देव पूजा Trupti Deo द्वारा आध्यात्मिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

देव पूजा

🙏श्री गुरुदेव दत्त 🙏
प्रत्येक घरात रोजची सकाळ "देवपूजेने सुरुवात होते " आणि ती पूजा म्हणजेच आपल्या घरातील आराध्य देव हयांना आपण घंटा, शँख वाजून जागृग करतो.आणि घरातील ऊर्जा सकारात्मक करतो.हा नित्यनियमच असतो.



आणि रोज सकाळ "संध्याकाळ 'देवाजवळ नियमित" दिवा" आणि उदबत्ती लावली जाते.

आपली संस्कृती आणि परंपरा ही अशीच आहॆ..तशीच आपण नियमाने पाळतो.


कारण घरातील देव आणि पूजा हे अत्यंत महत्वाचे भाग आहे.

ज्यामुळे घरात सामर्थ्य आणि शांतता वाटते.

सकाळची पूजा ही प्रत्येक घरातील एक महत्त्वाची पारंपारिक आणि प्रथाच आहॆ.प्रत्येक देवाची,
पोथी, पुराण,आरत्या,स्तोत्र, श्लोक, मंत्र जप, हें सगळ

आपल्याला नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता प्रदान करते. हे आपल्याला मानसिक शांती आणि आत्मविश्वास प्रदान करते. सकारात्मक विचार आणि भगवंताची उपासना यातून समाजात चांगले माणूस बनण्याची प्रेरणा मिळते. शिवाय, सकाळची पूजा आपला दिवस सुरक्षित आणि समृद्ध करण्यात मदत करते. हे आपल्याला जीवनात सकारात्मक मार्गावर राहण्याची प्रेरणा देते आणि आत्म-विकासासाठी प्रोत्साहित करते.


घरातील देव आणि पूजा एक महत्वाचं अंग आहे
ज्यामुळे घर केवळ "भोगांची "जागा नसते, तर

"कल्याणाची" ठिकाण आणि सुखसमृद्धीचं स्थान असत.

आपल्या घरातलं त्याचं अस्तित्व खूप मोठ आहे. घराच्या वास्तुत त्यांची वेगळी जागा असते छोटीशी किंवा लहान. पण पण सगळ्यांच्याच
घरात असते .


पूजनीय देवांची चित्रे, मूर्ती, कलश इत्यादी वस्तूंची स्थापना केली जाते. पूजा म्हणजे देवांना अर्पण करणे, आदर देणे आणि त्यांना स्तोत्र, स्तुति किव्हा भक्तिप्रद करणे. पूजनीय देवांच्या प्रती अग्रहण केलेले प्रसाद संग्रहित करण्यात येते ज्यामुळे पूजा सामर्थ्य अनुभवले जाते. पूजा हे एक ध्येयात्मक अनुभव आहे ज्यामुळे व्यक्तीची आध्यात्मिकता विकसित होते. यामुळे घरातील देव आणि पूजा पवित्र असतात आणि घराला शांती, समृद्धी, आणि सुखाचं वातावरण मिळतं.

मग त्या घरात वाईट चुकीचं कधीच बोलू नये, कोणाबद्दलही, कारण त्या देवाला आपण साक्षी मानलेला असतो. त्याचाही आपल्याकडे लक्ष असतं . हे कधी विसरू नका.

जस आपण देवाला आपण नेहमी चांगलंच मागतो .

देवाला पण सगळं चांगलंच हवं असतं. कधी असा विचार केला आहे.


दिवसभराच्या घडामोडी मध्ये आपण कोणा बदलही वाईट चिंत्तू नये,वाईट बोलू नये.

आपण आपल्या मनाचा विचार करतो .संपूर्ण घराचा ज्याच्यावर विश्वास आहे आणि आधार आहे त्या भगवंताचे कधी विचार करा काय त्याला आपल चुकीचं वागणं आवडतं.? त्याचं अस्तित्व आपण स्वीकारलेला आहे. मूर्ती रुपात नाही आहे.तर साक्षात आहे. प्रत्येक घर त्याच्याशिवाय अपूर्णच आहे.



संसारात घडणाऱ्या गोंधळातून दूर राहण्यासाठी, ध्येय देव आणि पूजा या दुव्यांचं महत्व अत्यंत उच्च असतं. एखाद्या घरात पूजा आणि देवाची उपासना असल्यास, त्यांची धार्मिक आणि आध्यात्मिक निश्चितता साधारणतः सर्वांच्याच जीवनात चरमस्थानी राहते.
मग अशा भगवंताबद्दल आपल्याला विचार करायला हवा.

देवाची पूजा घरातील संघटनेचं अभिन्न अंग असून, लोकांनी पूजेत भावनांचं व्यक्त केलं पाहिजे. पूजाच्या कार्यक्रमांत गायन, आरती, पद्य, उपासना अशा अनेक प्रकारांचं सामावलं जातं. दिव्य भावनेने लोकांचं मन शुद्ध होतं आणि उत्तम वातावरण सिद्ध होतं.

घरातील देव आणि पूजा जीवनात महत्वाचं ठरतं.
. विविध देवता आणि देवींच्या भक्तीत लोक सांस्कृतिक परंपरेचं सत्कार करतात. पूजा नियमित केल्याने अंतरंग शांतता आणि संतोष येतं, ज्ञान आणि आध्यात्मिक विकास होतं.





मग ते वातावरण पवित्र कसं राहायचं? कायम आपल्या चांगल्या विचारांनी .

आशीर्वाद रूपात आपण त्याला आपल्याकडे लक्ष राहू असंच मागणं करतो.मग त्याचं ही मागणं असेल आपल्याकडे .

देवाची जागा पवित्र आणि स्वच्छ करून पवित्र नाहीं होत.

तर मन शुद्ध असावा लागत.ते पवित्र आणि स्वच्छ असावा लागत.



आपल्या कर्माचा साक्षीदार तोच आहे.फक्त हे कधी विसरू नाही.
🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏

तृप्ती देव
भिलाई छत्तीसगड