महिलादिनाच्या निमीत्याने
महिलादिनानिमीत्यानं विचार मांडतांना एक विचार हाही मनात येतो. खरं तर तो संभ्रमाचे विचार आहे. कारण आज महिलांकडे पाहिलं तर महिला सक्षम आहे. त्याची उदाहरणं द्यायची झाल्यास नक्कीच देता येतील. कारण आज कैसर विल्यमसारखी महिला अंतराळात पोहोचलेली आहे. प्रतिभा पाटील सारखी महिला देशाच्या राष्ट्रपती बनल्या. किरण बेदी सारखी महिला राजकारणात सक्रिय झाली. तसंच इंदिरा गांधींसारखी महिला भारताची पंतप्रधान झाली. सोनिया गांधीसारखी महिला काँग्रेसची अध्यक्षा. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील महिलांच्या सक्षमीकरणांची. यावरुन वाटतं की खरंच महिला सक्षम आहे.
आजचा काळही असाच महिलांच्या सक्षमीकरणाला अनुकूल आहे. आज महिलांनी आपला स्वतःचा विकासच केला नाही तर ती आयतोब्या असलेल्या व स्वतःला पुरुष समजणा-या माणसाला पोषतो. आजही ठोंब्यासारखा बलदंड असलेला पुरुष हातपाय गळल्यागत महिलांसमोर गुलामागत वागतो व आजही घरातील स्नुषा चांगल्या निघाव्या, म्हणून विधात्याकडे साकडे घालणा-या भरपूर सासवा जगात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजही महिला पुरुषांना आपल्या पत्नीच्या हातचे कळसुत्री बाहुले म्हणून घरात वावरावं लागतं. संसार करावा लागतो. त्यामुळं महिला सक्षमच वाटते.
काल ठीक आहे की महिला सक्षम नव्हती. तिला साधा शिक्षणाचा अधिकार नव्हता. सतत तिच्यावर अत्याचार होत होता. बलात्कार तर वारंवार व्हायचा. घरात, दारात आणि बाहेरही. पुर्वीच्या काळातील महिलांवरील अत्याचाराबाबत सांगायचं झाल्यास पुर्वी बालविवाह व्हायचा. वधू कमी वयाची व वर जास्त वयाचा. यात वर वयानं कितीतरी मोठा असल्यानं मरुन जायचा. मग त्या घरात त्या वधूची साडेसाती सुरु व्हायची. साडेसाती म्हणजे एकाच घरातील सारी मंडळी या तरुण असलेल्या विधवेवर अत्याचार करीत सुचायची. तो बलात्कारच असायचा. परंतू त्यावर आवाजही उठवता येत नव्हता महिलांना. कारण ती सक्षम नव्हती. तसेच कायदेही तसे सक्षम नव्हते. विधवा विवाह बंदी होती.
आज काळ बदलला आहे. महिलांना शिकता येतं. उच्च शिक्षण घेता येतं. महिलांना आपला बालविवाह रोकता येतो. त्यांना विधवा विवाह करण्याची अनुमती आहे. विनाघुंघट कुठेही जाता येतं. कुठंही केव्हाहीपर्यंत विहार करता येतं. एवढंच नाही तर एक पती असतांना तो जर बरोबर वागत नसेल तर वेळप्रसंगी बदलवता येतो किंवा पती असतांनाही बिनधास्तपणे पर पुरुपांसोबत हिंडता येतं. कारण त्यांना कायद्याच्या संरक्षणाचं कवच आहे. मग असे असतांना त्या महिला स्वतःला का कमकुवत समजतात तेच कळत नाही. त्याचं कारण आहे येथील संस्कृती. आपली संस्कृती महान आहे. त्या संस्कृतीला विशिष्ट असं वलय आहे. महिलांबाबतीत सांगायचं म्हणजे ही संस्कृती सक्षम आहे महिला बाबतीत. या भारतीय स्री संस्कृतीला त्यांचा पुर्वइतिहास माहित आहे. तो पुर्वइतिहास म्हणजे दुर्गा, काली अवतारांची. त्यातच त्यांना हेही माहीत आहे की या संस्कृतीनं गार्गी, मैत्रेयीच्या रुपात शास्त्रार्थही केला होता व त्या महिला संस्कृतीनं पुरुषांच्या बरोबरीला खांद्याशी खांदा लावला. महिला कमकुवत नाहीच आणि कोणीही तिला कमकुवत समजून घेवून भूल करु नये. ती कमकुवत सारखी वागते तेही आपल्यासाठीच. तिलाही वाटते की हा देश माझा आहे. माझ्या देशाचा अपमान होईल मी जर अशी संस्कृतीला धरुन वागले नाही तर. हाच हेतू ठेवून महिला वर्ग वागत होता काल. आजही वागतात. परंतू त्या महिला वर्गाच्या तशा वागण्याचा फायदा हा मध्यंतरीच्या पुरुष जातीनं घेतला व त्यांच्यावर विशेष अशी बंधनं घातली व त्यांना गुलामागत वागवलं. यात त्यांनी पुर्ण संस्कृती स्रियांना सोपवून दिली. त्यांनी काय खावं, काय प्यावं याबाबतही बंधनं घातली. डोक्यावर पदर असावा. लुगडंच घालावं अशी बंधनं.
आज ब-याच महिला पुढे गेल्या आहेत. राजकारण, अर्थकारण व देशाची धुरा सांभाळत आहेत. आज महिलांनी ओळखलं आहे की आपण जर आवाज उचलला नाही आणि असेच दबत राहिलो तर येथील पुरुष वर्ग आपल्यावर विनाकारणचा अत्याचार करतो. म्हणून त्या सक्षम बनल्या आहेत. आजही ज्या घरी मुली विवाह करुन जातात. त्या घरी मुली आपल्या मनानुसार नवरोबाला वागायला लावतात. जर नवरोबा तसे वागत नसतील तर त्यांना इंगाही दाखवायला त्या मागे राहात नाहीत किंवा पाहात नाहीत. जर नवरोबा व सासूसासरे चांगले असतील तर मुली चांगल्या वागतात. सांस्कृतीक परंपरेनं वागतात. परंतू जर नवरोबा चांगले नसतील तर मात्र अशावेळी त्या संस्कृत्यांनाही गहाण टाकतात. त्यानंतर कोणी नावबोटं ठेवो की अजून काही त्या घाबरत नाहीत. त्या मुली डोक्यावर पल्लूही ठेवत नाहीत. कोणतीच व्रतवैकल्ये पाळत नाहीत.
महत्वपुर्ण गोष्ट ही की महिला ही आज कमकुवत नाही. तिला कोणीही कमकुवत समजू नये. ती कालही कमकुवत नव्हती. कालही ती दुर्गा रुपात वावरुन माजलेल्या महिषासूराचा विध्वंस करीत होती. आजही ती अशाच माजलेल्या महिषासूराचा विध्वंस करण्यास सक्षम आहे. तरीपण आजही अशा काही स्रिया आपण पाहतो की त्यांना पाहिलं की महिला कमकुवत जाणवते. अशा महिला आजही देशात ब-याच आहेत की ज्या आजही अत्याचार सहन करतांना दिसतात. आजही त्यांच्या डोक्यावर पदर दिसतो. घुंघटही दिसतो. आजही त्या महिलांवर घरादारात अत्याचार होत असतो. त्यांना मनमोकळे पणानं वागता येत नाही. ब-याच स्रियांना आजही कुठेही केव्हाही मनमोकळे पणानं फिरता येत नाही. सतत भिती आणि भितीच तसंच भितीदायक वातावरणही दिसतं. त्यांच्या आचरणातून आजही त्यांचं दुय्यम स्थान दिसून येतं.
आज महिला दिन आहे. महत्वाचं म्हणजे आजपासून तरी महिलांनाही चांगलं वागवावं. त्यांनाही सामाजिकता प्रदान करावी. त्या मान ठेवतात म्हणून त्यांच्याकडून जबरदस्तीनं प्रथांचं पालन करुन घेवू नये. तेव्हाच महिलादिनाचं सार्थक होईल एवढंच सांगावेसे वाटते.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०