मुलगी सुरक्षित नाही का??? Vrushali Gaikwad द्वारा प्रेरणादायी कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मुलगी सुरक्षित नाही का???

Seriously... खरंतर.. खुप वाईट वाटतं की मुलींसोबत, महिलांसोबत होणारे अत्याचार आत्ता या काळात कमी व्हायला हवेत तर ते वाढतंच चालले आहेत. का असं होतयं?? का स्त्रिया आजही सुरक्षित नाहीत. थोड्या दिवसांपर्यंत तर वाटतं होतं, आम्हाला ही स्वांतत्र्य आहे, आम्ही रात्री, अपरात्री बाहेर फिरू शकतो, आम्हीही वेळ आलीच तर अनोळखी व्यक्तीसोबत लढू शकतो. पण काही दिवसांपासून सलग एक एक घटना समोर येत आहेत, ऐकू येत आहेत. यशश्री शिंदे हत्या प्रकरण काही दिवसांपूर्वी सुरू होत, त्यानंतर पाठोपाठ एका महिलेच्या पाठीमागून रॉड मारून हल्ला केल्याचं समोर आलं. मंदिरामध्ये एक महिला होणाऱ्या अन्याया पासून दूर जाऊन आसरा बघते तर तिथेच तिच्यावर अत्याचार होतोय. हे असे एक एक घटना सुरू असतानाच कोलकत्ता मध्ये एका डॉक्टर सोबत ही अत्याचार झाल्याचं समजलं. त्यानंतर झारखंड मध्ये साडे तीन वर्षाच्या मुलीसोबत रिक्षचालकाकडून अत्याचार झालं, बदलापूर मध्ये चार वर्षाच्या दोन मुलींसोबत शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याकडून अत्याचार झालेलं समोर आले. इतकच नाही तर आता खोपोली मध्ये ही एका महिलेला एका अनोळखी व्यक्तीने तोंड बंद करून अडकवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले पण त्या महिलेची दोन पुरुषांनीच वेळीच सुटका केली.  
   पण खरचं इतकं वाईट का चाललं आहे भारतात ??? भारतात म्हणावं की महाराष्ट्रात म्हणावं की तालुक्यात म्हणावं प्रश्नच आहे ... आता महिला अजिबातच सुरक्षित नाहीत का?? कदाचित स्वतःच घर सोडलं तर त्यांच्यासाठी सुरक्षित जागाच राहिली नाही .. का वागत आहेत अशी लोकं ?? का इतक्या वाईट थरावर पोहचत आहेत?? कारण सोशल मिडिया असू शकते का ?? कारण सोशल मिडियावर इतके वाईट व्हिडिओ, फोटो व्हायरल होत असतात कदाचित त्यामुळेच लोकांचा दृष्टिकोन बदलत असेल .. 
     सोशल मिडियावर फेमस होण्यासाठी काही महिला अंग प्रदर्शन, कमी कपडे घालून किंवा विचित्र विचित्र व्हिडिओ बनवून आकर्षित करून फेमस व्हायला बघतात आणि या महीलांमुळेच तर सामान्य गरीब साध्या महिलांना किंवा मुलींना अशा वाईट लोकांच्या आहारी जावं लागतंय.  
   इतकचं नाही तर घटना घडल्या नंतर ही त्या गुन्हेगाराला शिक्षाही लगेच मिळत नाही, त्याला जर फाशीची शिक्षा किंवा जागीच ठार मारण्यात आले तर कदाचित असे लोकांचे क्रूर होणारे विचार थांबतील ही.. काही लोकं या वाईट लोकांच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी संविधानाला, कायद्याला दोष देतात. एकतर आपल्याला माहित नसतं की अस करणाऱ्यांसाठी काय कायदा आहे? आपण कधी वाचलेलं ही आहे का ?? आणि आपल्याला हे तरी महित आहे का कायद्यात ह्यांना काय शिक्षा आहे ?? किंवा त्यामध्ये या लोकांसाठी शिक्षा काहीतरी असेल ही पण आत्ताचं सरकार लगेचच कारवाई करत आहे की नाही??
    आपल्याला माहीत आहे, दिसतयं एका मुलीवर बलात्कार झाला आहे तरीही आपले पोलीस असो कोर्ट असो सरकार proof साठी थांबतात. का ती महिला, ती मुलगी समोर तुमच्या प्रुफ नाही का?? तिच्याकडे बघून तुम्हाला समजत नाही का?? काय नक्की घडलं आहे?? 
  खरचं कसं राहायचं महिलांनी, कोणावर विश्वास ठेवायचा? ज्या महिलांना पुरुष घाबरत होते, आपल्या बरोबरीचे समजत होते, तेच या न्याय व्यवस्थेमुळे स्त्रियांना दुबळे समजायला लागलेत. स्त्रिया खरचं आता घरातून बाहेर निघायला शंभर वेळा विचार करतील?? स्वतःच्या मुलींना घराबाहेर पाठवलं तर काळजीत राहतील.. आत्ता हे सर्व सुरू असताना ही महिला व्यवस्थित नाहीतच, सर्व महिला काळजीत आहेत,व्यवस्थित झोपत नाहीत ?? काय करायचं आपण ही सुरक्षित नाही का ??आपली बहीण, मुलगी, भाची, मैत्रीण घरी व्यवस्थित आली असेल ना असे अनेक प्रश्न प्रत्येकीच्या मनात आहेत.
     महिलांना प्लीज विनंती आहे, एकट्या कुठे बाहेर पडू नका, बाहेर गेलात तर सोबत काहीतरी सेफ्टी साठी घेऊन जा, स्प्रे नसेल तर तिखट पावडर जवळ ठेवा, धारदार शस्त्र काहीतरी जवळ ठेवा. तुमच्यावर चुकून वेळ आलीच तर लढा तुमच्याकडून समोर क्रूर व्यक्तीचा जीव तरी गेला ना तरी घाबरु नका तुम्ही स्वतःला वाचवलं हे खूप आहे.. आणि अशा लोकांना हीच शिक्षा योग्य आहे.. 
आपल्या लहान मुलींच्या सुरक्षेचा विचार करा, त्यांच्यावर लक्ष ठेवा, त्यांना चांगल्या गोष्टी, वाईट स्पर्श, चांगले स्पर्श शिकवा, कोणाही अनोळखी किंवा ओळखीच्या व्यक्तीसोबत आईला सांगितल्याशिवाय जाऊ देऊ नका. 

काळजी घ्य आणि सावध रहा..