अपराधबोध - 7 Gajendra Kudmate द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अपराधबोध - 7

हे सगळ बोलतांना श्वेताचा चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता आणि डोळ्यांत अश्रू होते. ती पुढ़े म्हणाली, " माझे बाबा गेले तेव्हा मी सुद्धा तुझ्याचप्रमाणे एक अल्पवयीन तरुणी होते. माझ्याही तेव्हा अनेको आशा, अपेक्षा आणि भावना होत्या. माझे ही एक गोड स्वप्र होते की मी सुद्धा नवरी बनुन कुणाचा तरी घरी जाईल आणि मला हवे असलेले मानसिक आणि शारीरिक सुख त्या माझ्या हक्काचा पुरुषाकड्न ग्रहण करणार. परन्तु नियतीला काही आणखीच घडवायचे होते म्हणून माझ्या भावंडांचा भवीतव्यासाठी मला त्या सगळ्या आशा, अपेक्षा आणि भावना त्याचबरोबर मी उघड्या डोव्यांनी बघीतलेल्या स्वप्नांची आहुती द्यावी लागली होती. अरे मी बालपणापासून त्यांची ताई तर होतीच परन्तु मला माझे बाबा गेल्यानंतर त्यांची आई सुद्धा व्हावे लागले. अरे मला ही आई व्हायचे होते आणि आहे रे, परन्तु आता ते शक्य नाही आहे. मी माझ्या त्या भावना आणि पर पुरुषाचा बद्दलचे आकर्षण याला कधीचीच तीलांजली देऊन दिली होती. परन्तु तुझे ते अनपेक्षित मला दिलेले आलिंगन मला आणि माझ्या हापापलेल्या मनाला आणि शरीराला सुखावून गेले. मी खर तर तुझे आभार मानायला हवे की माझ्या आयुष्याचा जो स्वर्णीम काळ मी आजवर विसरले होते त्याची अनुभूती आणि प्रचीती तू या दोन दिवसांत मला करून दिलीस." असे म्हणून ती ढसाढसा रडू लागली होती.

आता गच्चिवरील वातावरण अधिकच गंभीर होऊन गेले होते. सारांशने तीचा मनातील वेदना सम्पूर्ण मन आणि चित्त लावून ऐकून घेतली. मग थोड्या वेळाने तो बोलला, " श्वेता तू जे काही तुझ्या मनातील भावना आणि वेदना होती ती तू सांगुन मोकळी झालीस, आता माझ्या मनातील भावना आणि तुझ्या या बोलण्याने जी वेदना माझ्या कोमल हृदयाला होत आहे तीचाबद्धल तुला सांगतो. श्वेता तुझ्या म्हणण्याप्रमाणे आपली भेट ही बालपणातील अल्हळपणात झाली होती. तुझ्या आणि माझ्याप्रमाणे जगातील कुणाही आणि कुठल्याही लहान बालकाला त्या वयात आणि त्या क्षणात नातेबंध, लहान मोठे, राग आणि द्वेष हे काहीच कळत नाही. तेव्हा ते त्यांचा मनात येईल तसे वागतात, बोलतात आणि करतात. अग लहान असतांना आपण बहुला बहुलीचे खेळ खेळलो तेव्हा श्यामल कधी माझी तर कधी शेखरची पत्नी बनत होती. त्याचप्रमाणे तू सुद्धा माझी आणि शेखरची पत्नी बनत होतीस " तेवढ्यात श्वेता मधेच बोलली, " ते सगळे बालपणातील खेळ होते रे आणि आज हे खरे आयुष्य आहे." तेव्हा मग सारांश म्हणाला, " होय ग सखी मी तेच म्हणतोय ते बालपणातील खेळ होते आणि तो बालपणाचा काळ होता. त्यावेळेस तुला आणि मला आपण कोण आहोत, काय आहोत, सख्खे भाऊ बहीण आहोत की कुणी परके आहोत याची जाणीव नव्हती. त्याचप्रमाणे तू मुलगी
होतीस आणि मी मुलगा होतो याची सुद्धा जाणीव नव्हती. त्यावेळेस आपल्या दोघांत कसलीही लाज लज्जा नव्हती. तू त्यावेळेस माझे कपड़े घालायची आणि मी तुझे कपडे घालायचो. याशिवाय आपण एकमेकांचा सोबत उघडे होऊन आंघोळ करायचो. ते त्यासाठी की लहानपणी लहान मोठे, आपले परके विशेष म्हणजे मुलगा आणि मुलगी याची आपल्याला जाणीव नव्हती म्हणून."

सारांश पुढे म्हणाला, "तू म्हणालीस की तू बालपणापासून मला तुझ्या भावंडांसारखे प्रेम वात्सल्य आणि स्रेह दिले आणि त्यामुळे तुझ्या मनात माझ्याबद्दल वेगळे भाव नाही आहेत. तू इथेच चुकत आहेस मनुष्य त्याचा बालपणात जे काही अनयासपणे करतो त्याची प्रचीती त्याला त्यांचा वाढत्या वयात येते आणि तो पुन्हा त्या नकळत केलेल्या चूका, कृत्य आणि वर्तनाची पुनरावृत्ती त्याचा वाढत्या वयात कधीच करत नाही. मी पुन्हा म्हणतो आहे कृपा करून वाईट वाटुन घेऊ नकोस तू तेव्हा केलेली चुक आज ही आवर्जून करते आहेस आणि पुढेही करणार आहेस. सगळ्यात मोठी चुक म्हणजे आपल्या भावबंध यांचा भवीतव्यासाठी तू तुझ्या सगळ्या आशा, अपेक्षा आणि भावना त्याचबरोबर तूने उघड्या डोळ्यांनी बघीतलेल्या स्वप्रांची आहुती दिलीस, ज्याची काहीच आवश्यकता नव्हती तू आपल्या कर्तव्याचे वहन करु शकतेस आणि होतीस तेही तुझ्या सगळ्या आशा, अपेक्षा, भावना आणि उघड्या डोळ्यांनी बघीतलेत्या स्वप्नांचा सोबतीने. तू हे सगळ आधीही करु शकत होतीस आणि आताही तू करु शकतेस. तू अजुन काही म्हातारी झालेली नाहीस आणि नाही तुझे एवढे वय झाले आहे. तू आताही स्वतःबद्दल वीचार केलास तर हे सगळ संभव आहे." असे बोलून सारांशने श्वेताचा हात त्याचा हातात घेऊन तीला वीनवणी केली. तो मग खाली जमीनीवर बसला आणि श्रेताचा कुशीत डोक ठेवून तीचा डोळ्यांत बघू लागला.

सारांशचे ते बोलने ऐकून आता मात्र श्वेताचावर वीचार करण्याची पाळी आलेली होती. श्वेताने तीचा हृदयाचे दार जे परक्या पुरुषांचासाठी किंवा कोणत्याही पुरुषासाठी आजन्म बंद केलेले होते तेच दार आज सारांश तीला उघडण्यासाठी म्हणत होता. त्यावेळेस गच्चीवर किर्र अशी शांतता पसरली होती. मग श्वेता बोलली, " माझ्यासाठी हे एवढे सोप्पे नाही आहे रे" तेवढ्यात खालून आईचा आवाज आला, "श्वेता, अग झोपायचे नाही आहे काय तुला शिवाय उद्या सकाळी लवकर उठून तुला कामावर सुद्धा जायचे आहे." आईचा आवाज ऐकल्यावर श्वेता मात्र लगबगीने घरी जाण्यास नीघाली होती तोच सारांशने तीचा हात धरून तीचाकड़े बघीतले आणि तो म्हणाला, " माझ्या प्रश्राचे उत्तर दिले नाहीस मला " तेव्हा श्वेता लगबगीने जाताना म्हणाली, " वेळ आल्यावर ते मी देईल" असे बोलून ती तेथून नीघून गेली. सारांश मात्र व्यथित मनाने तीला जाताना बघत राहिला आणि नंतर तो सुद्धा त्याचा घरी नीघून गेला. त्या दिवसाची ती रात्र आणि आजचा दिवस येत जवळ जवळ पुष्कळ काळ म्हणजे ४ ते ५ वर्षाचा काळ उलटलेला होता. त्याला कारण ही असेच घडले होते. सारांश आणि श्वेताची भेट त्या रात्री झालेली होती जेव्हा सारांशने श्वेताला एक प्रश्र केलेला होता आणि त्या प्रश्राचा उत्तराचा प्रतीक्षेत तो अवीरत आजवर थांबून आहे. त्यानंतर दुसरा दिवस उगवलाच नाही म्हणजे त्या रात्री नंतर दुसरा दिवस उगवला आणि श्वेता तीचा कामावर गेलेली असतांना तीला कळले की तीला आणि तीचाचा सोबत काही कर्मचारीगण यांना दुसऱ्या शहरात अर्धस्थापीत म्हणून काही काळाकरीता हलवण्यात येत आहे. तेथेच त्यांचा रहाण्या आणि खाण्याची व्यवस्था कार्यालय करणार आहे. त्या अनुशंगाने त्या कर्मचारीगण यांना लवकरात लवकर तेथे जाऊन कामावर रुजू होण्याचा फरमान ऑफिसमधून देण्यात आला होता. म्हणून श्वेताला तात्काळ दुसऱ्याच दिवशी तेथे जावे लागले होते.

शेष पुढील भागात........