अजून ही बरसात आहे ..... - भाग 8 Dhanashree Pisal द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
  • चाळीतले दिवस - भाग 6

    चाळीतले दिवस भाग 6   पुण्यात शिकायला येण्यापूर्वी गावाकडून म...

  • रहस्य - 2

    सकाळ होताच हरी त्याच्या सासू च्या घरी निघून गेला सोनू कडे, न...

  • नियती - भाग 27

    भाग 27️मोहित म्हणाला..."पण मालक....."त्याला बोलण्याच्या अगोद...

  • बॅडकमांड

    बॅड कमाण्ड

    कमांड-डॉसमध्ये काम करताना गोपूची नजर फिरून फिरून...

  • मुक्त व्हायचंय मला - भाग ११

    मुक्त व्हायचंय मला भाग ११वामागील भागावरून पुढे…मालतीचं बोलणं...

श्रेणी
शेयर करा

अजून ही बरसात आहे ..... - भाग 8

     राधाला अस अचानक अर्जुन साठी आलेलं पाहून ..... अर्जुन सकट सगळेच राधा कडे  अश्चर्याने  पाहून लागले ....राधाने एक नजर सगळयाकडे भिरवली ....सगळेजण तिच्याकडे च बघतात ....हे पाहून ती स्वयंपाक घरात जवळ जवळ पळतच गेली ....राधाच्या नवऱ्याला .....आल्यापासून आधीच अर्जुनचा राग आला होता .....त्यात राधा अशी अचानक अर्जुनसाठी आलेली पाहून त्याला अजूनच अर्जुनसाठी राग आला .....

               राधा अशी अचानक निघून गेल्यावर .....राधाच्या जाऊबाई ने काहीबाही सांगून राधाची बाजू सावरून घेतली ...... 

            आता एक एक करून पाहुण्यांची जायची गडबड चालू झ्हाली ...... अर्जुन आणी निशा ही घरी जायला निघाले ......कबीर झोपल्यामुळे .....अर्जुन ने त्याला उचलून घेतले........निशा ने राधा च्या सासू ची आणी बाकी इतर घरातल्याची चौकशी करून  ते दोघे निघाले ..... 

                 वरचा जिना चढून .....अर्जुन आणी निशा दोघे ही ....त्याच्या घरी आले ...कुलूप उघडून दोघेही घरात आले .....झोपलेल्या कबीर ला घेऊन अर्जुन बेडरूम मध्ये आला ... त्याला त्यांनी शांतपणे बेडरूम मध्ये झोपवले ..... निशा ही  कपडे बदलण्यासाठी निघून गेली .....

                 अर्जुन  आज खूप खुश होता ..... कितीतरी दिवसानी आज ....निशा ,कबीर आणी तो तिघेही सोबत कुठे तरी गेले होते ..... कबीर तर राधाच्या मुलीशि खेळून किती खुश होता .......निशा ही खुश होती ......त्याला ही राधाची एक झ्हालक  मिळाल्यामुळे तो ही खूप खुश होता ......   सगळं कस छान छान वाटत होत .....त्याला एकसारखं राधा त्याच्यासाठी पळत पाणी घेऊन आली तो प्रसंग आठवत होता .....   

                    राधा माझ्यासाठी  अशी पळत आली ....खरच तिला माझ्याबद्दल काही वाटत असेल का ?  तिच्या घरचे तिला काही बोलणार तर नाही ना ? राधा खरच तु किती गोड आहेस .....अर्जुन असा विचार करत बसला होता ...तोच त्याचं लक्ष ......निशा कडे गेली .....

                    एकदम शांत बसली होती .....काहीही बोलत नव्हती .....बहुदा कोणत्या तरी विचारात गुंथ्लेलि होती ....अर्जुन तिच्या जवळ गेला .....काय झ्हाल निशा ? कसला विचार करतेस ?  

                 अचानक भानावर आल्यासारखं करत ....काही नाही रे अर्जुन ? ..... आजच्या पूर्ण दिवसाचा विचार करते ....खरच खूप छान वाटल ....आज .....खरतर हे देव वैगेरे मला असलं काही आवडत नाही ...तुला तर माहित आहे ....पण तरीही आज तिथे जाऊन मला खरच खूप छान् वाटल ......आणी मुळात आपण तिघेजण होतो तिथे ....खूप दिवसानी आपण तिघेही कुठेतरी गेलो होतो .....

                  खर आहे तुझं ......निशाच्या बोलण्याला दुजोरा देत ....अर्जुन बोलला ......आपण अस तिघेजण सारखे वरचेवर कुठेतरी गेलो पाहिजे .....

                 हो मला ही असच वाटत ......त्यामुळे कबीर ही खुश होईल .....निशा बोलली .....

         

                 बर ....आता सांग नक्की काय झ्हालय ? अर्जुन ने निशाला परत खोचक दृष्टीने विचारलं......

                 आता मात्र निशाचा बांध् सुटला ...तीने अचानक अर्जुन ला मिठी मारली .......

                 म्हणजे मला जे वाटत होत ते खर होत ....काय झ्हालय ? सांग लवकर ? 

                 

               काही  झ्हाल अस नाही ...पण कितीतरी दिवसानी ...आपल्या कॉलेजचे दिवस आठवले .....तु आठवलास ? मी आठवले ? कॉलेज मध्ये असताना ....माझ्या मागे मागे करायचास तु ? मला अजून ही आठवतंय .....

              निशा च बोलण ऐकून भावुक होऊन .....काय दिसायचीस तु ? मीच काय पूर्ण कॉलेज तुझ्या मागे असायचं ......त्यात मी असा साधाभोळा ....कॉलेज च्या हॉस्टेलवर जेमतेम पैशात दिवस काढायचो.....

               तुझ्हा तो च साधेपणा मला आवडला ......

                माहित नाही ......काय बघून तु मला पसंद केलंस .....नाहीतर माझं काय झ्हाल असत काय माहित ? ..... या गोष्टीवर दोघेही हसू लागले ......आणी हसता हसता नकळत निशाच्या डोळ्यातून पाणी आले ....आणी अलगद अर्जुनच्या छातीवर घरगले ......अर्जुन ला ते जाणवलं ...निशा तु रडतेस ......काय झ्हाल ? ....तुला कोणी काय बोललं का ? मला सांग ? मी आहे ना ....

               राहशील माझ्या सोबत नेहमी असा .....अर्जुन कडे बघत निशा बोलली .....