" अरे आदित्य... तु का रडतो आहेस...???", तीने चकित होऊन विचारलं...
त्याला मात्र तिच्या प्रश्नाचे उत्तर पण देता आले नाही...!! तो वेडा तिच्या मनातील दुख जाणून घेऊन रडू लागला... जणू तिला दुःखात पाहून त्यालाच तिच्या दुःखाची जाणीव झाली...
ती अजूनही चकित होऊन पाहत होती त्याच्याकडे... आज पहिल्यांदा.. कोणीतरी तिचं दुःख ऐकून रडत होतं... आणि तिलाच कळत नव्हतं की रिऍक्ट कसं करावं...???
.....
" अरे आदित्य... असाच रडत बसणार आहेस का रे..???", तीने उठून tissue पेपरचा बॉक्स त्याच्या समोर आणून ठेवला... तसं त्याने लगेच पूर्ण तो बॉक्सच घेऊन एक एक पेपर डोळ्याला लावला... तरीही त्याचे डोळे वाहत होते....
वेदांशीला मात्र मनातून खूप छान वाटलं होतं..!!
जे दुःख ऐकायला तिच्याकडे एक हक्काची व्यक्ती नव्हती... आज तेच दुःख ती एका अनोळखी पण तितक्याच ओळखीच्या व्यक्तीला सांगत होती... आणि ती व्यक्तीही अगदी जवळची असल्याप्रमाणे ऐकत होती... आणि रडतही होती..!
" वेडा... खरंच निरागस आहे..! ", ती मनातच म्हणाली त्याला पाहून...
" झालं का रे रडून..??? अगोदर माहित असतं की तु क्राय बेबी आहेस तर तुला माझी स्टोरी सांगितलीच नसती... माझ्यापेक्षा तर तूच जास्त रडतो आहेस... ", ती किंचित हसून म्हणाली...
" बॉस... तुम्ही खरंच एवढ्या सगळ्यातून गेला आहात...?? मला तर विश्वास होत नाही...! दिवसभर ... तुम्ही दिवसभर ऑफिस मध्ये मला ओरडत असता.. सगळ्यांना धारेवर धरत असता.. डरकाळी फोडत असता... हिटलर होऊन फिरत असता.. वाटलं नव्हतं... तुमच्या आयुष्यात एवढं दुःख असेल...", तो बिचारा भावनेच्या भरात भर भर बोलून गेला...
जेव्हा त्याला कळलं की तो काय बोलून गेला.. तसं त्याने पटकन आपली जीभ चावली... आणि समोर हळूच पाहिले... तसं त्याने आवंढा गिळला... कारण समोर ती त्याला डोळे बारीक करून पाहत होती.... तेही निर्विकार पणे...!!

ती एकटक त्याला पाहत होती... अजिबात काही अंदाज लावता येत नव्हता की ती त्याच्यावर रागावली आहे की नाही..!! तिचे असे निर्विकारपणे पाहणे त्याच्या अंगावर भीतीचा शहारा आणून गेला...
" सॉरी बॉस... ते... ", तो कसूनस हसून म्हणाला... पण मनात मात्र स्वतःला भलत्याच शिव्या घातल्या...
" तुझा या महिन्याचा पगार कट..!!! ", ती कडकपणे म्हणाली...!!
आणि आदी... बिचारा तो तर तोंड पाडून बसला तिथे...!! काहीच बोलला नाही... आणि बोलणारही काय..???!!
ज्याम वाईट वाटलं त्याला... पण माती तर खाल्ली होती त्याने... इमोशन मध्ये बरंच काही बोलून गेला होता... जे नको होतं बोलायला...
बिचारा अगदी चिडीचूप बसला... मनातच काहीतरी calculation करत बसला होता.. काहीतरी बोटांवर मोजत होता...
त्याला असं पाहून ती गोंधळात पडली..!
" काय रे.. काय मोजतो आहेस..??? ", तीने प्रश्न केला...
" तुम्ही या महिन्याचा पगार नाही देणार ना.. मग किती खर्च येईल.. किती पैसे मला वाचवलेले त्यातून खर्च करावे लागतील.. ते मोजून पाहत आहे..", तो अजून बोटांवर गणित करत होता... अजूनही तिच्याकडे पाहिले नव्हते... अगदी गंभीरपणे गणिताचे काम चालू होते त्याचे...
तिला हसू आलं... भयंकर क्युट वाटला तिला तो... आणि हसली ती..!!
तो मात्र अजूनही त्याच्याच गणिताच्या विश्वात..!
" बॉस.. आईचा पगार तर नाही ना कट करणार..???", त्याने तिच्याकडे पाहत निरागसपणे विचारलं... तसं ती खळखळून हसायला लागली..
आणि तो अगदी डोळे विस्फारून पाहू लागला तिला... खूप सुंदर हसू होतं तिचं... कधीही न पाहिलेल्या खळ्या तिच्या गालावर पडत होत्या..! अगदी मनापासून हसत होती ती... तो मात्र अजूनही तिच्या हसूत अडकला होता..
काहीवेळाने ती हसायची थांबली..!
" अरे वेड्या.. नाही कट करणार तुझा पगार... नाही तुझ्या आईचा.. नको एवढा काळजी करुस.. ", ती हसत म्हणाली...
तसं त्याने सुटकेचा निश्वास टाकला... कारण खर्च अंगावर येणार होता त्याच्या.. जर हा पगार मिस झाला असता तर...
" थँक यू बॉस... आणि सॉरी.. ते तुम्हाला हिटलर म्हणालो... ", तो माफी मागत म्हणाला...
" मला माहितीये की मला हिटलर म्हणून ओळखतात ऑफिस मध्ये.. आणि तु ऑफिस जॉईन होण्याआगोदर माहीत आहे मला हे.. So no worries..! पण हा पुन्हा माझ्या तोंडावर बोलू नकोस.. नाहीतर दोन महिन्याचा पगार कट करेन.. ", शेवटचं वाक्य ती त्याला घाबरवत म्हणाली...
" नाही बॉस.. मी हा शब्दच नाही काढणार कधी... बस पगार कट नका करू... ", तो तोंड पाडून म्हणाला... तसं तीने हसून मान डोलावली...
" बॉस.. तुम्ही अश्याच आनंदी राहा... हसताना खूप छान दिसता.. आणि हो !!.. मी काही फ्लर्ट करत नाहीये तुमच्याशी... निर्मळ मनाने म्हणतोय.. मनापासून वाटतं मला.. की तुम्ही आनंदी राहा... चांगल्या व्यक्ती आहात तुम्ही..! आता पर्यंत सहन केले ना तुम्ही.. पण या पुढचे दिवस नक्कीच सुखाचे असतील... तुम्हाला तुमच्या आई बाबांनी सोडले... ही सगळ्यात मोठी चुक केली आहे त्यांनी... आणि या चुकीचा प्रत्यय त्यांना एक ना एक दिवस नक्कीच येईल.. पण मी हे ठामपणे सांगू शकतो की तुमच्या आयुष्यात सुख आनंद लवकरच येणार आहे... जश्या आज खळखळून हसल्या ना.. अश्याच हसत राहणार.. ", तो मनापासून बोलत होता...
आणि ती त्याचा प्रत्येक शब्द नी शब्द साठवत होती.. मनात आणि डोक्यात..!
" Thank you for your best wishes..!", ती मनापासून म्हणाली...
आज मोकळेपणाने बोलली ती कोणाशीतरी... तेही बिना झिझक !!!
" बरं आता जा तु घरी.. तुझी आई तुझ्यासाठी जेवायची थांबली असेल ना.. ??", ती म्हणाली तसं त्याने घड्याळ पाहिले...
बराच उशीर झाला होता..!
" अरे देवा.. !! बराच उशीर झाला आहे... आता जायला हवं... बोलताना भानच राहिले नाही वेळेचे... ! काय बॉस किती बोलता.. उशीर केलात ना तुम्ही मला.. आता घरी केल्यावर आधी पोळी भाजी नाही.. तर आईचा मार भेटेल मला.. तेही तुमच्यामुळे.. ", तो डोळे बारीक करून म्हणाला... तसं दोघांनी एक क्षण एकमेकांना पाहिले... आणि पुढच्या क्षणी दोघेही खळखळून हसले....
मनापासून हसले ते आज.. मनात कसलीही अट न आणता... नाही त्यांच्यामध्ये बॉस एम्प्लॉयीचं नातं आड आलं....
जणू दोन मित्र मैत्रीण नॉर्मल गप्पा मारत बसले आहेत... असंच वाटत होतं...
" बॉस मी निघतो आता.. काळजी घ्या... ", तो म्हणाला.. तसं तीने मान डोलावली हसून...
तो पण जायला निघाला... तसं तीने हाक मारली...
" आदित्य... ",
" हा बॉस...???", तो तिच्याकडे वळत म्हणाला...
" उद्या रात्रीचं जेवण दोन माणसासाठी आणशील हा..", ती म्हणाली... तसं त्याने गोंधळून पाहिले...
" माझा fiance .. Soon to be husband येणार आहे... काही दिवसांसाठी.. सो त्यालाही जेवण लागेल ना...??", ती हसून म्हणाली....
" ओके बॉस डोन्ट वरी... आणतो मी.. ", आदित्य पण हसून म्हणाला...
आणि त्याने तिचा निरोप घेतला...
आदित्य गेल्यावर विदांशी दरवाजा तिच्या रूम मध्ये आली...

ती आपल्या रूम मध्ये येत बेडवर बसली... खुश होती ती... कधी नव्हते ते... हसत होती.. मन मोकळे झाले होते...
" किती चांगला व्यक्ती आहे आदित्य..! खरंच .. खूप छान आहे तो..! ज्याही मुलीशी लग्न करेल ना.. ती मुलगी खुप नशीबवान असेल ती.. आणि आय विश की त्याला चांगली मुलगी जोडीदार म्हणून मिळावी..! त्याच्याही आयुष्यात आनंद यावा.. तेही भरभरून.. ", ती मनापासून त्याच्यासाठी म्हणाली....
तेवढ्यात बाहेर लक्ष गेल्यावर तिच्या लक्षात आले की बाहेर हलक्या हलक्या पावसांच्या सरी चालू होत्या... तसं ती तशीच तिच्या बालकणी मध्ये आले....
बरीच मोठी बालकणी होती तिची... लाईट्स लावल्या होत्या... त्या हलक्या हलक्या सारी ती अंगावर घेत तशीच उभी राहिली... दुःख होते ना आयुष्यात.. पण आता तिला त्या दुःखात जगायचे नव्हते...
" सौरभ... आय मिस यु..! लवकर ये... वाट पाहतेय मी तुझी...! ", तो मनोमन साद घालत म्हणाली...
त्याच्या केवळ आठवणीने तिच्या ओठांवर स्माईल आली....
.....
" ओह माय डार्लिंग वेदा.... येतोय मी.. जस्ट वेट..", इकडे कोणीतरी मनातच वेदांशीला हाक मारत म्हणाला...
....
" आय जस्ट हॉप की बॉसचा होणारा नवरा त्यांच्यावर भरभरून प्रेम करेल.. की त्यांना कधी कोणा इतराची गरज भासणार नाही... ", इकडे आदित्य गाडीवर घरी जाताना मनातच त्याच्या बॉस साठी बेस्ट विश करत होता.. अगदी मनापासून...
क्रमश :
कथा आवडत असल्यास नक्की कमेंट करून सांगा...