Music and song should be created well books and stories free download online pdf in Marathi

संगीत व गाणं चांगलं निर्माण व्हावं

संगीत व गाणं चांगलं निर्माण व्हावं?
*आज अश्लील गाणे निर्माण होत आहेत. ज्यात जणू स्पर्धाच लागलेली आहे. ज्यात 'चोली के पिछे क्या है' 'छत पे सोया था बहनोई' 'चढ गया उपर रे' 'रुख्मनी रुख्मनी, शादी के बाद क्या क्या हुआ' पासून तर आजच्या 'शिला की जवानी' पर्यंत. खरंच असे गाणे हे परीवारासह ऐकायलाही लाज वाटते व विचार येतो की निर्माण थोड्याशा पैशासाठी का आपलं इमान विकत असावेत. त्यांनी चांगलं गाणं का निर्माण करु नये. असा अंगप्रदर्शनाचा तमाशा त्यांनी का मांडावा? हा विचार करणारा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहात नाही.*
गाणं.......अतिशय मोलाची गोष्ट. आधीपासूनच गाण्याला फार पसंती आहे. शिवाय गाणं महत्वपुर्ण बाब नाही तर त्या गाण्याला असलेली चाल, त्यात टाकलेले संगीत. ज्यातून परीपुर्ण गाणं बनतं. ते महत्वाचं आहे.
आज विशिष्ट वय झालं की लोकांना नवीन गाणे ऐकायलाच आवडत नाहीत. त्यांना जुनी व क्लासीकल गाणी आवडतात. त्यांच्या काळातीलही गाणी आवडत नाहीत लोकांना तर त्याहीपुर्वीची गाणी आवडत असतात. संगीत निर्माण कसं झालं वा गाणं कसं निर्माण झालं असेल? असा चिकीत्सक प्रश्न कोणालाही पडू शकतो आणि तशी शंका निर्माण होणं साहजीकच आहे.
संगीत हे पाण्याचं वाहाणं, पक्षाचा आवाज येणं, रात्रीला किड्यांचा आवाज येणं, चाकाची गाडी चालतांना येणारा आवाज यातून निर्माण झालं असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण याच आवाजात संगीत होतं. झुगारून वाहाणारं पाणी. त्याला विशिष्ट असाच आवाज असायचा. चाकाची गाडी चालतांनाही विशिष्ट असाच आवाज असायचा. तसंच रात्रीला कानावर येणारे किड्यांचे आवाजही वेगळ्याच स्वराचे असायचे.
माणूस पुर्वी झाडावर राहात होता असा आपला प्रागैतिहासीक इतिहास सांगतो. त्यानंतर तो जेव्हा खाली अर्थात जमीनीवर आला. तेव्हा तो अशा आवाजाच्या मोहक दृश्यांच्या ठिकाणी उभा राहायचा व त्या दृश्यांचे निरीक्षण करायचा. ते दृश्यच त्याला आवडायचं नाही तर ते नैसर्गिकरित्या निर्माण झालेलं संगीतही त्याला आवडू लागलं. शिवाय त्यातच त्यानं त्या दृश्यांचं ओबडधोबड वर्णन केलं. ती म्हणजे माणसाची पहिली कविता. तेथूनच कवितेचा जन्म झाला असावा. मात्र शब्दांचा जन्म त्याही पुर्वीचा असावा.
साधारणतः गाण्याची उत्पत्ती ही गतकाळातील एक महान शोध होता. गतकाळातील अंदाजे चाळीस हजार वर्षापुर्वी संगीताचा शोध लागला असं विचारवंतांचं म्हणणं आहे. एक अस्वलाचं हाड सापडलं आहे चाळीस हजार वर्षापुर्वीचं. ज्याला छिद्र आहेत. बहुतांश ती मानवानं पाडलेली असून तिलाच बासरी मानलं गेलं असावं असं संशोधक सांगतात. तसंच विशेषतः गाण्याच्या तालमी ह्या प्राचीन भारत, चीन व ग्रीस या देशातून केल्या गेल्या असाव्यात व गाणं हे मनोरंजनाचं साधन ठरलं असावं असंही संशोधक आपल्या विचारातून मांडतात. शिवाय काल मनोरंजन म्हणून अशाच गायनाचा व संगीताचा उपयोग केल्या जायचा. विशेष असं आयोजन केलं जायचं त्या काळात. कधी पीक निघाल्यावर तर कधी युद्धात विजय मिळाल्यानंतर. कधी ते देवादिकांना भोग म्हणून उत्सव साजरा करतांना अशा संगीत व गाण्याच्या तालमीचं आयोजन करीत असत.
आज तालबद्ध गाणं व संगीत जगात निर्माण केलं जातं. त्याचे अनेक प्रकार पाडले आहेत. ज्यात सध्याच्याही संगीत प्रकाराचा समावेश आहे. सध्याच्या संगीत प्रकारात पॉप व रॉक अशा प्रकारची गाणी येत असून पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण त्या गाण्याच्या प्रत्येक ठेक्यावर दिसत आहे. जे आधुनीक काळातील नव्या युवक वर्गाला आवडतं. त्यांना केवळ ते गाणंच आवडत नाही तर त्यातील विभत्सपणा आवडतो. यावरुन पुर्वी तसा विभीत्सपणा गाण्यात नव्हता काय? पुर्वीही तसाच विभत्सपणा होता. मात्र गाणं क्लासीकल होतं. शिवाय त्या गाण्याला असणारं संगीतही तेवढ्याच तोडीचं असायचं. त्याच संगीताच्या जोरदारपणानं ते गाणं उठून दिसायचं. शिवाय ते गाणं उठून दाखवत असतांना जास्त दृश्य चित्रीकरण केल्या जात नव्हतं. शिवाय ते गाणं चित्रीकरण करीत असतांना जास्त पैसेही मोजावे लागायचे नाहीत. तरीही ते गाणं हिट ठरायचं. परंतु आज तसं नाही. आजचं एक गाणं बनवतांना एवढे दृश्य त्या गाण्यात असतात की ज्याला कितीतरी पटीनं खर्च लागतो. शिवाय त्या गाण्याचं शुटींग विमानातूनही होतं. तरीही ते गाणं बाजारात फ्लॉप ठरतं.
महत्वाचं म्हणजे आपण गाणं आणि संगीत कसं निर्माण करतो हा भाग नाही. परंतु ते गाणं कसं लोकांच्या ह्रृदयाला भिडेल? लोकांच्या ह्रृदयाचा कसा ठाव घेईल हा प्रश्न आहे. ते गाणं जर जनसामान्यांच्या कानापर्यंत जात असेल व त्याला आवडत असेल तर ते गाणं अतिशय महत्वाचं. मग त्यात कमी दृश्य असली तरी चालेल. असंच गाणं व संगीत आज निर्माण होण्याची गरज आहे. परंतु आजच्या गाण्यात निव्वळ भडक दृश्य वापरली जातात. चित्रपटाचं गाणं म्हटलं तर आज अश्लीलतेचं प्रदर्शनच जणू मांनलं जातं. आज गाण्यानं क्लासीकल गाणं म्हणून जी ओळख होती. जे गाणं आबालवृद्ध सारेजण मोठ्या आवडीनं ऐकत, ती जागा सोडलेली असून त्या गाण्यानं अश्लिलतेचं प्रदर्शन मांडलेलं आहे असंच प्रत्यक्षदर्शी लक्षात येत आहे. जसे. शिला की जवानीसारखे गाणे. शिवाय त्या गाण्यातून जनमाणसात चांगला संदेश जात नाही.
विशेष म्हणजे गाण्यात नाही अश्लिलता भरली तर ते गाणं होवू शकत नाही काय? होवू शकते. परंतु आज चित्रपट बनविणाऱ्या लोकांनी आपला चित्रपट जगाच्या स्पर्धेत उतरावा म्हणून ते गाण्यातच अश्लिलता भरतात श पुर्णतः चांगल्या गाण्याला बेसुरपणा आणतात. हे बरोबर नाही. विशेषतः गाणं जेव्हा निर्माण झालं त्यावेळेस ते गाणं एका वेगळ्याच दृष्टीकोनातून निर्माण झालं होतं. तो दृष्टीकोन आज लोप पावत चालला आहे असे दिसते. हे असेच सुरु राहिले तर एक काळ असा येईल की त्या गाण्याला गाणंच म्हणता येणार नाही. ज्याची सुरुवात आज निर्माण होत असलेल्या गाण्यातून दिसत आहे. आजचे गाणे असेच बेसूर तालाचे निर्माण होत आहेत. ना त्यात बरोबर संगीत दिसत ना काही ताल. फक्त दिसतं ते अंगप्रदर्शन. जे अंगप्रदर्शन आबालवृद्धांना आवडत नाही. तसंच आजचं गाणंही पुर्ण परीवारासह कोणीही ऐकू शकत नाहीत अशाच स्वरुपाचे गाणे व संगीत आज निर्माण केले जात आहेत.
महत्वपुर्ण गोष्ट ही की गाणं व संगीत निर्माण व्हावं. ते सर्व लोकांसाठीच असावं. त्यातून अश्लीलता दिसू नये आणि ते परीवारासह सर्वांनाच ऐकावंसं वाटावं. ज्यात शिलाकी जवानी नसावी. अन् नसावे ते बोल. जे आबालवृद्धांना नकोसे वाटतील.
महत्वाचं म्हणजे संगीत व गाणं चांगलं निर्माण व्हावं? असं कोणाला वाटत नाही. प्रत्येकालाच वाटतं. परंतु आज अश्लील गाणे निर्माण होत आहेत. ज्यात जणू स्पर्धाच लागलेली आहे. ज्यात 'चोली के पिछे क्या है' 'छत पे सोया था बहनोई' 'चढ गया उपर रे' 'रुख्मनी रुख्मनी, शादी के बाद क्या क्या हुआ' पासून तर आजच्या 'शिला की जवानी' पर्यंत. खरंच असे गाणे हे परीवारासह ऐकायलाही लाज वाटते व विचार येतो की निर्माण थोड्याशा पैशासाठी का आपलं इमान विकत असावेत. त्यांनी चांगलं गाणं का निर्माण करु नये. असा अंगप्रदर्शनाचा तमाशा त्यांनी का मांडावा? हा विचार करणारा प्रश्न प्रत्येकाला पडल्याशिवाय राहात नाही.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED