मल्ल प्रेमयुद्ध - भाग 74 Bhagyashali Raut द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 74

मल्ल प्रेमयुद्ध






"काय क्रांतीच एकसिडेंट झाला??? अस कस होऊ शकत?" आज त्याचा तो राहिला नव्हता. त्याला समोरून येणाऱ्या गाड्या समजत नव्हत्या... तो वेड्यासारखा धावत होता.त्याच्या मनाची घालमेल सुरू होती. क्रांतीला फक्त नीट बघायचे होते त्याला... बस....


"माझं आयुष्य क्रांती नीट असावी... जिला मी तिची चूक नसताना जो मानसिक त्रास दिला हाय तर माझ्या बाबतीत वाईट घडायला पाहिजे व्हत मग अस का झालं? क्रांती माझी क्रांती सोज्वळ, सालस, प्रेमळ, नको देवा माझा जीव आत्ता घे पण तिला काही होऊ देऊ नकस र देवा... माझ्या जानला नको आता कोणताच तरास न शारीरिक ना मानसिक... मी नाय तिला वाईट अवस्थेत बघू शकत... देवा हे सगळं खोटं असुदे..."

सहा फूट उंचीचा, बलदंड शरीराचा माणूस फक्त बाथरोबवर अनवाणी पायाने पळत होता. सगळे रस्त्यावरची लोक त्याच्याकडे बघत होती. त्याला कशाचीच पर्वा नव्हती. त्याला फक्त क्रांतीला बघायचं होत. चेहऱ्यावरून घामाच्या धारा लागल्या होत्या आणि डोळ्यातून पाणी.


रस्त्याच्या पलीकडे त्याला ट्रक दिसला पोलीस सुद्धा होते. लोकांची गर्दी होती. गर्दी अचानक वाढत चालली होती. त्याला वाटलं इथच आपल्या क्रांतीचा एक्सीडेंट नसल ना झाला...? तो धावत सुटला गर्दी बाजूला करत पुढे पुढे जात होता. त्याला नव्हतं ते बघायचं... रक्ताच्या थारोळ्यात क्रांतीला पडलेल पोलीस त्याला मागे घेत होते. पण त्याला पुढे जायचं होतं. त्याला स्वतःच मन सांगत होत ते बघायचं होतं.
'त्या माझ्या क्रांती नायत ..." पोलिसांना सुद्धा त्यांने हिसका दिला आणि पुढ गेला.

समोरच्या दृश्य बघून तो आधी हादरला आणि चेहरा बघून त्याच्या जीवात जीव आला.
"देवा कुणाबर सुद्धा असं वाईट घडू देऊ नकस..."
वीर जड पावलाने परतला. दोन मिनिटं उभा राहिला. त्याला कुठल्या दिशेने जायचं होतं हेच लक्षात येत नव्हतं...
तो मांडी घालून रोडवरच बसला. सगळे लोक त्याच्याकडे बघत होते. डोळे पुसले आणि देवाला धावा केला.


"इतकी वाईट वेळ नको र आणू बाबा देवा माझ्यावर ... मी वाईट वागलो ... माणसाकडून चूक व्हती पण माणूस जर त्याच्याबद्दल दिलगिरी करत असल... स्वतःला माफ करू शकत नसल तर त्याच्यासाठी एवढी मोठी शिक्षा तू देऊ नकस... देवा क्रांतीला जर काही झालं तर मी सुद्धा या जगात नसल ... तुला मलापण घेऊन जावं लागल... इतका इतका वाईट वागू नकस माझ्याबर."


वीर एवढ्या जोरात बोलत होता. सगळे लोक त्याच्या चेहऱ्याकडे बघत होते. परत त्याने उलट्या हाताने डोळे पुसले. आणि पुन्हा चालायला सुरुवात केली. नक्की कुठे जातोय तो त्याचं भान नव्हतं त्याला.


जिंकून हरल्यासारखं झालं होतं त्याला. तो हरला होता... पहाडासारखा माणूस हरला होता. स्वतःच्या हाताने आयुष्यच केलेले मातेर त्याला आत्ता समजत होत. त्याचा माज, गुर्मी, मग्रुरी सगळं एक क्षणात उतरल होत.

तिथे पोहचेपर्यंत त्याच्या जीवात जीव नव्हता. वेड्या वाकड्या, वाईट विचारांनी त्याच मन धावत होत त्याच्याबरोबर... तो बरोबर दिशेने जातोय का हे सुद्धा लक्षात येत नव्हतं त्याच्या...
संतु त्याच्या मागून गाडी घेऊन आला. त्याला जोरात हाक मारत होता.

"दाजी... दाजी थांबा..." पण ऐकायला तो त्या मनस्थितीत असायला हवा होता ना... त्याला काहीही ऐकायला येत नव्हते. त्याचे कां बंद होते थोड्या वेळाने हृदय बंद पडेल की काय अस वाटत होतं.

संतुने त्याला गाडी आडवी घातली. वीर त्याच्या गाडीला धडकला. ऋषी पटकन बाहेर आला.
"दादा चल गाडीमधून पटकन पोहचू..."
"न्हाय न्हाय तुमच्या गाडीपेक्षा मी पटकन पोचीन..."
"दादा एक चल आधीच खूप उशीर झालाय..."
त्याच्या या वाक्याने वीर सुन्न झाला. म्हणजे नक्की काय झालं असलं...? आता त्याच्या मनाची जोरात उलथापालथ झाली.
"मंजी...?"
"तू आधी चल..." वीर जड पावलांनी गाडीत जाऊन बसला. आता गाडीपेक्षा त्याच मन वेगाने तिच्यापर्यंत पोचलं होत.
"ती बरी हाय माझं मन सांगतंय मला...डॉक्टर काय म्हणाल? काय समजलं का? किती लागलंय?"
वीर वेगाने प्रश्न विचारत होता पण उत्तर कोणाकडे नव्हतं सगळे एकमेकांकडे बघत होते.
"अरे बोला कायतरी... " वीर जीव खाऊन ओरडला.
"म्हायीत न्हाय वीर... पण धीर धार आपण पाच मिनिटांत पोहचू" भूषण
एवढा बलवान माणूस हरला होता. त्याला स्वतःच्या करणीची लाज वाटत होती. "का का केलं आपण हे??? काय वाईट होत तिच्यात म्हणून आपण अशी जीवघेणी शिक्षा दिली व्हती तिला. कसल्या त्रासातून गेली असत्याल त्या... आणि आता... चांगल्या लोकांबर का व्हत अस भूषण्या... तू मला सांगत व्हतास तवा माझ्यात कायच बदल झाला नव्हता. तू तासनतास समजून सांगायचस अन मी वेड्यासारखा सूडाच्या भावनेनं पेटलो व्हतो.

कळलं न्हाय र मला प्रेम...अन एवढ्या उशिरा मला प्रेम समजतय त्या जवळ नसताना... त्यांना कोणी माझ्यामुळं...? आर्या...?"

"वीर तू टेन्शनमधी असा इचार करतोयस... अस लय बी नसलं बघ..."

"न्हाय आर्या काय पण करू शकती मी त्यांना थोडी कल्पना द्यायला पाहिजे व्हती. आर्या त्यांच्यावर चिडली व्हती. भूषण्या माह्या क्रांतीला तीन जर काय केलं असलं ना तर...? तर... मी तिला जिवंत मारून टाकीन... त्यासाठी मी आयुष्यभर खडी फोडायला तयार हाय...."

गाडी हॉस्पिटलच्या समोर उभी राहिली. वीर काहीही मागेपुढे न बघता सुसाट आतमध्ये पळत सुटला.




आज घरी कुणीच नव्हतं.
"तेजु बाई पोट लै आलय तुला... इतक्या पटापटा पायऱ्या नको ग उतरत जाऊ आता ... काय गरज नाही वरती जायची."

" आव आत्या मी हळूहळू उतारते की पायऱ्या, तुम्ही उगाच लय काळजी करता... " ती सुलोचना बाईकडे बघत बोलत होती. पण तिच्या लक्षात नाही आलं मधली एक पायरी चुकलीये. ती न बघितल्यामुळे तिचा तोल सुटला आणि जिन्याचा बाजूला असलेल्या आधाराचा हात सुटला आणि ती घरंगळत खाली आली . सुलोचनाबाई जाऊन पकडेपर्यंत तेजश्री बेशुद्ध झाली होती. घरी कोणीच नव्हतं.


" तेजू... तेजू... उठ ग..." सुलोचन बाई तिच्या चेहऱ्यावर हळूहळू थापटत बोलत होत्या. पण तेजश्री उत्तर देत नव्हती. ती पूर्णतः बेशुद्ध झाली होती. ना घरी गाडी होती ना लोक होती. सुलोचनाबाईंनी पटकन जाऊन पाणी आणले आणि तिच्या तोंडावर मारले तरीसुद्धा तेजश्री शुद्धीत येत नव्हती. सुलोचनाबाई मोठया मोठयाने शेजारच्या लोकांना हाका मारायला लागल्या पण कोणालाच आवाज जात नव्हता. का त्यांना कळत नव्हतं??? तेजश्रीला त्यांनी तसंच ठेवलं आणि पळत बाहेर गेल्या. बाहेर लोकांकडे भीक मागितल्यासारखं बोलत ...

" माझ्या तेजुला वाचवा... माझी सून पडली... माझी गरोदर सून पडली बेशुद्ध झाली. कुणीतरी वाचवा...?" सगळ्यांची घर बंद झाली. सुलोचनाबाईंना कळत ना की लोक का येत नाहीत आपल्या तेजुला वाचवायला...?
" रामा... रामा रे तू तरी उपकाराची जाणीव ठेव की... वाचवणार माझ्या तेजूला... बघ कशी निपचित पडली घरात... कुणीच नाय घरात..."
" मावशी मी वाचवलं असतं तुझ्या पण जेव्हा मला गरज व्हती तवा माझ्या मदतीला कुणी न्हाय आलं ग धावून.. मी नाय कठोर पण माझी आता इच्छा नाय यायची आणि तुला मदत करायची."
" अर तिथ आबांची चूक होती ना मग आबांना शिक्षा द्या... माझ्या सुनेच्या पोटातल्या बाळाला का देताय ??? " सुलोचनाबाईंना समजलं की इथं ओरडून काहीच उपयोग नाही. ती दुसऱ्याच्या दाराकडे पळत गेली.
" सीमा अगं किसनला सांग ना गाडी काढायला... तेजश्री बघ ना कशी निपचित पडली."
" आत्याबाई अहो ते नायात घरात ... ते बाहेर गेल्यात..."

सुलोचनाबाई अनवाणी पायाने पळत होत्या.
" राजा राजा तुझी गाडी बघ र असली तर ... वाचवणं माझ्या सुनेला.. "
राजा म्हणाला, " मावशी माझ्या पोराला दवाखान्यात जायला पैसे पायजे व्हत... आबांनी कर्जावर पैसे दिलं पण डबल व्याज लावून माझ्याकडं पैसे घेतलेत? घरात तुकडा खात नव्हतो पण कर्जाचे पैसे आणून भरत व्हतो. कारण आबा तारीख झाली की दारात उभा असायचं ..."
सुलोचना बाई आता रडव्याला झाल्या होत्या. काय करावं आबांनी केलेल्या कर्तुत्वाचा माझ्या अख्ख्या घरावर परिणाम व्हतोय.
"रामा रे पण संग्राम आणि वीरन तुमच्यासाठी किती काय काय केल, किती काम दिल तुम्हाला मिळवुन... त्याच्या तरी उपकाराची जाणीव ठेवा."
रामाने सुलोचना बाईंच्या तोंडावर दरवाजा बंद केला. सुलोचनाबाई रडायला लागल्या. पण रडून उपयोग नव्हता. त्यांना काय करावं सुचत नव्हतं. जोडलेली माणसं तोंडावर दरवाजा लावत होती. नाहीतर काहीतरी कारण काढून पळ काढत व्हती. सुलोचनाबाईंना कळत व्हतं आबा चुकीच वागलं. आबांनी सतत पैशाचा इचार केला. पण ह्याची शिक्षा माझ्या नातवंडाला आणि सुनला का...? म्हणून एक शेवटचा प्रयत्न म्हणून तिने दिनकर चे दार ठोकले.
"दिनकारा दिनकरा अरे माझी सुन पायऱ्यांवरण पडली र... तीला आणि तिच्या पोराला काहीतरी व्हईल... कृपा कर आणि गाडी काढ बाबा... माझ्या सुनेला घेऊन जाऊ आपण तालुक्याला..." दिनकरने मावशीच्या चेहऱ्याकडे बघितलं.

" मावशी तू चल पुढ काय घ्यायच ते सामान घे... मी गाडी घेऊन येतो." सुलोचना बाईंच्या जीवात जीव आला आणि सुलोचनाबाई पटकन घराबाहेर पडल्य.

काहीतरी उपकाराची जाणीव कुठेतरी दिनकरन ठेवली व्हती.

दिनकर बाहेर पडत होता तेवढा त्याच्या बायकोने त्याला अडवल.
" कुठ चाललाय...? आव मोठ्या ची जमात ही...? काय उपकाराची जाणीव राहणार नाय त्यांना.. नका जाऊ..."

दिनकरने तिचा हात झटकला.
" आबा कसपण असूदे... पण पोरं चांगली आणि आता त्यांना आपली गरज हाय ... तू मला आत्ता अडवू नकस आणि मी तुझा ऐकणार नाय..." दिनकरने शर्ट चढवला.
गाडीची चावी घेतली आणि निघाला.
तेजश्रीला त्या दोघांनी उचलून गाडी ठेवले. तेजश्रीच्या पोटात दुखायला लागलं होतं. शुद्धीवर येऊन ती विवळत होती. सुलोचनाबाई देवाचा धावा करत होत्या. सगळ्यांच्या फोन ट्राय करत होते. पण कोणाचाच फोन लागत नव्हता. तर कोणी फोन उचलत नव्हत.

दोन्ही बाजूने संकट आ करून उभं व्हत.
दोन्ही सुनांच्या जीवाला धोका होता.

सुलोचनाबाई तालुक्याला पोहोचल्या . त्यांनी तेजश्रीला दवाखान्यात ऍडमिट केलं. डॉक्टरांनी तिला चेक केलं आणि सुलोचनाबाईंना सांगितलं .
"बाई आम्ही प्रयत्न करतो तुमच्या सुनेला आणि बाळाला वाचवायचा पण गॅरंटी काहीच नाही दोघं वाजतील याची... पण आम्ही पूर्ण प्रयत्न करू... शेवटी सगळ देवाच्या हातात आहे."

सुलोचनाबाई रडायला लागल्या दिनकर त्यांना सावरत होता. तो सुद्धा सगळ्यांचे फोन ट्राय करत होता. कोणाचे फोन लागत नव्हते तर फोन लागत होते तर फोन उचलत नव्हतं.


कुठे गेले असतील सगळे ....
दोघांनाही प्रश्न पडला?

म्हणतात न... जैसी करणी वैसी भरणी...



तुका म्हणे....
तेलनीशीं रुसला वेडा । रागें कोरडें खातो भिडा ॥१॥
आपुलें हित आपण पाही । संकोच तो न धरी कांहीं ॥ध्रु.॥
नावडे लोकां टाकिला गोहो । बोडिले डोकें सांडिला मोहो ॥२॥
शेजारणीच्या गेली रागें । कुत्र्यांनी घर भरिलें मागें ॥३॥
पिसारागें भाजिलें घर । नागविलें तें नेणे फार ॥४॥
तुका म्हणे वांच्या रागें । फेडिलें सावलें देखिलें जगें ॥५॥


क्रमशः
भाग्यशाली अनुप राऊत.