ओढ प्रेमाची.... - 7 Madhumita Lone द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

ओढ प्रेमाची.... - 7

माया शर्वरीला भेटायला उत्सुक असते, तिला कधी शर्वरीला भेटते असं झालतं. शर्वरी मायाची लहानपणापासूनची बेस्ट friend होती, दोघी पहिली पासून बारावी पर्यंत एकत्र होत्या, मैत्रिणी पेक्षा बहिणी म्हंटल तरी चालेल. बारावी नंतर शर्वरी तिच्या पुढच्या शिक्षणा करता तिच्या मामाकडे दिल्लीला शिफ्ट झाली.

माया अचानक गाडीचा ब्रेक मारते, तशी एक गाडी तिचा जवळ थांबते.
तू माझा पाठलाग करतो आहेस का?? माया खूप चिडली होती. तो राकेश होता जो मगापासून तिचा पाठलाग करत होता.

नाही, नाही तुझा काय तरी गैरसमज होतो आहे , मी तुझा पाठलाग वैगरे करत नाही, मी इकडे एका कामानिमितताने आलो आहे.

हो , का मग गाडी का थांबवली .

ते मी, ते....

पुढं काही बोल , बोल ना आता.

ते तू थांबली म्हणून थांबलो, मला वाटलं तुला काही मदत हवी आहे का ते विचारावं पण तू तर चिडलीस.

हो का. ठीक आहे जा तू आता पुढे मला नाही मदती ची गरज .

तशी तू कुठे जात आहेस .

मी कुठेही जावो त्याचं तुला काय ?

बरं, बाबा मे असच विचारलं.

मी बाबा वैगरे नाही , कळालं.

तसा राकेश गाडीला किक मारून निघतो. खरं तर तो मायचाच पाठलाग करत होता पण माया ने बरोबर ओळखून घेतलं.

*****************************

माऊली कॅफे मध्ये एका टेबलावर एक पिवळा ड्रेस मध्ये एक मुलगी बसली होती. तिला पाहून माया ने आवाज दिला.
शर्वरी.

माया अगं किती वेळ , लगेच निघते म्हणाली होतीस.

वाटेत एकाला नीट रस्ता दाखून आले , बिचारा रस्ता चुकला होता, त्याला नीट रस्ता दाखवला. बाकी ते सगळा सोड आधी सांग कशी आहेस तू.

मी एकदम कडकं आणि तु. तू जे काही मला फोन वर सांगितलं त्याच्यावर विश्वास बसत नाही, तो समोर येऊ दे त्याला कसा सुता सारखं सरळ करते बघ.

अग थांब थांब किती बोलतेस, मी पण एकदम कडक आहे
.

मग असा का चेहेरा झाला आहे तुझा , रडली आहेस ना बघ कसे डोळे सुजले आहेत.

ते मी कॉलेजमध्ये फ्रेंड्स सोबत असच बोलताबोलता दादाचा विषय निघाला म्हणून बाकी काही नाही.

माया तुला किती वेळा सांगितलं आहे, जुन्या गोष्टी आठवून काय नाही होत.

हो, बाई माझी आई. तू खरंच माझी आई आहेस ,किती काळजी वाटते तुला माझी . माझ्या साठी तू इकडे आलीस.

काही काय तुजं.

म्हणजे तू माझ्या साठी नाही आली.

तसं नाही, तुझ्याच काळजीने आले. पण मी तुझी आई नाही आहे.

पण पुढच्या जन्मी तूच माझी आई व्ह्यावी असं मागणं मागेन देवाला मी.

हे ऐकून दोघी हसायला लागतात.

माया हसताना किती गोड दिसतेस तू

म्हणूनच कदाचित देवाने माझ्या आयुष्यात दुःख दिलं असावं, म्हणजे मला कोणाची नजर लागू नये.

माया shut up, काहीही बोलू नकोस. मी आले ना आता .

किती दिवस आहात तुम्ही इथे मॅडम.

ते मी... दोन तीन दिवस आहे.

अरे बापरे इतके दिवस. खरंच किती करतेस ग माझ्या साठी.

सॉरी यार ते जास्त दिवस सुट्या नाही घेऊ शकले.

ये मी गमत केली . Seriously घेऊ नकोस.

Hmmm.

आता काय झालं शर्वरी तुला.

यार मला नाही करमत तुझ्याशिवाय तिथे. तुझी फार आठवण येते.

मला पण, तू नको टेशन घेऊ मी स्कॉलरशिप मिळाली की तिकडेच येणार आहे . मग आपण एकत्र राहू.

पण त्याला फार वेळ आहे अजून.

हो ते हि आहेच अजून. चल निघते मी आता . आजी वाट बघत असेल माझी.

ओके, संभाळून जा.