कोण? - 15 Gajendra Kudmate द्वारा थरारक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कोण? - 15

भाग – १५
सावली आता एकदम रौद्र रुपात आलेली होती आणि तीने म्हटले, “ मी आता तुम्हा तीघांची तक्रार तुमचा वरचा कार्यालयात करणार आहे. तुम्ही या ऑफिसचा नावावर काय काळे धंदे करत आहात हे मी सगळ त्यांना सांगणार आहे.” आता मात्र त्या तीघांना हि जाणीव झाली होती कि हि मुलगी काही आपल्या दडपणाचा खाली येणार नाही म्हणून, ते तीघे सुद्धा आता खुलून त्यांचा मूळ औकातीवर आले होते. ते म्हणाले, “तुला जे करायचे आहे ते कर तुझ्याकडे काय पुरावा आहे कि आम्ही तुझ्याबरोबर वाईट वर्तन केले आणि तुला आम्ही काय बोललो. तू आमचे काही वाकडे करू शकत नाहीस तर गुमान येथून निघून जा तुला आम्ही अपात्र ठरवल्याचा रिपोर्ट पाठवणार आहे. त्याशिवाय तुझ्या या वागण्याचा उल्लेख करून पुढील सगळ्या जाहिरातींसाठी तुला अपात्र ठरवून तुझे आयुष्य संपूर्ण घालवणार आहे. तुला माहित नाही आम्ही काय काय करू शकतो. तू नाही तर कुणी आणखी दुसरी मुलगी आम्हाला भेटेल जीला जास्त गरज असेल.” असे म्हणून त्यांनी चपराश्याला सावलीला बाहेर काढण्यास सांगितले. मग चपराशी आला आणि सावलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागला तोच सावली म्हणाली, “ खबरदार माझ्या अंगाला हात लावशील तर मी माझी स्वतः येथून जाण्यास सक्षम आहे.” आणि असे म्हणून ती बाहेर निघाली.

सावलीला तसे भांडण करत बाहेर नीघतांना उरलेल्या सुंदर मुलींना सुद्धा बळ मिळाले होते आणि त्यांनीही तेथे कार्य करण्यास नकार दिला आणि त्यांचे कागदपत्र घेऊन त्या तेथून निघून गेल्या. सावली रागाचा भारात घरी जाऊन पोहोचली तरी सावलीला कळत नव्हते काय झाले. हे सगळ तीचा मानसीक परिस्थितीमुळे तीला होत होते. घरी आल्यानंतर आईने तीला शांत करून तीला वीचारले तर ती म्हणाली, “ काय झाले.” तेव्हा तीची आई म्हणाली, “ अरे बाळा तू पुन्हा वीसरलीस काय, अग तू साक्षात्कारासाठी गेलेली होतीस ना मग अशी रागात का बर आलीस हे वीचारतेय मी.” तेव्हा सावलीला स्मरण झाले आणि तीने तीचा फोन चेक केला. तर त्यात आताही रेकॉर्डिंग सुरूच होती. सावलीने रेकॉर्डिंग बंद करून सेव केली आणि मग तीने पुन्हा पहिल्यापासून ती रेकॉर्डिंग सुरु करून संपूर्ण बघितली. सावलीला तेव्हा आठवत होते कि तीने किती हुशारीने तीचा फोन अशारितीने ठेवला होता कि त्या तीघांना कळले सुद्धा नाही कि त्यांचे ते सगळे वर्तन आणि त्यांचे अभद्र बोलने सगळे त्या मोबाईल मध्ये सेव झाले आहे. तर सावली आता पुन्हा शुद्धीवर आलेली होती आणि तीने जे काही म्हटले होते. ते करण्याचा मार्गावर ती सरसावली होती. तीने आधी थोडा विचार केला आणि मग तीचा आईला विश्वासात घेऊनच मग ती पुढे जाणार होती.

तीचा आईने सुद्धा सावलीला या अन्यायाविरुद्ध आवाज उचलण्यास सहमती दिली होता. म्हणून सावलीने आता प्रथम पाऊल उचलले होते. तीने त्या कार्यालयाचा वरचा ऑफिसचा पत्ता आणि तेथील फोन नंबर माहिती करून घेतला. सावलीने प्रथम त्या फोन नंबर वर फोन करून तेथील संबंधित अधिकाऱ्याशी भेटण्यासाठी अनुमती मागीतली होती. ती तीला सहजच मीळाली होती. ठरलेल्या दिवशी आणि वेळेत ती त्या ऑफिस मध्ये जाऊन तेथील संबंधित ऑफिसरला जाऊन भेटली. तीने घडलेला सगळा प्रकार त्या वरचा अधिकार्याला सांगीतला आणि तो रेकॉर्ड केलेला व्हिडीओ त्यांना दाखवीला. तीने त्याच बरोबर त्या तीघांची लिखित मध्ये तक्रार सुद्धा नोंदवली होती. आत मात्र तीला प्रतीक्षा होती ती न्यायाची. सावली समजत होती ते तीतके सोपे नव्हते. त्या तीघांची ओळख आणि साठगाठ हि वरचा आणि त्याहूनही वरचा अधिकाऱ्या पर्यंत होती. म्हणून सावलीने जे पुरावे तेथे सादर केले होते. ते तर त्यांनी आधीच नष्ट केले त्याच बरोबर त्या तीघांना ही खबरदार करून टाकले होते. सावली निश्चिंत होऊन पुढे काय होणार आहे याची प्रतीक्षा करत असतांना सावलीचा घरचा दाराची घंटी वाजली. सावलीने जाऊन दार उघडले तर तीचा समोर पोस्टमन उभा होता. त्याने तीचासाठी एक रजिस्टर टपाल आणलेलं होत. ते सावलीचा नावाने होते म्हणून ते सावलीला स्वीकारावे लागले होते.

सावलीने ते टपाल उघडले आणि वाचले तर सावली एकदम अचंभीत होऊन गेली. ते पत्र होते त्या कार्यालयाचे जेथून ती भांडण करून आलेली होती. सावलीला त्या ऑफिस मध्ये कार्य तर करायचे नव्हते परंतु तीचा मानसीक आणि शारीरिक छळ करण्यासाठी मुद्दामून सावलीला त्या कामावर ठेवण्यात आले होते. त्या टपाल मध्ये तीचे कामावर रुजू होण्याचे पत्र आणि सोबत एक करारनामा सुद्धा पाठवलेला होता. त्यात लिहिले होते कि सावली स्वतःचा मर्जीने त्या ऑफिस मध्ये काम करण्यास तयार आहे आणि जर तीने हा करार तोडण्याचा प्रयत्न केला तर तीला रक्कम ५० लक्ष भरपाई द्यावी लागेल शिवाय पैशांची भरपाई न केल्यास तीला २० वर्ष न्यायालयीन कोठडी भोगावी लागेल. आश्चर्यचकित होण्याची गोष्ट अशी होती कि त्या करारनाम्यावर सावलीचे हस्ताक्षर होते. ते सगळे बघून आता सावलीला काय करावे आणि काय नाही काहीच कळत नव्हते. ते पूर्णपणे त्यांचा जाळ्यात सापडली होती.
शेष पुढील भागात.............