श्रद्धा Gajendra Kudmate द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

श्रद्धा

नमस्कार मित्रांनो, आज मी अशा
विषयावर माझे मनोगत मांडणार आहे, जो
विषय तुमचा माझ्या आणि आपल्या
सगळ्या भारतीय बांधवांचाशी निगड़ित आहे आणि असणार. हा विषय आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे. तो विषय आहे, श्रद्धा जी तुमच्यात माझ्यात आणि आपण सगळ्यांचा अंतकरणात आहे. मला भारतातील कुठल्याच जाती धर्म देव यांचाशी कसलीच हरकत नाही आहे
उलट त्यांचासाठी सर्वथा आदर सन्मान आहे. मी सगळ्यांच देवांना धर्माला मानतो, मी ज्यावेळेस ज्या देवालयाचा आत जातो किवा त्या देवालयाचा शेजारून, समोरून
पूढ़े जातो. तेव्हा मी श्रद्धेने मन भावनेतून त्या देवालयात विराजमान देवाला नमस्कार करतो त्याची वंदना करतो. त्यावेळेस मी कसलाच विचार करत नाही की हे त्या फलान्या देवाचे मंदिर आहे तर मला वाकून नमन केले पाहिजे आणि हे त्या अलान्या देवाचे मंदिर आहे तर त्या देवाला नमन करायचे नाही. कारण की मला माहीत आहे ईश्वर हा एकच आहे तुमचा माझा आणि सगळ्यांचा फक्त आणि फक्त जाती धर्म यांचा नावावर त्या देवाला विभाजीत केलेले आहे, काही निवडक अशा मनुष्यांनी. काही माझ्या भाऊबंधांना माझे बोलने पटणार नाही. मला त्याची काहीच हरकत नाही आहे कारण की प्रत्येक मनुष्याची एक वेगळी आपली भावना आणि समज असते. स्वतःचा नजरेने जर आपण पुढ़े बघितले तर आपल्याला आपण सर्वथा उचीतच वाटणार तिकड़े काहीही असोत. तर मीत्रांनो, आपण सगळे माझ्यापेक्षा जास्ती परिपक्क आणि बुद्धिजीवी आहात म्हणून मी काय म्हणतो आहे आणि काय नाही हे तुम्ही सगळे समजून गेलेले असणार. तर तुमची जास्तीची वेळ न घेता मी थेट मुद्द्यावर येण्याचा प्रयत्न करतो.

तर मीत्रांनो, मी आधी बोललो त्याप्रमाणे आपल्या भारत देशात विभिन्न जन आणि जातीचे लोक राहतात. त्याचप्रमाणे त्या विभिन्न जनजाती नुसार आपल्या देशात विभिन्न असे धर्म सद्धा आहेत, मी कु जरी चूकत असेल तर कृपा करून माझे उचीत मार्गदर्शन करून माझी
चुक दुरुस्त करण्याची संधी द्यावी ही विनंती. त्याच बरोबर माझ्या बोलण्याचा गैरसमज न करून घेणे ही एक मौल्यवान अशी हात जोडून विनंती आहे. तर माझा अल्पशा बुद्धिमत्तेनुसार आपल्या देशात विभित्न जातींचा अनुपातात विभिन्न धर्म सुद्धा वास्तवाला आहेत. जेथे मनुष्य आहे तेथे जाती धर्म आला, जेथे जाती धर्म आले तेथे निश्चित देव आणि दैवत आले आणि जेथे देव आणि दैवत आले तेथे श्रद्धा ही आलीच. तर त्या विभिन्न लोकांची विभिन्न देवांचा प्रती विभिन्न अशी श्रद्धा ही असणारच कठल्याच वादविवादा शिवाय, तर ही श्रद्धा मनुष्याचा मन मस्तिष्कात येते कुठून कुणी मला सांगू शकेल काय. हे बघा मीत्रांनो, मी काही खुपच विद्वान नाही आहे की मी खुप काही अभ्यास केलेला आहे या विषयावर. मी फ़क्त माझ्या सामान्य बुद्धीचा अनुपातात एक सामान्य अशी गोष्ट बोलत आहे. माझ्या सामान्यज्ञानाचा नुसार मला वाटते की ही श्रद्धा प्रत्येक मनुष्याचा
मन मस्तिष्कात सगळ्यात आधी त्याचा आई वडिलांचा द्वारे त्याचा मनात येते, त्यांचा कडून दिलेल्या त्यांचा संस्कारातुन येते आणि मग जस जसा तो मोठा होतो त्याची आचार विचार करण्याची क्षमता वाढ़त जाते किंवा वाढ़ते तेव्हा त्याचा मन आणि मस्तिष्कात ही श्रद्धा घातली जाते.
माझ्या शब्दाचा अर्थ म्हणजे उचित अर्थ तुम्ही समज़ून घ्या घातली जाते आपोआप ती नैसर्गिकरीत्या ती येत नसते.

माझ्या या शब्दावर आणि माझ्या बोलण्यावर अनेक जण आपेक्ष घेऊ शकतात, ते म्हणु शकतात की मी सर्वथा अनुचीत बोलत आहे श्रद्धा ही जन्मजातच मनुष्याचा अंतकरणात येत असते. येथे मी म्हणतो त्यांची सुद्धा गोष्ट बरोबर आहे आणि असणार, परन्तु आपण हे विसरतो
की जेव्हा मनुष्य हा जन्म घेतो तेव्हा तो अबोध असतो. त्याला कसल्याच प्रकारचे ज्ञान हे कळत नसते. तो तर त्यावेळेस एका भिजवलेल्या मातीचा गोळ्यासारखा असतो. त्याला त्यावेळेस एक आकार देण्याची आवश्यकता असते आणि तेच काम सगळ्यात आधी त्याचे जन्मदेते, मग त्याचा
समाज तो आकार देण्याचे कार्य करतो. अहो आपण आपल्या लहान अबोध बालकांना त्यांचा बालपणात याचाकड़े जायचे त्याचाकड़े नाही जायचे असे शिकवतो, कारण की त्याचा अबोध मनाला त्यावेळेस काहीच कळत नाही. त्याला तर त्यावेळेस सगळे एकसारखेच दिसतात आणि वाटतात, त्याचा त्या अबोध निर्मळ अशा बालमनात फरक करणे हा सगळ्यात पहिला गुण टाकतो. त्यानंतर तो बिचारा आपल्याकडून दिलेल्या गुणाला स्वतःत आत्मसात करतो. त्यानंतर आपल्यात आणि परक्यात फरक करणे शिकतो. त्यावेळेस त्याचा कानावर जे पड़ेल आणि डोळ्यांनी जे दिसेल त्याचा नुसार तो त्या गोष्टींचा विचार करतो. कारण की त्यावेळेस त्याचाकडे ती विचार विमर्श करण्याची बुद्धि आलेली नसते. काही वर्षानी जेव्हा
तो वयात येऊ लागतो त्यावेळेस त्याला समाजाकडून आणि त्यातील लोकांचाकडून जे काही ज्ञान प्राप्त होते. तो ते ज्ञान त्याचा बुद्धिमत्तेनुसार आत्मसात करतो.
तर मित्रांनो, माझा मुद्दा हा याच शब्दावर आधारित आहे. मागील गेलेल्या काही वर्षापासून सर्वथा आपल्याला हे चित्र दिसून येत आहे की मनुष्याचा मन आणि मस्तिषकात श्रद्धा ही बळजबरीने नाही म्हणणार मी परन्तु काही सी त्याचा मन आणि मस्तिषकाला संभ्रमित करून
त्याचा मनात श्रद्धा ही रुजू केल्या जाऊन राहिली आहे. येथे आजचा मनुष्य तो एक अबोध बालक नाही तर एक परिपक्व असा तरुण म्हणा की मध्यम वयीन मनुष्य असोत तो जन्म घेणाऱ्या बालकाचा प्रमाणे होऊन गेलेला नाही म्हणणार मी. त्या परिपक्व अशा मनुष्याला अबोध बालक
समजुन किवा बनवून त्याचा परिपक्व अशा बुद्धित श्रद्धा ही त्याचा मस्तिषकाला संभ्रमित करून घातली जात आहे. कुठे बळजबरी होत आहे तर कुठे त्याचा भावनांशी खेळ करुन घातली जात आहे. माझा हा मुद्दा पटवण्यासाठी मी तुम्हाला सविस्तर काही उदाहरण सुद्धा देणार
जेणेकरून तुम्ही मी काय बोलतो आहे. खरे बोलतो आहे की खोटे बोलतो आहे हे कळून चुकेल, त्यापूर्वी पुन्हा मी चुकत असेल तर मला निश्चित तुम्ही करेक्ट कराल अशी विनंती आणि माझा शब्दांचा अनर्थ न काढता मला मार्गदर्शन करण्याची तुमच्याकडुन अपेक्षा बाळगतो. तर मित्रांनो,
मी आधीच म्हटले आहे आणि तुम्ही सुद्धा हे भलीभाती जाणता की इश्वर हा एकच आहे. तो या पृथ्वीचा कणाकणात समाविष्ट आहे. तो कधीं एखाद्या दगडात दिसतो तर कधी पाशाणात, कधी पाण्यात तर कधी वाळवंटात आणि कधी तो मानवाचा स्वरूपात दिसतो. अहो मी खर बोलतो
आहे आज देव आपल्याला मानवाचा स्वरूपात दिसतो आहे. तुम्ही रोजच त्यांना तूमचा समोर तुमचा टीव्हीवर बघता. ते कधी तुम्हाला साक्षात आमोर सामोर तर कधी टिव्हीचा माध्यमातून भेटतात.

ते रोजच एका निश्चित वेळेवर नाही तर दिवस भरातून कधीही तुम्हाला त्या निरंकारी इश्वराचा बाबतीत सांगत असतात. त्यांचात फरक मात्र एवढाच असतो की प्रत्येक जण प्रत्येक वेळेस एकच गोष्ट सांगतात फक्त आणि फक्त तेथे त्यांचा देव हा वेगवेगवळा असतो. ते तुम्हाला रोजच
सत्कर्म करण्यास सांगतात आणि सत्कर्म करणे ही फारच चांगली गोष्ट आहे. आपण सगळ्यांना आपल्या संपूर्ण आयुष्यात सत्कर्म हे निरंतर न चूकता केलच पाहिजे. परन्तु माझा प्रश्र हा आहे की यासाठी वेगवेगळ्या देवतांचे उदाहरण देऊन का बर हे शिकवले जाते. आता तर काही
मानवरूपी देव सरळ सरळ त्या निरंकारी अशा देवाची निर्मित त्याची अदभूत अशी कलाकृती म्हणजे मनुष्य, त्या मनुष्यात फरक करण्यास सांगतात. आपण भारतीय आहोत आणि आपण एक आहोत असा अनमोल असा नारा देऊन आपले पूर्वीचे काही थोर महात्मे होऊन गेले. तर या त्यांचा ब्रीदवाक्याला पूर्ण पणे बदलुन टाकण्याचे कार्य आज होत आहे. आज कितीही दिखावा करण्यासाठी म्हटले जाते की आपण मानव जात एक आहोत, परंतु मनातून वारंवार एकच आवाज येत असते ती म्हणजे आपण उच्च आहोत आणि उरलेले नीम्मे आहेत. त्याच बरोबर आपण
या धर्माचे आहोत ते वेगळ्या धर्माचे आहेत असा फरक करण्यास सांगीतले जाते. आपण सगळे आजवर देवाची पूजा ही निरंतर करत आलो आणि जेव्हां पर्यन्त हे आपले जीवन आहे. तेव्हा पर्थत आपण ती न चूकता करत राहणार, माझ्या घरी सगळ्याच देवंचे फोटो आहेत. त्या सगळ्या देवांची पूजा आमचा वडिलांचा जन्माचा वेळेपासून होत आली आणि पूढ़ेही होणार तर मग यात नाविन्य काय, अमुक्या देवाची पूजा मी केली म्हणून काहीं विशेष नाही आणि कुणी दुसऱ्याने केली तर ती काय जगावेगळी झाली काय, ज्या देवाची पूजा ही अनंत काळापासून आविरत
होत आली, तर त्याच देवाची पूजा कुणी एका मनुष्याने पुन्हा केली तर त्याचा होहल्ला करने आवश्यक आहे काय.
माझा प्रश्न अजूनही तेथेच आहे की ते स्वतःचाच देवाला श्रेष्ठ ठरवण्याचा प्रयत्न का बर करतात, सरळ सरळ हे सगळ एकाच ईश्वराने केलेले आहे आणि करतो आहे असे म्हणून मोकळे का बर होत नाहीत. उगाच दुसऱ्या मनुष्यांचा डोक्यात भ्रम निर्माण करत असतात, आपत्या
या भारत देशात आस्था आणि श्रद्धा ही बाब इतकी विध्वंसकारी आहे की या बाबीला केंद्रबिंदू धरुन एखादी चिंगारी जरी पेटली ना तर घरचे घर उध्वस्त होत आले आहेत आणि होत राहणार. मग हे मानवरूपी देव या गोष्टीला जाणतात तरीही या गोष्टीला इतके महत्त्व का बर देतात.
याचे उत्तर असे असू शकते आणि ते म्हणजे त्यांचा स्वतःचे महत्व सगळ्या जनतेतेला संपूर्ण मनुष्य जातीला व्हायला पाहिजे म्हणून. याच श्रद्धेला एक अस्त्र म्हणून वापरते जाते आणि या श्रद्धेचा वापर हा व्यापार म्हणून केला जातो. काही वर्षाचा पूर्वी टीव्हीवर एका धर्माची धार्मिक वाहिणी उघडली. त्या वाहिनीवर त्याच धर्माचा बद्दल माहिती सांगण्यात येऊ लागली. तीला बघता बघता पुढ़ील काही वर्षात पुन्हा नवनवीन अनको धर्माचा अनेको वाहिन्या उघडल्या गेल्या. त्या वाहिन्यांवर सुद्धा तेच सुरु होऊन गेले की अमक्या धर्माने असे केले आणि अमक्या धर्म हा श्रेष्ठ आहे त्यासाठी तुम्ही सुद्धा या धर्माचा अवलंब करा. या नवनविन वाहिन्यांचा अनुपातात अनेको नवनविन मानवरूपी देव या भूतलावर प्रकट झाले. त्यांना कसे आणि काय देवत्व प्राप्त झाले मला माहीत नाही. परन्तु त्यांचा अंधभक्तांची संख्या ही दिवसें दिवस वाढू लागली आणि वाढत आहे. त्यातील एकही धर्म असा नाही आहे की विनाशुल्क कुठेल कार्य करत असेल. या प्रत्येक धर्मात सामिल होण्यासाठी काही न काही शुल्क द्यावेच लगते. शिवाय देणगी ही तर मग लागलीच आहे, तर या देणगीचा मार्फत त्या धर्माचा देवालयात टूस्टची निर्मिती करावी लागली. धर्मात सामिल होण्यासाठी लागणारा शुल्क आणि देणगी यामुळे या देवालयाजवळ इतकी जास्त धन संपदा गोळा होऊन गेली की ते देवालय भारतात खुप श्रीमंत असे देवालय होऊन गेले. याच देवालय मध्ये पूर्वी काही काळापूर्वी ज्या सामान्य मनुष्याला त्याचा देवाचे दर्शन मनसोक्त आणि विनाशुल्क होत होते. त्याच सामान्य मनुष्याला आज त्याच देवाचे दर्शन घेण्यासाठी लांब लांब अशा रांगे मध्ये लागावे लागते. संपूर्ण दिवस उपाशी तापाशी रहावे लागते आणि शेवटी जेव्हा त्या बिचाऱ्याचा नंबर येतो तेव्हा त्याला
मनसोक्त तर सोडा एक नजर त्याचा प्रीय देवाला बघण्याची सुद्धा सवळ मिळत नाही. त्याचा पापणी उघडून बंद करण्यापर्यंत त्या सामान्य मनुष्याला देवालयाचा गाभाऱ्यातुन बाहेरचा रस्ता दाखवल्या जातो. कारण की तो त्याचा देवाला शुल्क आणि देणगी न देता भेटायला गेला होता. याउलट जे भक्कम असे शुल्क आणि देणगी देणारे अती विशिष्ट असे मनुष्य असतात त्यांचासाठी एक विशेष अशी रांग तर नसतेच परन्तु एक विशेष असा द्वार असतो. त्या द्वाराचा सहाय्याने तो अतिविशिष्ट मनुष्य क्षणभर ही न गमावता त्या देवाचा समोर जाऊन उभा होतो आणि मनसोक्त आपली पूजा करून अवध्या दहा ते पंधरा मिनिटात तेथून बाहेर निघून जातो. तर मग मला सांगा येथे त्या सामान्य मनुष्याची श्रद्धा त्या अतिविशिष्ट मनुष्याचा श्रद्धेचा तुलनेत कुठे कमी पडली. काय तो त्याचा देवावर प्रेम करत नाही की अतिविशिष्ट मनुष्य हा खुप प्राण ओतुन देवावर प्रेम करतो. याचे उत्तर असे असेल की त्याने जी देणगी त्या देवाला दिलेली असेल म्हणून तो देव त्या मनुष्यावर अती प्रसन्न असेल. इथे मी म्हणतो सरळ सरळ त्या अतिविशिष्ट मनुष्याचा श्रद्धेचा व्यापार केलेला आहे. सामान्य मनुष्य आणि अतिविशिष्ट मनुष्य या दोघांची श्रद्धा आणि भावना या त्यांचा देवासाठी सारखी आहे. फक्त आणि फक्त येथे सामान्य मनुष्याचा श्रद्धेचा आणि भावनेचा खेळ केल्या गेलेला आहे आणि भक्कम अशी देणगी दिल्याने अतिविशिष्ट मनुष्याचा श्रद्धेचा आणि भावनेचा मान ठेवल्या गेलेला आहे. अशा लोकांचा हेतु तो फक्त व्यवसायीकरण हा असतो ती एखादी जीवंत किंवा निर्जीव वस्तु असोत की कुणाची श्रद्धा आणि भावना अशा लोकांना त्यांचा नफ्याचा पुढे बाकी काहीच दिसत नाही. अशा लोकांना दिसतो तो फक्त पैसा आणि फक्त पैसा. जेथे त्या निरंकारी देवाने मनुष्या मनुष्यात कधी फरक केलेला नव्हता त्या देवाला पुजणाऱ्या मनुष्यानेच आपल्या सारख्या मनुष्यात फरक केलेला आहे. हा फरक कोणी सामान्य मनुष्य करु शकत नाही तर
जे त्या धर्माचा नावावर संभ्रमित करणारे अति महत्वाचे लोक असतात ते करतात आणि त्यांचा अनुसरण करुन आपल्यातील काही मुर्ख असे सामान्य मनुष्य हे आपल्या भाऊबंध यांचात फरक करतात. हे संभ्रम निर्माण करणारे तेथे हजार किलोमीटरचा अंतरावर बसून टिव्हीचा माध्यमातून तोंडात जे येईल ते बोलतात आणि इकडे हजार किलोमीटर वर बसलेले आपल्यातील काही मुर्ख असे सामान्य त्यांचे अंध भक्त आजवर ज्या शेजारचा दोन पाऊलचा अंतरावर राहणाऱ्या पर जातीचा मनुष्याला आजवर आपला भाऊबंध म्हणायचे त्यालाच आज जीवे मारायला तयार होतात. हे मुर्ख मनुष्य याचा विचार करत नाही की जेव्हा त्याची स्वतःची परिस्थिति फारच बिकट अशी होती तेव्हा त्यांचा मदतीला तो हजार किलोमीटरवर बसलेला संभ्रमित करणारा आलेला होता की दोन पाऊलचा अंतरावर राहणारा त्याचा मित्र सखा बंधू आलेला होता. याचा काहीच विचार न करता हा मूर्ख मनुष्य आपल्या जुन्या ऋणानुबंध यांना धिक्कारून त्याचा बोलण्यावरून असे कुकर्म करायला तयार होतात.

माझ्या म्हणण्याचा आशय तूम्ही नक्कीच समजून घ्याल, हे हजार किलोमीटर अंतरावर बसलेले मानवरूपी देव मनुष्याचा
श्रद्धेचा सर्रास व्यापार करून राहिले आहेत. आज ते त्यांचा प्रवचन यांचा मार्फत देवाची महिमा विशेष करून त्यांचा एका विशिष्ट अशा देवाची महिमा त्यांचा अंध भक्त यांना समजावून देतात. सामान्य मनुष्य हा फक्त आणि फक्त त्यांचा देवाचा निर्मळ अशा श्रेद्धेचा आहारी जाऊन त्या
धर्माकडे ओढले जातात. परन्तु आजचे मानवरूपी देव हे त्या सामान्य मनूष्यांचा संख्येला संधी म्हणून उपयोग करतात आणि भक्त म्हणून त्या सामान्य मनुष्याची त्या धर्माचा यादीत नोंद करतात. त्याच बरोबर त्यांचा धर्माचा भक्तांचा आकड़ेवारीत आणखी भर पाडतात. दुसऱ्या शब्दात म्हटले तर एखाद्या नौकरीचा भरतीप्रमाणे भक्तांची भरती करून घेतात. यानंतर गणित हे सोप्पे आहे जेवढी भक्तांची संख्या वाढली त्याचा
अनुपातात त्यांचा देवाला आणि धर्माला मिळणारी देणगी ही वाढणार. मित्रांनो, तूम्ही सद्धा ही गोष्ट अनुभवली आहे आणि असणार, की देव आणि श्रद्धा ही जेथे आली की मनुष्य तो सामान्य म्हणा की श्रीमंत तो श्रद्धेचा बाबतीत कधीच तड़जोड करत नाही. त्यांचा मनात देवाचा प्रती
श्रद्धा भाव आसतो म्हणून तो म्हणतो पैसे जरी जास्ती लागत असतील तरीही ते माझ्या देवाला अर्पण होत आहे म्हणून त्यावेळेस लागणारी दुप्पट अशी रक्कम हीं हसत हसत खर्च करण्यासाठी तयार असतो. त्या खर्चात ते देवालयात दर्शन करण्याचे शुल्क म्हणा की देवाचा निगडित असलेले साहित्य असोत. ते वीकत घेण्यास मनुष्य कधीच नकार देत नाही आणि याच साहित्याचा द्वारे या देवालयाचा ट्रस्टकडे पैसा भक्कम असा तयार होतो.

मित्रांनो, मी जे काही वर बोललो ते काही प्रमाणात की संपूर्ण चुक असू शकते. परंतु याचा उलट सुद्धा असू शकत हे मी तुमचावर सोडलेले आहे. परंतु पुन्हा मी चुकत असेल तर माझे उचित मार्गदर्शन करण्याची मी विनंती करतो. जेणेकरून तुमाचाकडून उचीत असे ज्ञान मिळेल तर माझ्या सामान्य ज्ञानात आणखी भर पडेल. तर मित्रांनो, माझ्या बोलण्याचा आशय तुम्हाला कळले असेल. तर माझे जे मनोगत होते ते काहीं प्रमाणात मी तुमचा पुढ़े बोलून दाखवले. माझ्या या मनोगतामुळे कुणाचा भावना दुखावल्या असतील तर मी त्याची क्षमा मागतो आत्ताच. माझ्या मनोगताबदल तुमचे जे विचार चांगले किंवा वाईट आहेत किंवा असतील ते तुम्हीं मला नक्कीच कळवा तुमचा कमेन्ट्सद्वारे तुमचा
कमेन्ट्सची आतूरतेने प्रतीक्षा राहील मला. तर मित्रांनो, पुन्हा आपली भेट होईल पुन्हा एका नवीन विषयाचा सोबत. तोपर्यंत मला रजा दया.

धन्यवाद

गजेन्द्र गोविंदराव कुडमाते