नियती - भाग 19 Vaishali S Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 19





भाग -19



दोन दिवसांपासून त्याचे हृदय तडफडत होते तिला पाहण्यासाठी. तिच्याशी बोलण्यासाठी.




तिचा स्पर्श त्याला उभारी देऊन गेला. हृदय उचंबळून आले त्याचे आणि नेत्रातून दोन अश्रू खाली पडले. आणि छातीवर असलेले तिच्या हातावरती ओलावा जाणवला अश्रू पडतानाचा.


तसे मग तिने मागून मिठी सोडली आणि त्याच्या पुढ्यात येऊन उभी राहिले... भिरभिर त्याच्या नजरेत बघू लागली तर.....





तर तिला त्याच्याही नजरेत तिच्या इतकीच भेटण्याची व्याकूळता दिसली...





जेथे दोघेही उभे होते ते शहरातले शेवटच्या भागातल्या साईडचे घर असल्यामुळे येथून पूर्ण निसर्गरम्य वातावरण दिसत होते. सर्व टेकड्यांचा भाग स्पष्ट दिसत होता. त्यातून जाणारे आडरस्तेही वाकडे हेकडे .....हेकडे मेनरोड  एखाद्या चित्रांमध्ये काढल्याप्रमाणे काळे डांबरी रस्ते तेही  सुंदर दिसत होते.



हिरव्या टेकडी सारख्या ... कमी उंचीच्या डोंगरांवर काळे वळणदार रस्ते.... तर काही आडवे तिडवे रस्ते ... 
आणि दूर असल्यामुळे त्यावरून जी चालणारी वाहने आहेत ती खूपच छोटी छोटी खेळण्यातल्या वाहनांसारखी दिसत होती.




मंदसर गार वाऱ्याची झुळूक आली. मायराच्या चेहऱ्यावर उजव्या बाजूने केसांची बट गालावर हेलकावे खाऊ लागली. ती गालावर स्पर्श करून हेलकावे खातानाच मोहितला तिचा राग आला . त्याला हेवा वाटला तिचा आणि त्याने......... त्याने ती बट बोटांनी धरून मागे केली आणि तिची हेअर क्लिप्स जी लावून होती ती काढली आणि तिच्यात ती बट लटकवून केली.





आता तिचा चेहरा मोकळा झाला . तर त्याने तिच्या गालावर झुकून किस घेतले. त्याच्या ओठांच्या हळूवार स्पर्शाने मायराच्या अंग अंगावर रोमांच उभे राहिले.
आणि तसं मोहितलाही जाणवून आलं स्वतःच्याही शरीरामधून काहीतरी..... काहीतरी सळसळ करत गेल्यासारखं.....






आपसूकच मंद स्मित झळकले दोघांच्याही चेहऱ्यावर.
मायराला बरेच वेळा वाटायचं की त्याला भेटण्यासाठी केवळ आपल्यालाच ओढ आहे...
पण आज ती बघत होती की त्याच्याही नेत्रांमध्ये 
.....तिला भेटण्यासाठी तेवढीच ओढ आहे.





त्याचा शांत निरागस चेहरा आणि पाणावलेले नेत्रं
थोड्यावेळापूर्वी दिसलेली त्यामधील व्याकुळता आणि आता .........त्यामध्ये थोडेसे समाधान .....
तर अजूनही थोडी व्याकुळता शिल्लक होती जणू पूर्ण समाधान झाले नाही असे दर्शवत होती.....
त्याचे नेत्र तिला प्रश्न विचारत होते....




करोगे क्या फिर मोहब्बत मुझसे....
लहू लहू था दिल मेरा....
डर लगता है कहीं-तुम भी ना हो लहूलुहान...
....
मगर....
होठों ने कहा तुम्हारे....बेइंतेहा बेइंतेहा....





त्याच्या नजरेतले सर्व भाव  भावना तिलाही उमगल्या आणि ती त्याचा हात पकडून त्याला बाजूच्या भिंतीकडे घेऊन गेली.
त्या जागेला तीनही बाजूने उभी भिंत होती....
मानवी उंचीपेक्षा जास्त मोठी... 
तेथे एक तक्तपोश उभा टेकून ठेवलेला होता.
(तक्तपोश म्हणजे मजबूत असा लाकडी बेड.)




तो तिने खाली पाडला हळूच आणि सरळ त्याचा हात पकडून त्याला तिथे बसवले....

आणि ती त्याच्या पुढ्यात बसली मांडीवर.....
ती बसताच त्याला आश्चर्यचकित झाले. तिच्याकडून त्याला ही अपेक्षा नव्हती......


लहान तर दोघेही नव्हते. प्रेम ही दोघांची एकमेकांवर तेवढेच होते. आजपर्यंत प्रेमामध्ये पुढाकारही तीच घेत आली होती. पण आतापर्यंत त्यांच्यामध्ये एक विशिष्ट अंतर त्यांनी राखले होते.




ते दोघांमध्ये असलेली अंतर दाखवणारी अदृश्यरेघ
आज मायराने मिटवून टाकले आणि एक पाऊल पुढे तिने घेतले.



तिचा आपल्यावरचा विश्वास आणि आपल्यावरील प्रेम पाहून  मोहित तिच्यावर आणखी इम्प्रेस झाला आणि
पुन्हा तिच्यावर जास्त प्रेम येऊ लागले.




पण त्याला धास्ती वाटत होती की आपल्या कडून जर काही चुकीचे घडले तर आपण तर निघून जाणार आहोत पण मायराला इकडे भोगावे लागेल...


तो हरवल्यागत तिच्याकडे नुसता एकटक पाहत होता.
आणि मायराला त्याच्या साधेपणावर....
.... खुळेपणावर प्रेम करावे की राग करावा..?? असे वाटत होते.





"ए मोहित ....एवढे मी पुढ्यात बसली आहे 
खुळचटासारखा काय पाहतोस...?? 
दूधखुळा कुठचा..??"




"ए मायू... दूधखुळा वगैरे म्हणू नकोस."


"मग काय म्हणू ...?? एवढी समोर आहे ना मी..??"





"खरं सांगू ...तू अशी पुढ्यात बसलेली आहे ना !!
मग मला घाबरल्यासारखे वाटत आहे."


"हो !! मी काय खाणार आहे का तुला...??"





"अगं पण.... पहिल्यांदाच कुणी बसले असे माझ्या मांडीवर..."





"मग  किती जणाला आणखी बसवायचे आहे..??"





"प्चss अगं ....तसं नाही.... आणि मी कशाला बसवणार
ना कुणाला...??"



"ही बसण्याची जागा माझी फक्त एकटीचीच आहे... लक्षात ठेव.."


त्यावर तो मंदस्मित करत फक्त "हम्म" म्हणाला.


"आणि हम्म हम्म काय करतो आहेस...??"





उत्तरा दाखल त्याने तिचा चेहरा दोन्ही हाताने पकडला आणि आपल्या हृदयाजवळ नेऊन ठेवला.



तसे ती क्षणभर भांबावली पण काही वेळाने तिच्या लक्षात आले की मोहितचे हृदयसंगीत जोरजोऱ्याने सुरू होते.



"बापरे ...!!!...का धडधडते आहे एवढ्याने...??"



"तू जवळ आलीस ना एवढ्या म्हणून..."


"माझ्यासाठी...??"





मोहितने वर खाली मान करून "हम्म" केले...




तिने मोहितच्या हृदयाजवळील कान काढून सरळ त्याच्याकडे पहात उत्साहाने बसली आणि...



आता त्याच्या रावडी मिशीचे दोन्ही टोके...
हाताच्या....दोन चिमटीमध्ये इकडच्या आणि तिकडच्या..
पकडले....
आणि म्हणाली....

" मिशी इतकी धारदार इकडे...
हृदयाची स्पंदने बघा तिकडे...."

मिश्किल पणे त्याच्या नेत्रांत बघत म्हणाली.



"मिशी आणि त्याचा काय संबंध गं...???"


"कसा नाही संबंध ...??"





थोडासा चिडून तो म्हणाला....
"संबंध कसा आहे ??? सांग ना मग...!!"



"ए  घाबरगुंडू...!!! राहू दे ...राहू दे...हां...!!"



"कोण घाबरतो हा...??"..मोहित चिडून म्हणाला.


उत्तरा दाखल त्याच्याकडे पाहून स्वतःच्या भुवया उंचावल्या.. ओठांची हालचाल करून पूटपूटली..



"तू आहेस"...असा इशारा केला....



आणि रागात येऊन त्याने मग तिची उजव्या हाताने वेणी गच्च पकडली डोक्याजवळ... 
आपसूकच मान उंचावली गेली तिची... डावा हात तिच्या कमरेभोवती गुंडाळला गेला.... झटक्याने जवळ ओढले आणखी......

.....




त्याने घेतलेला पवित्रा तिला अगदी अनपेक्षित होता.
लाजेने दोन्ही गालांवर अबोली रंग फुलला मायराच्या...





हृदय स्पंदने वाढली पण काहीतरी मधुर गोड असे वाटत होते तिला... तिच्यासाठी हा अनुभव पहिलाच होता त्याच्याकडून आलेला.


पोटामध्ये फुलपाखरे उडू लागली होती खूप खूप सारी.


आणि तिचे हे रूप त्याच्यासाठी अगदी नवखे होते.
त्याने कधीही तिला असे लाजरे घाबरे बघितले नव्हते.





सुंदर तर ती अगोदरंच होती... पण आता ती थोडी लाजाळू च्या झाडाप्रमाणे सिमटल्यासारखी झाली.
ओठांवरती अबोली फुलली असे वाटले त्याला...



नाजूकता किती असावी ती ओठांमधली.....???
त्यांकडे पाहून प्रश्न पडला त्याला.




एवढी सारी नाजूकता तो पहिल्यांदाच बघत होता.
जिन्यामध्ये बंगल्यातल्या जेव्हा त्यांचा पहिला वहिला किस झाला तेव्हा काहीही दिसले नव्हते फक्त स्पर्श अनुभव घेतला होता...


आता या घडीला मात्र तसे नव्हते...
नैसर्गिक वातावरणात त्या झंकार उमटले होते हृदयात त्याच्या....... त्याच्या ते सुंदर कमानदार अबोली ओठ बघून...





आणि आता या क्षणांत निरागसपणे अबोल असलेले तिचे दोन्ही ओठ थरथरू लागले होते....




अगदीच न रहावून मोहितने मग हळुवार तिच्या ओठांवर ओठ टेकवले. त्याच्या ओठांचा स्पर्श होताच थोडे ते खुले झाले.
आणि.... त्याने तिचा खालचा ओठ आपल्या ओठांत जखडला चांगला पकडून ....मग हळूच खेचला आणि सोडून दिला.





तिचा श्वास चढला होता... नजरेत नशा चढलेली .
त्याचे असे पकडून सोडून देणे तिला आवडले नाही. किंचित तिने लाल नजर घेऊन त्याच्याकडे पाहिले.





त्याचीही नजर तिच्या नजरेत मिसळली..... तिच्या नजरेतील प्रश्न उमगला त्याला.... आणि मग पुन्हा त्याने
डाव्या हाताने तिला आणखी जवळ ओढले.... हृदयांचे संगीत एकमेकांत मिसळले... हृदयस्पंदने एकत्र आली.
हृदय संगीतामध्ये स्पर्धा सुरू झाली...



हृदयांमध्ये गोड धडधडी ती .... मायरा लाजून पण लक्षपूर्वक अनुभवत होती तर केव्हा तिचे ओठ त्याच्या ओठात गेले तिला कळलेही नाही.







आता मात्र तो अगदी मन लावून रसस्वाद घेत तिच्या जवळील अबोली चोरू लागला...
लाजलेल्या अबोलीमध्येही आता शिरशीरी आली.. थोडीशी तीही चवताळली.... तीही गुलाबामधील गुलाबाचा मकरंद चाखू लागली.




अबोली आणि गुलाब धुसमुसळेपणा करू लागले.
गुलाब कधी रांगडेपणा दाखवत होता तर कधी अबोली चवताळंत होती आणि अधिकार गाजवीत होती...
चढाओढ लागली जणू जिंकण्यासाठी....




श्वासांमध्ये श्वास मिसळून गंधाळले गेले वातावरण.
डावा हातंही त्याचा हळुवार पाठीवर प्रेमाने फिरत होता.
कुठेही आसक्ती नव्हती त्या स्पर्शात... निव्वळ प्रेम आणि प्रेम जाणवले मायराला....




तिलाही तर तेच हवे होते... स्पर्शातून त्याच्या निरपेक्ष प्रेम जाणवत होते..... भावना उचंबळून गेल्या तिच्या .....सादाला प्रतिसाद देऊ लागली तेवढीच...




क्षण गेले काही चढाओढीचे..... 
त्यावेळी तिचेही हात त्याच्या पाठीवरून फिरत होते प्रेमळपणे.
आणि आता त्याच्या स्पर्शात काहीतरी वेगळे जाणवू लागले तिला..
वेगळेपण स्पर्शामध्ये जाणवताच तिने उजवा हात त्याच्या माने कडे नेला आणि केसांमध्ये घेऊन मुठीत केस पकडले आणि त्याची मान मागे ओढली...




आणि मग....

🌹🌹🌹🌹🌹