दासबोध गिरीश द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
शेयर करा

दासबोध

दासबोध
समास - २ गणेश स्तवन

श्री समर्थ श्री गणेशाला प्रार्थना करतात की हे ज्ञान व बुद्धी देणाऱ्या, अज्ञान दूर करणाऱ्या व सर्व भक्तांच्या हाकेला धावून येणाऱ्या
देवा ! मला हे लिखाण करण्यास शक्ति दे.
तू मोह व अज्ञान दूर करणारा आहेस, व सर्व अडचणी व भय व शंका दूर करणारा आहेस. म्हणून तुला विघ्नहर्ता म्हणतात. तू सर्वांचा त्राता आहेस. सर्व देव पण तुला वंदन करतात.
जगातील सर्व जे चांगले आहे त्याचा तू कर्ता आहेस. तुला वंदन करून कार्य चालू केले तर ते यशस्वी होणारचं. तो नुसती आठवण काढली तरी हांकेला धावून येतो.
ज्याचे नृत्य बघण्याचा मोह देव सुद्धा टाळू शकत नाहीत व त्याच्या तालावर नाचू लागतात. त्याचा शांत चेहरा पाहून मन प्रसन्न होते. त्याच्या अंगी अमर्याद शक्ति आहे.
त्याच्या कपाळातुन स्रवणारा द्रव सुगंधी आहे. तो ज्ञानाचा देव आहे. त्याच्या मुकुटावर अनेक हिरे आहेत. त्याचे दात शुभ्र व मजबूत आहेत. त्याला चार हात आहेत.
पोट मोठे व पुढे आलेले आहे ते त्याच्या सौंदर्यात भरच टाकते आहे. कमरेभोवती नाग आहे व तो नेहमी पवित्र असे पितांबर नेसतो. त्याच्या गळ्यातील माळा नागापर्यंत येतात. त्याच्या दोन्ही हातात शस्त्रे आहेत.
तिसऱ्या हातात कमळ व चौथ्या हातात त्याचा आवडता मोदक आहे. त्याचे शरीर मोठें असले तरीही तो चपळ आहे. (सर्वात वेगवान आहे). कोणी लिखाणासाठी मदत मागितली तर तो पूर्णपणे मदत करतो. मी त्याला भक्तिभावाने वंदन करतो.
ब्रह्मदेवांसह सर्व त्याला वंदन करतात. गणेशाच्या भक्तिने ज्ञान प्राप्त होते व सरस्वती देवीचा आशीर्वाद लाभतो.
तो अज्ञानी माणसाला ज्ञानी करू शकतो. तो सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे. मी माझ्या बुद्धि नुसार त्याचे वर्णन केले आहे, पण तो वर्णनापलिकडे आहे हे मी जाणतो.
दासबोध - समास ३.

मी वेदांची माता, ब्रह्मदेवाची मुलगी व ध्वनीचे (नाद) उत्पत्ती स्थान असणारी व महामाया अशा शारदामातेला वंदन करतो.
शारदामातेमुळे सूक्ष्मरुपात शब्द निर्माण होतात. तीच्यामुळेंच आपल्याला शब्दांचे अर्थ कळतात. शूर पुरुषांची निर्भयता व योग्यांच्या समाधीमध्ये ती स्थित आहे.
तिच्या प्रेरणेनेंच साधु महान कार्य करण्यास प्रवृत्त होतात.
ती योग्यांना ध्यानात, साधकांना चिंतनात स्थिर होण्यासाठी मदत करणारी व सिद्धपुरुषांच्या अंतःकरणात समाधीरुपाने स्थिर होणारी आहे. ती ईश्वराच्या स्वरुपात लिन होउन राहिलेली असते.
तिचे खरे स्वरूप आकलन होत नाही. मनामध्ये निर्माण होणारी निर्मल स्फुर्ती तीच आहे. ती जीवाला शांती प्रदान करते. माणसाच्या अंतःकरणात ती तीन वाणींमध्ये स्फुरते व शब्दरुपाने प्रगट होते.
शब्दाने व्यवहार चालतात म्हणून जगातील सर्व कर्तुत्व तीच्या शक्तिने चालते.
शारदा देवी परमार्थाचे मुळ आहे.
शास्त्रे, पुराणे, वेद, श्रुती तीची स्तुती करतात. शारदा म्हणजे जीचा अंत लागत नाही
अशी " माया " आहे. भगवंताची भक्ति, भजन व स्तुति तीच्या मदतीशिवाय करता येत नाही.
म्हणून श्रेष्ठाहून श्रेष्ठ व ईश्वरांची ईश्वर असलेल्या शारदादेवीला मी नमस्कार करतो.
सदगुरू स्तवन
माया सुद्धा ज्याला स्पर्श करू शकत नाही ते सद्‌गुरु रुप अज्ञानी माणसाला कसे कळणार. श्रुती पण असे नाही असे नाही म्हणतात त्या स्वरुपाचे आकलन कसे होणार.
नमस्कार करून सद्गुरूना सांगतात की मला या भवसागरातून पैलतीरावर न्यावे.
आपल्या मनात जसे भाव असतात त्याप्रमाणे आपण देवाचे ध्यान करतो तसेच मी शब्दांत सद्‌गुरुंचे स्तवन करतो.
दीनबंधु, विश्वाचे बीज, विश्वात भरुन उरणारा आणि मोक्षाची ध्वजा धारण करणारा असा तू हे सद्‌गुरु राजा, परमपुरुष आहेस. तुझा जयजयकार असो.
सद्गुरू ना उपमा कोणती द्यावी तर त्यात काही उणें दिसते.
सूर्य - सूर्यास्तानंतर अंधार होतो पण सद्गरु अज्ञान रुपी अंधार समूळ नष्ट करतात. शास्त्रे सांगतात की सूर्यप्रकाशाला मर्यादा आहेत पण सदगुरुंच्या ज्ञानप्रकाशाला मर्यादा नाहीत.

परिस- परिसस्पर्शाने लोखंडाचे सोने होते पण त्याचे परत लोखंड होत नाही. सद्‌गुरू कृपा होते त्याला कसलाच संशय राहत नाही. परिसस्पर्शाने सोने झालेल्या सोन्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होत नाही. पण सद्‌गुरू कृपेने शिष्यास गुरुत्व प्राप्त होते.
समुद्र, क्षिरसागर - समुद्र खारट असतो तर क्षिरसागराचा कल्पांतकाळी नाश होतो.
सद्गुरू अमृतरुप असून शाश्वत असतात.
मेरु - पर्वत कठोर असतो तर सद्‌गुरु मृदु असतात. सद्गुरू शाश्वत असतात.

जल हे आटणारे असून सद्‌गुरु रुप निश्चल व स्थिर आहे. कल्पवृक्ष मागेल ती आपल्या कल्पनेतील वस्तू देतो पण निर्गुणी सद्गुरू इच्छाच (वासना) नाहिशा करतात.
सदगुरुंमुळे चिंताच राहत नाहीत त्यामुळे चिंतामणीची गरजच नाही.
सद्‌गुरू जवळ मोक्षलक्ष्मी असल्याने इतर वैभवाची आवश्यकता नाही.
सदगुरु हे अविनाशी आहेत. सदगुरुंचे वर्णन करता येत नाही हेच त्यांचे वर्णन आहे. केवळ ज्ञानी महात्म्यांनाच ते आकलन होउ शकते.
जय जय रघुवीर समर्थ.