नियती - भाग 18 Vaishali S Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 18





भाग -18


सुंदर....

"काय सांगतो...???.. अरे .!!!.आठ दहा महिन्यापूर्वी जेव्हा मला ती दिसली होती....तेव्हा तर दहावी-अकरावीत असल्यासारखी वाटत होती. ही एवढी मोठी.. ..एवढ्याच दिवसात कशी झाली..??"





त्याचा मित्र म्हणाला...
"पोरींच्या बाबतीत ...आठ-दहा महिने ...काही कमी होत नाही... बापू... अरे मर्दा.. आठ दहा महिन्यांत काहीही होऊ शकतं... पोरगी बाई होऊ शकते.....पोरी म्हणतात कशाला मग...??"




सुंदरच्या मित्राने असे म्हटल्याबरोबर...
...मग..





तेथे बसलेले सर्व त्याचे मित्र अर्थ समजून लक्षात येताच खो-खो करून हसू लागले.





ज्या दिवशी मायराची भेट सुंदरला झाली होती त्या दिवसापासून त्याची अन्नावरची वासना उडाली.
त्याला बाबारावांच्या त्या गुलबकावलीच्या फुलावाचून काही दिसेना आणि काही सूचेना.





आजवर सुंदर ने अनेक मुली पाहिल्या होत्या आणि शहरातल्या मुली ही पाहिल्या होत्या..
बरेच वेळा मुलींना घेऊन शहरात नेऊन उपभोगूनही आला होता. पण आज पर्यंत कूणामध्ये त्याचा जीव मात्र गुंतून पडला नव्हता. आजपर्यंत तो सर्वच मुलींकडे घडीभर ची मौज म्हणूनच त्याने पाहिले होते.






जीवनभराची जोडीदारीन एकीतही नाही.. कुणी त्याच्या पात्रतेची त्याला कधीच वाटले नाही... ज्या दिवशी आपल्याला वाटेल एखाद्या मुलीला पाहून हीच आपली जोडीदारी त्याशिवाय तो लग्न करणार नव्हता. पण असा जोड आज पर्यंत त्याला सापडला नव्हता.
आणि दिवसेंदिवस वय वाढत असल्याने त्यांच्या घरचे लोक यावर्षी संसाराच्या खूट्याला बांधून टाकायचे या विचार आणि प्रयत्नाला लागली होती.





पैसा मुबलक असल्यामुळे आणि गावात थोडासे वजन असल्यामुळे अनेक मुली त्याला सांगून आले होते पण त्याचे होय नाही होय नाही असेच चालेले होते.








पण आज सुंदर ने तिसऱ्या मार्फत नानाजीच्या कानावर नाव घातले आणि ते होते मायराचे...
ते नाव कानावर पडतात नानाजी  विचार करू लागले.
....






आज बाबाराव मित्राच्या गावाहून आले तेच मुळी तापलेल्या अवस्थेत... भयंकर चिडलेले होते तिकडून आल्यावर...
त्यांचा मित्राकडे जाऊन फार फार मोठा अपमान झाला होता. अपमानाने केवळ आणि केवळ ते जळत होते.
सूडायची भावना मनात तयार होत होती. पण काय करावे त्यासाठी हे मुळीच त्यांना समजत नव्हते.








मायरा फायनल इयरला होती तेव्हा म्हणजेच जवळपास एक वर्षांपूर्वी त्यांचे मित्र आपल्या मुलासाठी मायराला मागणी घालण्यासाठी गावाला आले होते.
तेव्हा मायरा बीएससी ला शेवटच्या इयरला होती. म्हणून त्यांनी वर्षभर थांबण्याची विनंती केली होती.






त्यांच्या मित्राचा मुलगा खूप खूप शिकलेला होता. भरपूर सावकारी शेत जमीन होती त्यांच्याकडे. आणि तशी ती अफाट शेतजमीन तो स्वतःच पाहत होता. एकुलता एक मुलगा बाबारावांना खूप आवडला आणि पाहता क्षणी ही पसंत पडला होता.






मित्राला बोलणी केल्यानुसार ते लग्न जमवण्याच्या उद्देशाने आपले मित्राकडे गेले होते त्याच्या गावात.
बाबारांना वाटले तिथे गेल्यावर आपले भव्य स्वागत होईल.
ज्याप्रमाणे मागच्या वेळी त्यांचा मुलगा त्यांच्या भोवती घुटमळत होता याही वेळी तसाच घुटमळत राहील मागे मागे ...






..आवभगत करेल सन्मानाने असे वाटत होते.
पण तिथे गेल्यावर तसे काहीही आढळले नाही.
फारच थंड असा प्रतिसाद होता त्या लोकांचा.







बाबाराव कुलकर्णी आले तर जो उत्साह दिसायला पाहिजे होता दरवेळेस प्रमाणे तो यावेळेस अजिबात नव्हता उलट चेहऱ्यावर कुणाच्याही उत्साह दिसत नव्हता तर त्यांना पाहून चेहऱ्यावर त्यांच्या आठ्या पडल्या होत्या.






बाबाराव...
"मित्रा.. तू माझ्या मायराला आपल्या मुलासाठी मागणी घातली होतीस म्हणून मी आलो."






"त्याला वर्ष झाला आता ...बाबाराव.."







बाबाराव....
"हो ती शिकत होती तेव्हा म्हणून म्हटलं होऊ द्यावं शिक्षण पूर्ण."








"बाबाराव ....स्पष्ट शब्दात सांगू..
तुमच्या घराण्याशी आम्हाला संबंध जोडायचे नाहीत आता. आमचा कारभारी तुमच्या गावांमध्ये आम्ही पाठवला होता. त्याने जे ऐकलं ते आम्हाला पटलं नाही किंवा कोणत्याही सासरकडच्या लोकांना.... होणाऱ्या सुनेबद्दल ऐकलेलं असं सहन होणार नाही. खानदानी माणसं आहोत आम्ही.. इज्जतीला मान आहे. तर आम्ही सून अशी तशी कशी करणार...??"







बोलताना त्यांच्या मित्राचा स्वर कडक होता आणि बाबाराव आपल्या मित्राच्या तोंडाकडे वेड्यासारखे स्तंभित होऊन बघत राहिले.







ते त्यांच्या त्या वाक्यात समजून गेले की त्यांच्या मित्रांला काय बोलायचे आहे...??





स्पष्टपणे काहीही समजून घेण्याची गरज त्यांना भासली नाही. मित्राच्या कारभाऱ्याला गावात काय समजले असावे याची त्यांना पुरेपूर कल्पना होती नव्हे खात्रीच होती. कितीतरी वेळ बाबाराव थिजल्यागत तसेच बसून राहिले.... हात पाय गळून गेल्यासारखे झाले त्यांचे.








त्यांचा मित्र त्यांची तंद्रीभंग करत म्हणाला...
"बाबाराव... हे बघा आम्ही ऐकलेलं..."







त्यांचा मित्र पुढे बोलणारच होता तर बाबाराव यांनी हात दाखवून त्यांना थांबवले.
"बस ....
आम्ही समजून गेलो तुम्हाला काय म्हणायचे आहे. आम्हाला सांगण्याची काहीही गरज नाही."

असे म्हणून ते तडक मित्राच्या घरून बाहेर आले.









गाडीत बसून ड्रायव्हरला गाडी गावात घ्यायला सांगितले.
संतापाने नुसते थरथर कापत होते ते. 






आयुष्यात आपला अपमान एवढा होईल याचा विचार त्यांनी कधी स्वप्नातही केला नव्हता. मित्राकडे जेव्हा बसले होते तेव्हा राम गाडीत बसलेला होता. 






तेव्हा रामलाही त्यांनी तेथे काय झाले अजिबात 
सांगितले नाही.
एवढा भयंकर अपमान ते स्वतःच्या तोंडाने कसे सांगणार...???







त्या दिवशी त्यांना रात्रभर झोप आली नाही.. रात्रभर ते तळमळत होते बेडवर या कडावरून त्या कडावर...
कधीतरी मग पहाटे पहाटे त्यांना झोप लागली त्या दिवशी...
....
...







घरावरच्या स्लॅब वरती बसून मायरा समोर दूरपर्यंत पसरलेल्या  टेकड्यांकडे पाहत होती. 
किती ओबड खाबड आहेत नाही टेकड्या ....??
आणि तसेच वाकडे हेकडे रस्ते आहेत...







आपलं जीवन पण सुद्धा असंच आहे. माझे जीवन असंच झालेले आहे.







जीवन कोणत्या मोडवर येऊन ठेपले आहे काही समजत नाही आणि काही सांगता येत नाही. 
कुठून कुठपर्यंत आली आहे मी....
विचार करता करता तशीच बसून सुन्नपणे बाहेर पाहत बसलेली होती.







आता तिला 23 वे वर्ष लागलेले असेल.. पण अजूनही
ती सतरा अठरा वर्षाच्या मुली सारखीच दिसत होती..
अंगप्रत्यंगातून सौंदर्य झळकत होत तिच्या. 
जिकडे जाईल तिकडे मुलांच्या नजरा वळत होत्या तिच्याकडे...पण तिने कधीच कोणाला दाद दिली नाही...







एकमेव मोहितच होता तिच्याकडे कधी वळून बघत 
नव्हता कॉलेजमध्ये असताना... म्हणूनच तर ती त्याच्याकडे आकर्षित झाली होती.






जेव्हा ती पहिल्यांदा त्याच्यासोबत बोलायला गेली..
तेव्हा त्याला तिच्यासोबत बोलताही येत नव्हते. एवढा घाबरला होता तो तिच्यासोबत बोलायला. 









ती अभ्यासात जेमतेम होती.. त्याची मदत घेण्याच्या उद्देशाने तिने मैत्री केली. आकर्षण तर होतेच पण त्याची मदत घेता घेता केव्हा ती प्रेमात पडली त्याच्या तिलाही कळले नाही.
तिला तर माहिती नव्हते की त्या दोघे एकाच गावातले आहेत.
तो तर प्रेमाच्या ही दूर दूर पळत होता. पण शेवटी त्याला आपण आपल्या प्रेमात पाडलेच. साध्या भोळ्या माझ्या मोहितला मी कधीच दूर करणार नाही.

फक्त तो एकदा दिल्लीला जाऊ दे....
मग मीही..... असा ती विचार करतच होती की तिला कसली तरी चाहूल लागली. आणि ती सतर्क झाली.








तेथेच रेलिंगला लागून उंच भिंत होती त्याच्या आडोशाला उभी राहिली...
आपल्या मामाच्या घरून त्याच गावात एका मैत्रिणीच्या घरी आली होती आणि ती कुणाची तरी वाट बघत होती.







केव्हाची बसून वाट पाहत होते पण अजून तो आला नाही.
" आता हे कोण येतंय...??"








विचार करीत ती शांत अंग चोरून उभी राहिली.
तर एक तरूण स्लॅब वरती आला आणि इकडे तिकडे पाहू लागला. कुणीच दिसले नाही तर तो तसाच शांत उभे राहिला. त्याचेही लक्ष निसर्गरम्य वातावरणाकडे गेले.






दोन क्षण त्यासमोर दिसणारे  हिरव्यागार टेकड्या आणि सोबतच दिसणाऱ्या वाकड्या पायवाटा.... रस्ते पाहत उभा राहिला....







विचार करत होता तो...
" वसुंधरा किती सुंदर आहे. तिला भेदभाव नाही.. ती सर्वांनाच आपल्यात सामावून घेते.. तिच्यासाठी कोणी श्रीमंत नाही ...गरीब नाही ...ना .... मग मानवाने का असं वातावरण केले की आज या भेदभावामुळे मला असं माझ्या प्रेमाला लपून छपून भेटायला यावं लागत आहे... आणि आता दूरही जावे लागणार आहे...!!!"






विचारशृंखला सुरू होती त्याची ....तेवढ्यात पाठीमागून कोणीतरी त्याला मिठी मारली .....दोन्ही हात समोर छातीवर आले त्याच्या....... आणि तो स्पर्श त्याला त्याच्या उखडत्या मनाला गारवा देऊन गेला...
आणि त्याने मग......



तिच्या दोन्ही हाताला पकडून डोळे मिटून शांत स्वरात "मायू " म्हणून तसाच उभा राहिला.







दोन दिवसांपासून त्याचे हृदय तडफडत होते तिला पाहण्यासाठी. तिच्याशी बोलण्यासाठी.





तिचा स्पर्श त्याला उभारी देऊन गेला.

हृदय उचंबळून आले त्याचे आणि नेत्रातून दोन अश्रू खाली पडले. आणि छातीवर असलेले तिच्या हातावरती ओलावा जाणवला अश्रू पडतानाचा.







तसे मग तिने मागून मिठी सोडली आणि त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिले...
भिरभिर त्याच्या नजरेत बघू लागली तर.....

🌹🌹🌹🌹🌹