी म्हणून येणार हाय आम्हाला त्यापेक्षा जास्ती काय सुद्धा नको."
"हा तुमच्या मनाचा मोठेपणा पण मला वाटत की आमची एकुलती एक मुलगी तीच लग्न थाटात व्हायला पाहिजे. लग्न इथं करू सगळं आम्ही करू तुम्ही आणि तुमची लोक या फक्त. येण्या जाण्याचा खर्च आम्ही करू आणि आम्ही आमच्या पद्धतीने जे काय द्यायचं ते भूषणराव आणि स्वप्नाला देऊ."
स्वप्नाची आई म्हणाली.
"ठीक हाय तुम्हाला जस योग्य वाटत तसं करा. माझं के पण म्हणणं न्हाय. स्वप्ना लवकर घरात यावी एवढीच इच्छा हाय."
भूषणच्या आई म्हणाली. भूषण मात्र स्वप्नाकडे एकटक बघत होता. ऋषीच्या लक्षात आलं होतं ह्यांना बोलायचे आहे त्याने पटकन विषय बदलला.
"आई मी काकांना आताच सांगून येतो. म्हणजे मुहूर्त काढायला ते गावच्या मंदिरात जायच्या आधी घरी येतील कारणमंदिरात गेल्यानंतर ते परत कधी सापडतील माहीत नाही."
"होय की पण आता नऊ वाजलेत एवढ्या उशिरा जाणार का तुम्ही?"
"हो आम्ही सगळेच पायी चालत जातो मूल मुलं तुम्ही बस गप्पा मारत."
तेवढ्यात थकून तेजश्री वहिनी बाहेर आली.
"काय ग काय झालं?" अत्यानी विचारले.
"गाडी लागली बहुतेक.. लै उलट्या व्हत्यात. खाल्लेलं पचेना काय."
"व्हय का मग तू ज वर जाऊन पड ह्यांना जाऊ दे..."
"मी थांबतो तुझ्याबर..." संग्राम तेजश्रीला घेऊन वर गेला. तेजश्रीला खूप थकवा आला होता. संग्राम तिची काळजी घेत होता. बाकीचे सगळे बाहेर पडले. वीर एकटा समुद्रकिनारी जाऊन बसला. चिनू आणि ऋषी, भूषण आणि क्रांती काकांच्या घरी गेले त्यांना निरोप दिला.
"भूषण असे कसे अचानक आला? एव्हढ्यावेळ आपले बोलणे झाले तुम्ही काहीच बोलला नाही."
"आईना माहिती व्हत प। मीच सांगू नका म्हणालो. जर सांगितलं असत तर एवढं मोठा आनंद तुमाला झाला असता का?"
"खर तर आज आनंद वाटण्यासारख कस असेल जरी माझा वाढदिवस असला तरी कारण क्रांती तिकडे एकटी आहे. वीर चुकला आहे भूषण."
"सगळ्यांना माहीत हाय अगदी त्याला सुध्दा... "
"म्हणजे...?"
"त्याला पण वाटत होतं की डीओर्स नको व्हायला. पण त्याने तिला त्रास दिला म्हणून तो म्हणाला की आता बोलायचं नाय"
"पण त्याला समजलं आहे तर त्याची चूक आहे तर मग एक चान्स घ्यायला पाहिजे होता एकदा बोलायला हवं होतं."
"मी खूप समजवलं लन तो ऐकायला तयार नव्हता. त्याला लै त्रास झाला."
"पण चुकीचा वागला तेंव्हा समजलं असत तर ही वेळ आली नसती."
"हे नशिबात होत त्याच्या... क्रांतिवैनीने सहन केल त्यापेक्षा जास्त सहन आता वीर करल... त्याला मी चांगल ओळखतो त्याच लै प्रेम हाय क्रांती वैनिवर हे सूडाच्या भावनेतन झालंय त्यातनं तो आता भायर आलाय पण प्रेम??? प्रेमाची जाणीव लै आधिपासन व्हती. ती अशी संपणार न्हाय..."
"भूषण तुम्ही एवढं ओळखता तर त्यांना एकदा थांबवायचं ना काहीतरी नक्की झालं असत."
"न्हाय थांबवू शकलो...त्याची शपथ मोडायची हिम्मत नाय झाली."
"यात सगळ्यात जास्त दोषी असतील तर ते आबा..."
"आता कुणाला दोष दिवून उपयोग न्हाय..." मागून वीर येऊन म्हणाला.
स्वप्ना आणि भूषण दोघेही पटकन उभे राहिले.
"सॉरी भूषण्या मग इवून थांबलो नव्हतो, इथन जाताना तुमचा आवाज आला म्हणून आलो."
"काय र लेका... सॉरी काय म्हणतोयस..."
"स्वप्ना आल्यापासून मझयाशी बोलली न्हाईस मला म्हायती हाय तुला माझा राग आलाय."
"का नाही येणार राग... आयुष्यात आलेल्या चांगल्या मुलीला तू गमावून बसलास.."
"माझं प्रेम एक घटस्फोटाच्या कागदावरून संपणार न्हाय... माझं लै प्रेम हाय त्यांच्यावर... मी चुकलोय हे मान्य हाय त्याची माफी तर मी मागीनच पण त्यांना माझ्या आयुष्यात परत याव लागल..."
"वीर आता तू काय वेड वाकड करायचं न्हाईस अन मी ते तुला करून देणार न्हाई... आर जगू दे त्यांना आता त्यांचं आयुष्य.."
भूषण रागाने म्हणाला.
"बाबा मी काहीच करणार न्हाय...मला फक्त उद्या मुंबईत सोड.."
"म्हंजी तू कुस्ती परत सुरू करणार?"
"न्हाय...आता कुस्तीच नाव सुद्धा मी घेणार न्हाय मी माझ्या चुकीच प्रायश्चित्त घेणार..."
क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत