इतिहास जपा? Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

इतिहास जपा?

इतिहास आठवता? चांगल्यासाठी आठवा?

आज आपण इतिहास आठवतो. कशासाठी? तर तशा चुका आपल्या हातून होवू नयेत यासाठी. आपल्यात सुधारणा घडवून याव्यात यासाठी. परंतु तो इतिहास आठवून त्या इतिहासाच्या आधारे वाद वा दंगे करण्यासाठी नाही. तसे दंगे वा वाद जर करायचे असतील तर आपला इतिहासच आठवून नये.
आपल्याला समृद्ध असाच इतिहास लाभला आहे. आपला इतिहास समृद्ध व वैभवशाली जरी असला तरी तेवढाच रक्तरंजीतही आहे. तो रक्तरंजीत झाला. त्याला कारण आहे आपलीच फितुरी. आपल्याच माणसांनी द्वेषातून आपल्याच माणसांबद्दल केलेली फितुरी. ज्यातून असा रक्तरंजीत इतिहास घडला.
इतिहास आठवता. मग तो चांगल्यासाठी आठवावा. द्वेषभावना असा इतिहास आठवून वाढत असेल तर कधीच असा इतिहास आठविण्याची आवश्यकता नाही. गरजही नाही. गुरु गोविंद सिंहाबाबत सांगायचं झाल्यास पहिला इतिहास बालवीरांची हत्या करणारा तर दुसरा इतिहास बालविरांच्या हत्येचा बदला. म्हणूनच वजीरखानाची हत्या, त्यातच त्याच्या प्रेताचं विटंबन आणि वजीरखानाची हत्या केली म्हणून बंदा सिंह बहादूरची हत्या. त्यातच त्याच्याही प्रेताचं विटंबन. बदल्यावर तेवढ्याच ताकदीनं बदला. हाच इतिहास आजपर्यंत घडत आलाय. आज ना ते बालवीर आहेत. ना गुरु गोविंद सिंह ना बंदा सिंह बहादूर. ना गुरु तेगबहाद्दूर सिंह ना ते शिखांचे दहा गुरु. फक्त आहे गुरुग्रंथसाहेब हा शिखांचा ग्रंथ. तोच दिशा देतो खऱ्या जगण्याला. माणसानं जगावं कसं? कसं जगू नये? याचं अभिसरण करणारा ग्रंथ. त्या ग्रंथनिर्मीतीनंतर शिख गुरु, गुरु गोविंद सिंहानं शिखांच्या गुरुपदाला मर्यादा आणली. कारण शिख पंथ निर्माण झाला होता. पुढे इंग्रज भारतात आले. त्यांनी येथील परिस्थिती पाहिली. तसाच इतिहास पाहिला. तो हिंदू व मुसलमानांचा इतिहास रक्तरंजीत होता. त्यानंतर त्यांनी ठरवलं. ठरवलं की या देशातील हिंदू मुसलमानात दंगे निर्माण करावे, शिख व मुस्लीमात दंगे लावावे व त्या दंग्यांना थोडी हवा दिली की बस, आपल्याला चांगलं राज्य करता येईल. याच विचारांनी त्यांनी या देशात हिंदू मुसलमानांना वेगवेगळ्या स्वरुपानं भडकवून दंगे निर्माणच केले नाही तर ते धुमसवतही ठेवले.
शिख हा पुर्वी धर्म नव्हता. तो पंथच होता. परंतु इंग्रजांनी त्यांना धर्माचं स्थान दिलं. त्याचं कारण होतं. हिंदू एकतेला तोडणं. शिख ह्या संप्रदायातील लोकं हे आधीपासूनच लढवय्ये होते. याचाही अभ्यास केला होता इंग्रजांनी. तसं पाहता शिख संप्रदाय हा हिंदू धर्मातूनच तयार झाला होता. हेच पाहिलं इंग्रजांनी व शिख संप्रदायाला धर्माचं नाव दिलं आणि स्थानंही. तेव्हापासून शिख नावाचा भारतात स्वतंत्र्य धर्म उदयाला आला. त्यानंतर शिखांच्या रक्तरंजीत इतिहासाचाही अभ्यास केला होता इंग्रजांनी. त्यांनी फतेहसिंह व जोरावर सिंह हे आपल्याच माणसांनी फितूरी केल्यामुळं मारले गेले असं लोकांना न सांगता त्यांनी दंगे भडकविण्यासाठी त्यांना मुस्लीमांनी मारलं असं सांगीतलं व त्याचाच प्रसार केला. संभाजींनाही पकडून देतांना आपल्याच माणसांनी फितुरी केली हे न दाखवता मुस्लीमांनी मारलं असं दाखवलं व तमाम देशात हिंदू मुसलमान, शिख मुसलमान असे दंगे भडकवले.
आज भारत स्वतंत्र्य आहे. भारतात पुर्वी हिंदू मुसलमान युद्ध चालायचे. मग दंगे चालायचे. आज तसं नाही. आताही द्वेष चालतो आणि रागही तेवढ्याच स्वरुपाचा. कारण आहे इंग्रजांनी प्रसवलेली राजनीती. लोकांच्या मनात बिंबवलेल्या इतिहासातील घडलेल्या गोष्टी. त्यांचा उलटाच अन्वयार्थ लावून त्यांचं एकत्रीकरण होवू नये म्हणून प्रसवलेली नीती व ध्येयधोरणे. जी ध्येयधोरणं येथील नांदत असलेल्या संस्कृतीला तडा देणारी होती. मुगलांनी केलेली संभाजीराजांची हत्या. तसे संभाजी हिंदूंचे राजे होते तर शिख समुदाय मुसलमानांचा आज द्वेष करतो. त्याचंही कारण आहे मुघलांनी केलेली फतेहसिंह व जोरावर सिंह यांची हत्या. कारण गुरु गोविंद सिंह हे शिखांचे गुरु होते आणि फतेहसिंह व जोरावर सिंह ही गुरु गोविंद सिंहांची मुलं. त्या बालवीरांचं बलिदान सतत आठवण देत असतं की आम्हाला मुगलांनी नाही तर मुसलमान धर्मानं मारलं. तसंच संभाजींचंही बलिदान मुस्लीम धर्मानं मारलं अशीच आठवत देत राहातं. यावरुनच वाद होतात. वाद कधीकधी एवढे विकोपाला पोहोचतात की भांडणं होतात व दंगे भडकतात. मग देशातील निरपराध माणसं मरतात. तेवढ्याच प्रमाणात देशातील मालमत्तेचंही नुकसानही होतं.
धर्माधर्मातील ही भांडणं. आजही याच धर्मावरुन वाद होत आहेत. वाद एवढे विकोपाला जात आहेत की ज्या वादाला अंत उरत नाही. संभाजी राजे हिंदूंचे होते व त्यांची हत्या औरंगजेबानं केली. जो एक मुस्लीम होता. गुरु तेगबहाद्दूर, फतेहसिंह व जोरावर सिंह हे शिख संप्रदायातील होते. ज्यांची हत्या औरंगजेबाच्या आदेशानं सरहिंदचा गव्हर्नर वजीरखान यानं केली. जो एक मुस्लीम होता. यात महत्वपुर्ण गोष्ट ही की जरी वरील हत्या या मुस्लीम शासकानं केल्या असल्या आणि तो हत्या करणारा एक मुसलमान असला तरी समस्त मुस्लीमांनी हत्या केलेल्या नाहीत. त्या हत्या त्या मुस्लीम शासकांच्या व्यक्तीगत दोषांनी केल्या. धर्मानं नाही. तसं पाहिल्यास त्या हत्या झाल्या. त्याचा दोष फितुरीला देता येईल. आपल्याच धर्मातील व जातीतील माणसांनी फितुरी केली नसती तर आज त्यांच्या हत्या झाल्या नसत्या हे विसरता येत नाही. जसं म्हटलं जातं की महाराज संभाजीला त्याच्या मेव्हण्यानं फितुरी करुन पकडून दिलं. जो एक हिंदूच होता. म्हणूनच राजे संभाजी मुगलांना सापडले व मारले गेले. यातही व्यक्तीगत दोषच कारणीभूत आहे. तसेच फतेहसिंह व जोरावर सिंह यांनाही फितुरीनं मारलं गेलं यातही आतिशयोक्ती नाही. कारण गंगू नावाच्या नोकरानं माता गुजरी व जोरावर सिंह व फतेहसिंह सिंह यांना संरक्षण देतांना गुरु गोविंद सिंहांना वचन दिलं होतं की तो त्यांना कधीच दगा देणार नाही. संरक्षण देईल. परंतु त्यानंच धोका दिला होता त्यांना. जो गंगू एक शिख होता. तसंच गुरु तेगबहाद्दूर यांनी आपली बलिदान दिलं. त्यालाही कारण होतं आपल्याच धर्मातील माणसांचे प्राण वाचविणे. जे हिंदू काश्मीरी पंडीत होते.
महत्वपुर्ण गोष्ट ही की महाराज संभाजी महाराज वा फतेहसिंह व जोरावर सिंह वा गुरु तेगबहाद्दूर सिंह, यांच्या हत्या झाल्या. त्या मुस्लीम असलेल्या एका नावाच्या मनोवृत्तीने झाल्या, इतर मुसलमान लोकांच्या मनोवृत्तीनं नाही. कारण त्याच्याही फौजेत मुस्लीम होते. तसंच गुरु गोविंद सिंहाच्या खालसा दलातही काही मुसलमान होते. एव्हाना जेव्हा चमकौरचं युद्ध झालं. त्यावेळेस गुरु गोविंद सिंह पळून गेल्यानंतर त्यांना गनीखान व जुनैद खान यांनी मदत केली. तेही दोघं मुसलमानच होते. त्यामुळं आज मुस्लीम हिंदू, मुस्लीम शिख असा वाद होत आहे. तो होवू नये. त्या वादावर विरजण पडावं. तसा तो आपला इतिहास असला तरी आज तसा इतिहास घडविण्याची इच्छा ठेवू नये. तिन्ही धर्मांनी आज एकमेकांबाबत आकस बाळगू नये. राग वा द्वेष मनात ठेवू नये. आजपर्यंत जे घडलं. घडत आलं, त्याची पुनरावृत्ती आज होवू नये. पुनरावृत्ती करु नये. कारण इतिहासात घडलेली धर्मातीत भांडणं ही केवळ औरंगजेबाच्या मनोवृत्तीनं झाली. इतर मुस्लीम लोकांच्या मनोवृत्तीनं नाही. औरंगजेबाला आलमवीर बनायचं होतं. म्हणूनच त्यानं धर्माला मध्यबिंदू करुन आपलं आलमवीर बनायचं स्वप्न पुर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठीच फतेहसिंह व जोरावर सिंह व गुरु तेगबहाद्दूर सिंह यांच्या हत्या घडल्या. तशी संभाजीचीही हत्या घडली हे तेवढंच खरं आहे. आपण मात्र त्याचाच बाऊ करुन इतर लोकांना दोष देवू नये म्हणजे झालं. कारण त्यात दोष इतरांचा मुळीच नव्हता यात तीळमात्रही शंका नाही. इतिहास हा ध्येयधोरणं ठरविण्यासाठी असतो. शुल्लकचे वाद करण्यासाठी नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०