दिवाळी आनंदाचीच आहे Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
  • लोभी

          "लोभी आधुनिक माणूस" प्रस्तावनाआजचा आधुनिक माणूस एकीकडे...

  • चंद्रासारखा तो

     चंद्र आणि चंद्रासारखा तो ,जवळ नाहीत पण जवळ असल्यासारखे....च...

  • दिवाळी आनंदाचीच आहे

    दिवाळी ........आनंदाचीच आहे?           दिवाळी आनंदाचीच आहे अ...

  • कोण? - 22

         आईने आतून कुंकू आणि हळदची कुहिरी आणून सावलीचा कपाळाला ट...

  • कथानक्षत्रपेटी - 4

    ....4.....लावण्या sssssss.......रवी आणि केतकी यांचे लव मॅरेज...

श्रेणी
शेयर करा

दिवाळी आनंदाचीच आहे

दिवाळी ........आनंदाचीच आहे?

           दिवाळी आनंदाचीच आहे असं कोणी म्हटल्यास कोणी म्हणतील की तसं बोलणाऱ्याला वेड्या कुत्र्यानं चावलंय की काय? तसं पाहता दिवाळी आनंदाचीच आहे आणि हा आनंद लोकं आपल्या घराला तोरणं लावून, आपल्या घराची रंगरंगोटी करुन, वेगवेगळे लाईटं लावून, अंगणात सडा टाकून, रांगोळी काढून तसेच फटाके फोडून साजरा करीत असतात. 
          दिवाळी सण आला की लोकांची चांदीच चांदी असते. लोकं जवळपास एक महिन्यापासून आपल्या घराच्या सजावटीच्या कामात लागतात. घरात जे जे पदार्थ लागतात. त्याची खरेदी विक्री करतात. कपडेलत्ते घेतात सर्वांनाच. 
            पुर्वीही दिवाळीचा सण साजरा होत असे. त्यावेळेस आपली आई अंगणात सडा टाकत असे. त्यानंतर रांगोळी टाकत असे. त्यातच या सणाच्या दिवशी नवनवीन पदार्थ करीत असे व ते पदार्थ लक्ष्मीला खाऊ घालत असे. त्यावेळेस त्या आईचं वेडं मन विचार करीत नव्हतं की हे वेगवेगळे पदार्थ आपली लक्ष्मीमाता खात नाही. खातात फक्त आपली लाडकी मुलं. ते पदार्थ आम्ही मुलांनी खातात त्या आईच्या चेहर्‍यावर निरपेक्ष आनंद ओसंडून वाहात असे. बाबा नवनवीन कपडे विकत घेवून देत असे. ते आम्हाला नवीन वस्र जेव्हा देत तेव्हा मात्र आमच्या चेहर्‍यावर आनंद दिसत असे अन् तोच आनंद आपल्या आईबाबांच्याही चेहर्‍यावर. आपले आईबाबा आपल्या चेहर्‍यावरचा आनंद पाहून खुश होत. 
            ते आपल्याला नवनवीन पोशाख घेवून देत. नवनवीन पदार्थ खायला देत. परंतु स्वतःसाठी मात्र कधीच नवनवीन वस्र घेतांना पाहिलं नाही. पदार्थही जास्तीचे खातांना पाहिलं नाही. तेव्हा हः कळत नव्हतं की आपले आईबाबा तसे का करतात. आपल्याला नवनवीन वस्र घेवून देतात. परंतु ते स्वतः घेत नाहीत. आज कळतं की ते तसे का करीत असावेत. ते तसे करीत होते. त्याचं कारण होतं त्यावेळची महागाई. आज जी महागाई आहे. तीच महागाई त्यावेळीही होती. फरक हाच आहे की आज कमावणारी हात जास्त आहेत. त्यावेळेस फक्त बाबा कमवायचे व स्रियांनी फक्त चूल आणि मुलच सांभाळायचं असतं या गैरसमजुतीनं तिला घरातून बाहेर पडण्याला मार्ग नव्हता. 
           आज तसं नाही. आज स्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कामावर जाते. तशी महागाई आजही आहे. परंतु आज दोघंही पती पत्नी म्हणून राहणारे घटक घरातच राहात नसल्यानं व ते कमवते झाल्यानं आज महागाई फारशी वाटत नाही. त्यातच हम दो व हमारे दो, काही काही घरात एकच अपत्य असल्यानं त्या महागाईला रोखलं जातं. मात्र आजही काही काही घरात दोघंही कमावते असले तरी महागाई त्यांना छळतेच व बाबा मात्र आजच्या काळातही तो कमावता असूनही स्वतःसाठी कपडे घेत नाही. तो आपल्या लेकरासाठी व प्रसंगी आपल्या पत्नीसाठीही कपडे घेतो. कारण त्याच्याच खांद्यावर जबाबदारी असते. 
           पुर्वीचा तो काळ. त्या काळात आई लक्ष्मीपुजनाच्या दिवशी शेणाचा सडा अंगणात टाकायची. त्यानंतर पुर्ण अंगणभर रांगोळी टाकायची. गोधनही असायचं घरोघरी. आज तसं नाही. आज ना अंगणात शेणाचा सडा पडत, ना अंगणात कधीच अधीकच्या रांगोळ्या. तसं बऱ्याच घरात गोधन दिसत नाही. अन् अंगणात शेणाचा सडा तरी कसे टाकणार. कारण त्या अंगणात असलेल्या मातीची जागा शहाबादी फरशी व सिमेंट क्रॉंक्रीटनं घेतलेली असून त्यावर शेणाचा सडा टाकल्यास संपूर्ण अंगणच अस्वच्छ होतं. तसं कोण करणार? त्यातच आजच्या काळात शेण देणारे गाई बैलं देखील सापडत नाही. शेती बैलानं केली जात नाही. ती शेती टॅक्टरनं केली जाते. लोकांनी गाई बैलं परवडत नाहीत म्हणून कसायाला विकलेले आहेत.
            आज दिवाळीबद्दल सांगायचं झाल्यास दिवाळी आनंदाची आहे आणि राहणार. कालही ती आनंदाचीच होती. परंतु काही काही घरात आजही ती आनंदाची नाही. कारण त्या घरचं विश्वकोटीचं दारिद्र्य. एक वर्ग एवढा गरीब आहे की त्यांच्या घरी दिवाळी राहात नाही. कारण जिथं खायलाच पैसा पुरत नाही. तिथं दिवाळी साजरी करायला ते लोकं कुठून पैसा आणणार? त्या घरात आज तशी अवस्था का असेल असा विचार केल्यास आपल्याला नक्कीच कल्पना येईल की त्या घरात खाणारी तोंड जास्त असतील. काम करणारे हात कमी असतील. असं का झालं? त्याचं कारण काय? त्याचं कारण आहे आपलं शिक्षण नव्हे तर शिक्षणाचा अभाव. मुलं ही देवाची देण मानणारा एक वर्ग असाही आहे की ते म्हणतात मुलं देवाघरची फुलं. त्यांना जन्मास घालणं हे देवाचं काम. त्यातच कुटुंबनियोजन करणं म्हणजे देवाच्या कार्यात बाधा आणणं होय. यामुळेच अशा घरात जास्त मुलं जन्मास येत असतात. त्यातच अशा अडाणी घरात त्या घरातील स्रीनं घराबाहेर पडू नये असं ठरवलेलं असतं. त्यामुळंच फक्त त्या घरात कमावण्याचं काम एकटा बापच करीत असतो. अन् आई........आई आपली लेकरं सांभाळत असते. ना त्या लेकरांना धड कपडे भेटत ना खायला बरोबर मिळत. खस्ता गर्ता खात खात व झेलत झेलत ती मुलं कशीबशी मोठी होत असतात. पुढं तिही अल्पवयातच विवाह करतात. तेही शिक्षणाच्या अभावानं मुलांना विधात्याची देण समजत अनेक मुलांना जन्मास घालत असतात. हे पिढी दरपिढी चालत असतं. त्यातच दिवाळी येते व दरवर्षीच दिवाळी ही अशा घटकांसाठी आनंदाची नसते. 
          महत्वाचं सांगायचं म्हणजे लक्ष्मीला आपण धनाची देवी संबोधतो. तिचं पुजन केल्यास धन येतं म्हणतो. परंतु ते सत्य नाही. धन येतं ते लक्ष्मीमातेचं पुजा करुन नाही, तर त्यासाठी मेहनत करावी लागते. जो अपार मेहनत करतो. लक्ष्मीही त्याच्याच घरी वास करीत असते हे सांगायला नको. तुम्ही जर मेहनत करीत असाल आणि लक्ष्मीमातेला तुम्ही एक जरी फुल चढवलं तरी लक्ष्मी पावन होणार. मग त्यासाठी वेगवेगळे पदार्थ बनविण्याची गरज नाही. तुम्हाला मेहनत त, करावीच लागेल. परंतु त्यासाठी आणखी दोन उपाय करावे लागतील. पहिला उपाय म्हणजे तुमच्या मनात चांगले विचार ठेवावे लागतील व दुसरा उपाय म्हणजे तुम्हाला कुटुंबनियोजन करुन लेकरं जन्मास कमी घालावे लागतील हे तेवढंच खरं. हे उपाय जेव्हा कराल, तेव्हाच लक्ष्मीमाता तुमच्यावर आनंदीत होईल व तुमच्यावर धनाचा वर्षाव करेल. मग सगळेच म्हणतील आमची दिवाळी आनंदाचीच आहे. जर तुम्ही तसे करणार नसाल तर प्रत्येकाची दिवाळी ही आनंदात नसणार यात शंका नाही. 

           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०