भाग – १४
सावली मात्र त्यांचा या चालाकीला आणि हलकटपणाला चांगली ओळखत होती. तितक्यात दुसरा म्हणाला, “ अरे असे का बर विचारतोस ती तर एक स्त्री आहे मुलगी आहे तर तिची छाती नाही तिला तर स्तन आहेत मोठे.” तितक्यात तिसर्याने हुशारी केल्यागत हळूच प्रश्न केला, “ फिगर काय आहे तुमचा.” तेव्हा मात्र सावली उत्तरली, “ तुम्ही तुमचा बहिणीला कधी विचारले आहे काय तिचा फिगर काय आहे.” असे म्हटल्या बरोबर तो तिसरा तापून उठला आणि म्हणाला, “ हे काय उत्तर झाले माझ्या प्रश्नाचे, हे याद राखा तुमचा साक्षात्कार सुरु आहे आमचा नाही. आम्ही येथील ऑफिसर आहोत जे ठरवणार आहे कि कोण या कार्यासाठी लायक आहे आणि कोण नाही.” तितक्यात दुसरा बोलला, “ शांत हो रे थांब मला बोलू दे.” तो पुढे बोलला, “ हे बघा मीस सावली आम्ही जे प्रश्न विचारू त्याचे सरळ सरळ उत्तर द्यायचे अन्यथा आम्ही तुम्हाला या कार्याकरीता अपात्र ठरवू.” तेव्हा सावली उत्तरली, “ तर मग माझ्या कार्याबद्दल प्रश्न विचाराना, असे निर्लज्ज आणि हलकटासारखे प्रश्न का बर विचारता.” मग पहिला बोलला, “ हो ठीक आहे, तर सांगा या आधी तुम्ही कुठे आणि काय काम करत होत्या.” सावली म्हणाली, “ मी याचा आधी एका कार्यालयात अकाऊंटचे काम करत होते.” “ते का बर सोडले” असे तो विचारू लागला.
तेव्हा सावली उत्तरली, “ काही तरी अनपेक्षित असे माझ्या आयुष्यात घडले आणि ते काम माझ्या हातून सुटले.” तेव्हा तो सावलीला फोर्स करू लागला होता ते व्यक्तीगत कारण सांगण्यासाठी. सावली पुन्हा पुन्हा नाकारू लागली होती. म्हणून तो त्याचा सीटवरून उठून आला आणि थेट सावलीचा खांद्यावर हात ठेवून बोलला, “ हे बघा आमचा ऑफिसची नियमावली आहे कि तेथे काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याची खाजगी बाब हि आम्हा ऑफिसरला माहित असणे आवश्यक आहे. शिवाय मी तुमची समस्या अधिक जवळून समजून घेईल. तर जे काही आहे ते स्पष्टपणे सांगा.” असे म्हणताना त्याचा डोळ्यात आणि हाताचा स्पर्शात सर्वथा वासना जाणवत होती सावलीला. त्याचा तोंडून तर टप टप लार टपकत होती. तेव्हा सावलीने एका झटक्यात त्याचा हात आपल्या शरीरावरून बाजूला सारला आणि ती ताडकन उठून उभी झाली. ती म्हणाली, “ मी एका शब्दात सांगते मला तुम्हाला माझ्या खासगी आणि वैयक्तिक गोष्टी सांगायचा नाही आहे आणि मी तुम्हाला चेतावणी देते कि माझ्याशी बोलतांना लांबून बोलायचे.” आता मात्र सावलीचा रागाचा पारा हा त्याचा उच्चांकावर पोहोचला होता.
तेव्हा दुसरा म्हणाला, “ हे बघा मिस सावली, आमचा तसा हेतू नाही आहे. तुम्ही विनाकारण काही हि समजून तुमचा गैर समज करून घेत आहात. आम्हाला आमचा ऑफिस करीता कर्मचारी पाहिजे म्हणून आम्ही हे सगळ करतो आहे.” तेव्हा सावलीने ताडकन प्रश्न केला, “ हा साक्षात्कार कशासाठी म्हणजे कुठल्या कार्यासाठी होत आहे ते मला आधी सांगा.” तेव्हा त्यातील तिसरा बोलला, “ हे बघा मीस असे प्रश्न तुम्ही आम्हाला करू शकत नाही. येथे प्रश्न करण्याचा अधिकार फक्त आमचा आहे.” तर सावली उत्तरली, “ मग मला येथे कुठले कार्य करायचे आहे किंवा नाही हे जाणून घेण्याचा अधिकार मला सुद्धा आहे.” मग मात्र त्यांना सावलीला सांगावे लागले. त्यातील एक बोलला, “ मिस सावली आम्ही हे साक्षात्कार पर्सनल सेक्रेटरी या पदासाठी घेतो आहे.” सावली म्हणाली, “ कुणाची पर्सनल सेक्रेटरी तुम्हा तिघांची कि या ऑफिसची.” “मग ती काय करेल तुमचासाठी कि या ऑफिससाठी.” तेव्हा त्यातील एक उत्तरला, “ अर्थातच पर्सनल सेक्रेटरी हि आमचासाठी आणि ती फक्त आणि फक्त आमची काळजी घेईल. आम्ही जे आणि जसे म्हणू तिला ती ते करेल. तिला ऑफिस त्याकरीता दरमाह पगार सुद्धा देईल. ती आमची संपूर्णपणे काळजी घेईल आणि आम्ही तिची संपूर्णपणे काळजी घेऊ.”
मग सावली म्हणाली, “ काळजी म्हणजे ती तुम्हाला चहा पानी देईल, कधी तुमचा मूड झाला तर एके दिवशी तुम्हाला दारू सुद्धा तीचा हाताने पाजणार. त्यानंतर तुमचा आणखी मूड झाला तर तुमचा सोबत या ऑफिसमध्ये त्याच बरोबर बाहेर एखाद्या हॉटेल मध्ये जाऊन तुमचा सोबत झोपणार.” तीतक्यात एकजण बोलला, “ हे काय म्हणता मी सावली, असे आम्ही तर नाही बोललो. परंतु जर तुमची इच्छा असेल तर तसेही आपण करू शकतो. तुम्ही फक्त हो म्हणा आताच सगळ्या मुलींचे अर्ज खारीज करून फक्त तुम्हाला या कार्याकरिता आम्ही पात्र ठरवून देतो. मग तुमची आणि आम्हा तीघांची मज्जाच मज्जा असणार आहे. शिवाय या ऑफिसकडून तुम्हाला पगार तर मिळणारच आहे त्या व्यतिरिक्त आम्ही सुद्धा तुम्हाला काही न काही पैसे वेगळे देऊ त्या सर्विसचे.” असे म्हणताना ते तिघेही सावलीला निर्लज्जपणे स्पर्श करू लागले होते. तेवढ्यात सावली जोऱ्यात ओरडली आणि त्यातील एकाला तीने झणझणीत कानाखाली लावली. ती पुढे म्हणाली, “ तुम्हाला गरज असलेली प्रत्येक स्त्री आणि मुलगी उपभोगायची वस्तू वाटते. तीला काही मान आणि मर्यादा नाही असते. लाज लज्जा फक्त तुमचा घरचा स्त्रियांना असते इतर स्त्रियांना नसते. आता मी तुम्हाला या स्त्रीची शक्ती दाखवते.” असे म्हणता म्हणता सावली क्रोधीत झाली होती.
शेष पुढील भागात................