स्त्रियांची सुरक्षीतता ; ऐरणीचा प्रश्न.
काही प्रतिबंधात्मक उपाय
आज कलियुग आहे व या कलियुगात गुन्ह्याचे प्रमाण वाढत चाललेले आहेत. त्यातच बलात्काराची प्रमाण वाढत चाललेले आहेत. ज्यातून दिसून येत आहे की स्री ही सुरक्षीत नाही.
आज स्री समानतेच्या गोष्टी करणाऱ्या समाजानं स्रियांच्या बाबतीत समानता आणली. स्री इतरत्र वावरु लागली. अंतराळातही गेली. संधी मिळताच ती आपल्या कर्तबगारीनं मोठमोठी कार्य करु लागली. जशी पुर्वी करीत होती. तरीही अलिकडील काळात घडत असलेल्या बलात्काराच्या घटना पाहून असं वाटू लागलंय की स्री आज सुरक्षीत नाही.
स्री ही कालही सुरक्षीत नव्हती. कालच्या युगात स्रियांना तिचा पती मरण पावल्यानंतर नाना तऱ्हेच्या यातना भोगाव्या लागत. त्याही काळात घरची जवळच्या नात्यातील मंडळी, मग तो दीर वा भासरा का असेना, त्या स्रीवर बलात्कार करीत असे आणि त्याची वाच्यताही करता येत नसे. अशी वाच्यता केल्यास तिलाच कुलथा म्हणत घरातून हाकलून दिलं जाई. त्यानंतर ती समाजाचं भक्ष बनत असे व तिच्यावर समाज जेव्हा म्हणेल, तेव्हा बलात्कार करीत सुटत असे. त्याला कोणीच व्यक्ती विरोध करु शकत नव्हता. त्यामुळंच अशी स्री तिचा पती मरण पावताच आपल्याच परीवारातील आपल्या दीर वा भासऱ्याकडून होणारा बलात्काररुपी अत्याचार सहन करीत असे. अगदी निगरगट्ट होवून, नाईलाजानं. काही स्रिया यातही स्वाभिमानी होत्या. त्यांना त्या भासऱ्याकडून वा दिराकडून वा समाजाकडून होणार असलेल्या बलात्काररुपी अत्याचाराची कल्पना कल्पना असायची. त्यामुळं त्या सती जात असत व त्या पतीच्या शरणावर स्वतः जळत असतांना शरणावरच्या अतीतीव्र यातना सहन करीत असत. ज्या यातना तिला त्या बऱ्या वाटायच्या. परंतु जीवंत राहून होणार असणाऱ्या सःभाव्य बलात्काराच्या यातना तिला बऱ्याच वाटायच्या नाहीत. म्हणूनच सतीप्रथा जीवंत होती. ज्यात एक स्री ही स्वतःच्या इच्छेनं सती जाणे पसंत करायची मात्र कधीकधी अपवादात्मक काही प्रकरणे घडत असतात. ज्यात त्या स्रिया सती जाणे पसंत नसतांनाही जाणूनबुजून जबरदस्तीनं सती दिलं जाई. ती हिंसाच होती, मानवदेहाची होत असलेली.
स्री ही सुरक्षीत नव्हतीच लहानपणापासूनच. ती नऊ वर्षाची झालीच तर तिचा विवाह केला जात असे. ज्याला बालविवाह म्हणत. या काळात अगदी खेळण्याचं वय असतांना तिला सासरी नांदायला जावं लागायचं. ज्यात एखादी सासू खास्ट भेटलीच तर तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला पारावार नसायचा. त्यातच केशवेपण आणा इतर बर्याच गोष्टी स्रियांचा अत्याचार करणाऱ्या होत्या. तसं पाहिल्यास त्या काळात युद्धात एखादा राजा हरल्यास विजयी झालेल्या राज्यांची प्रजा अर्थात मंत्री वा सैनिक हरलेल्या त्या राज्यातील इतर स्रियांवरच बलात्कार करीत असत. मात्र ते बलात्कार तेवढ्या प्रमाणात भयानक नसायचे. जसे आज भयानक स्वरुपात होतांना दिसत आहेत. आज तर बलात्काराचे प्रमाण वाढलेच आहे. व्यतिरीक्त त्याचे स्वरुपही वेगळे आहे. आज बलात्कार झाल्यानंतर एकतर तो माहीत होवू नये, म्हणून संबधीत स्रिलाच मारुन फेकलं जातं. गुप्तांग कापले जातात. चेहरा ओळखू येवू नये म्हणून विद्रूप केला जातो. उदा. द्यायचं झाल्यास कलकत्यातील प्रकरणाचं देता येईल. ती बोलू नये म्हणून तिची थॉयराईड ग्रंथीही तोडण्यात आली.
आज स्री सुरक्षीत नाही. कारण आज स्वतःचा बापच आपल्या मुलींवर वाईट नजर टाकतो. त्याला आपली मुलगीही ओळखू येत नाही. स्वतः जन्मास घातलेली. एवढी हैवानियतता आज लोकांमध्ये शिरली आहे. तिथं समाज तर वेगळाच. नागपूरातील एका प्रकरणात त्या रिक्षाचालकाला चार मुली असूनही त्यानं शाळेत जाणाऱ्या मुलीला कामवासनेची मागणी केली आणि ती जर तयार नसेल तर तिची गत कलकत्ता प्रकरणासारखी करायची धमकीही दिली. एवढी हैवानियतता शिरली आहे आज पुरुषात. आज शाळा असो की कार्यालय, आम रस्ता असो की कोणताही परीसर. स्रिया सुरक्षीत असल्याचं भासत नाही.
स्री सुरक्षितता व्हावी. तो एक ऐरणीचा प्रश्न आहे. त्या अनुषंगानं काही गोष्टी आपल्याला कळणे आवश्यक आहे. त्या गोष्टी प्रत्येक स्त्रीने लक्षात घ्याव्यात. त्या लक्षात घेणे गरजेचे आहे. जर आपल्याला तशी बाब आढळून आली व वाटलं की आपण सुरक्षीत नाही. अशावेळेस पोलीसांचा असलेला खुफीया क्रमांक एकशे बारा डायल करावा किंवा एक हजार एक्यान्नव क्रमांक डायल करावा. जेणेकरुन पोलीस मित्र आपल्याला मदत करतील व आपली सुरक्षा होईल व तसा फोन लावणंही आपल्यासाठी एक पुरावा होईल. या घटनेत पोलिसांनीही निष्क्रिय राहू नये. जेणेकरुन स्त्रियांची सुरक्षितता होणार नाही. तसाच दुसरा फोन आपल्या आई वा वडीलांना वा आपल्या नातेवाईकांना लावावा. त्याचा विशिष्ट कोड असावा. जो कोड संकटसमयी इतरांना कळणार नाही. तो कोड शब्दांचाही असू शकतो. तो कोड म्हणजे आपल्यावर आलेलं संकट असेल. आईवडीलांनीही लक्षात ठेवावं की आपल्या मुलींच्या फोनवरुन असे शब्द ऐकायला आलेच तर आपली मुलगी संकटात आहे असे समजून पोलिसांना फोन करावा. त्यानंतर आपल्या मुलीचा फोन नंबर पोलिसांना द्यावा. पोलीस तो नंबर ट्रकवर लावून त्या संकटस्थळी पोहोचू शकतात. शाळेत आपल्याला असे आढळून आलेच तर त्या गोष्टी आपण आपल्या वर्गशिक्षकांना सांगाव्यात किंवा शाळेतील तक्रारपेटीत तसं लिहून टाकावं. घरी किंवा परीसरात तसं काही दिसत असेल तर ते आपल्या आईला सांगावे. तसंच आपण कोणाच्या प्रलोभनास बळी पडू नये. कोणी चॉकलेट देत असेल किंवा एखादी वस्तू घेवून देत असेलच तर ती स्विकारु नये. अलिकडील काळात प्रेम करणेही बरोबर नाही. कारण प्रेमाची आस दाखवून त्यात गुंतवून लोकं स्रियांना अशा ठिकाणी नेतात व सामुदायिक बलात्काराची शिकार करतात. ज्यात आपलं काय काय करतात, याची आपण कल्पनाही करु शकत नाही. शिवाय आपल्या प्रेमातून कधीकधी आपलीच नाही तर इतरांचीही हत्या होते. हेही स्त्रियांनी लक्षात ठेवावे. उदा. नागपुलातीलच मोनिका किरणापुरे हत्या प्रकरण. वरील सर्व गोष्टींपासून स्रियांनी अलर्ट राहावे. तसंच सर्वात महत्वाचं सांगायचं झाल्यास स्रियांनी कधीकाळी कोणत्याही पुरुषाला फसवू नये. कारण त्यातून बदल्याची भावना निर्माण होवू शकते आणि बदल्याच्या भावनेनंही बलात्कार होवू शकतो. असा बलात्कार की ज्याची आपण कल्पनाही करु शकत नाही. उदा. एखाद्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून पैसे मिळावे. म्हणून त्याला गुन्ह्यात गोवणे. असे प्रकार शाळेत होत असतात कधीकधी. संस्थाचालक शिक्षकांकडून पैसा वसूल करतात यावा. म्हणून एखाद्या स्री शिक्षीकेला मोहरा बनवून एखाद्या पुरुष शिक्षकांचं जीवन उध्वस्त करु शकतो. अलिकडील काळात फेसबुकवर काही स्रिया पैसा कमविण्यासाठी मोबाईल माध्यमातून पुरुषांना फसवीत असतात. परंतु तसं फसवणं कधीकधी आपल्याच जिव्हारी लागतं.
महत्वाचं सांगायचं झाल्यास सर्व स्रियांनी स्वतःची सुरक्षा स्वतःच करावी. तसं करणं गरजेचं आहे. शिवाय अशी सुरक्षा करीत असतांना इतर पुरुषांचीही मदत घ्यावी. कारण सर्वच पुरुष वाईट नसतात. प्रेम करावे. परंतु प्रेम करतांना सहजासहजी कोणावर विश्वास करु नये. कारण बरीचशी बलात्काराची प्रकरणं ही प्रेमातूनच घडत असतात. विशेष बाब ही की आपण आपलीही सुरक्षा करावी आणि त्याचबरोबर इतरांचीही करावी. जेणेकरुन प्रत्येक स्री सुरक्षीत होईल. तसंच या प्रकरणात एखाद्या ठिकाणी समजा बलात्कार झालाच तर पोलीस आणि न्यायालयानं संबंधीत आरोपींबाबत बचावात्मक पवित्रा घेवू नये. त्यांना जबरात जबर शिक्षा द्यावी. जेणेकरुन त्यापासून बोध घेवून इतर कोणताही व्यक्ती बलात्कारासारखे कृत्य करणार नाही. जे कृत्य देशातील स्री सुरक्षेवर प्रश्नचिन्हं निर्माण करु शकेल.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०