जोसेफाईन - 6 Kalyani Deshpande द्वारा भय कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

  • गोळ्याचे सांबार

    🟡गोळ्यांचे सांबार🟡माझी आई नोकरीवाली होतीपण अनेक पदार्थात तिच...

श्रेणी
शेयर करा

जोसेफाईन - 6

"अरे झोपताना तर मी बाल्कनीचे दार बंद केले होते, सुपर्णा तू उघडले होते का मी झोपल्यावर?", सुमित म्हणाला.

"नाही तर! मी तू झोपल्यावर लगेच झोपी गेली. काय माहित कसं काय उघडं राहिलं दार?", सुपर्णा आश्चर्याने म्हणाली.

"पण सुपर्णा मी तुला एक गोष्ट सांगतो हे घर काहीतरी विचित्र वाटते खरं ", सुमित

"कसं काय असं वाटलं तुला ", सुपरणा

"काल रात्री काय चित्रविचित्र आवाज येत होते, खिळे ठोकण्याचा आवाज, कोणाचा तरी पाय घासत चालण्याचा आवाज आणि काही वेळाने इतका घाणेरडा वास आला मला की श्वास घेणं मुश्किल झालं मला. असा अनुभव मला याआधी कुठेच आला नाही.", सुमित

"मला पण काल संध्याकाळी ठोकण्याचा आवाज आणि घाणेरडा दर्प आला होता. पण मला काय वाटते ह्यात एवढं विचार करण्यासारखे काहीच नाही. आजूबाजूचा आवाज असेल तो आणि वास ही असेल कुठला तरी. जाऊदे सोड तो विषय. आज कुठली भाजी करायची ते सांग?", सुपर्णा ने सुमितला विचारलं पण त्याचे लक्ष नव्हते. तो विचारात गुंग होता त्यामुळे तिने त्याला पुन्हा विचारले तेव्हा तो भानावर आला आणि म्हणाला, " कोणतीही कर तुला आवडेल ती. "

तेवढ्यात सुमित च्या फोन ची रिंग वाजली.

"हॅलो! हं बोल गं! काय म्हणतेस?", सुमित

पलीकडून आवाज

"अच्छा! अगं मग ये न घरी उगीच फॉर्मल नको होऊ. बोल सुपर्णा शी ", असे म्हणून सुमित ने सुपर्णा ला फोन दिला. तिने स्क्रीन वरचे नाव पाहिले तर ती होती सुमित ची आत्येबहीण श्वेता.

"हां बोल श्वेता लंडनहून केव्हा आली तू?", सुपर्णा

पलीकडून आवाज

"अच्छा आता महिनाभर तरी आहे ना माहेरी मुक्काम?", सुपर्णा

पलीकडून आवाज

"अरे व्वा छान! ये मग तू छोटी ला घेऊन. आत्यांना सुद्धा आण सोबत, आम्ही वाट बघतो. जेवण्यात काय करू? "

पलीकडून आवाज

"बरं बरं तुला आवडेल तेच करते.", असं म्हणून सुपर्णा ने सुमितला फोन दिला त्याने आणखी काही बोलून फोन ठेवला. दोघेही आपापल्या कामाला लागले.

बरोब्बर दुपारी एक वाजता श्वेता तिच्या सहा महिन्यांच्या मुलीला आणि आत्यांना घेऊन हजर झाली. सुमित -सुपर्णा ने त्यांचे स्वागत केले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. सगळे गप्पा मारत मारत जेवू लागले.

"छान सोसायटी आहे हां सुमित, फ्लॅट ही चांगला आहे.", श्वेता

"हो न! ह्या सोसायटी चे नाव माझ्या एका सहकार्याने मला सुचवले त्यामुळे आम्ही दोन दिवसांपूर्वीच इथे शिफ्ट झालो.", सुमित

"हो आईने मला सांगितले की आत्ताच तुम्ही शिफ्ट झालात म्हणून मला वाटलं लगेच यावं की नाही पण आई म्हणाली त्यानिमित्ताने सुमित चा नवा फ्लॅट पाहून यावा आणि भेटी गप्पा ही होतील.", श्वेता

"बरं झालं तुम्ही आल्यात, आम्हालाही नवीन फ्लॅट मध्ये थोडं चुकचुकल्या सारखं वाटत होतं", सुपर्णा सुमित कडे सहेतूक नजरेने पाहत म्हणाली.

"हो नवीन ठिकाणी रुळायला जरा वेळ लागतो. एकदा सवय झाली की करमेल तुम्हाला", आत्या म्हणाल्या.

जेवणं आटोपल्यावर सगळ्यांनी थोडा आराम केला त्यानंतर सगळे खाली सोसायटीत पाय मोकळे करायला निघाले.

"वाव! मस्त आहे रे सोसायटी, बऱ्याच सुखसुविधा आहेत इथे. मुलांना खेळायला मैदान, झुले वगैरे. ", श्वेता

"वॉकिंग ट्रॅक ही छान ahe", आत्या

"अरे व्वा मंदिर सुद्धा आहे", सुपर्णा

"अगं हो आणि बरेच धार्मिक कार्यक्रम होतात मंदिरात. माझ्या कलीग ने सांगितलं होतं मला. सुपर्णा ला आवड आहे धार्मिक गोष्टींची ", सुमित ने आत्याला सांगितलं.

"चांगलं आहे देवा धर्माची आवड पाहिजेच", आत्या

"एकंदरीत मस्तच आहे सोसायटी, बॅडमिंटन कोर्ट, टेबल टेनिस, बास्केट बॉल एरिया, जिम, सगळं छान आहे.", श्वेता उत्साहात तिच्या मुलीला खांदयावर थोपटत म्हणाली.

"एक काम करा तुम्ही दोघी, आज इथेच थांबा वाटल्यास उद्या जेवल्यावर जा तसंही घरी वाट पाहणारे कोण आहे?", सुमित

थोडे आढेवेढे घेऊन अखेर श्वेता आणि आत्या मान्य झाल्या. त्यानंतर चौघान्नी मिळून बॅडमिंटन खेळले, सुमित श्वेता बास्केट बॉल खेळले. काही वेळ सगळे मंदिरात बसले. आणि मग कार मध्ये एक चक्कर मारून घरी फ्लॅट नंबर 1002 मध्ये पोचले.

फ्लॅट चे दार उघडताना पुन्हा सुमित सुपर्णा ला काहीतरी ठोकण्याचा आवाज येऊ लागला. सुमित ने श्वेता आणि आत्या कडे पाहिलं पण त्यांचं लक्ष नव्हतं.

दार उघडताच पुन्हा तो घाणेरडा दर्प सगळ्यांच्याच नाकात घुसला

श्वेता ने विचित्र तोंड केलं आणि आत्याने पदर नाकाला लावला.

क्रमश: