अतिशहाणा मी माझा बैल कामाचा? Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अतिशहाणा मी माझा बैल कामाचा?

बंधूक आपलीच, गोळीही आपलीच ; अतिशहाणा मी, माझा बैल कामाचा?          *आज परिस्थिती बदलली आहे. लोकं स्वतंत्र्य झाली आहेत. कारण काळ बदलला आहे. बदलत्या काळानुसार परीवर्तनही झाले आहेत व लोकं जास्तच स्वतंत्र्य झाले आहेत. आज बदलत्या काळानुसार लोकं स्वतंत्र्य तर झालेच. ते एवढे स्वतंत्र्य झालेत की जणू त्या स्वातंत्र्याचा माजच आला आहे त्यांना असंही वाटायला लागले आहेत. कालच्या प्रथाही आज कोलमडून गेलेल्या आहेत. त्यातच कालच्या सतीप्रथा, बालविवाह, गंगाप्रवाह, तृषानल आणि इतर सर्वप्रकारच्या प्रथा तशाच आजच्या देव्या अंगात येणे, पाषाणात देव मानणे या प्रथाही हे लोकांना थोतांड वाटायला लागल्या आहेत. त्याला ते उत्तरही देवू लागले आहेत व सिद्ध करु लागले आहेत की त्या प्रथा अघोरी होत्या व आजच्याही काही प्रथा ह्या अघोरीच आहेत. हा सर्व बदल शिक्षणानं झाला आहे. तरीही काही लोकं अंधश्रद्धा पाळतात. काही लोकं निश्चीतच बदलले आहेत. काही लोकं अजुनही बदलायचे आहेत आणि जे बदलले त्यांची अवस्था अतिशहाणा त्याचा बैल रिकामा अशी झाली नसून तेच मुठभर लोकं आज इतर सर्वसामान्य लोकांना मुर्ख समजू लागले आहेत. ते त्यांना मुर्ख बनवीत आहेत. जे जनतेचे नेते आहेत. अन् त्यांनीच सर्वसामान्य लोकांची अवस्था बंधूक तुमचीच, गोळीही तुमचीच व तुमच्यावर झाडणारेही तुम्हीच अशी करुन टाकलेली आहे. ही चिंतेचीच बाब आहे.*          आज विज्ञानानं प्रगती केली व विज्ञान घराघरात शिरलं. तसं वातावरण बदललं. त्यातच त्यांना कळलं आहे की पृथ्वीवर निर्माण झाली असलेली जीवसृष्टी ही जलावरण, वातावरण व शिलावरणाच्या माध्यमातून निर्माण झालेली आहे. तशी विज्ञानाची ही एक क्रांतीच आहे. आज विज्ञानाचं जग पादाक्रांत केलेलं असून जगाला चंद्र म्हणजे काय व सुर्य म्हणजे काय? हे सांगण्याची गरज नाही. तो मंगळावरही जाण्याचे प्रयत्न करीत असून त्यानं पाणी कसं निर्माण करायचं हेही शिकून घेतलेले आहे. शिवाय गतकाळात अग्नी देखील निर्माण केलेला आहे.          आप, तेज वायू, आकाश अन् जमीन हे पाच नैसर्गिक घटक. याच घटकापासून माणूस बनला. तसेच पृथ्वीवरील व पृथ्वीपरीसरातील सर्व जीव बनलेत. वरील घटकांना पंचमहाभूते समजत असून त्यानं वरील पाच पंचमहाभुतांपैकी तेज हे कितीतरी वर्षापासून शोधून काढलं. ज्यावेळेस माकडअवस्थेतील माणूस झाडावरुन खाली आला. आपण हे गतकाळातील शंभर वर्षाच्या काळात शोधून काढलं. पाणी हे H2O चं मिश्रण असून एच म्हणजे हायड्रोजन व ओ म्हणजे ऑक्सिजन हे त्याला कळलेलं आहे. समजा हायड्रोजन हवेत जाळला तर पाणी निर्माण होतं हेही त्याला आज माहीत झालेलं आहे. आता शोधायचं बाकी आहे वायू, आकाश आणि जमीन. कारण आकाश, जमीन आणि हवा हे निर्माण करणं कठीण आहे. हे जरी खरं असलं तरी आज त्याच माणसानं अशा एका दगडाला जीव फोडला आहे की जो दगड एका सेकंदात कितीतरी लांबचा पल्ला गाठतो व संवाद करतो. माहिती मिळवतो नव्हे तर त्या माहितीच्या आधारे आपल्याला दिशाही ठरवता येते. माणसाला माहीत आहे की त्याला आकाश निर्माण करता येत नाही. वायू निर्माण करता येत नाही. त्यातल्यात्यात जमीनही निर्माण करता येत नाही. तसे प्रयत्न सुरु आहेत. परंतु त्या कितीतरी युग लागतील की तेही आप आणि तेजसारखं माणसाला निर्माण करता येईल. त्या दिवशी तो या संपुर्ण जीवसृष्टीचा मालक बनेल. परंतु हे जरी खरं असलं तरी आजचा मानव हा आजही कोणत्याच बाबतीत कमी नाही. मात्र आजची काही माणसं ही अर्ध्या हळकंडात पिवळी झाल्यागत वागत असतात. ते स्वतःला अतिशहाणे समजत असतात. ज्यांना माहीत आहे की जो अतिशहाणा, त्याचा बैलही रिकामा असतो. परंतु हे लक्षात कोण घेतं.          आज समाजाची तशीच गत आहे. काल समाज घाबरावा व समाजातील माणसं सुव्यवस्थीत वागावीत म्हणून देव निर्माण करण्यात आला. त्यानं उदंड वागू नये म्हणून त्यात अंधश्रद्धा भरल्या. शिवाय एखाद्या व्यक्तीनं उदंड वागण्याचा प्रयत्न केल्यास वा तसा तो वागायला लागल्यास त्याची हत्या करण्याची परंपरा तत्कालीन काळात उदयास आली. ज्याला वध म्हटल्या गेलं व जो व्यक्ती असा उदंड वागत होता. त्याला दानव समजल्या गेलं आणि हत्या करणाऱ्या व्यक्तीला देव. काल माणूस उदंड वागू नये म्हणून पाषाणात देव आहे असा भाष निर्माण करण्यात आला. तेही माणूस घाबरावा व समाजाचा कारभार व्यवस्थीत चालावा म्हणून. परंतु तसा निर्माण करण्यात आलेला कालचा पाषाणरुपी देव आज कालबाह्य झालेला आहे. परंतु आजच्या मानवाला देव व दानव यामधील फरक समजलेला असून तो आजच्या काळात उदंड वागायला लागलेला आहे. हा सर्व बदल विज्ञानानं घडवून आणलेला आहे. आज लोकं देवाला घाबरत नाहीत. त्याला पाषाण समजतात. त्यामुळं समाजाचा कारभार चालवत असतांना आज काळात तो कसा चालवायचा? हा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. आज समाजात बलात्कार, हत्या, गर्भपात, काही ठिकाणी भ्रृणहत्या, काही ठिकाणी बालविवाह तर काही ठिकाणी नरबळी सर्रास होत आहेत. समाज उदंड वागू लागलेला आहे. समाजाला त्यांच्या उदंड वागण्यापासून नियंत्रणात ठेवण्यात अपयशी ठरलेला पाषाणरुपी देव, त्याच्या जोडीला असलेल्या अंधश्रद्धा, अघोरी प्रथा, रुढी, परंपरा, अस्पृश्यता ह्या गोष्टीही आज कालबाह्य ठरलेल्या आहेत आणि कायद्याचं राज्य आलेलं आहे. लोकं कायद्यालाच देव समजायला लागलेले आहेत. परंतु हे कायदेही आज काही करु शकत नाहीत. एवढा माणसाला माज चढलेला आहे. आजचा मानव हा कायद्यालाही न घाबरता माणसाला माणूस समजत नाही. माणसाप्रमाणे वागू देत नाही.  वागवत नाही. स्वतंत्रता असली तरी स्वैराचार आहे. हे सगळं घडत आहे, कालच्या पाषाणात असलेला देव संपविल्यानं.            विशेष सांगायचं झाल्यास काल देव दानव असा भेदभाव होता. तद्नंतर स्पृश्य अस्पृश्य असा भेदभाव आला. ज्यात अनेक बळी घेतले गेले. अन् आज गरीब श्रीमंत असा भेदभाव आला. ज्यातून अनेक बळी जात आहेत. शिवाय अनौरस प्रकारही वाढत आहेत. काय करावं ते सूचत नाही. शिवाय आजचे नेतेही इतर सामान्य नागरिकांची दिशाभूल करीत आहेत. स्वतः मात्र एसीच्या बंगल्यात राहतात. एसी गाडी वापरतात. कितीतरी करोडो मालमत्ता त्यांच्याजवळ आहे. तेच अत्याचार करीत असतात लोकांवर. अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कालचा गरीब असणारा साधारण व्यक्ती नेता बनल्यावर पाच दहा वर्षात एवढा श्रीमंत होतो जादूची कांडी फिरवल्यागत. हा एक चमत्कारच असून ती एक चिंतेची बाबही आहे. कालचे गरीब नेते आज मालामाल व आजचा सामान्य माणूस आणखीनच गरीब होत चाललेला आहे. त्यातच सामान्य माणसांच्या घरी खायला अन्न नसून त्यांच्या कधीकधी उपासीपोटी आत्महत्याही घडत आहेत. देशात महागाई वाढलेली आहे व खायला पुरेसे पैसे नसल्यानं त्यातच अशी मंडळी मेहनतीनं दोन पैसे कमविणाऱ्या माणसांच्या घरी डकेती टाकतात. लुटमार करतांना दिसतात. हे वास्तविक चित्र आहे. आज सर्वसामान्य माणसंही आत्महत्याच करीत असून काल श्रीमंत असणारी ही सर्वसामान्य माणसं गरीब कशी झालीत? हा एक चिंतेचाच प्रश्न आहे. तसाच दुसरा चिंतेचा विषय हाही आहे की कालच्या गरीब असणाऱ्या नेत्यांजवळ एवढा पैसा कुठून आलाय? अन् आला तर त्याची चौकशी व्हावी. परंतु चौकशी तरी कुठून होणार? कारण चौकशी करायची झाल्यास तो नेता पटकन दल बदलून सत्ताधारी पक्षात जात आहे. तर काही नेते धमक्या देवून मोकळे सुटत आहेत. आता लोकं म्हणतात की मतदानातून चांगला विचार करुन आपला चांगला नेता निवडावा. परंतु तो तरी कसा निवडायचा? हाही एक प्रश्नच आहे. कारण सर्वच नेते काही ना काही प्रमाणात भ्रष्टाचारीच आहेत. शिवाय यावर कोणी कोणत्याच नेत्यांच्याही विरोधात काहीच बोलू शकत नाहीत. कारण तसं काही बोलल्यास त्याच्यावर कारवाईची म्हशाल टांगती आहे.           महत्वपुर्ण बाब ही की काल देवांचं राज्य होतं. त्यावेळेस लोकं पाषाणाला घाबरत होते. कारण पाषाणाची मुर्ती निर्माण करुन त्यात देव आहे असं भाषवून लोकांना घाबरवलं जात होतं. मध्यंतरीचा काळात कायद्याचं राज्य निर्माण झालं. लोकं कायद्याला घाबरायला लागले होते. आज मात्र नेत्यांचं राज्य आहे. आज नेत्यांनाच घाबरावं लागतं. त्यामुळं आज नेत्यांची ज्या माणसावर कृपा होत असेल, तो भाग्यवान आणि अवकृपा होत असेल, तो पदभ्रष्ट्र. अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच बलात्कार, हत्या या सर्व गोष्टी होतात व चक्कं कितीही मोठ्यात मोठे गुन्हे असले तरी ते गुन्हेगार या नेत्यांच्याच वरदहस्तानं मोकळे सुटतात. त्यांनाच तिकीटं मिळतात. मग तेच समाजात सांगत फिरतात की आम्ही काल जरी नालायक असलो तरी आजचे समाजसेवक आहोत. तेच निवडणुकीला उभे राहातात. जनतेसमोर येतात. जनताही भोळीभाबडी की त्यांना देवच समजते व तीच जनता त्यांना देव समजून बहुमतानं निवडणूकीत निवडूनही देते.          महत्वाचं सांगायचं झाल्यास सध्या निवडणूक आहे  अनेक हौसे, गवसे, नवशे निवडणूकीत उभे राहतील. घराजवळ येतील. मतांचा जोगवा मागतील. परंतु त्यावर सामान्य जनतेनं डोळे मिटून विश्वास करु नये. त्यांचं डोळस होवून निरीक्षण करावं. त्यांची इतर माध्यमातून माहिती काढून ते निवडून देण्याच्या लायक आहेत का ते पाहावं. त्यांच्यावर गुन्हे आहेत का तेही पाहावं. ते आपलेच पोट भरतील की जनतेचाही विचार करतील? तेही पाहावं. मगच मतदान करावं. जेणेकरुन त्यांच्या माध्यमातून आपला, आपल्या परीसराचा, आपल्या राज्याचा नव्हे तर देशाचा आपल्याला विकास करुन घेता येईल. ते जर तशा स्वरुपाचे नसतील तर त्यांना मतदान न केलेलं बरं. इतर काम करणाऱ्या सर्वसामान्य उमेदवाराला मतदान केलेलं बरं. यात शंका नाही. कारण आज त्यांनी आपली अवस्था अतिशहाणा नमस्कार त्याचा बैल कामाचा अशी करुन टाकलेली आहे व त्यांनी सर्वसामान्य लोकांची अवस्था बंधूक तुमचीच, गोळी तुमचीच व तुमच्या स्वतःवर झाडणारेही तुम्हीच अशी करुन टाकलेली आहे. त्यामुळंच आपण त्या अतिशहाण्या लोकांसाठी मतदान करतांना बंधूक आपलीच, गोळीही आपलीच आणि आपल्यावर गोळी झाडणारेही आपणच अशा स्वरुपाचं मतदान करु नये. ज्यानं आपणच दोषी ठरुन आपलाच विकास खुंटेल. दोष त्यांचा असेल, परंतु ते आपल्यालाच दोषी ठरवतील. अशाप्रकारची चूक आपल्या हातून होवू नये. मतदान करतांना या गोष्टीचा आवर्जून विचार करावा म्हणजे झालं.           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०