अजून ही बरसात आहे ..... - भाग 7 Dhanashree Pisal द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अजून ही बरसात आहे ..... - भाग 7

                 अर्जुन आज जरा नेहमीपेक्षा लवकरच उठला होता ..... उठताच त्याची नजर कबीर कडे गेली .....कबीर निशाच्या शेजारी शांत झोपला होता .....कबीर झोपला आहे हे  ...तर तोपर्यंत आवरून घ्यावं ....अस म्हणून तो उठला .....आणी तडक बाथरूम मध्ये शिरला .....

                 बाथरूम मध्ये शिरताच .....त्याने गरम पाण्याचा शॉवर चालू केला .... गरम पाणी  अंगावर पडताच त्याला थोड फ्रेश वाटल ...आणी झोप ही गेल्या सारखी वाटली ..... अंघोळ उरकून तो बाहेर आला ..... 

                कपडे घालून तो किचन मध्ये आला ....कामावली बाई यायला अजून बराच अवकाश होता ....म्हणून त्याने स्वतःहांसाठी कॉफी बनवायला घेतली ....कॉफी बनवता बनवता सुद्धा त्याच्या डोक्यात विचार् येत होती की ....ऑफिस ला जावं की नाही ....का काही कारण सांगून सुट्टीच घायावी .....उगीच धावपळ नको ....

                  त्याला ही आज ऑफिस ला  जाण्याचा कंटाळाचं आला होता .....त्याने लगेच फोन उचला आणी बॉस ला कॉल केला .....तिकडून आवाज येताच ...पोटात दुखताय अस सांगून त्याने एमेरजेन्सी सुट्टी घेतली .....

                    सुट्टी मिळाली ...ह्या आनंदातच तो कॉफी चा  आनंद त्याचा दिविगुणित जहाला .....

                    थोड्या वेळाने निशा उठली ....आणी तीने ही आवरून तिचे आवरून घेतले ..... खरतर अर्जुन ला निशा च अस वागण अजिबात एक्सपेक्ट करत नव्हता ....पण राधा नी तिच्यावर कोणती जादू केली होती ....काय माहीत ? .....पण ती थोडी का होईना ....वेगळी वागत होती .....

                    इकडे अर्जुन आणी निशा दोघेही उरकून ....राधाच्या घरी आले होते .....अर्जुन नी कुर्ता पायजमा घातला होता ....तर  निशानी पिंक कलर चा पंजाबी ड्रेस घातला होता ...त्याच्यावर मॅचिंग कानातले घातले होते .... आणी केस मोकळे सोडले होते .....निशा खूप सुंदर दिसत होती .....अर्जुन नी राधाच्या घरी देण्यासाठी मिठाई चा बॉक्स आणला होता .....

                     राधा च्या घरी राधाचे सासरे आणी नवरा दोघे मिळून ....पूजेचे केळीचे खांब बांधत होते ..... राधाच्या सासू बाई पाहुण्यांची देखरेख करत होत्या .....राधा बिचारी नेहमीप्रमाणे किचन मध्ये जेवण बनवत बसली होती ......

                      राधा ची एक नजर दिसावी ....म्हणून अर्जुन खूप प्रयत्न करत होता ....पण गेली तासभर झ्हाला ....तरी त्याला राधाच नख सुद्धा दिसलं नव्हतं ..... त्याला वाटलं पूजेला बसताना तरी त्याला राधाचा चेहरा बघायला भेटेल ...पण तस ही काहीच झ्हाल नाही .... पूजेला तिची मोठी जाऊ आणी दीर दोघे जन बसले होते ...... कबीर ....राधाच्या मुली सोबत  खेळण्यात व्यस्त होता .....

                      आता पूजा वैगेरे आटोपली होती ....आता जेवणाची वेल झ्हाली होती .....घरगुतीचं जेवणाचा घाट घातला होता ......सगळं जेवण राधाने एकटीनेच बनवलं होत ........पाहुण्यांची पंगत बसली ......अर्जुन आणी निशा ही जेवायला बसले ......राधाची सासू तर आल्यापासून नुसती निशाच्या मागे मागेच करत होती .....त्यांनीच राधाला निशाच्या घरी जाऊन निशाला खास आमंत्रण दयाला सांगितलं होत ..... आणी राधेचे सासरे ....अर्जुन ला वयफल जोक सांगून  हसायला लावत होते ....अर्जुन आता त्याचे जोक ऐकून वैतागला होता .....जेवणाच्या पानांवर तरी ते शांत बसतील ...अस त्याला वाटलं होत ...पण ते काही शक्य झ्हाल नव्हतं ....

                राधाचा नवरा मात्र अर्जुन पासून थोडा लांब लांबच राहत होता ......त्याला कदाचित अर्जुन चे घरी येणे आवडले नसावे .........

                पान वाढतंच सगळ्यांनी जेवणावर ताव मारायला सुरवात केली .....पुरणपोळी त्यावर भरपूर तूप ..त्या सोबत कटाची आमटी , भाजी ,पापड .....सगळं अगदी जीव ओतून बनवल्या सारखं वाटत होत .....सगळे जेवणाचं  भरभरून कौतुक करत होते .....अर्जुन नी एक पोळीचा एक खास उचलून तोंडात टाकला .......त्याला स्वर्ग सुखाचा अनुभव आला ... इतकं सुंदर जेवण त्यांनी कधीच खाल्लं नव्हतं .....खरच राधाच जेवढं कौतुक कराव तेवढं कमी अस त्याला वाटत होत .....

                 दुसरा घास उचलून त्याने घाई घाई ने तोंडात टाकला ....इतक्यात त्याला तयारी  ठसका लागला .....कोणाचं लक्ष त्याच्या पर्यंत जाईपर्यंत .....राधा त्याच्या समोर पाण्याचा ग्लास घेऊन उभी होती ....राधाचा तत्पर पणा पाहून सगळेच राधा कडे  आवाक होऊन पाहत होते ....