Mall Premyuddh - 75 - Last Part books and stories free download online pdf in Marathi

मल्ल प्रेमयुद्ध - भाग 75 (समाप्त )




मल्ल प्रेमयुद्ध (समाप्त )


हॉस्पिटलच्या समोर गाडी थांबली आणि वीर पळत सुटला कसलाही विचार न करता. डोळ्यासमोर फक्त क्रांती दिसत होती . काय झालं असेल नेमकं ..? या विचाराने तो अक्षरशः धावत होता.

देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही
सांग कुठं ठेऊ माथा कळंनाच काही
देवा कुठं शोधू तुला मला सांग ना
प्रेम केलं एवढाच माझा रे गुन्हा
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी…
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी……
आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू

का रे तडफड ही ह्या काळजा मधी
घुसमट तुझी रे होते का कधी
माणसाचा तू जल्म घे,
डाव जो मांडला मोडू दे
का हात सुटले, श्वास मिटले, ठेच लागे
उत्तरांना प्रश्न कसे हे पडले
अंतरांचे अंतर कसे ना कळले
देवा काळजाची हाक ऐक एकदा तरी…
माझ्या ह्या जीवाची आग लागू दे तुझ्या उरी…
आरपार काळजात का दिलास घाव तू
दगडाच्या काळजाचा दगडाचा देव तू...



रिसेप्शनिस्टला त्याने नाव विचारले.

"सर अशी कोणतीही व्यक्ती इथे नाही." वीर कोलमडला.
तो तसाच बाहेर पळत सुटला. सगळे ओळीने बाहेर उभे होते.

आबा, दादा, संग्राम, रत्ना, भूषण, ऋषी, चिनू, स्वप्ना हाताच्या घड्या घालून उभे होते. त्याची तडफड बघत होते सगळे...

"अरे क्रांती न्हाईत इथं...कुठं दुसरीकड नेलाय का त्यांना??? "

कोणी काहीच बोलत नव्हते.

"अरे सांगा ना काय झालंय माझ्या क्रांतीला...? सांगा कुणीतरी...?? आबा, दादा कायतरी नक्की झालय तुमी अस अचानक का आलाय...? आबा तुमी आलाय ठीक हाय पण दादा...?" वीर पळत दादांकडे गेला.
"दादा मला सांगा काय झालंय... माझा जीव जाईल हो आता जर मला।कुणी काय सांगितलं न्हाय तर... कृपा करून सांगा.. आबा तुमी प्रत्येक येळला माझ्या मग खंबीरपणे उभं असता जे हाय ते सांगा आबा... असं गप नका उभं राहू...
संग्रामदादा तू तरी सांग... माझ्या क्रांतीला दुसऱ्या दवाखान्यात नेलाय का...? रत्ना तू तुझ्या मैत्रिणीबर कशी न्हाईस तू तिच्या बरोबर असतीस ना...? भूषण्या स्वप्ना का माझा अंत बघताय तुमाला तुमच्या मित्राची अशी परीक्षा घ्यायची हाय का??? असा बदला घ्यायचा हाय का माझ्या सगळ्या गोष्टींचा...? चिनू... आग तुझी तायडी... तुला वाटत व्हत ना आम्ही परत एकत्र यावं मग मग आता मला भेटव तुझ्या तायडीला... ऋषी तुझ्या डोळ्यात पाणी का...? कुणीच का काय सांगत न्हाय... मी नाय हा जगू शकत तुझ्या शिवाय क्रांती... तुझं वाईट झाललं ऐकायची ताकत माझ्यात नाय... मी नाय जगू शकणार तिच्याशिवाय तिला काय झालं असेल तर मी माझ्या जीवाचं..."

सगळ्यांच्या मागून पळत क्रांती वीरच्या समोर आली आणि त्याच्या तोंडावर हात ठेवला.

"असं नका बोलू... मला काय बी झालेल नाय.. आबा आन दादांनी तुमची परीक्षा घेतली आन हे सगळे त्याच्यामधी सामील झाले व्हते मी सुदा..."

"परीक्षा... कसली माझ्या प्रेमाची... इतकी जीवघेणी...??? क्रांती तुमाला काय झालं नाय हे बघून जीवात जीव आला माझ्या... तुमाला जर काय झालं असत तर ...?मी आयुष्यात स्वतःला कधी माफ करू शकलो नसतो अन माफ करायला मी जीवंत राह्यलो नसतो." वीरच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने क्रांतीच्या दोन्ही दंडाला पकडले आणि स्वतःकडे ओढले. गच्च मिठीत... त्याला आपण पब्लिक प्लेस मध्ये आहोत ह्याचे भान नव्हते. समोर आबा दादा उभे आहेत ह्याचा सुद्धा विचार त्यांनी तिला मिठीत घेताना केला नाही.

त्याला फक्त तिला अनुभवायचं होतं आणि तेच तो करत होता. त्याला इतकंच स्वतःला सांगायचं होतं की,
"तुझ्या क्रांतीला काही बी झालेल नाय .... काय बी झालं नाय तुझ्या क्रांतीता, ती अगदी नीट हाय."
दोघांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. क्रांतीला ह्याची खात्री झाली होती. वीरच खरं प्रेम आहे आपल्यावर... आणि वीरला खात्री झाली होती की, क्रांती सुरक्षितत हाय तिला काय झाल नाय..

बाकी सगळे जण त्यांचे प्रेम आनंदाने नि कौतुकाने बघत होते. दादांच्या डोळ्यात पाणी होते. आबांनी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. आणि म्हणाले,
" पटवून दिले नव्ह... मला बघा माझं काम मी केलं ते तुमच्यामुळ, तुमी जर मला एक संधी नसती दिली तर आज तुमाला हे बघायला मिळालं नसतं, यांचं प्रेम समजलं नसतं.. ह्या दोघांना आपण लांब केलं असत आणि सगळ्याला आपण जबाबदार ठरलो असतो. दादा मला माफ करा याआधी जे बी झालं त्यासाठी..."
" नाही आबासाहेब त्या दिवशी एका संधीचा तुमी हट्ट नसता केला तर मी सुद्धा इचार केला नसता परत वीरचा... कारण सगळं संपल्यासारखं झालं व्हतं पण तुमी मला मजबूर केलं, तुमाला एक संधी द्यायची, त्यांचं प्रेम सिद्ध करायची. वीर तरास झाला पण त्यांचे एकमेकांवरचे प्रेम त्यांना सुद्धा कळून चुकलं नाय का..."
आबांनी दादांना कडकडून मिठी मारली. संग्राम आणि बाकी सगळे आनंदात टाळ्या वाजवत होते. टाळ्यांच्या आवाजाने आजूबाजूला लोक जमलेली होती ती सुद्धा टाळ्या वाजवू लागली. आणि वीर क्रांती पटकन बाजूला झाले. दोघांनी डोळे पुसले.
दादा जवळ आले आणि म्हणाले,
" वीर आमाला माफ करा... तसं वागला म्हणून आमच्या नजरेतून तुमी उतरला व्हता पण तुमी तुमचं प्रेम सिद्ध करून दाखवलं... आमच्या पोरीला आता परत तू कधी दुःखात लोटू नका दादांना नमस्कार केला.
" दादा मी माझ्या आईची शपथ घेऊन सांगतो क्रांतीला मी इज भर सुद्धा दुःख देणार नाय. तुमच्या मुलीला मी फुलासारखी जपीन." क्रांतीने मान खाली घातली. दादांनी तिला जवळ घेतले. सगळे दोघांच्या भोवती जमा झाले आणि जल्लोष करू लागले.

सगळ्यांचे स्वप्न तरी काय होतं या दोघांनी एकत्र यावं हेच...

सगळेजण पुन्हा कोर्टवर गेले. वीरच तिथे सन्मान झाला. आबा क्रांती त्याच्यासोबत उभे होते सन्मानासाठी. वीरने प्रथम विजेता पद पटकवलं होतं. सगळीकडे जल्लोष आणि आनंदाचे उत्साहाचं वातावरण होतं. आबांची छाती अभिमानाने भरून आली होती. सगळे वीरचे अभिनंदन करत होते. लोकांनी विरला घेराव घातला होता. सगळीकडे आनंदी आनंद होता. शेवटी म्हणतात ना सगळं चांगलं होत असताना कुठेतरी गालबोट लागतंच.


संग्राम चा फोन खिशात व्हायब्रेट होत होता. त्याला जाणवलं... बघितलं...
" दिनकर... दिनकर चा फोन..." त्याने पटकन उचलला आणि कानाला लावला.
" हॅलो हा दिनकर बोल दिनकर..." सगळी घटना सांगत होतातच तसा संग्रामच्या चेहऱ्यावरचा भाव बदलत होता.

संग्रामने भूषण च्या कानात काहीतरी सांगितले एकमेकांची कुजबूज सुरू झाली. वीरने ते पाहिले आणि संग्रामच्या खांद्यावर हात ठेवला.
" दादा...."
संग्राम त्याच्या गळ्यात पडून रडायला लागला.
फटाफट गाड्या निघाल्या गावाकडे...


सुलोचनाबाई एकट्या बाहेर ऑपरेशन थिएटरच्या बाहेर बसल्या होत्या. दिनकर त्यांना सावरत होता. त्या देवाचा धावा करत होत्या. एकदा हॉस्पिटलच्या दरवाज्याकडे बघत होत्या आणि एकदा ऑपरेशन थेटरच्या दरवाज्याकडे... संग्राम पळत पळत आईकडे आला.. सुलोचनाबाई त्याच्या गळ्यात पडून रडायला लागल्या आणि घडलेली घटना पुन्हा एकदा त्यांना सांगितली. सगळेजण जमा झाले.
"लई येळ झाला तिला ऑपरेशन थेटरमधी नेल हाय डॉक्टर म्हणत्यात काय सांगू शकत नाय..."

आबा सुलोचनाबाईंच्या जवळ आले.

"सुलोचनाबाई काय भी व्हणार नाही आपल्या सुनबाई आणि बाळाला... हे बघा ह्यांना कसं घेऊन आलो.. आता अजून एक सुनाला समोर ठणठणीत बघायचंय.... आपल्या दोन्ही सुना आपल्यासमोर लेकींसारख्या उभ्या राहणार हायत. तुम्ही अजिबात काळजी करू नका..." सुलोचनाबाईंना धीर देता आबासाहेबांनी पहिल्यांदा त्यांना सगळ्यांच्या समोर जवळ घेतले आणि सुलोचनाबाई उस्मरून त्यांच्या कुशीत रडत होत्या.

सगळेजण एकमेकांना धीर होते.
" संग्राम दादा तू अजिबात काळजी करू नको. बघ देवावर विश्वास ठेवला की होताना सगळं आपल्या मनासारखं....मग आता.. वहिनींच्या बाबतीत पण व्हईल का नाही बघ... वैनी आणि बाळाला काय नाय व्हानार. तेवढ्यात ऑपरेशन थेटर चा दरवाजा उघडला आणि समोरून नर्स आल्या धावपळ सुरू होती संग्राम पुढे सरसावला विचारायला काय झालं नर्स...?

" डॉक्टर सांगतील तुम्हाला..."
नर्स पुन्हा ऑपरेशन थेटर मध्ये गेली. पाच-दहा मिनिटं सगळीकडे शांतता होती. सगळे विचारात होते.
डॉक्टर बाहेर आले म्हणाले,
" अभिनंदन मुलगी झाली..." सगळेजण खुश झाले. सुलोचनाबाईनी देवाला हात जोडले. डोळे पुसले.
"आणि सुनबाई.."
"माफ करा पण त्यांची परिस्थिती खूपच नाजूक आहे. आता त्यांना आयसीयू मध्ये ठेवले आहे. आत्ताच काही सांगू शकत नाही." पुन्हा सगळीकडे शांतता... सगळ्यांनाच टेन्शन आले.

" डॉक्टर पण काय व्हणार नाय ना तेजश्रीला...?" संग्रामने विचारलं .
" शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो दोघांनाही वाचवायचा आणि दोघेही वाचले मग अजून थोडा विश्वास ठेवा आमच्यावर ... सगळं ठीक होईल. संग्रामच्या जीवात जीव आला."


काही दिवसांनी



सगळेजण पाळण्याच्या भोवतीने बसले होते . पिल्लूला खेळवत होते. आबासाहेब आणि सुलोचनाबाई सगळ्यांच्याकडे बघून खुश होत्या. बाळ मोठ्या मोठ्याने रडायला लागतर .तेवढ्यात क्रांती आली आणि तिने हळुवार तिला उचलून हातात घेतले.

वीर क्रांतीच्या बाजूला जाऊन बाळाला खेळावायला लागला. पण पिल्लूचे रडणे थांबत नव्हते. तेजश्रीने क्रांतीच्या हातातून बाळाला घेतले बाळ शांत झाले. वीर क्रांतीच्या अगदी जवळ गेला. मला लवकरात लवकर राजकुमारी हवी. क्रांती पटकन वरती निघून गेली. वीरसुद्धा तिच्या मागे गेला. आबा आणि सुलोचनाबाई एकमेकांकडे बघून हसायला लागल्या. क्रांती लाजून खिडकीत उभे राहिली होती. पाठीमागून वीर आला आणि तिला पटकन मागून पकडले. तिच्या पाठीवरचे केस एका बाजूला केले आणि त्याचे हनुवटी तिच्या खांद्यावर ठेवली. तिचा अंग मोहरून आले. अंगावर शहारे आले. तिने तिचे डोळे बंद केले.
"काय झालं असं का निघून आलात तुमी...? "
"असं बोलल्यावर मग काय करणार एवढ्या सगळ्यांच्यामधी..."
" मग काय झाल आमाला कधी ना कधीतरी पाहिजेच ना राजकुमारी आण बायकोलाच बोललो."
तो मागे सरकला आणि तिला त्याच्या दिशेने वळवली.
"काय झाल एवढं लाजायला...?"
त्यांनी तिचा चेहरा स्वतःकडे वरती केला. क्रांती त्याच्या डोळ्यात बघत होती. वीर अजूनच जवळ येत होता. क्रांती मागे सरकत होती. वीरने पटकन तिला कमरेतून जवळ खेचले. क्रांतीला काही सुचत नव्हते.
" अहो दरवाजा उघडा हाय..."
" असू देत..."
" अहो खरच दरवाजा उघडा हाय..."
" असू देत..."
तिला ठाऊक होत... आता काहीही केलं काही झालं तरी वीर ऐकणार नाही. तिने डोळे गच्च बंद केले. वीरने त्याचे ओठ तिच्या ओठांवर टेकवले. वीर पटकन बाजूला झाला. मागे गेला...
" अचानक काय झालं वीरला...? "
वीर मागे गेला आणि दरवाजा पटकन बंद केला. आसुसलेल्या वीरने पटकन क्रांतीला त्याच्या कवेत घेतले.

किती दिवस पुन्हा या क्षणाची वाट बघत होता ... तो आणि क्रांती सुद्धा...


समाप्त

भाग्यशाली अनुप राऊत.



मी मनापासून आभारी आहे तुम्ही माझ्या या कथेवर भरभरून प्रेम केले. आणि या कथेचा शेवट गोड झाला.
सुलोचनाबाईंच्या मनासारखे झाले. दादाच्या मुलांची लग्न ठरली. वीरविषयी त्यांच्या मनामध्ये जी अठी होती ती एकमेकांच्या मदतीने शक्य झाली. आबांनी वीर आणि क्रांतीच्या मनामध्ये असलेले एकमेकांविषयीचे प्रेम दादाना दाखवून दिले. संग्रामला मुलगी झाली घरात लक्ष्मी आली.


भाग्यशाली राऊत

Thank you so much


इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED