त्याही वर्गानं सावधान व्हावं? Ankush Shingade द्वारा क्लासिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

त्याही वर्गानं सावधान व्हावं?

त्याही वर्गानं सावधान व्हावं?

              जातीवरुन भांडण. अलिकडील काळात नेहमी जातीवरुन भांडण होत असतं. हा अमूक जातीचा. तो अमूक जातीचा. असा वाद होतो. त्याची जात हलकी व माझी जात उच्च असंही मानलं जातं. शिवाय जातीच्या उत्पत्तीवरुनही बरेच वाद आहेत. कोणी म्हणतात की जेव्हा गाव विकसीत झालं. तेव्हा बारा बलुतेदारांची व अठरा अनुतेदारांची उत्पत्ती झाली. ह्याच जाती ठरल्या. याचाच अर्थ असा की त्यापुर्वी जाती नसाव्यात. परंतु असे नाही. अनुतेदार व बलुतेदारांपुर्वीही काही जाती अस्तित्वात आल्या होत्या. जाती बनविण्यापुर्वी व गावंही विकसीत होण्यापुर्वी. त्याचा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे. 
          जाती केव्हा निर्माण झाल्या? या प्रश्नांचं उत्तर देतांना असं ठामपणे म्हणता येईल की सर्वप्रथम चांभार जात या पृथ्वीवर निर्माण झाली. म्हणूनच चांभार जातीचा इतिहास सांगतांना गाव कसं निर्माण झालं ते सांगणे क्रमप्राप्त ठरेल. 
          पुर्वी माणूस झाडावर राहायचा. हे सर्वांनाच माहीत आहे व हे डार्वीनचा उत्क्रांतीवाद सांगतोच. त्यानंतर माकड रुपातील मानव पृथ्वीवर राहायला आला हेही आपण जाणतोच. अन् जेव्हा हा माणूस पृथ्वीतलावर राहायला आला. तेव्हा त्यानं पाहिलं की आता खाली आल्यावर गवताशिवाय त्याला खायला प्यायला काहीच मिळत नाही. पुर्वी जसं त्याला झाडावर असतांना झाडाची पानं खायला मिळायची तशी. आता ती झाडं उंच होती व त्या पानांना हातही पुरत नव्हता. शिवाय आता त्याला मानव अवस्थेत झाडावर जास्त चढता येत नव्हतं. शिवाय अन्नही मिळवता येत नव्हतं. मग काही दिवस त्यानं जमीनीलगत असलेले गवत खावून काढले. परंतु कालांतरानं तेही त्याला रुचकर वाटत नव्हते नमस्कार दुसर्‍या ठिकाणी जास्त वेगानं जाताही येत नव्हतं. जसा तै माकड अवस्थेत असतांना जात होता. तो भटकंती नक्कीच करायचा. अशातच भटकत असतांना त्यानं एक मेलेलं जनावर पाहिलं. ते जनावर नुकतंच मरण पावलं होतं. त्यामुळंच त्यानं विचार केला, आपण प्राण्यांचं मांस खावून पाहिलं तर....... विचारांचा अवकाश, तसा विचार करताच त्यानं त्या प्राण्याचा मांसाचा एक तुकडा तोंडात टाकला. तो अधीक रुचकर लागला. तेव्हापासून माणूस हा प्राण्यांचे मांस खाणारा बनला. यावेळेस सुरुवातीला तो प्राण्यांचे कच्चेच मांस खात असे. परंतु कालांतरानं एकदा त्या मांसाचा एक तुकडा नकळत अग्नीमध्ये पडला व त्यानं तो काढून खाल्ला असता त्याला तो तुकडा अधीक रुचकर लागला. तेव्हापासून हा माकड मानव प्राण्यांचं मांस नेहमी खात असे, तेही भाजून. 
         माकड रूपातील प्राणी जेव्हा झाडावरुन खाली अर्थात जमीनीवर आला. त्यावेळेस तो भटकंती करीत असे. त्यातच तो गवत व जमीनीलगतचा चारा खात असे. अशीच भटकंती करीत असतांना त्यानं पाहिलं की एके ठिकाणी एक प्राणी मरण मरण पावलेला आहे. त्यानंतर त्यानं त्याचं मांस काढलं व ते थोडं खावून पाहिलं. हीच पहिली चांभार जात होय. ते मांस त्याला रुचकर लागलं. त्यानंतर तो त्या मेलेल्या प्राण्यांचं मांस खावू लागला. परंतु ते मेलेले प्राणी त्याला दररोज सापडतच नसत, कितीही भटकंती केली तरीही. तेव्हा त्यानं ठरवलं की आता आपण प्राणी मारायचे. तेव्हाच आपल्याला मांस खायला मिळेल. त्यानंतर त्यानं प्राणी मारायला सुरुवात केली. परंतु त्यापुर्वी त्यानं अवजारे बनवली व हा सल्ला कोणीतरी त्याला दिला व एक जात निर्माण झाली ब्राह्मण. त्यानंतर त्यानं त्याच्याच सल्ल्यानुसार अवजारे बनवली व अवजारे बनविणारा व्यक्ती हा खाती ठरला व ही जात निर्माण झाली. त्यानंतर त्यानं शिकार करण्यास प्रारंभ केला. ती शिकारी अर्थात पारधी ही जात निर्माण झाली. त्यातच त्या प्राण्यांचे लहान तुकड्यात रुपांतर होवू लागले व एक नवी जात निर्माण झाली. ती खाटीक जात होय. त्यानंतर माणूस स्थिरावला. तो गृहीत राहू लागला. त्यातच तो गृहेजवळ स्वच्छता करु लागला. ही मेहतर जात होय. तसाच तो गृहेजवळ स्वच्छता करता करता त्यानं ठरवलं की आता आपण एखादे घर उभारुन पाहावे. त्यानं त्यानंतर घर उभारलं. ही त्याची आणखी एक जात निर्माण झाली. ती जात होती गवंडी. त्यानंतर तो माणूस शेती करु लागला व कृषक बनला. ती त्याची चवथी जात होय कुणबी. त्यानंतर तो आपल्या शेतात भाजीपाला पिकवू लागला. ही त्याची जात होती माळी. अशाप्रकारे तद्नंतर भरपूर जाती निर्माण झाल्या. ज्या जाती माणसाला माहीतही नव्हत्या. कारण ती कामं होती व ती कामं कोणीही करु शकत होता आणि कोणीही करीत असे. 
          चांभाराचा मुख्य संबंध हा चामड्याशी येत असून जो चामड्याचे काम करेल व चामड्याचं सेवनही करेल. त्याला चांभार असं संबोधल्या जाईल. त्यावरुन सुरुवातीला प्राण्यांचे कच्चे मांस सेवन करणारा माकड हा पहिला चांभार होय. परंतु त्यापुर्वी त्यानं शिकार केली नव्हती व ती करण्यासाठी त्याला अवजारांची गरज पडली होती. तो अवजारे बनविणारा व्यक्ती हा वाढई वा खाती असू शकतो. अशाप्रकारे वेगवेगळ्या जाती निर्माण झाल्या. ज्यांना जाती कळत नव्हत्या तर त्या जातीची कामं कळत होती. 
          काही दिवस गेले व त्या त्या कामात काही नवी माकडमाणसं यायला लागली. ज्याला ती कामं जमत नव्हती. कारण सराव नव्हता. त्यातच कोणीतरी सल्ला दिला की ही कामं एकाच घरची वा बिरादरीतील माणसं करतील. तेव्हापासून ती कामं एकाच बिरादरीतील माणसं करायला लागली होती. ज्यात सरावही झाला व त्या कामात कौशल्य प्राप्त होवून सुबकताही आली. त्यानंतर जाती निर्माण झाल्या विशिष्ट ओळखीसाठी.
            काही दिवस असेच गेले व कालांतरानं समाजात असाच एक वर्ग निर्माण झाला की जो सल्लेच द्यायचा. तो काम करायचा नाही. शिवाय तो सल्ले देतांना त्या सल्ल्याची जबरदस्ती करु लागला नव्हे तर ते सल्ले लोकांवर लादू लागला. त्यासाठी भांडणं करु लागला. त्यातच स्वयंपुर्ण असलेल्या ज्या गावात भांडणं होत नव्हती. त्या गावात आज भांडणं होवू लागताच त्यांनी ठरवलं की गावात एकोपा टिकावा. म्हणूनच ते नाईलाजानं अशा वर्गाचे सल्ले वापरु लागले तिथंच माणूसकीची हत्या झाली व माणूसकी गहाण पडली. याच सल्ले देणाऱ्या लोकांनी पाहिलं की एक समाजात असाही वर्ग आहे की जो स्वतः शुरवीर आहे. त्याच्या शुरवीरतेवर ताशेरे ओढता येणं शक्य नाही. अशाच वर्गाच्या हातात राजसत्ता आहे. त्यानंतर तसा विचार करताच या सल्ले देणाऱ्या वर्गानं ठरवलं की जो आपलं ऐकेल, त्याच माणसाला राजसत्तेवर बसवावं व जो ऐकत नाही, त्याला राजसत्तेवरुन काढून फेकावं. त्यातच त्याच लोकांनी काही नियम बनवले. मग बाकीच्या काही लोकांना विश्वासात घेतले. त्यांच्यात देव दानव, भूत प्रेत, भेदभाव व अंधश्रद्धा या सर्व गोष्टी भरल्या. ज्यातून आता राजसत्तेवर असलेल्या लोकांना बाहेर जावं लागलं. परंतु काही असेही सत्ताधीश आणि त्या राज्यातील लोकं होते की त्यांना राजसत्तेबाहेर हाकलणे कठीण जात होते. ते अशा लोकांचे मुळात ऐकतही नसत. त्यामुळंच त्यांनी ठरवलं व योजना आखली. त्या योजनेनुसार त्यांनी बाहेर राज्यातील लोकांशी संगनमत केलं व त्या परकीय टोळींना मदत करुन त्यांच्याकडून आपल्याच लोकांवर आक्रमण करुन घेतलं व आपली पोळी शेकली. ज्यातून ते तर गुलाम झालेच झाले. ते स्वतःही गुलाम झाले. मात्र अशा गुलामीच्या काळात त्यांना काहीच फरक पडला नाही. फरक पडला त्या लोकांचं न ऐकणाऱ्या लोकांना. त्या लोकांना गुलामगिरीच्या काळात अशी अशी कामं करायला बाध्य केलं गेलं की ज्याची कल्पनाही करु शकत नाही. याचाच अर्थ असा की पुर्वी राजसत्तेवर असलेला वर्ग आज राजसत्तेबाहेर होताच अस्पृश्य व आदिवासी म्हणून गणला जात होता. काल राजसत्तेत असतांना त्याचेवर कोणतेच बंधन नव्हते आणि आज राजसत्तेतून बाहेर होताच त्यांच्यावर अशी अशी नानाविध बंधनं आली होती की त्याचं जगणं कठीण करुन टाकलं होतं.
          ती सल्ले देणारी जात होती ब्राह्मण आणि राजसत्तेवर असणाऱ्या जाती होत्या, चांभार, मांग, महार, मेहतर, खाटीक, गोंड, गोवारी, गारुडी व इतर सर्व आजच्या अस्पृश्य व आदिवासी जमाती. काल या जाती जमातींना जातीची नावंच नव्हती. कालांतरानं विदेशी आक्रमण कर्त्या लोकांनी त्यांना जातीची नावं देवून जाती निर्माण केल्या.
          महत्वाचं सांगायचं झाल्यास जाती व जमाती ह्या जर पुर्वी नव्हत्या तर आज त्याच जातीला जात म्हणून का संबोधावे? आज जातीच्या आधारावर कोणत्याही स्वरुपाचे निकष का ठरवावे? जातीच्या आधारावर राजकारण का खेळावे आणि जातीच्याच आधारावर भेदभाव का करावा? हा अमूक हा तमूक असं म्हणून जाती आधारावर कल्लोळ का माजवावा? परंतु हे जरी बरोबर असलं तरी जात व जातीवरुन भांडण केल्याशिवाय राजकीय पोळी कशी काय शेकता येणार? त्यामुळंच आज जाती आधारावर राजकारण आढळतं व जाती आधारावर भेदभावही. परंतु महत्वपुर्ण बाब ही की तो काळ गेला. ज्या काळात आधी राजसत्तेवर असलेल्या लोकांना गुलाम बनवलं गेलं. त्यातच त्यांना गुलाम बनविल्यावर जास्त छळलं गेलं. आजही छळलं जात आहे. ज्यातून त्वेष निर्माण होत आहे. हे असंच सुरु राहिलं तर कधीतरी क्रांती होवू शकते. लोकं एकत्र येवू शकतात व आजची राजसत्ता उखडून फेकल्या जावू शकते. शिवाय सल्लाधीश वर्गाच्या वागण्यावर जरबही लावली जावू शकते. ज्यामुळंच जातीजातीवरुन राजकारण चालतं. भांडणेही होत असतात. तेव्हा सर्व जातींनी सावधान असावं. राजसत्ताधिशांनीही सावधान व्हावं आणि सावधान त्याही वर्गानं व्हावं की ज्यांनी आपली स्वतःची आजपर्यंत पोळीच शेकलेली आहे व शेकत आलेले आहेत.

            अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०