मल्ल प्रेमयुद्ध
पहाटे ग्राउंड वर सगळ्यांचाच एक्ससाइज सुरू होता. विरला ग्राउंड वर बघून साठे सरांना आनंद झाला.
वीर पुन्हा एकदा प्रेमात बुडाल्यासारखा क्रांतीला डोळे भरून बघत. किती बघाव? आणि किती नाही हे त्याला कळत नव्हतं.
स्पर्धेमध्ये "जिंकणं" यापेक्षा तिच्यासाठी जिंकाव फक्त तिच्यासाठी तिच्या इच्छेसाठी....
क्रांतीला जाणवत होत की, वीर सतत आपल्याकडे बघतोय,
क्रांतीच्या काळजात धस्स होत होत.
ये इश्क नजरोंसे ना खेलो युं,
बात बिघड जाती हें,
हमें फिरसे प्यार हो जायेगा...
" आता कसं सांगावं ह्यांना की बघू नका..."
समीरचं लक्ष वीर कडे होतं. समीरच्या काळजात कालवा कालव होत होती. तो एकदा वीरकडे बघत होता. एकदा क्रांतीकडे बघत होता. या दोघांच्या नजरा नजरांचा खेळ समीरला सहन होत नव्हता.
आज काहीही करून समीर क्रांतीला सगळं मनातलं सांगणार होता.
साठेसरांनी सगळ्यांना आवाज दिला.
वीर राज्यस्तरीय स्पर्धेत सिलेक्ट झाला. हे जाहीर करून टाकले. सगळ्यांना आनंद झाला होता. वीरचा आनंद वेगळा होता. क्रांतीचा आनंद वेगळा होता. आणि समीरचा आनंद वेगळाच होता.
सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याला अभिनंदन केल.
साठे सरांनी दुसरा मुद्दा सगळ्यांच्या समोर मांडला.
"महाराष्ट्रमध्ये जेवढे जेवढे राज्यस्तरीय खेळाडू खेळले आहेत. तेवढे सगळे एकेक दिवस विरला येऊन कोच करतील.
क्रांतीच्या अंगावर काटा आला.
" हे काय मधीच... मी का शिकऊ ह्यांना?"
वीरचा मात्र आनंद गगनात मानत नव्हता. विरला साठे सरांनी सांगितलं,
" दिवसभराचा प्रॅक्टिस वेगळी आणि जे खेळाडू तुला शिकवायला येतील त्यांची प्रॅक्टिस वेगळी. पहिल आपल्या इथून क्रांती तुला शिकवेल.
क्रांती पटकन पुढे झाली आणि म्हणाली,
" सर मला हे मान्य नाय मी कोणाला काहीही शिकवणार नाय."
" साठे सरांनी सर्वांसमोरच तिला सांगितले हे बघ तुमचं पर्सनल रिलेशन म्हणून नाही. तर एक खेळाडू म्हणून त्याला योग्य मार्गदर्शन तुला करावंच लागेल."
" सर खेळलेत त्यांना माहिती खेळ काय तो मी वेगळं सांगायची गरज नाय आणि ते मला सीनियर हायत."
"मिस क्रांती ह्या वरतून ऑर्डर आलेत माझ्या हातात काहीच नाहीये."
वीरचा आनंद गगनात मावत नव्हता. तो गालातल्या गालात क्रांतीकडे बघून हसत होता.
तर समीरचा जळफळाट झाला. विरला काय करू आणि काय नको असं झालं होतं.
त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद क्रांतीला दिसत होता. त्याच मिश्किल हसणं तिला असह्य झालं.
तिला तेच नको होतं.... त्याच्या जवळ जाणं....त्याच्या मोहात अडकन... त्याच्या पुन्हा प्रेमात....
तन तन करत ती तिथून निघाली. रत्ना तिच्या मागे मागे आली.
" काय झालं ग? अशी का तनतन करत आलीस?" क्रांतीच्या डोळ्यात पाणी होते.
"रत्ना मला नाय जायचं त्यांच्याजवळ... नाय शिकवायचं त्यांना.. त्यांचं जवळ येन, त्यांचा स्पर्श मला नाय सहन व्हनार... मला त्यांच्या डोळ्यातलं प्रेम दिसतं... परत परत तेच खर खोट... मला नाय माहित पण त्यांच्या बलदंड बाहुत जाणं मला आता शक्य नाय."
रत्ना म्हणाली," क्रांती स्वतःवर विश्वास ठेव आण एक खेळाडू म्हणूनच शिकव फक्त..."
"वेळ तर बघितलीच ना काय दिली सगळे गेल्यावर मंजी तिथ कोण असणार साठे सर, मी आण ते बस..."
" क्रांती स्वतःवर विश्वास ठेव मन भटकू देऊ नको फक्त खेळाकडे लक्ष दे." क्रांतीनी तीचा हात रत्नाचा झटकन पकडला आणि तिच्या छातीवर ठेवला बघ अनाउन्स केल्यापासन हे असं सारखं धडधड धडधड होतंय छातीत... मला माहितीये काय होणार हाय..."
" मंजी तुझा तुझ्यावर विश्वास नाय तर..."
" माझा माझ्यावर विश्वास हाय ग पण त्या माणसावर नाय... जर त्यांनी काय केल तर काय सांगू हे मला त्रास देत्यात असं मी सांगण्यासाठी सरांना सांगणार...??"
" म्हणजी तुला तो स्पर्श त्याचं ते नजरेत रोखून बघणं हे सगळं पाहिजे तर.."
"नाही नाही रत्ना तू चुकीचं समजतीस मला हे नको हाय... का सगळं परत ? मी त्यांच्यापासून मी जितकी लांब जायचं प्रयत्न करती तितक ते माझ्याजवळ येत्यात."
वीर येरझाऱ्या घालून थकला होता. तो शांत खुर्चीवर जाऊन पाय पसरून बसला.
" जे मला हवं व्हतं तेच मिळालं. आज मी क्रांतीच्या परत जवळ जाणार..."
त्याला सरांव्ही अनाउन्समेंट पुन्हा पुन्हा आठवत होती आणि
"तो क्षण येणार ती माझ्या पुन्हा जवळ येणार... माझं चुकलं मी प्रेम केलं... पण अघोरी प्रेम केलं...त्यात वासना नव्हती... सूड व्हता... पण आता मला प्रेमाची किंमत कळती... एवढ्या दिवस मी त्यांच्यापासून लांब राहिलो माझी तडपड होत होती."
आज एवढा मोठा वीर प्रेमात पूर्ण हरला होता. त्याला प्रेम या शब्दाची जाणीव आता होत होती. त्याचं कठोर काळीज प्रेमात परावर्तित झालं होतं. त्याला कधी एकदा ती जवळ येते. तो क्षण अनुभवता येतोय असं झालं होतं. हा माणूस प्रेमात पूर्ण वेडा झाला होता. त्याच्या नजरेसमोर फक्त क्रांती क्रांती आणि क्रांती होती.
तिचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि विचार केला की,
" आपण एवढा क्रूर का वागलो? आपण जर एवढं वाईट वागलो नसतो तर क्रांती आपल्यापासून लांब गेलीच नसती. त्या आत्ता माझ्या जवळ असत्या. माझा विचार करत असत्या.
आज तिने मला या स्पर्धेसाठी प्रोत्साहन दिल असतं. जवळ राहून... " क्रांती मी तुमच्या प्रेमात पूर्ण वेडा झालोय मला तुमच्या प्रेमाची किंमत कळती... मला माणसांची किंमत तुम्ही शिकवली... मला तुमच्याजवळ परत यायचंय...
ठरवलं मनाशी ठरवलं आता फक्त क्रांती... पहिला ध्येय माझे जिंकणं असल या स्पर्धेमधी आणि दुसरं क्रांतीला मिळवन...
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. वीरने घड्याळ बघितलं. लगीच कोण आलं? असा विचार करत दरवाजा उघडला. तर दारात समीर होता.
"समीर...?" वीरच्या कपाळावर आट्या पडल्या. समीरने त्याच्या पुढे यायची हिंमत केली होती हेच खूप होतं. आज काय होणार होतं देवाला माहीत... समीरला बघून वीरचा पारा चढला. प्रेमाचा रूपांतर रागात झाले.
"तू इथं काय करतोयस?"
" मला तुमच्याशी बोलायचंय."
" काय?"
"आता येऊ का?"
वीरची इच्छा नसताना समीर आतमध्ये आला. वीरच्या आणि क्रांतीच्या लग्नाचा फोटो बघून त्याच्या कसंस झालं.
वीरने त्याला झालेल दुःख हेरल आणि म्हणाला,
"हा आमच्या लग्नातला फोटो आणि हो हे लग्न असच टिकून राहणारे...समीर आणि त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार हाय माझ्या रस्त्यात कोणी आलं तर त्याला जीवे मारायला सुद्धा मग पुढं बघणार नाय."
विरला आपली नजर समजली हे समीरच्या लक्षात आले. समीर म्हणाला,
" वीर मला जास्त काही बोलायचं नाही मी इतकच सांगतो की, माझं क्रांतीवर प्रेम आहे आणि तिच सुद्धा आहे तर तू आमच्या दोघांपासून लांब हो.."
वीरने त्याचा शर्टाची कॉलर पकडली आणि त्याला जवळ घेतले. "आत्ता बोललास परत क्रांति विषयी चुकीच शब्द आल ना तर थोबाड फोडून टाकीन... एवढ लक्षात ठेव." त्याचे ते डोळे रागाने लाल झालेले डोळे.. घामाने डबलेला चेहरा.... त्याचे हे विचित्र होतं. त्याला पुन्हा क्रांतीला मिळवायची आहे हे त्या रूपातून स्पष्ट दिसत होतं.
समीर घाबरला हादरला पण धीट करून म्हणाला,
" वीर तू क्रांतीला विचार आणि मग मला सांग." वीरने समीरच्या कानाखाली वाजवली.
"ती माझी आणि फक्त माझीच राहील डोळ वर करून जरी तिच्याकडे बघितलस ना तर डोळ काढून हातात दिन ..." वीरचा पारा चढला होता.
" चालता हो..." समीरने शर्ट नीट केला आणि निघुन गेला. कानाखाली इतक्या जोरात पडली होती, कानातून शिट्टी वाजवत होती, ओठातून रक्त वाहत होतं. त्याला वीरच्या प्रेमाचा अंदाज आला होता. पण काही करून समीरला क्रांती त्याच्या आयुष्यातून निघून जायला नको होती. त्याला क्रांती हवी होती पण क्रांतीच काय...?
सगळे प्रॅक्टिस करून निघून गेले. वीर, क्रांती आणि साठे सर तिघेच कोर्टवर होते. साठे सरांनी तिला काही सूचना दिल्या. आणि वीर आणि क्रांती दोघेजण कोर्टच्या आतमध्ये प्रॅक्टिससाठी गेले.
क्रांती तिच्या डिसिजनवर ठाम होती. तिने वीरच्या नजरेत पाहिले देखील नाही. तिने ठरवले होते त्याच्या नजरेत बघायचेच नाही. त्याला प्रत्येक गोष्ट ती व्यवस्थित समजून सांगत होती. हात पकडून दाखवत होती. तिथे कसं कसे खेळाडू असतात. काय त्याचं त्यांचं वेगळेपण असतं.वीरसुद्धा व्यवस्थित शिकत होता. साठे सरांना कॉल आला आणि ते बाहेर पडले. क्रांतीने बांधलेला अंबाडा निसटत आला. क्रांतीने अंबडा बांधायला घेतला वीरच लक्ष तिच्या केसांकडे गेल. क्रांतीचे केस बघून....
त्याने तिचा हात पकडला आणि तिला जवळ घेतले. त्याच्या बलदंड छातीवर ती खाडकन आपटली आणि डोळ्यांनीच "नका बांधू... केस" अस सांगितले.
क्रांती सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती. पण त्याचे बलदंड हात तिला सोडतील तर ना...? त्याने तिला आणखीन करकचून जवळ घेतले आणि तिच्या नजरेत बघितले. तीच घायाळ नजर...ज्याच्या वरती तिचं मन ऐकणार नव्हतं... ती स्वतः घसरणार होती त्या नजरेत... तिने त्याच्या नजरेत पाहिलं आणि ती पुन्हा विरघळून गेली. तिचा प्रतिकार थांबला आणि तिचे केस हातातून अलगत निसटले गालावर आलेल्या बटा तिने मागे करायचा प्रयत्न करताच त्यांने पुन्हा हात पकडला आणि तिच्या नजरेत बघू लागला. त्याचे हात तिच्या पाठीवरून फिरत होते. तिला हे नको असून हवस वाटत होतं. तिला समजत नव्हते . आता मी ह्या विळख्यातून कसं सुटू? ह्या नजरेतून कसे सुटू ? तो खूप जवळ येत होता खूप जवळ...? त्याचे श्वास तिच्या मानेला लागत होते. आणि ते भरकत चालली होती. त्याचे लक्ष तिच्या गुलाबी ओठांवर गेले. ओठांवर ओठ टेकताच क्रांतीने त्याला प्रतिकार केला नाही. बराच वेळ एकत्र राहिल्यानंतर तिला ते अजून हवं होतं. आता ती त्याचे ओठ सोडत नव्हती. काय होत हे??? एवढ्या दिवसांचा दुरावा... त्याने तिला अलगत बाजूला केले. आणि नेहमीसारखा तिच्या मानेवर लव बाईट घेतला आणि तिला कळ निघाली. ती जोरात ओरडली आणि भानावर आली.
त्याला जोरात ढकलून दिले. तो मागच्या दोनरखंडावर जाऊन पडला. तिला काही सुचत नव्हते. मी कशी वाहवत गेले तिचे पाय थरथर कापत होते. ति बाहेर आली. बॉटल आणि सॅक उचलली आणि पळत रूमवर गेली.
" हे काय झालं काय झालं? कसं झालं?
वीर मात्र सातव्या मनावर होता...
नैणों की मत माणियो रे
नैणों की मत सुणियो
नैणा ठग लेंगे
जगते जादू फूकेंगे रे
जगते-जगते जादू
नींद बंजर कर देंगे
नैणा ठग लेंगे
भला मंदा देखे णा, पराया ना, सगा रे
नैणों को तो डसने का चस्का लगा रे
नैणों का ज़हर नशीला रे
बादलों में सतरंगियाँ बोंवे, भोर तलक बरसावें
बादलों में सतरंगियाँ बोंवे, नैणा बांवरा कर देंगे
नैणा ठग लेंगे...
नैणा रात को चलते-चलते, स्वर्गां में ले जावे
मेघ मल्हार के सपने बीजें, हरियाळी दिखलावें
नैणों की ज़ुबान पे भरोसा नहीं आता
लिखत-पढ़त न, रसीद ण खाता
सारी बात हवाई रे
बिण बादल बरसावें सावण, सावण बिण बरसातां
बिण बादल बरसावें सावण, नैणा बांवरा कर देंगे
नैणा ठग लेंगे...
क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत