Featured Books
  • तुझी माझी रेशीमगाठ..... भाग 2

    रुद्र अणि श्रेयाचच लग्न झालं होत.... लग्नाला आलेल्या सर्व पा...

  • नियती - भाग 34

    भाग 34बाबाराव....."हे आईचं मंगळसूत्र आहे... तिची फार पूर्वीप...

  • एक अनोखी भेट

     नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता...

  • बांडगूळ

    बांडगूळ                गडमठ पंचक्रोशी शिक्षण प्रसारण मंडळाची...

  • जर ती असती - 2

    स्वरा समारला खूप संजवण्याचं प्रयत्न करत होती, पण समर ला काही...

श्रेणी
शेयर करा

मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 11

पान ११ 

               सातवीत असताना अजून एक किस्सा म्हणजे आमच्या रूम मधल्या आरश्याचा . खूप मुली एकाच रूम मध्ये असल्यामुळे आम्हाला बाईंनी आमच्या रूम मोठा आरसा दिला होता . म्हणजे आमच्या हॉस्टेल मध्ये सगळ्या रूम मध्ये लहान आरसे असायचे . पण , तेव्हा ज्यांच्या रूम मध्ये जास्त मुली असायच्या . त्या रूम मध्ये मोठा आरसा असायचा . आणि मग मोठा आरसा असल्यामुळे दुसऱ्या रूम मधल्या मुली कधी कधी आरश्यात बघायला रूम मध्ये यायच्या, आवरायला यायच्या . हे झालं आमच्या हॉस्टेल च्या आरश्यांच . पण ,असच एकदा आम्ही रात्री सगळे झोपले होतो . तेव्हा अचानक मध्यरात्री आमच्या रूम मधला आरसा फुटला . सगळीकडे रात्रीची शांतता आणि रूम मध्ये पूर्ण अंधार असल्यामुळे तो आवाज एवढा मोठा झाला , त्या आवाजाने आम्ही सगळ्या घाबरून जागे झालो . ज्यांच्या बेड शेजारी आरसा फुटला . त्यांना तर खूप भीती वाटत होती , भुताची . त्या रात्री सगळेच खूप घाबरले होते , कोणीच झोपलं नाही . नंतर आमचा जो आरसा गेला तो गेलाच . कारण आमच्याकरून आरसा फुटला असं बाईंना वाटल्यामुळे त्यांनीं आम्हाला लवकर नवीन आरसा काय दिला नाही . पण आमची आरसा नाही म्हणून आवरायची गैरसोय झाली नाही . मात्र , लिपस्टिक , काजळ आणि गंद लावून झाल्यावर कुठे पुसायचा हा प्रश्न पडला होता. कारण , आम्ही हे सगळं आरश्याला पुसायचो . आणि आता आमचा आरसाच नव्हता .

          आणि हो अजून एक म्हणजे सांगायचं राहिलच ती जी आमच्यात श्रद्धा होती ना. ती तर रूम मध्ये खूप चोरी करायची.तिने एकदा लिशा बॅग मधून खाऊ चोरला होता . ते पण , बॅग ला लॉक असताना . कसा काय ? बॅग कटरने कापून . आम्ही तिची तक्रार खूप वेळा रेक्टर मॅडम कडे दिली होती . तरी सुद्धा ती काय सुधारली नव्हती . मग आम्हाला रेक्टर बाई बोलल्या की , तुम्हाला तिची तक्रार लेखी करावी लागेल . तरच , काहीतरी होऊ शकत . मग आम्ही वार्षिक परीक्षेच्या शेतीच्या दिवशी पेपर देऊन आल्यावर ४-५ पाणी लेखी तक्रारीचा अर्ज केला . सगळे पटापट पेपर देऊन बॅग भरून घरी चालले होते .पण , आम्हाला परत ती श्रद्धा नको असल्यामुळे पान भरून सगळं आठवून आम्ही तिच्या तक्रारी लिहीत बसलो होतो . आणि आम्ही बाईंना अर्ज दिला. आणि त्याच फळ आम्हाला मिळालं . तिला हॉस्टेल मधून काढून टाकलं .आता इथून पुढं ती आमच्यात नाही याचा आम्हाला खूप आनंद झाला होता . खरंतर ती तशी बरी होती . पण तिची चोरी करणं हि सवय खूप वाईट होती . त्यामुळे आम्हाला तिच्या बाबतीत नाइलाजाने हे करावं लागल . ती चांगली असती तर ,आमच्या सोबत मस्तपैकी १० वि पर्यंत एन्जॉय केलं असत . जाऊ दे नशीब ज्याचं त्याच .

        आता पुन्हा रवानगी आठवीत झाली आमची. पण , एक Problem  म्हणजे काही मुलींच्या तुकड्या बदलल्या होत्या . माझी नव्हती बदलली. पण , माझ्या काही मैत्रिणी दुसऱ्या वर्गात गेल्या होत्या. आणि दुसऱ्या वर्गातल्या मुली आमच्या वर्गात आल्या होत्या . नेहमी प्रमाणे हॉस्टेल चा दिनक्रम चालू होताच .

        मी सकाळी आमच्या रेक्टर बाईंसोबत Racket खेळायचे . त्यांचा आणि माझा डाव खूप रंगायचा . त्यांना पण रॅकेट खेळायला खूप आवडायचं. खेळताना त्या आमच्या वयाच्या वाटायच्या . त्यांच्यासोबतच खेळणं कधी संपूच नये आस वाटायच.खूप भारी खेळायच्या बाई . Shuttle कितीही लांब गेल तरी त्या बरोबर मारायच्या . आमच्यासोबत खेळताना कधीच थकत नव्हत्या त्या . त्या दिवशी रोजच्या प्रमाणे आम्ही सकाळी शाळेत गेलो . प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत झाल्यावर माइकवरून अचानक सांगितलं की , आपल्या महाविद्यालयातील विज्ञान शिक्षिका सौ . घोलप बाईंचे दुःखद निधन झाले आहे . आम्हला तर हे ऐकून खूप मोठा धक्का बसला . कारण त्या दिवशी सोमवार होता . आणि आम्ही शनिवारी तर त्यांच्याशी बोललो होतो. मध्ये फक्त एक दिवस गेला होता . 

  पुढचं पान लवकरच .........