अष्टावक्र गीता गिरीश द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अष्टावक्र गीता

अष्टावक्र गीता -
अष्टावक्र गीता ही राजा जनक व अष्टावक्र ऋषी यांच्यातील संवाद आहे.
जेव्हा राजानी अष्टावक्र ऋषींना पाहिले तेंव्हा ऋषींचे शरिर आठ ठिकाणी वक्र असलेने राजाच्या मनात विचारआला की किती कुरूप मनुष्य आहे हा.
तेव्हा त्यांनी आत्मज्ञानाने राजाच्या मनातील भावना ओळखून त्याला सांगितले की
हे राजा ! जसे मंदिर तिरके असले तरी आकाश तिरके होत नाही , मंदिर गोल अथवा लांब असल्याने आकाश गोल अथवा लांब होत नाही, कारण आकाशाचा व मंदिराचा कांहीही संबंध नाही. आकाशाला अवयव नाहीत पण शरिराला अवयव आहेत.
आत्मा नित्य असून शरिर अनित्य
आहे. शरीर वक्र असू शकते पण आत्मा नाही. ज्ञानी माणसाची दृष्टि आत्मदृष्टि असते व अज्ञानीमाणसाची चर्मदृष्टि असते.
तूं माझ्याकडे आत्मदृष्टिने पाहशिल तर तुझ्या मनातील घृणा नष्ट होईल.
ऋषींचे हे बोलणे ऐकून राजाच्या मनात आत्मज्ञान प्राप्त करण्याची इच्छा झाली.
त्यानी ऋषींना प्रार्थना केली की आपण माझ्या कडे यावे व माझ्या मनातील संशय दूर करून आत्मदृष्टि निर्माणकरावी.
त्याप्रमाणे ऋषी राजाकडे आले राजानी त्यांना एका सिंहासनावर बसविले व प्रश्नविचारण्यास सुरुवात केली. या प्रश्नोत्तरातुन अज्ञानाचे निराकरण व ज्ञानाचा उगम झाला.
राजानी ऋषींना तीन प्रश्न विचारले.
१- आत्मज्ञान कसे प्राप्त होते ?.
२ - संसार बंधनातून कसे मुक्त होता येते ?.
३ - वैराग्य कसे प्राप्त होते ?.
राजाचे प्रश्र्न ऐकल्यावर ऋषींनी विचार केला की या जगात ४ प्रकारचे लोक असतात.
एक ज्ञानी, दोन मोक्ष प्राप्ती ची इच्छा असणारा, तिसरा अज्ञानी, चौथा मुर्ख.
राजाच्या बाबतीत विचार केला तर राजा ज्ञानी नाही कारण जो संशय रहित असतो व आत्मानंदात मग्न असतो तोच ज्ञानी म्हणून ओळखला जातो पण राजाच्या मनात संशय आहे.
राजा अज्ञानी नाही कारण अज्ञानी माणसाच्या मनात चुकीच्या कल्पना असतात. मुर्खपण नाही कारण मुर्ख लोक महात्म्यांना नमस्कार करीत नाहीत. आपल्या धनाचा त्यांना गर्व असतो. पण राजा तसांही नाही कारण त्याने आपल्याला सत्कार पुर्वक घरी आणले व जिज्ञासू वृत्तीने प्रश्र्न विचारले आहेत.
यावरून असे सिद्ध होते की राजा जिज्ञासू, मोक्षार्थी व आत्मविद्येचा अधिकारी असलेला आहे.
ऋषी म्हणाले हे राजा ! तुला जर मुक्त व्हायचे असेल तर प्रथम तुला डोळे, जीभ इ. पाच ज्ञानेद्रिंयांचे शब्द, स्पर्श असे जे पाच विषय आहेत त्यांचा त्याग केला पाहिजे.
विष घेतल्यावर माणूस मरतो तसेच विषयोपभोगांमुळे माणूस संसारचक्रामध्ये (जन्म मृत्यू च्या फेऱ्यात) अडकतो.
त्यामुळे विषाप्रमाणे त्यांचा त्याग केला पाहिजे. मुमुक्षुला विषयांचा त्याग आवश्यक आहे. विषयांचे अधिक भोगाने शरिरात रोग उत्पन्न होतात व बुद्धि भ्रष्ट होते.
सारासार विचार करण्याची बुद्धि होत नाही.
राजानी विचारले हे ऋषी ! विषयोपभोगांचा त्याग केला तर शरिर कसे राहील. आजपर्यंत अनेक महान राजे , महान ऋषी होऊन गेले त्यांनी विषयोपभोगांचा त्याग केला नसला तरी ते आत्मज्ञानी झाले आहेत ,
तरी तुम्ही मला त्यांचा त्याग करणेस कसे सांगत आहात ?
ऋषी म्हणाले की इथे विषयांचा त्याग असा अर्थ नसून विषयांच्या आसक्ति चा त्याग असा आहे. विषय हे बंधन नसून आसक्ति हे बंधन आहे. या विषयांपैकी एखादा न मिळाल्यास त्याची आसक्ती न वाटणे किंवा अधिक भोगण्याची इच्छा न होणे म्हणजे आसक्ती चा त्याग म्हणजे विषयांचा त्याग.
जे मिळाले आहे त्यात समाधानी राहणे, लालसा न वाटणे , त्यांना मिळवण्यासाठी खोटेपणा न करणे, ते मिळविण्यासाठी कोणापुढे हात न पसरणे, ते मिळतं असताना त्यांचा त्याग करण्याची इच्छा होणे म्हणजे वैराग्य.
राजा - जगात वस्त्रहीन राहणारे व भिक्षा मागून खाणारे यांना वैराग्य प्राप्त झालेले लोक असे म्हणतात.
ऋषी - अशा लोकांना वैरागी म्हणणारे अज्ञानी असतात. जर त्यांना वैरागी म्हणायचे तर प्राणी व वेडे यांना पण तसे म्हणावे लागेल. जर भिक्षा मागणारे वैरागी समजलें तर दरिद्री लोकांना पण तसे म्हणावे लागेल. जिथे प्रकाश असतो तिथे अंधार असतं नाही. ते परस्पर विरोधी आहेत.
सत्व गुणाचे निदर्शक सत्य व योग्य विचार आहे तसे तमोगुणाचे निदर्शक वस्रहीन राहणे आहे. त्यांना बाराही महिने शरीराला त्रास आहे. थंडीत थंडी मुळे बेजार, उन्हाळा, पावसाळ्यात कीटक चावून ते दुःखी होतात व विचार करू शकत नाहीत.
जर कोणतीतरी इच्छा ठेवून एखादा शरीराला त्रास देत असेल तर भगवान श्रीकृष्णांनी पण सांगितले आहे की त्याला तामसी तप म्हणावे. यावरून समजतें की वस्त्रहीन राहणे म्हणजे वैराग्य नव्हे.
मदिरा घेतल्यावर जसे शरिराचे भान राहत नाही तसेच जीवन्मुक्त ज्ञानी माणसा ची वृत्ति असते, शरीराची ओढ नसते. ही अवस्था जीवन्मुक्त माणसाची आहे मुमुक्षुची नाही. सांसारिक गोष्टींचा मोह सोडणे म्हणजे वैराग्य आहे.
क्षमा वृत्ति असलेला , मृदु , दया असलेला व सत्यवचनी असाचं मनुष्य वैराग्यवान असतो व ज्ञान मिळवू शकतो.