संक्रातीचा सण म्हणजेच उत्सवाची पर्वणीच... सर्व सुवासिनी स्त्रिया या सणाची आतुरतेने वाट पाहत असतात... संक्रांत म्हणलं की सौभाग्य अलंकार याचा दिवस....
भोगीची भाजी म्हटलं की आठवते ती मसाल्यातील सर्व प्रकारच्या मिक्स भाज्यांची भाजी.. 😋 त्यासोबत चुलीवर भाजलेल्या तीळ लावून केलेल्या बाजरीच्या भाकरी...
खरंच आपली संस्कृती म्हणजेच एक अमूल्य असा ठेवा आहे... प्रत्येक सणाचे काही ना काही वैशिष्ट्य तर आहेच पण आरोग्य दायी असे प्रत्येकाचे स्वरूप आहे... प्रत्येक सणाचा काहीना काही ऐतिहासिक अर्थ असतो आणि म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीत आलेल्या प्रत्येक सणाला तितकेच महत्त्व आहे...😊
संक्रांतीच्या आदल्या दिवशीच येते ती म्हणजे भोगी... या भोगीच्या दिवशी देवाची पूजा करून त्यांना भोगीच्या भाजीचा नैवेद्य दाखवला जातो... गाजर ,बिबे, पेरू, हरभरे, भुईमुगाच्या शेंगा, वालाच्या शेंगा, वांगी आणि अशा अनेक भाज्यांची मिळून बनवलेली भाजी म्हणजेच,भोगीची भाजी!!!!!...बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावलेली भाकरी इत्यादी पदार्थांचा यामध्ये समावेश असतो... लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी आणि मुगाची खिचडी केली जाते...🙂
नव्यानेच आलेल्या शेतामधील सगळ्यात भाज्यांचा यामध्ये समावेश असतो.. या पिकाचा आनंद व्यक्त करण्यासाठीच एकत्र भाजी बनवून सर्वप्रथम देवाला नैवेद्य दाखवून मगच ती आपल्या खाण्यास प्रसाद रुप योग्य होते..
👣इंद्रदेवाने धरतीवर उदंड पिके पीकावीत म्हणून प्रार्थना केली होती..आणि म्हणूनच सर्व शेतकरी बांधव व ही वर्षानुवर्षे ही पिके अशीच पिकत राहावी, यासाठी देवाकडे प्रार्थना करतात.... 🙂या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते..
आहारामध्ये सर्वच उष्ण भाज्यांचा समावेश असल्यामुळे थंडीचा आस्वाद घेता येतो... हिवाळ्याच्या दिवसांमध्ये भाज्या सर्वच अगदी हिरीरीने येतात.. शेताला जणू नवीन बहार आलेला असतो..भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी मधून कृष्ण उष्णता..मिळते, ह्यामुळे वर्षभर काम करण्याची ऊर्जा आपल्याला मिळते...
"न खाई भोगी तो सदा होई रोगी" हे आपण ऐकलेले असेलच... भोगी म्हणजेच उपभोग नारा... या दिवशी सकाळी घर आणि घरासमोरील अंगण व इतर परिसर स्वच्छ करून दरवाजासमोर सडा-रांगोळी करतात..
. घरातील सर्वच लोकांनी तिळाचे अभ्यंग स्नान करून नवीन वस्त्र किंवा स्वच्छ कपडे परिधान करावेत... आंघोळीच्या वेळी पाण्यामध्ये हळदी कुंकू टाकून आंघोळ करतात... यावर्षी भोगी ही अमावस्येच्या दिवशी आली असली तरीही संक्रातीचा पवित्र असा पर्व असल्यामुळे ती शुभ च आहे...
तुमच्याकडे भोगी कशी साजरी करतात हे मला नक्की सांगा...तुमच्या आमच्या मधील✍️✍️💞 Archu💞
प्रत्येक वर्षी संक्रात आली म्हणजे आपल्यामध्ये एक प्रकारचा उत्साह येतो संस्कृत म्हणजे बायकांसाठीच पर्वाणी त्यानिमित्ताने का होईना त्यांची इतरांशी बोलण्याची देवाणघेवाण होते स्वतःसाठी थोडा काहींना वेळ मिळतोच आणि त्यातल्या त्यात सजायला सावरायला कुणाला आवडत नाही यासाठी महिला वर्ग तर आतुरतेने सांगतच वाट बघत असतोच।।
तर यामध्ये छोटे मुलं देखील काही कमी नाही त्यांना सुद्धा आता नवी पिढ्याप्रमाणे पतंग खेळण्याची हौस असते वेगवेगळ्या प्रकारची पतंग रंगाचे पतंग कागदाचे पतंग रंगबिरंगी आकाशात उडणारे हे पाहून त्यांच्या बालनाला खूपच आनंद होतो आता तर ट्रेडिंग गाणी असतात त्यानुसार आणि त्या निमित्ताने का होईना काहीतरी वेगळा खेळ खेळला जातो प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक गोष्टींची वेगवेगळी गोष्ट असते रीत असते परंपरा असते प्रत्येक सणाची ती संस्कृती असते आपल्या संस्कृती प्रमाणे आपणही आपले सर्वच सण अगदी उत्साहात साजरी करतो आणि त्या सणामागे त्या संस्कृती मागे आणि त्या परंपरा मागे जुन्या चालीरीती रूढी प्रथा परंपरा आहेतच पण त्यामागे देखील त्यांचा महत्त्व सगळ्यांनीच पटवून दिले आहे प्रत्येक सणाला काही ना काही अर्थ आहे कशाने शी आणि कशाशी ते निगडित असतात आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे इतर कुठलेही देशात एवढे सण व्रत उपवास राहत नाही इथे मात्र सगळ्यांचाच उत्साह परा कुठला पोहोचलेला असतो तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना संक्रातीच्या खूप खूप खूप खूप शुभेच्छा 2024 हे वर्ष तुमच्यासाठी सुखी समाधान व आनंदाचे जावो