दिवाळीला लक्ष्मीपुजनाची गरज आहे का?
तमाम गरीबीत जीवन जगणारी माणसे. लक्ष्मी पुजन करीत नाही काय? करतात. पण पाचवीला दारिद्रय पुजलेलं. कितीही चांगलं लक्ष्मी पुजन केलं तरीही....
समाजात गरीब, शोषीत, दलित, आदिवासी सर्व प्रकारची माणसे जीवन जगत असतात. पण ते इमानदार असतात. त्यांना भ्रष्ट व्यवहार समजत नाही. पण ते गरीब असतात. पण जे धनवान असतात. ते मात्र भ्रष्टाचार करणारे असतात. त्यांचा व्यवहार हा पारदर्शी असतो. तरीही त्यांच्याकडे गरीबीच असते. म्हणजे जे श्रीमंत आहेत पण व्यवहारीक दृष्ट्या पारदर्शी नाहीत. त्यांना लक्ष्मी पावन होते आणि जे गरीब पण व्यवहार चांगला. तरीही लक्ष्मी त्यांच्याघरी नाही. मग लक्ष्मीने असा भेदभाव करावा काय?
विदेशात लोक राहतात. तिथे ख्रिश्चन बौद्ध जास्त आहेत. तिथे लक्ष्मीचे पुजेला थारा नाही. तरीही तिथे गरीब जास्त प्रमाणात नाहीत. मग लक्ष्मी पुजा केल्यानेच श्रीमंती येते असे नाही तर आपले कर्म चांगले असावे. खरच दिवाळीला लक्ष्मी ची गरज आहे काय?
गरीब व्यक्तीच्या घरी जसे आपण जातो. तसा आपला सन्मान ही जास्त होतो. भारत देश किती गरीब आहे. इथे सगळे विदेशी लोक येतात. सगळ्यांचा इथे सन्मान होतो. देश विदेशातील लोक इथे येवून राहतात, सन्मानाने राहतात. राहण्यासाठी या देशाला पारतंत्र्यात ठेवतात. आपण आजपर्यंत पारतंत्र्यात होतो. केवळ इंग्रजांच्याच नाही तर मोगलांच्याही. मोगलच नाही तर आर्यांचेही गुलाम होतो. आर्यापुर्वी गुलाम होतो त्या राजसत्तेचे. इथे राजेशाही होती.
स्वातंत्र्य आलं पण खरंच आपली गुलामी गेली काय? गुलामीचे भोग आपला पिच्छा सोडत नाही. आज आपण गुलाम जरी नसलो तरी आपल्याला राजरोषपणे स्वतंत्र्य आहो असेही म्हणता येत नाही.
आज आपण स्वतंत्र्य असलो तरी मानसिक गुलाम आहो. कोणी धार्मिक गुलाम आहेत. देवांची पुजा करणारे. एकमेकांच्या धर्माचा आदर न करता देव धर्मावर टिका करणारे. एवढेच नाही तर एकमेकांच्या धर्मावर टिका करता करता आपला धर्म श्रेष्ठ माणण्यासाठी दुस-याच्या धर्माची कत्तल करणारे. इच्छा नसतांनाही देवीदिकांची धार्मीक कार्यक्रमासाठी वर्गणी देणे. इत्यादी गोष्टी पाहिल्या की आपण धार्मीक गुलाम वाटतो.
कोणी आर्थीक गुलाम आहेत. आर्थीक गुलाम म्हणजे......जे श्रीमंत आहेत. त्यांची कामे, सेवा विना मोबदल्याने मांडलिक असल्यासारखे करणे. बदल्यात काहीच मिळत नाही. कोणी तर अल्प मोबदल्यात जास्त कामे करुन घेतात. आर्थीक शोषण करतात.
सामाजिक गुलाम म्हणजे समाजाचे गुलाम........समाजसेवेची इच्छा नसूनही समाज काय म्हणेल म्हणुन दान देणे. कार्यक्रमात सहभागी होणे. समाज सुधारण्याची इच्छा मनात नसते.
अलिकडे राजकिय व शैक्षणिक गुलामही दिसतात. राजकिय गुलाम म्हणजे काहीही भेटत नसतांना कोणत्यातरी पार्टी वा पक्षाचे गुलामासारखी कामे करणे. विचार न पटल्यास अगला व्यक्ती विरोध करतो. असा विरोध झाल्यास बदनामी केली जाते. भ्रष्टाचार बाहेर काढला जातो. राजकारणातुन फिटवल्या जातो.
शैक्षणिक गुलाम म्हणजे एखाद्या संचालक मुख्याध्यापकाचे मांडलिक बनुन राहणे यांनाही स्वतःचे मत नसते. संचालक म्हणेल तसे त्यांना वागावे लागते. नाही वागल्यास वेगवेगळे आरोप लावुन पदावरुन हटविले जाते. नाहीतर कधी जीवही घेतला जातो.
आम्ही स्वतंत्र्य असलो तरी ख-या अर्थानं स्वतंत्र्य नाही. कशाचे तरी आम्ही गुलाम आहोच. याच गुलामीपणात स्वार्थी माणसे स्वार्थ साधत असतांना आपल्या मायबापालाही विसरतात. राजदरबारी नोकरी करणारी माणसे खोट्या वर्तनुकीत जगत असतांना मायबापाला वृद्धाश्रमात टाकत असतात. कारण येणा-या विदेशी उच्चशिक्षीत लोकांना ते चांगले दिसले पाहिजेत. त्यांना चांगलं म्हटलं पाहिजे. घरात मायबापाचं अडाणीपण दिसता कामा नये.
मी आणि माझी बायको एवढीच संस्कृती. लेकराचीही काही गरज नाही. लेकरं काय करतात ह्याचंही त्यांना भान नसतं. यातच त्यांची लेकरं कधीच म्हाता-या व्यक्तींचं टोकणं न पाहिलेली असल्याने प्रेमात पडतात. आपल्या जीवाची राखरांगोळी करतात. मायबापाचा आजोबा आजीचा वचक नसल्याने अशा पोरी गर्भार राहतात. जवळच्या दवाखान्यात गर्भ पाडले जातात. बदनामी होऊ नये म्हणुन.....कारण पैसा आहे तिथे. पण लक्ष्मी नाही.
लक्ष्मी पुजा हा संस्कार आहे. पैसा चांगल्या मार्गानं कमवा हे सांगण्यासाठी संदेश आहे. सर्वांशी गोडीनं रहा नाश्ता द्या, प्रेम वाढवा. वैरत्व नष्ट करा. असे सांगण्यासाठी दिवाळीचं प्रयोजन आहे. प्रत्येक धर्मात हे प्रेम वाढविण्यासाठी दिवाळीसारखे सण आहेत, कोणी नाताळ, तर कोणी ईद ए मिलाद साजरा करतात. पण पैसा चांगल्या मार्गानं खर्च व्हावा ह्याची आठवण करुन देण्यासाठी दिवाळी आहे.
आम्ही आमचे उत्सव साजरे करतो. पण उत्सवातुन काहीच घेत नाही. पैशाचं महत्व काय? हे आम्हाला कळत नाही. पैसा लक्ष्मी पुजा करा की नको करा. तो येणारच आहे. पण तो खर्च करतांना कोणाची मन दुःखावली जाणार नाही याचा विचार तर आम्ही करीत नाही. आमचा पैसा आमची जुनी संस्कृती विसरत चाललाय. आम्हाला जग दाखवणा-या आईबापालाही आमचा पैसा विसरायला लावतो. पैसा कमविण्याच्या हव्यासापायी आम्ही आमच्या परिवाराकडे, त्यांच्या संस्काराकडे लक्ष देत नाही. पैसा एके पैसा असे समजुन आम्ही आमचे जीवन जगत असतो.
आम्ही दिवाळी साजरी करतो. पण संस्कार, पद, प्रतिष्ठा ह्या गोष्टी, जी वस्तु वाढवते ती वस्तु म्हणजे पैसा. ह्या पैशाला आम्हाला नियंत्रीत करता यावे. मायबापाशी, आमच्या लेकराशी आमचा व्यवहार चांगला राहावा यासाठी आम्हाला दिवाळीसारख्या सणाची गरज भासते.
दिवाळी ही संस्कार फुलविण्याचे केंद्र जरी नसेल तरी पैशाला नियंत्रीत करणारं माध्यम आहे. पण त्यासाठी प्रत्येकाची विचार शक्ती कशी आहे हे त्यावर अवलंबुन आहे. बौद्ध पंथीय समजतात की दिवाळी म्हणवु नये. कारण त्याच दिवशी बळीची हत्या झाली नव्हे तर गौतम बुद्धाचा प्रिय शिष्यचीही. पण सम्राट अशोकाने याच दिवशी त्या प्रिय शिष्याचा मृत्युदिवस एक दिपोत्सव म्हणुन साजरा करण्याची प्रथा आणली एवढेच नाही तर राम आणि सीता जसे लंकेतुन अयोध्येला याच दिवशी आले असे समजुन दिवाळी साजरी केली जाते. पण याच दिवशी तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धही आत्मन्यान म्हणजे न्यानप्राप्ती झाल्यानंतर पहिल्यांदा याच दिवशी आपल्या राजधानीत परत आले होते. म्हणुन दिवाळी हिंदुसाठी जशी महत्वाची आहे. तशी याच देशात जन्म झालेल्या नव्हे तर उद्यास आलेल्या बौद्धांसाठीही दिवाळी तेवढीच महत्वाची आहे. दिवाळी ही केवळ दोनच धर्म नाही तर जगातल्या प्रत्येकासाठी महत्वाची आहे.कारण दिवाळी आली की सर्वजण घराची साफसफाई करतात. ज्याप्रमाणे घराच्या साफसफाईचा संदेश दिवाळी देते. तसेच मनही साफ करण्याचा संदेश दिवाळी देत असते. पण आम्ही स्वार्थ साधणारी माणसे हे लक्षात घेत नाही. पुर्वीच्या काळी दिवाळी साजरी करतांना राजे आपल्या राज्यातील खजिना गरजुना दान करीत असत.पण आज तसे नाही.
आम्ही ज्याप्रमाणे सण साजरा करतो. घराची साफसफाई ठेवतो. रांगोळी काढुन घर सजवतो. त्याप्रमाणे मनाचीही साफसफाई करावी. मनातही चांगले विचार सजवावे. मनातही चांगले विचार भरण्याची रांगोळी काढावी. मायबापाची अनाथाची सेवा करावी. जेणेकरुन दिवाळी ची लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल. ज्याने जन्म दिला त्या मायबापरुपी लक्ष्मी नारायणाला विसरुन दिवाळी कितीही चांगली साजरी करण्याचा प्रयत्न केला तरीही एक ना एक दिवस ही लक्ष्मी नष्ट होऊन तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही.
जो मायबापाची सेवा करतो. अनाथाची सेवा करतो रंजले गांजले. अंध अपंग यांना सुरक्षा प्रदान करतो. तोच जगात सर्वात जास्त श्रीमंत. त्याला दिवाळीही साजरी केली नाही तरी चालेल. लक्ष्मी सदैव त्याच्या सोबत असते हे लक्षात घेण्याची आज गरज असुन त्यानुसार वागण्याची शपथ प्रत्येकाने घ्यावी तेव्हाच ख-या अर्थानं दिवाळी साजरी करण्याचा आनंद प्राप्त होईल व लक्ष्मी ही आनंदात टिकेल नांदु शकेल. दिवाळीला लक्ष्मी पुजणाची गरज नसुन दीन दलित दुबळ्यांची सेवा करण्याची गरज आहे. त्यासाठीच दिवाळीचे आयोजन अनादीकालापासुन चालत राहावे यासाठी ही प्रथा पडली आहे हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट विसरता कामा नये.
अंकुश शिंगाडे लेखक नागपुर ९९२३७४७४९२