गुरु गोविंद सिंह एक आगळे वेगळे व्यक्तीमत्व Ankush Shingade द्वारा जीवनी मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

गुरु गोविंद सिंह एक आगळे वेगळे व्यक्तीमत्व

गुरु गोविंदसिंह-:एक आगळे वेगळे व्यक्तीमत्व

२० जानेवारी गुरू गोविंदसिंह जयंती विशेष

गुरु गोविंदसिंह हे एक आगळेवेगळे व्यक्तीमत्व होते. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांचं कार्य. शिख धर्माचे ते दहावे गुरु होते.त्यांच्या वडीलांचं नाव गुरु तेगबहाद्दूर होते. गुरु गोविंदसिंह हे आपल्या वडीलांच्या मृत्यूनंतर म्हणजे ११नोव्हेंबर १६७५ मध्ये गुरु बनले.
गुरु गोविंदसिंह यांचा जन्म विक्रमी कालगणनेनुसार २२ नोव्हेंबर १६६६ ला झाला. ते एक महान कवी तसेच युद्धवीरही होते.त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली. यामागे गुरु गोविंदसिंह यांची भुमिका फार मोलाची असलेली दिसून येते.
गुरु गोविंदसिंह यांचं नाव गोविंद राय होतं. परंतू सिंह हे नाव नव्हे तर पदवी त्यांनी केलेल्या कार्यामुळं मिळाली. त्यावेळी मुगलांचं राज्य सर्व भारतावर बहुतेक प्रमाणात होतं. पंजाब पर्यंतचा भागही होता. पण पंजाब........पंजाबातील शिख समुदाय मराठ्यांसारखाच बहाद्दूर होता. त्यांनाही कोणाच्या गुलामीत राहणे पसंत नव्हते. त्यातच औरंगजेब बादशहाला वाटत होतं की या पंजाबातील लोकांवर राज्य करावं. तसा प्रयत्न बादशहानं केला. परंतू ज्यावेळी तसा प्रयत्न झाला व बादशहाने शिखावर सैन्य पाठवले. तेव्हा शिखाच्या खालसा दलाला ते आक्रमण परतावून लावता आले नाही.
आनंदपूर हे खालसा दलाचे प्रमुख केंद्र होते. औरंगजेबाचा हा हल्ला आनंदपूरवरच होता. त्यावेळी शिखांनी प्रचंड झुंज दिली. परंतू त्यांना यश आले नाही. त्यानंतर ते दक्षिणेत आले.
गुरु गोविंदसिंह हे शिखाचे दहावे गुरु होते. त्यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मीक धोरणाविरुद्ध नापसंती दर्शवली. त्यांनी जेव्हा खालसा दलाची स्थापना केली. त्यावेळी त्यानं शिखांना पाच गोष्टी वापरण्यासाठी सांगीतल्या. त्यात कंगवा वापरणे,दाढी व केस न कापणे,हातात कडा वापरणे,कमरेला बिचवा वापरणे,त्याला किरपान म्हणत तसेच कच्चेरा वापरत असत.
शिख समुदायाच्या एका सभेत गुरु गोविंदसिंहाने सर्वांना म्हटले की कोण आपल्या शरीराचं बलिदान देवू शकते? त्यावर स्वयंसेवकापैकी एक व्यक्ती पुढे आला. त्याला त्यानं तंबूत नेलं. काही वेळानं रक्ताळलेली तलवार घेवून परत आल्यानंतर उपस्थीत लोकांना त्यांनी तोच प्रश्न केला. त्यावर पुन्हा एक स्वयंसेवक तयार झाला. त्यालाही त्यांनी त्या तबूत नेलं. हीच कृती पाच वेळा केली. शेवटी पाचही जणांना बाहेर आणून हाच माझा खालसा दल आहे हे जाहिर केलं.
गुरु गोविंदसिंहाचे वडील हे आसाम मध्ये धर्म उपदेशक होते.ज्या घरी त्यांचा जन्म झाला. त्या घरी त्यांनी चार वर्ष काढले.त्यांनी शिक्षण १६७२ मध्ये शिवालिक पहाडीवरील नानकी नावाच्या गावात केले.त्यांनी फारशी व संस्कृतमध्ये शिक्षण घेतले. त्यातच युद्धाचंही शिक्षण घेतलं. ते पुढील काळात कामात आलं.ते दया,क्षमा व सहनशिलतेचे पुजारी होते.
ज्यावेळी त्याचे वडील काश्मीरी पंडीतांच्या जबरन मुस्लिम बनविण्याच्या प्रकियेची शिकायत करण्यासाठी औरंगजेब बादशहाच्या दरबारात आले. तेव्हा त्याच्या वडीलांनी काश्मीरी पंडीतांचा धर्म वाचविण्यासाठी इस्लाम स्विकारला नाही. त्यामुळे गुरु तेजबहाद्दराची दिल्लीमध्ये ११ नोव्हेंबर १६७५ मध्ये हत्या करण्यात आली. त्यानंतर वैशाखीच्या दिवशी २९ मार्च १६७६ मध्ये दहावे शिखाचे गुरु म्हणून गोविंदसिंहाला जाहिर करण्यात आले.त्यानंतरही त्यांचं शिक्षण सुरु राहिलं. ते त्यावेळी दहा वर्षाचे होते. ते घोडसवारी सुद्धा शिकले होते.
त्यांना तीन पत्नी होत्या.पहिला विवाह त्यांनी २१ जून १६७७ ला केला. पहिली पत्नी....तिचं नाव जीतो असून ती वसंतगडची होती. तिच्यापासून त्याला तीन मुलं झाली. त्यांची नावं झुंझारसिंह,जोरावर सिंह व फतेहसिंह होती. त्यानंतर १४ एप्रिल १६८४ मध्ये त्याचं दुसरं लग्न झालं.तिचं नाव सुंदरी होतं.तिच्यापासून एक मुलगा झाला.त्याचं नाव अजितसिंह ठेवण्यात आलं. त्यानंतर १५ एप्रिल १७०० मध्ये तिसरा विवाह केला.तिचं नाव देवन होतं. तिला एकही मुलगा झाला नाही.
त्यांनी आपल्या जीवनात भरपूर लढाया केल्या. त्यात शेवटी औरंगजेबाच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचा मोठा मुलगा दिलावरला गादीवर बसताच लढाया थांबल्या. कारण त्या मोठ्या मुलाशी गोविंदसिंहाचे संबंध मित्रत्वाचे होते.त्यानंतर बादशाहाला गादीवर बसविण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्याचेवर क्षुब्ध असलेल्या पठानांनी त्याचेवर धोक्याने वार करुन त्यांची हत्या ७ आक्टोंबर १७०८ ला केली. त्यानंतर कोणीही गुरु बनला नाही.
आजही शिख संप्रदाय गुरु गोविंदसिंहला मानतात. त्यांनी दिलेल्या पाच तत्वाचं पालन करतात. आजही कंगवा,दाढी, ठेवतात. तसेच गुरुद्वारात जातात.आजही हा शिख संप्रदाय कोणाला घाबरत नाही. मग तो कोणताही पुरुष असो वा स्री. मग तो लहान मुलगा असो की नसो. ही गुरु गोविंदसिंहानंच दिलेली देणगी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०