Apradhbodh - 8 books and stories free download online pdf in Marathi

अपराधबोध - 8

दुसऱ्या दिवशी सारांशला श्वेता संपुर्ण दिवस दिसली नाही आणि जेव्हा तीचा बद्दल तीचा आईला वीचारणा केल्यानंतर त्याला ही गोष्ट कळली, आता मात्र सारांशची प्रतीक्षा ही आणखीनच वाढली होती ती किती काळ असेल याची जाणीव काही कुणालाच नव्हती. श्वेता तेथे जाऊन
तीचा कार्यात व्यस्त होऊन गेली होती. काळावर काळ लोटून गेला आणि आज ४ ते ५ वर्षांचा काळ होऊन गेला त्यात दोन्ही प्रेमी युगल आपल्या व्यस्त अशा आयुष्यात गुंग होऊन गेले. परन्तु त्यांचा प्रेमाची दोरी ही अजूनही तसीच दोघांना जोडून होती. श्वेता आजही तशीच एकटी होती आणि
सारांश हा तर तीला समर्पित होता म्हणून तो तीचा प्रतीक्षेत आजवर तसेच जीवन जगत होता. त्यातल्या त्यात श्वेताने श्यामल आणि शेखर यांचे लग्न लावून दिले होते, श्यामलचे लग्न श्वेताचा कार्यालयातील एका कर्मचारी गण याचा भावाशी आणि शेखरचे लग्र श्वेताचा एका मैत्रीणीचा बहिणीशी
लावून दिले होते. श्वेताचा तो अर्धस्थापीत असा काळ आता संपला होता आणि ती दोन दिवसांचा पुर्वीच आपल्या जूण्या कार्यालयात आणि घरी आलेली होती. तीचाबरोबर शेखर आणि त्याची पत्नी सुद्धा आलेली होती तीचे नाव शर्वरी होते. तर तीच शर्वरी आज सारांशला दिसली होती शर्वरी ही रुपाने आणि शरीराने आकर्षक होतीच परन्तु तीचे मन है चुलबुल आणि अस्थिर होते. तिला परपुरूषांचे आकर्षण होते. त्यामुळे ती परिसरातील कुठल्याही पुरुषांकड़े लालसेचा दुष्टीने बघत रहायची आणि आपले अंग दाखवून त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्र करायची.

तर आता श्वेता ही परत आलेली आहे हे कळल्यावर सारांश मुद्दाम करून आणि वीशेष म्हणजे तीला भेटण्यासाठी आतुर झालेला होता. तो वीचार करू लागला की श्वेताला कसे भेटायचे कारण की तो आता पुर्विसारखा त्यांचा घरात जाऊ शकत नव्हता. श्वेताचा घरात शेखरची तरुण
पत्नी आलेली होती आणि कुणालाही कसलेही वेगळे वाटायला नव्हे म्हणून तो तीचा घरी जाण्याचे टाळायला बघत असतो. तर आता सारांशचा प्रतीक्षेचा अंत होणार होता. तर सकाळी सारांश हा जॉब वर जाण्यास नीघाला होता आणि आज मुद्दाम करून तो श्वेताचा घराकडे बघत नीघाला होता. त्याचे संपुर्ण लक्ष तीचा घराकडे आणि तीचा एकमेव दर्शनाचा अपेक्षकड़े होते, तोच त्याला समोरून एक आवाज आला, " मला शोधताय काय?" अनपेक्षित तो आवाज ऐकल्यावर सारांशचे लक्ष तीकड़े गेले. तर ती शर्वरी होती, ती तीचा केसांची लट गोल गोल फिरवीत तीची जीव्हा ओठांवर फिरवत सारांशकड़े बघत होती. तीने मुद्दाम करून तीचा खांद्यावरचा पदर आशा प्रकारे बाजूला सारलेला होता की जेणेकरून तीचा वक्ष स्थलाचे दर्शन सारांशला व्हावे. तीने थेट सारांशचा खांद्यावर हात ठेवून त्याला आमंत्रण देण्यागत त्याला वीचारले होते.

तीचे असे वागणे आणि बोलणे बघुन सारांशला फारच राग आला होता. परन्तु त्याने तो राग आवरला आणि तो तेथून काहीच न बोलता नीघून गेला. शर्वरी जरी तीचा पतीचा प्रती एकनीष्ठ नव्हती, परन्तु सारांश हा श्वेताचा प्रती एकनीष्ठ होता. आजवर अनेको मुली आणि स्त्रियांनी सारांशचे चीत्त भंग करण्याचे प्रयत्न केले होते, परन्तु त्या सारांशचा मनातील श्वेताबद्दलचा नीर्मळ प्रेमाला क्षणिक ही बदलू काय कमी करू शकल्या नाही. तर आज सारांशचा नवीन दिवसात काही तरी घडणार होते. सारांश त्याचा ऑफिसमध्ये एका मोठ्या पदावर काम करत होता आणि आज त्याचा ऑफिसमध्ये एक मीटिंग होती. एका दुसऱ्या कंपनी सोबत सारांशची कंपनी काही अनुबंध करणार होती. या दोन्ही कंपन्या मीळून कुठले तरी प्रोजेक्ट संपुष्टात आणणार होते, म्हणून ही मीटिंग आयोजीत केलेली होती. तर हे प्रोजेक्ट सारांशचा हाताने पूर्ण होणार होते त्यामुळे संपुर्ण प्रोजेक्टचा कार्यभार कंपनीने सारांशला सोपवलेला होता. तर आमंत्रीत केलेले सगळे अतीथी आल्यानंतर त्या ऑफिसचा चपराशी सारांशला बोलावण्यासाठी आला आणि म्हणाला, " साहेब, सगळे मान्यवर गण आलेत तुम्हाला मीटिंग मध्ये बोलावले आहे." मग सारांश मीटंग हॉल मध्ये येऊन दाखल झाला होता.
त्याने सगळ्या मान्यवरांचे हस्तांदोलन करून स्वागत करत असतांना अचानक एक हात हस्तांदोलनाकरीता हातात
घेतला आणि तो तेथेच थाबला.

सारांशला तो स्पर्श ओळखीचा वाटला त्यामुळे आवर्जुन त्याने त्या चेहऱ्याकड़े बघीतले तर तो चेहरा श्वेताचा होता. सारांशचा कंपनीचे ज्या कंपनीसोबत अनुबंध होणार होते ती कंपनी श्वेताची होती जेथे ती काम करायची. थोड्या वेळेसाठी सारांश त्याचे भान हरवायला लागला होता परन्तु सभोवतालचा परीस्थितीची जाण घेऊन तो पुढे सरसावला. सगळ्यांचे स्वागत केल्यानंतर मीटिंगला सुरुवात झाली आणि जवळ जवळ १ तास ती मीटिंग चालली. त्यानंतर आवश्यक त्या कागदपत्रांवर हस्ताक्षर करून दोन्ही कंपन्यांचे अनुबंध एकमेकांशी झाले. मीटिंग संपल्यावर सारांशने श्वेताला थांबण्यास सांगीतले काहीतरी काम आहे म्हणून, श्वेता ही सारांशचा तो रुबाब आणि त्याची परिपक्वता बघून अचंभीत आणि
समाधानी झालेली होती. तीने तीचा हृदयाचे द्वार जरी संपुर्ण पुरुष जातीसाठी बंद केलेले असतील तरीही सारांशसाठी तीचा हृदयातील एका कोपऱ्यात एक जागा ही रीक्त होती ज्याबद्दल तीलाही कळले न्हवते आजवर. परन्तु आज अचानक पुन्हा सारांश तीचा पुढे आल्यावर त्याचा एका
शब्दावर कसल्याच शंकेशिवाय ती त्याचा साठी तेथे थांबली.

काही वेळेने सारांश तेथे आला आणि तीला सोबत चलण्यास सांगीतले. तेथून सारांश तीला घेऊन एका सुंदर अशा होटल मध्ये घेऊन गेला. तेथे मोकळया पटांगणात मोकळे टेबल आणि खुर्च्या ठेवलेल्या होत्या. ते दोघेही तेथे जाऊन बसले त्यानंतर सारांश श्वेताला म्हणाला, " श्वेता पुष्कळ दिवस म्हण की वर्ष होवून गेलेत आपल्या दोघांना भेटून, जवळ जवळ ४ ते ५ वर्ष झालेत हो ना." तेव्हा श्वेता बोलली, " हो रे दिवस कसे पटापट उलटून गेलेत काही माहितच नाही झाले. या काळात फारच परीवर्तन आले आहे रे तुझ्यात आणि तुझ्या कर्तुत्वात. काय ती प्रसिद्धि मिळवली आहेस तू मी तर थक्क होवून गेली होती जेव्हा पहिल्यांदा आज तुला त्या मुख्य् स्थानावर बसलेल बघून, पुष्कळ नाव आणि पैसा कमावला आहेस रे तू. तर आता सांग कसे वाटत आहे तुला आणि कसा आहेस तू." असे श्वेताने अनभिग्यपणे सारांशला वीचारले. मग सारांश गंभीर होऊन बोलला, " पुर्विसारखाच एकांतात." ते शब्द बोलतांना त्याचा डोळ्यांत तेच पूर्वीचे प्रेमाचे भाव होते. परन्तु श्वेताला कळलेच नव्हते तो काय बोलतो आहे. तर तीने पुन्हा त्याला वीचारले, " काय, काय बोलतोस, एकांतात म्हणजे? " मग सारांश बोलला, " हो एकांतात, ज्याचा मागे पुढ़े कोणीच आपला नाही आहे तो आहे मी." मग श्वेता हसून बोलली, "थट्टा करतोस माझी अरे माझ्या एकांकी आयुष्याची मला का बर आठवण करू देतोस, हे आयुष वीसरण्यासाठी तर मी स्वतःला कामात व्यस्त करून ठेवते. इतर लोक सारखी माझी थट्टा करत असतात आणि तू सुद्धा माझी आणि माझ्या आयुष्याची थट्टा करतोय इतर लोकांचाप्रमाणे." असे बोलतांना मात्र श्वेताचे डोळे पाणावले होते.

शेष पुढील भागात........

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED