वटपोर्णिमा Archana Rahul Mate Patil द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

वटपोर्णिमा

आज वटपौर्णिमा.... त्यानिमित्ताने सर्व स्त्रियांना व पुरुषांना ही वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ,💞💞महिलांना यासाठी अापल्या पती परमेश्वरासाठी उपवास करून त्याला दीर्घायुष्य मागतात ,तर पुरुषांना यासाठी आपण तिला समजून घ्या नका घेऊ ती मात्र सगळं काही आपल्यालाच मानत असते ....आपले सर्वस्व तिने आपल्या नवर्‍याला अर्पण केलेले असतं याची त्याला जाणीव ज्यांना असते त्यांनाही शुभेच्छा..,🌹भारतातील स्त्रियाना आर्य महिला असे संबोधले जाते.. आर्य महिला यांनी त्याग तपस्या याच्या सजीव मूर्ती त्या साक्षात आहेत...पतीलाच आपल्या परमेश्वर मानून मनोभावे एकनिष्ठ राहून त्याची पूजा केली जाते ...स्त्रियांच्या इच्छा-आकांक्षा आपल्या नवऱ्याच्या संकल्पात एकरूप झालेली असतानाही श्रद्धेने ते संपूर्ण आयुष्यभर त्याचं पालन करतात ...अशा या महिलांना सर्वप्रथम श्रद्धेने आर्य महिलांच्या चरणावर शत शत नमन...त्या पतिव्रता आहेत त्यांच्या पतिव्रता त्याच्या धर्मावर त्यांना सार्थ विश्वास आहे..आजच्या आधुनिक युगातील सावित्रीही अशाच आहेत ...त्या प्रत्येक कार्याबरोबर आपल्या पतीची साथ देत असतात किंबहुना काहीवेळा त्या आपल्या नवऱ्याच्या खांद्याला खांदा भिडवून संसाराची रथ हकात असतात... .गाडीच्या दोन चाकाप्रमाणे एक स्त्री आहे तर दुसरी पुरुष.....स्त्रियांना कमी लेखणारे पुरुष आजही आहेत, पण त्याच प्रमाणे त्यांची पूजा करणारे व त्यांना योग्य तो मानसन्मान देणारी पुरुषही आपल्या संस्कृतीत आहे...भारतीय संस्कृती ही संपूर्ण जगाच्या पाठीवर एकमेव अशी संस्कृती आहे की तिचे गुणगान अवघ्या विश्वात आहे.....स्त्रियांना आपल्या पायातील वाहन समजणारे काही नराधम ही आहेत पण त्यांचा संहार करणाऱ्या ही दुर्गा आणि कालीमातेचा अवतार पूजनीय आहे.....वट हा देव वृक्ष आहे ..वटवृक्षाच्या मुळांमध्ये भगवान ब्रम्हा ...मध्यभागात जनार्धन विष्णूआणि अग्र भागांमध्ये देवाधिदेव शिव राहतात...देवी सावित्री पण वृक्षांमध्ये विद्यमान आहे ...वनवास काल अवधीमध्ये रामाने लक्ष्मण सीता सहित याच पाच वटवृक्षाच्या समुदायात निवास केला होता,म्हणूनच त्याला पंचवटी असे आजही म्हटले जाते...आरोग्यदृष्ट्या पाहिलं तर हानीकारक वायूला दूर करून वातावरण शुद्ध ठेवण्यामध्ये वटवृक्ष विशेष महत्त्व ठेवतो..सावित्रीने आपल्या पतीचे धर्माच्या प्रभावाने या वटवृक्षाच्या खाली आपल्या वटवृक्षाच्या खाली आपल्या प्राणहीन पतीला जिवंत केले होते ...तेव्हापासून आजपर्यंत हे व्रत वटसावित्री च्या नावाने केले जात... म्हणूनच याला वटसावित्री पौर्णिमा असेही म्हणतात...ज्येष्ठ मासाच्या पौर्णिमेला हे वट सावित्री व्रत केले जाते...महिला आपल्या पतीला आयुष्य वाढविण्यासाठी व कुटुंबाच्या कल्याणासाठी हे सौभाग्य प्रभावशाली व्रत करतात..सौभाग्यवती महिलांनी जेष्ठ त्रयोदशीच्या दिवशी पासून पौर्णिमेपर्यंत हा तीन दिवसांचा उपवास केला पाहिजे..आपल्या यथाशक्ती प्रमाणे जर आपल्याला तीन दिवस उपवास करण्याचे जमत नसेल तर एकच दिवस करावा...तीन दिवसांचा ठेवायचा असेल तर, पहिल्या दिवशी स्नान पूजा करून पळ आहार करावा दुसऱ्या दिवशी फक्त कोणी दुसऱ्यांनी दिलेलेच किंवा दूध घ्यावे व तिसऱ्या दिवशी म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी निराहार राहून उपवास सोडावा...तीन दिवसाचा उपवास कुणालाच शक्य नसल्यामुळे आता हा उपवास फक्त एकच दिवस केला जातो...आपल्या यथाशक्ती प्रमाणे जसाच्या तसाच आपणही तो करण्याचा प्रयत्न केला पाहिजे...पौर्णिमेच्या दिवशी वेळू द्वारे बनवलेल्या दोन दुरड्या घ्याव्यात एका दूर डी मध्ये सात प्रकारच्या धान्य व फळे घ्यावीत... दुसऱ्या दोघींमध्ये ब्रह्म सावित्रीची तसेचएकी यामध्ये सत्यवान सावित्रीची वाळूने बनवलेली देवतेची मूर्ती घेऊन वडाच्या मुळाशी ठेवावी...  यथायमाचे ही पूजन करावे..त्यांच्या पूजनानंतर महिलांनी वडाचे पूजन करावे व सात किंवा 108 वेळा प्रदक्षिणा करत, वडाच्या झाडाला जाड दोरा गुंडाळावा...त्यासोबतचनमो वैवस्वतआय...हा मंत्र जपतच प्रदक्षिणा घालाव्यात...इतर सौभाग्यवती महिलांनाही हळदीकुंकू देऊन व सौभाग्याचे वाण घेऊन त्यांची ओटी भरावी...त्यानंतर घरी येऊन सौभाग्याचे वान आपल्या सासूला देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा..सौभाग्य वानांमध्ये सिंधुर ,काजळ, हळदी कुंकू, सोन्याचा किंवा चांदीचा अलंकार, एक रुपया असे सहा भाग करून त्याचे वान ब्राह्मणास दान द्यावीत...सौभाग्याच्या याच वानाला सौभाग्य पेटी असेही म्हणतात....हा व्रत करत असताना सत्यवान सावित्रीची कथा वाचावी किंवा ऐकावी...प्राचीन काळात मद्र देशामध्ये अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता पण त्याला संतान सुख नव्हते म्हणून त्यांनी ब्राह्मणाकडून यज्ञ करून घेतला... व त्यातूनच त्यांना 1कन्यारत्न प्राप्त झाले... तिचे नाव सावित्री ठेवले...समय व्यतीत होत गेला...सावित्री आता विवाहयोग्य झाली होती.. म्हणून तिच्या पित्याने तिला वर निवडण्यास सांगितले..सावित्री तिच्या सख्ख्या समवेत वनात गेली असता तेथे राहात असलेला किंमत सेन सत्यवान याचे तिने वरण केले...इकडे ही गोष्ट नारद मुनींना कळाली असता ते अश्वपति राजांना म्हणाले, हे राजन तुझ्या मुलीने त्यावरचे वरण केले आहे ,त्या सत्यवानाचे आयुष्य खूप कमी आहे...तो दिसायला रूपवान गुणवान जरी असला तरी तो पुढच्या एका वर्षात मृत्यू पावणार आहे ....असे ऐकताच सावित्रीला ही गोष्ट सांगितली ...पिताजी मी एक भारतीय आर्य कन्या आहे...आर्य महिला फक्त जीवनात एकदाच पतीचे वरण करत असते व त्याच्याशी स्वामीनिष्ठ जीवन व्यतीत करण्याचा संकल्प करते......राजा म्हणाले की तो अल्पायू आहे, तू दुसरा वर शोध ...पण सावित्री आपल्या दृढनिश्‍चयवर राहिली ..तिच्या संकल्पा पुढे राजानेही तिचा विवाह वनात राहणाऱ्या सत्यवानाशी करून दिला....तत्या वनात राहून सावित्रीने सासूसासऱ्याचे व आपल्या पतीची एकनिष्ठ देणे सेवा केली....पाहता-पाहता वर्ष सरले आणि नारदांच्या सांगण्याप्रमाणे सत्यवानाचा मृत्यू तीन दिवसावर येऊन ठेपला होता..्हणून सासू-सासर्‍यांची आज्ञा घेऊन सावित्रीने तीन दिवस निर्जल वरत ठेवले....नारदाने सत्यवानाच्या मृत्यूचा जो दिवस सांगितला होता, त्यादिवशी त्यवान लाकडे गोळा करण्यासाठी वनात जाण्यास निघाला..तेव्हा सावित्रीही आपल्या सासर्‍यांची आज्ञा घेऊन त्यासोबत वनात गेली...वनामध्ये सत्यवान लाकडे तोडण्यास करतात ,एका झाडावर चढला आणि लाकडे तोडता त्याला मुर्छा येऊ लागली....म्हणून तो सावित्रीला म्हणायला की हे प्रिये माझ्या डोक्यात असं का होत आहे, तेव्हा सावित्री म्हणाली की प्राणानात तुम्ही खाली या, आणि माझ्या मांडीवर डोके ठेवून थोडावेळ विश्राम करा ...असे म्हणतात सत्यवानही खाली पडला...थोड्यावेळाने सावित्रीने पाहिले की साक्षात यम व त्याचे दोन दू त हळूहळू त्यांच्याकडे येऊ लागली व हाताच्या अंगठा एवढा असलेला सत्यवानाचा जीव घेऊन दक्षिण दिशेकडे निघाले...सावित्री पण आपल्या पतीची प्राणज्योत घेऊन चाललेल्या यमाच्या मागे मागे चालत गेली...आपल्या पाठीमागे सावित्री येत आहे ,असे पाहून यम म्हणाले" हे पुत्री तू परत जा, याची साथ जिवंत पर्यंतच होते... विद्यात्याने त्याला जेवढी आयुष्य दिले होते, तेवढे त्यांनी पूर्ण केले आहे ...हे पतिपरायण देवी आयुष्यभर तू आपल्या पतीला साथ दिलीस जिथपर्यंत, तू साथ देऊ शकतेस तिथपर्यंतच, तुला येण्याचा अधिकार आहे ,तेव्हा तू परत जा!!!!"असे म्हणून पुढे चालू लागली....यमा ची गोष्ट ऐकून सावित्री म्हणाली", हे भगवण जेथपर्यंत माझे पती जातील ,तेथपर्यंत सनातन धर्मीय श्री आपल्या पती सोबतच राहील...."सावित्रीची धर्म वाणी ऐकून य म सद्गदीत होऊन म्हणाले," हे पुत्री तू माझ्याकडून कोणताही एक वर मागून घे, मी तुला ते देण्याचं वचन देतो...."सावित्री म्हणाली ,"हे महाराज माझे सासू-सासरे आनंद आहेत :त्यांचे राज्य ही शत्रूंनी हीरवलेले आहे.. शिवाय तुम्ही माझ्या पतींची प्राणही तुमच्या सोबत घेऊन चालले आहेत...????अशा वेळेस मी काय तो वर मागणार????तरीही तुमच्या इच्छेचा मान ठेवून मी तुम्हाला एक वर मागते...."माझ्या  पूत्र्याच्या डोक्यावर सोन्यानी जडलेले छत्र आम्ही सहकुटुंबआनी पहावे"!!!!!!!!यम तथास्तु म्हणाले आणि पुढे जाऊ लागले.  .सावित्रीही त्यांच्या मागे जाऊ लागली... कीयमराज सावित्रीला म्हणाले ,"की तू आता तरी माघारी जा!!!सावित्री हसू लागली ..आणि म्हणाली "महाराज माझ्या पतीचे प्राण तर तुम्ही सोबत चालले आहे .. तर मला पुत्रप्राप्ती कसा होईल आणि मला संतान झाली नाही ,तर आम्ही सहकुटुंब तो कसा बघणार...?????सावित्रीची धर्मपरायणता व दृढनिश्चय पाहून यमराजही आर्य श्री पुढे नतमस्तक झाले....शेवटी यमराज एका पतिव्रते पुढे हरला आणि पतिव्रता जिंकली...यमाने आपल्या पाशातून सत्यवानाचे प्राण मुक्त करून सावित्रीला अखंड सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद दिला.....तसेच" तुझ्यासारखी धर्मपरायण व पतिव्रता जर हे व्रत मन लावून करेल तर मी ही त्यांचे अखंड सौभाग्याचे रक्षण करीन"!!!! असा त्यांनी सावित्रीला वर दिला.... !!!सावित्रीला व सत्यवानी दर्शन घेतले व आपल्या घरी आले....घ री पाहतात तर सासू-सासर्‍यांना डोळे आले व थोड्यावेळाने त्यांचे गेलेले राज्य ही त्या राजाने परत केले असा या व्रताचा महिमा आहे..म्हणूनच सर्व सौभाग्यवती महिलांनी या वृत्ताचे जेवढे होईल तेवढे पालन नक्की करावी...ज्यांना झेपत नसेल त्यांनी एक दिवस केला तरीही चालेल...पण वर्षातून एक दिवस आपल्या सौभाग्यासाठी व कुटुंबाच्या सुखासाठी हे व्रत करायलाच हवं. ...संसारात ही मान्यता आहे की सावित्री व सत्यवानाची कथा ऐकून किंवा वाचून हे व्रत केल्याने सांसारिक विपत या दूर होतात.... पतीव्रता नारी की आर्य महिला की जय हो.....!!!तुमच्याकडे वटपौर्णिमेचा सण कसा साजरा केला जातो हे मला कमेंट द्वारे नक्की कळवा...✍️✍️💞Archu💞