दिव्यांग असणे हा गुन्हा नाही Ankush Shingade द्वारा क्राइम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

दिव्यांग असणे हा गुन्हा नाही

दिव्यांग असणं हा काही गुन्हा नाही

*दिव्यांग दोष असणं हे काही पाप नाही. तसेच दिव्यांग असणं हा काही गुन्हाही नाही. तरीही बरीचशी मंडळी कोणी दिव्यांग असेल तर त्याची हेळसांड करीत असतात असे पाहण्यात आले आहे. परंतु तशी हेळसांड करण्याऐवजी त्यांनाही आधार द्यायला हवा की जेणेकरुन त्यांनाही आत्मबळ मिळेल व तेही आपल्या स्वतःचा विकास करु शकतील. जो विकास देशहिताला तारक ठरु शकेल.*
दिव्यांगपणा......... हा अलिकडील काळातील शापच समजला जातोय. कारण जो व्यक्ती आजच्या काळात दिव्यांग दिसला की त्याच्याकडं लोकांची पाहण्याची दृष्टी ही बरोबर राहात नाही. मनात किंतु परंतु सारखे शब्द उपस्थीत होत असतात.
दिव्यांगपणा हा अलिकडील काळात अवयवात येणारा विद्रुपपणा. जर कोणी पाहायला विद्रूप असेल. ज्यांच्या शरीराची ठेवण व्यवस्थीत नसेल, वा ज्याला कमी ऐकायला येत असेल, ज्याला प्रमाणापेक्षा कमी दिसत असेल, ज्याला बुद्ध्यांक कमी असेल, ज्याला बरोबर चालता येत नसेल, अशांना दिव्यांग समजलं जातं.
काही लोकं म्हणतात की मागील जन्मात ज्यानं पाप केलं, त्याला दिव्यांग मूल जन्मास येतं वा या जन्मात ज्यानं पाप केलं, त्यास दिव्यांग मूल जन्मात येतं. परंतु तसं काही नसतं. त्यामुळंच उचलली जीभ आणि लावली टाळूला असं कोणीही करु नये.
दिव्यांग व्यक्तीचा जन्म कसा होतो वा दिव्यांग मुलं का जन्माला येत असतील? असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. त्याची बरीच कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे आनुवंशिकता. जर आधीच्या पिढीतील एखादा व्यक्ती दिव्यांग असेल तर पुढच्या पिढीतील व्यक्ती दिव्यांग नक्कीच जन्मास येवू शकतो. दुसरं कारण आहे, जर गर्भधारणेच्या वेळेस गर्भ नको असे वाटून गर्भनिरोधक गोळ्या खाल्ल्या तर त्याचाही परिणाम गर्भावर होवून जन्मास येणारं मुल हे दिव्यांग बनू शकतो. तिसरं कारण म्हणजे सतत गर्भ राहूच नये म्हणून घेतलेल्या गर्भनिरोधक गोळ्या वा रसायने बाळ गर्भात असतांना त्यावर परिणाम करुन जातात. चवथं कारण म्हणजे गर्भ ज्यावेळेस गर्भपिशवीत समावतो. तेव्हा जास्त उत्तेजक पेय पिणे, मादक, नशा येणारे पेय पिणे, पदार्थ खाणे. या गोष्टीही दिव्यांग मुलाच्या जन्मास कारणीभूत ठरतात. पाचवं कारण आहे कुपोषण. जर गर्भार मातेला गर्भधारण केलेला असतांना चांगलं सात्वीक अन्न खायला मिळालं नाही तरही दिव्यांग व्यक्ती जन्मास येत असतो. शिवाय गर्भार व्यक्ती गर्भ पोटात असतांना आजारी पडणे, गर्भार व्यक्तीने अति प्रमाणात एखादी वस्तू खाणे, झोप येत नसल्याने झोपेच्या गोळ्या घेणे, एखाद्या वेळेस गर्भाला प्राणवायूचा पुरवठा न होणे, रक्तात आयोडीनची योग्य मात्रा नसणे, गर्भाची एक्सरे चाचणी वारंवार होणे, गर्भ असतांना स्रिया पडल्याच तर त्यांना मार लागत असतांना गर्भालाही मार लागणे, वजनदार वस्तू उचलल्यास त्याचा गर्भावर परिणाम होणे, वेळेआधी प्रसुती होणे, परिसरातील मोठा आवाज ऐकणे, नात्यातील व्यक्तीसोबत विवाह होणे, वाढलेल्या वयात विवाह होणे, प्रदुषण असणे इत्यादी बरीच कारणं दिव्यांग व्यक्तीच्या जन्मासाठी आवश्यक आहेत.
दिव्यांग व्यक्ती जन्मास येण्याचं महत्वपुर्ण कारण म्हणजे गर्भ लवकर न थांबणे. याला जबाबदार असतात गर्भनिरोधक गोळ्या वा आपलं खानपान. आपलं खानपान जर व्यवस्थीत असेल, आपण गर्भ निरोधक गोळ्या घेत नसेल तर गर्भ व्यवस्थीत टिकत असतो. तो गर्भपिशवीत लवकर थांबतही असतो. परंतु जर आपले खानपान व्यवस्थीत गर्भाक्षयास अनुकूल नसेल वा आपण गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या असतील तर गर्भपिशवी आंकृचन पावते. ज्यातून गर्भ लवकर थांबत नाही. तसाच कदाचीत थांबलाच तर दिव्यांग मुलं जन्मास येवू शकतात. म्हणूनच आपलं खानपान व्यवस्थीत असावं. गर्भनिरोधक गोळ्यांचा अतिवापर टाळावा किंवा मुल जन्मास घालण्यापुर्वी त्याचा वापरच न केलेला बरा.
दिव्यांग व्यक्ती सुधारु शकतात काय? कोणालाही असा पडलेला प्रश्न. याचंही उत्तर नाही असंही येईल आणि हो असंही येईल. त्याचं कारण आहे त्या दिव्यांग व्यक्तीची टक्केवारी. जर तो दिव्यांग टक्केवारीच्या कमी टक्केवारीत बसत असेल, तर तो पुर्णपणे बरा होवू शकतो. त्यावर औषधीशास्रात औषधी उपलब्ध असतात. साधारणतः कर्णबधीर असलेली, वाचादोष असलेली, दृष्टीदोष असलेली, गतीमंद असलेली, मतीमंद असलेली दिव्यांग मुलं औषधानंही बरी होवू शकतात. त्यामुळंच घाबरण्याचं कारण नाहीच. मग कोणी कितीही भीती दाखवत असला तरी. कारण दिव्यांग व्यक्तीबद्दल बरेच समज गैरसमज समाजात रुढ आहेत. शिवाय जरी अनुवंशशास्रानुसार आनुवंशिकता हे जरी दिव्यांग व्यक्ती जन्माचं एकमेव कारण असलं तरी आताच्या पाश्चात्य काळात ते कारण होवू शकत नाही. कारण अलिकडील काळात वातावरणाचा अभ्यास केल्यास वा लोकांच्या जीवनशैलीचा अभ्यास केल्यास दिव्यांग व्यक्ती जन्माला जबाबदार असलेले आनुवंशिकता वा इतर काही कारणं. ही कारणं केव्हाच कालबाह्य झालेले आहे. आता नवी कारणं पुढे आलेली आहेत. ती कारणं आहे आपलं खाणपान. आज आपलं खाणपान बरोबर नाही. चीनसारख्या इतरही प्रगत देशात कोणते कोणते प्राणी खातात यावर बंधन नाही. साप, गोम, पाली इत्यादी. अलिकडील काळात तर विवाह सोहळ्यात लोकांना स्वादिष्ट वाटावं म्हणून केमीकल टाकली जातात. मुलं वा मुली बर्गर, पिज्जा आवडीने खातात. न्युडल्स, मंचुरियन हेही पदार्थ आवडीने खाल्ले जातात. शिवाय चिकन फॉक्स सारखे पदार्थही खाल्ले जातात. असे पदार्थ बनवितांना जे केमीकल वापरले जाते. ते केमीकल शरीराला व्याधीकारक असते. असे पदार्थ खाल्ल्यानंतर ते पदार्थ गर्भाला हानीच पोहोचवत असतात. ज्यातून दिव्यांग जीवही जन्मास येवू शकतात ही शक्यता नाकारता येत नाही. मोठमोठ्या रेस्टॉरेंटमध्ये खाल्ले जाणारे मांस हे काही ताजं नसतं. ते फ्रीजमध्ये केमीकल लावूनच टिकवलं जातं व जशी त्या डिशची आर्डर मिळाली. तसं ते बाहेर काढलं जातं. आपल्याला ते माहीत नसतं व आपण आवडीनं खातो. त्यानंतर ते रक्तात मिसळतं. रक्ताद्वारे गर्भातही जातं व गर्भाला नुकसान करीत असतं. ज्यातून दिव्यांग लोकांचा जन्म होवू शकतो. आता कोणी म्हणतील की गर्भ जेव्हा पोटात होता. तेव्हा तर आम्ही काहीच खाल्लं नाही. परंतु त्यापुर्वी तसे पदार्थ लहानपणापासूनच खाल्ले जातात व ते पदार्थ लहानपणापासूनच गर्भपिशवी बनत असतांना त्यावर परिणाम करुन जात असतात हे विसरता कामा नये.
महत्वाची गोष्ट ही की आपल्या घरी एखादा विकलांग व्यक्ती जन्माला येत असतांना आपल्याला दुःख होते. त्यानंतर आपण आपल्या नशिबाला दोष देत असतो. कोणी त्याला आनुवांशिक भोग समजतात तर कोणी त्याला आपण केलेल्या कर्माची फळं समजतात. परंतु हे तेवढंच खरं जरी असलं तरी शंभर प्रतिशत ते खरं नाही. कारण त्याला जबाबदार असतं आपण घेतल्या गर्भनिरोधक गोळ्या व गर्भ राहण्यापुर्वीचा काळ. गर्भ जर पोटात गर्भधारणेच्या अनुकूल काळात म्हणजे वयाच्या अठरा ते पंचवीस दरम्यान राहात असेल तर बाळ सुदृढ राहीलच यात शंका नाही. कारण तेव्हा गर्भाच्या वाढीस अनुकूल वातावरण शरीरात असतं. ते वातावरण गर्भाला विकलांग होण्यापासून कदाचीत वाचवत असतं एरवी विकलांग वा दिव्यांग न बनविण्याला पोषक असतं असंच म्हणता येईल. यात शंका नाही.
दिव्यांग मूल जन्मास येतं हा दोषच आहे. परंतु तो दोष टाळता येवू शकतो. आपण आपलं खानपान व्यवस्थीत केलं तर. गर्भाक्षयाला न पटणारे पदार्थ आपण त्याज्र करायला हवेत. शिवाय अन्नात मांस वा पिज्जा बर्गर घेण्याऐवजी हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये यांचा समावेश केलेला बरा. तसाच मुलींचा विवाहही एकवीस ते पंचवीस या दरम्यानच केलेला हवा. जेणेकरुन विकलांगतेला पोषक वातावरण निर्माण होवू शकणार नाही. हे तेवढंच खरं.

अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०