Apradhbodh - 6 books and stories free download online pdf in Marathi

अपराधबोध - 6

क्षणासाठी तीने विचार केला तो आला नसेल परन्तु तीने बघीतले की सारांशचा गच्चीवरचा लाईट सुरु आहे आणि विशेष म्हणजे तेथे सारांशची रुमाल खाली गच्चीवर पडून होती. आता मात्र श्वेता स्वतःलाच दोष देत राहिली. ती म्हणाली, " मी निरर्थक सारांशचा मन आणि भावनांचा खेळ केला. तो बीचारा माझी वाट बघत राहिला आणि मी त्याला तसेच माझी वाट बघत ठेवून घरीच बसले. माझ्या अशा वागण्याने त्या बीचाऱ्याला किती वाईट वाटले असेल. मी फारच वाईट आहे आणि मी सारांशचा अपेक्षा भंग केला आहे यासाठी मी स्वतःला कधीच क्षमा करणार नाही." असे म्हणत ती तेथेच गच्चीवर स्वतःला दोष देत बसली होती. परन्तु तेथे नीयतीला पुन्हा तीचा खेळ खेळायचा होता म्हणून तीने काळ चक्र परत फिरवले.
स्वतःपासून हताश आणि निराश होऊन श्वेताही आता घरी जाण्यासाठी जीण्याचा दाराकड़े जाण्यास नीघाली होती आणि रुमाल गच्चीवर राहिला होता म्हणून सारांश गच्चीवर येण्यास पायऱ्या चढू लागला होता, तो गच्वीवर येऊन पोहोचला तेव्हा त्याचे लक्ष रुमलाकड़े होते. त्याने रुमाल उचलला आणि घरी जाण्यासाठी नीघणार तोच त्याचा कानावर पैंजन वाजण्याचा आवाज आला. त्याने आवाजाचा दिशेने वळून बघीतले तर श्वेता ही गच्चीचा दाराचा दिशेने त्याला जाताना दिसली. आता मात्र सारांशला राहवल नाही आणि त्याने तीला आवाज दिला, " श्वेता !" सारांशचा आवाज श्वेताचा कानावर आला तेव्हा स्वतःचा गूंगीतुन नीघून तीने मागे वळून बघीतले. काय बघते तर सारांश त्याचा गच्चीवर उभा तीला आवाज देत असताना दिसला. सारांशला बघून त्या क्षणी श्वेताला फारच बरे वाटले, त्यावेळेस मात्र दोघेही अतीआनंदित होऊन गेले आणि त्या आनंदाचा भारात सारांश केव्हा न बोलता श्वेताचा गच्चीवर जाऊन पोहोचला होता. त्याच आनंदाचा उन्मादात त्याने जाऊन तेथे श्वेताला आपल्या बाहुपाशात घेऊन भरगच्च असे आलिंगन दिले. त्यावेळेस श्वेताने सुद्धा त्याला प्रतीसाद दिला आणि तीने त्याला तीचा छातीशी कवटाळून घट्ट असे आलिंगन दिले.

त्या थोड्या वेळेसाठी ते दोघेही मागील सगळ विसरून हापापलेल्या एकमेकांचा सहवासाचा मनसोक्त आनंद लुट् लागले होते. एकमेकांचा मीठीत ते दोघेही बेभान होऊन गेले होते. श्वेताचे घाबरून आणि चींतेने ग्रस्त होऊन घामाने भीजलेत्या शरीरातून मादक असा घामाचा गंध सारांशचा नाकात दरवळत होता आणि तो अधिकच उत्तेजीत होऊन गेलेला होता, त्याच प्रमाणे सारांश सुद्धा एक तरुण होता आणि त्याचाही तरुण शरीराचा एक पोरूषात्मक गंध श्वेताचा सुद्धा नाकात दरवळत होता. त्यामुळे ती सुद्धा बेभान होऊन त्याचा अस्वाद घेत होती.त्या वेळेस मात्र दोघांचे ही हात अनयासपणे दोघांचा ही शरीराचा प्रत्येक अवयवांना न चुकता स्पर्श करत होते. मग अनयास दोघांनी ही एकमेकांच्या शरीरावर चुंबनाचा वर्षाव करण्यास सुरुवात केलेली होती मागचा रात्रीप्रमाणे. असे करता करता सारांशने श्वेताचा ओठांचे एक दीर्घ असे चुंबन घेतले ते चुंबन पूर्ण होण्याचा दरम्यान जेव्हा पर्यंत दोघांचे ही डोळे बंद होते तेव्हा पर्यंत काहीच नाही घडले आणि मग त्या दरम्यान अचानक दोघांचे डोळे उघडले आणि दोघांचा नजरा एकमेकांशी भीडल्या. तेच दुसऱ्या क्षणी श्वेताने स्वतःला सारांशचा पासून लांब सारले.

कसल्या तरी गूंगीतुन बाहेर आल्यागत तीने तसे केले आणि मग तीने बघीतले तर तीचा सलवारची ओढनी ही खाली पडलेली आहे आणि तीचा सलवार ही सम्पूर्ण संपूर्ण विस्कटलेला आहे. शिवाय तीने सारांशकड़े बघीतले तर सारांशचा चेहरा, मान आणि छातीचा काही भाग हा श्वेताचा ओठांचा ठशांनी भरून गेलेला आहे. मग तीने क्षणातच तीचा सलवार सावरला आणि तीची पडलेली ओढनी पुन्हा तीचा छातीवर घेतली. इकडे सारांशने सुद्धा त्याची वीस्कटलेली टी शर्ट ही खाली सरकवली आणि त्याने त्याचे विस्कटलेले केस हाताने व्यवस्थित केले. आता दोघेही व्यवस्थित झालेले होते परन्तु पुन्हा आता दोघांचे एकमेकांचा नजरेशी नजर मीळवण्याचे धाडस होत नव्हते. परन्तु यावेळी सारांशने पुढाकार घेतला आणि तो म्हणाला, " सॉरी श्वेता, मला माफ़ कर मी तुला वचन दिले होते तरीही माझ्याकडून पुन्हा हे कृत्य घडले. मी तुझा अपराधी आहे आणि तू जी कोणती ही शिक्षा देशील ती शिक्षा भोगण्यास मी पात्र आहे."

सारांशचे बोलने ऐकून आता श्वेताचे सुद्धा धाडस होऊ लागले आणि ती बोलली, " सारांश, हे बघ यात तुझाच एकट्याचा दोष नाही चुकी नाही आहे. या अपराधात मी सुद्धा तुझ्या प्रमाणे तेवढीच अपराधी आहे. असे आणि हे असले काही आपल्यात घडून यायला नव्हते रे. आपल्या दोघांचे पवीत्र भाऊ बहिणीचे नाते आहे आणि हे असे आपल्या पासून घडले. तेव्हा सारांश बोलला, " श्वेता तू खर बोललीस परन्तु ते अर्धवट, हो आपल्यात नाते आहे आणि ते ही पवित्र आणि निर्मळ प्रेमाचे. दूसरी गोष्ट म्हणजे मी आता लहान राहिलेलो नाही तुझे आणि माझे काही एकाच रक्ताचे, एकाच जातीचे आणि एकाच कुळाचे नाते नाही आहे. आपल्यात नाते आहे ते फक्त आणि फक्त मैत्रीचे आणि प्रेमाचे, तू माझी सखी आहेस "सख्खी" नाही आहेस हे लक्षात ठेव. बालपणात अजाणपणे तुला ताई म्हटल्याने तुला सखी, संगीनी सारखे प्रेम करण्याचे तुला पत्नी न बनवण्याचे माझ्यावर काही बंधन नव्हते लावून घेतले होते. आपल्या दोघांत जे घडले आणि पुढेही घडणार हा काही आपण अपराध केलेला नाही आहे. प्रेमी युगलात हे कृत्य घड़तेच ते पतीपत्नी असोत की प्रेम करणारे यूवक यूवती असोत."

सारांशचा वागण्यात आणि बोलण्यात आता श्वेताला त्याचात परिपक्व तरुण आणि पुरुषाची छवी दिसू लागली होती. त्याचे ते वागणे आणि त्याचे ते थोर व्यक्तीसारखे बोलणे तीला राहून राहून त्याचा आभास करून देत होते की सारांश आता खरच मोठा झालेला आहे. परन्तु तीचा मनातील दुवीधा तीला आताही अपराधबोधाची अनुभूती करवून देत होती. ती पुन्हा म्हणाली, " सारांश तू जे काही बोलतो आहेस ते जरी तुला पटणारे असेल तरी या जगाला आणि विशेष म्हणजे मनाला पटायला हवे, तुझ्या आणि माझ्या बालपणी जेव्हा आपल्या आई बाबांची आणि अर्थात आपली ही भेट म्हणावे की ओळख झाली त्या वेळेस तू आणि माझी भावंड माझ्यापेक्षा वयाने लहान होती. त्याचबरोबर आताही ते आणि तू माझ्यापेक्षा लहान आहात, मी बालपनापासून तुला माझ्या सख्या भावंडांचा प्रमाने प्रेम, वात्सल्य आणि स्नेह दिले आहे. माझ्या मनात त्यांचा बरोबर तुझ्या बद्दल ही तेच निर्मळ आणि निरागस प्रेमाचे भाव आहेत. तर मी तुला त्यांचा पेक्षा वेगळा कसा काय रे समजू"

शेष पुढील भागात........

इतर रसदार पर्याय