ऑपरेशन एंटेबी गिरीश द्वारा पुस्तक पुनरावलोकने मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ऑपरेशन एंटेबी

पुस्तक परिचय.
ऑपरेशन ऐंटेबी. रवींद्र गुर्जर
फ्रेंच विमानाचे दहशतवाद्यांकडून अथेन्स मधुन अपहरण झाले. त्या विमानामध्ये ज्यु, इस्राएली, प्रवासी जास्त होते. इतरही देशांचे प्रवासी होतेच. युगांडा दहशतवाद्यांना सहकार्य करत असल्याने विमान युगांडातील एन्टेबी येथे उतरविण्यात आले.
तेथे युगांडाचे सैनिक व दहशतवाद्यांच्या पहाऱ्यात सर्वांना एका इमारतीत ठेवण्यात आले. इस्राएली व ज्युंना बाजूला काढण्यात आले.
हे विमान फ्रेंच असल्याने फ्रेंच सरकारने हस्तक्षेप करावा अशी इस्राएल सरकारने विनंती केली. दहशतवाद्यांनी त्यांच्या मार्फत वाटाघाटी करण्याचे मान्य केले.
इदी अमीन पुर्णपणे दहशतवाद्यांच्या बाजुने होते. खरेतर आधी इस्राएल बरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध होते. परंतु एकदा त्यांनी शस्त्र पुरवठा नाकारल्याने ते बिघडले.
वाटाघाटी सुरु झाल्या नंतर दहशतवाद्यांनी इतर देशांतील कैदी सोडावे अशी मागणी केली. त्याप्रमाणे काही इतर देशांतील नागरिकांना सोडण्यात आले. अमीन ज्यू नागरिकांची चौकशी करण्याचे त्यांना मदत करण्याचे नाटक पुरेपूर वठवत होते. त्यांचे इस्राएल मधील मित्र बार लेव्ह यांनी अमीन यांना फोन करून त्यांची भरमसाट स्तुती केली व सांगितले की तुम्ही जर या लोकांना सोडविण्यात यश मिळविले तर तुम्हाला नोबेल पारितोषिक मिळेल. अमीन म्हणाले की त्यांच्या कडे खूप स्फोटक द्रव्ये आहेत, मी तसा प्रयत्न केल्यास ते सर्व प्रवाशांना ठार मारतील. हे संभाषण इस्राएल सरकारला कळले.
अमीन यांचे हेतू स्पष्ट झाले होते. इस्राएल संरक्षण दलाने एक योजना आखली. त्यांची योजना एक हवाई लष्करी पथक पाठवून या प्रवाशांना मुक्त करण्याची होती. दहशतवाद्यांनी गुरुवार अंतिम मुदत दिली. इस्त्रायली सरकारने वाटाघाटी करण्यास मान्यता दिली, पण त्या लांबतील अशी व्यवस्था केली. तातडीची बैठक झाली, त्यात सगळ्यांचे मत पडले की आता माघार घेणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा पाडून घेणे आहे. तेव्हा या मागण्या मान्य करता कामा नये. संरक्षण मंत्र्यांनी आपली योजना सर्वांकडे मांडली. परंतु त्यात खूप अडचणी होत्या. त्यासाठी जी अमेरिकन विमाने वापरावयाची होती ती वापरल्यास अमेरिका शस्त्र पुरवठा बंद करण्याची शक्यता होती. कारण हा पुरवठा बाह्य आक्रमण झाल्यास आत्म संरक्षण करता यावे अशा दृष्टीने केला जातो. दुसरी गोष्ट योजना असफल ठरल्यास वैमानिक पथक आणि सर्व प्रवासी यांचा मृत्यू अटळ होता.
आणि अल्टीमेट रीझल्ट मंत्री मंडळ ढासळण्यात होण्याची शक्यता होती. अखेर निरपराध लोकांचे जीवन ही गोष्ट महत्त्वाची मानली जाऊन या योजनेला मान्यता देण्यात आली. या योजनेला ऑपरेशन जोनाथन असे नाव देण्यात आले कारण या मोहिमेचे प्रमुख होते जोनाथन उर्फ यॉनी. हे एक हुशार व कार्यक्षम असे अधिकारी होते. त्यांनी सर्व योजना राबवली.
अनेक वेळा हल्ल्याचे प्रात्यक्षिक घेण्यात आले आणि ग्रीन सिग्नल मिळताच हवाईदलाची हर्क्युलस जातीची उत्तम दर्जाची विमाने हवेत उडाली. त्यांनी रडार क्षेत्रात न येण्याच्या दृष्टीने ढगाखालुन कमी उंचीवरून प्रवास केला व ती यशस्वीरित्या एन्टेबीत पोचली. तेथील एका दुरच्या धावपट्टीवर उतरली. रडार केंद्रातील लोकांच्या गाफीलपणा मुळे ही गोष्ट अधिक सोपी झाली. विमानातून उतरल्या उतरल्या इस्त्रायली सैनिकांनी वादळी वेगाने कामे केली. ज्या इमारती मध्ये दहशतवादी व प्रवासी होते तेथे जाऊन दहशतवादी व युगांडा सैनिक याना मारुन ती इमारत तसेच दळणवळण खात्याची इमारत, रडार केंद्र ताब्यात घेतले. तिथे असलेल्या एका टॉवरवरून युगांडा सैनिकांनी प्रतिहल्ला चालू केला. त्याला स्वतः जोनाथन प्रत्युत्तर देत होते पण अचानक काही कारणाने ते वळले व त्यांच्या पाठीत गोळी लागून ते मरण पावले.
इस्राएल सैनिकांनी त्यांना बाजूला नेऊन ठेवून काम चालु ठेवले. तिकडे सर्व प्रवासी घाबरले होते त्यांना वाटत होते की आपल्या सरकारने बोलणी बंद केल्याने दहशतवादी आपल्याला मारण्यासाठी आले असावेत.
पण लवकरच त्यांच्या लक्षात सर्व गोष्टी आल्या व ते शूर सैनिकांच्या आज्ञे प्रमाणे विमानाकडे पळत सुटले. प्रवासी,जखमी व मृत सैनिक, जोनाथन याना पण विमानात सुरक्षितपणे आणण्यात वैद्यकीय पथकाने यश मिळवले. सर्वच्या सर्व प्रवासी एक हॉस्पिटलमध्ये असलेल्या बाई वगळता विमानात आले व विमाने सुरक्षित पणे इस्राएल मध्ये पोचली.

त्याचवेळी बार लेव्ह यांनी अमीन यांना फोन करून धन्यवाद दिले. तेव्हा अमीन गोंधळले व म्हणाले धन्यवाद कशासाठी मी अजून काहीच केले नाही. तुम्ही आपला निर्णय कळवा नाही तर दहशतवादी प्रवाशांना ठार मारतील तेव्हा लेव्ह नुसते हसले. थोड्या वेळाने परत अमीन चा फोन आला ते म्हणाले मैत्रीने दगा दिला. तुम्ही केलेले हे कृत्य लांच्छनास्पद आहे. माझा एक विमानतळ नष्ट झालाच पण काही सैनिक मारले गेले. आणि शेवटी फोन ठेवताना ते म्हणाले 'एक राजकीय नेता किंवा अध्यक्ष म्हणून नाही तर एक खंदा सेनापती या नात्याने मी तुम्हाला सांगु इच्छितो की हा पराक्रम अद्वितीय आहे, तुमच्या विमान दलाला व राष्ट्राला भूषणावह आहे.'
गिरीश.