नियती - भाग 26 Vaishali S Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 26






भाग 26



तोपर्यंत त्यांचा एवढा मोठा आवाज ऐकून बाहेरील असलेला वॉचमन कम बॉडीगार्ड.. तेथे आला ...
तर नानाजी  यांना... बाबाराव यांनी ढकलून दिले त्याच्याकडे...

नानाजी  यांनी कसेबसे स्वतःला सावरले आणि व्यवस्थित सरळ उभे झाले...

वॉचमन कम बॉडीगार्ड...
"चला ...बाहेर चला....."
म्हणत जवळपास ओढत बाहेर घेऊन जाऊ लागला.

नानाजी  या घोर अपमानाने अद्वा तद्वा बोलू लागले बाबाराव यांच्या बद्दल....

वॉचमन ने त्यांना जवळपास ओढतच गेटच्या बाहेर आणले आणि समोर ....

गेटच्या बाहेर....
कवडू चा मुलगा... मोहित  उभा होता.
त्याला नानाजी  यांनी व्यवस्थितरित्या ओळखले. आणि  पुन्हा त्याच्याकडे पाहून अद्वा तद्वा बोलू लागले ...
वॉचमनने त्यांना  ओढत रस्त्याला समोर लावले. आणि ते तसेच बडबडत निघून गेले.


आणि त्यांच्या त्या बडबडण्यावरून मोहित समजून गेला की सुंदर बद्दल काय घडले असावे आणि कोणी हे घडवून आणले असावे...???
त्याला स्वतःबद्दल थोडी काळजी वाटू लागली....???


तेवढ्यात वॉचमन आत मध्ये बोलावले आहे असे सांगितले तर तो गेटच्या आत आला.
उभा राहून इकडे तिकडे बघू लागला. कुठे शेरू तर नाही...???
पण कुठेही त्याला शेरू दिसला नाही कदाचित मागच्या दिशेने बांधून ठेवलेले असावे असा त्याने विचार करून पुढे पाऊल टाकू लागला..

पुढच्या दिशेने म्हणजे बंगल्याच्या मेन डोअर कडे जाताना
त्याची नजर वर गेली तर तेथे तर.,....
बालकनी मध्ये ........ मायरा उभी होती....
तिला अचानक तो दिसला तर...
... तर आश्चर्य वाटले... याबद्दल तिला काहीही माहिती नव्हते ...ना घरून...... ना मोहित कडून....

ती समजून गेली की तिच्या वडिलांनी त्याला बोलावले आहे... पण का ...?? हा प्रश्न तिला  पडला...
आताही बंगल्याच्या दाराच्या बाजूला झोपाळ्यावर बाबाराव बसलेले होते झोके घेत सावकाशपणे....
तर तेथे बाहेरच मोहित त्यांच्यासमोर दोन हाताचे अंतर ठेवून उभा राहिला गावातल्या प्रथेनुसार....

तेवढ्यात... राम त्याच्या दिशेने आला आणि त्याला इशाऱ्याने चालण्यास सांगितले...
मोहितला पोटात आतून धक धक तर होत होती पण
त्याने चेहऱ्यावर तसे काही दिसू दिले नाही. 
निर्विकार चेहरा ठेवून तो रामच्या सोबत मागे चालू लागला .


तो त्या विशिष्टरूम कडे जाताना पाहताच मायराही लगबगीने त्या दिशेने जाऊ लागली....

त्या रूम मध्ये आल्यानंतर.... बाबाराव  ही त्या रूममध्ये मोहीत आणि रामच्या नंतर आले....

बाबाराव हे आत मध्ये आल्यानंतर राम दार बंद करण्यास पुढे सरसावला. तर दारावर मायरा आली....
तिला बघून मग रामने दार बंद न करता बाबाराव यांना विचारले.
बाबाराव....
"हम्म....येऊ दे."


त्या खोलीत बाबाराव यांची आराम खुर्ची होती.... त्या घरची वरती ते बसले आरामशीर मान टेकून आणि पुढे मागे डोलू लागले.....

रूम मध्ये दोन मिनिटं कोणीच बोलत नव्हते... स्मशान शांतता पसरली होती....
शेवटी बाबाराव यांनीच शांतता भंग केली...


बाबाराव....
"....बैस..."

मोहितला आपण जे ऐकतोय ते बरोबर ऐकतोय ना...!! यावर विश्वास बसत नव्हता.... त्यांनी..." बैस" ..
म्हटले का आपल्याला....???


त्याच्या चेहऱ्याच्या दिसणाऱ्या भावनांवरून बाबाराव यांनी ओळखले की त्याच्या मनात कोणता संभ्रम चाललेला आहे..
बाबाराव पुन्हा त्याला..." बैस"... म्हणाले.

मग मात्र मोहित समोरच्या सोफ्यावर व्यवस्थित बसला. आता त्या खोलीमध्ये बाबाराव बसलेले होते ....तो बसलेला होता पण राम आणि मायरा दोघेही उभे होते.


बाबाराव....
"गावात कसा काय जातोय वेळ...??"


मोहित....
"मी गावात फिरण्यात  वेळ घालवत नाही. 
मी आमच्या घरातच असतो वाचन करत.... 
अभ्यास करायचा असतो. मला परीक्षा द्यायची आहे..."


तो आता लहानपणापासून शहरात शिकलेला .....सवरलेला आणि आलिशान... वैभवशाली अशा शहरात राहूनही .... वाड्यात मात्र त्याला आता.... तिथे ते वैभव पाहून थोडे विचित्र दडपण आल्यासारखे वाटत होते.


कसेबसे तो ... स्वतःला सावरत सोफ्यावर बसलेला होता. त्याच्या मनात चाललेला गोंधळ बाबाराव यांच्या लक्षात आला होता....
पण मात्र... बाबाराव  यांच्या मनात चाललेला गोंधळ काय आहे ...???...याच्याकडे मोहितचे 
काडीमात्र लक्ष नव्हते.


पण तिथेच उभी असणारी मायरा.... तिची तीक्ष्ण नजर होती दोघांवरही....
ती बारकाईने स्वतःच्या बाबांच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत होती..... तिच्या लक्षात आले की तिचे बाबा आता काहीतरी गोंधळ घालणार आहेत.....
आणि हा साधा भोळा मोहित.... 
याला काही ते लवकर लक्षात येणार नाही....

मोहित स्वतःच बावचळलेल्या मनस्थितीत असल्यामुळे त्याचे लक्ष जाणे शक्यच नव्हते आणि इकडे बाबाराव  यांच्या चेहऱ्यावरच्या रेषा बदलत होत्या....

मायराने मात्र पक्क ठरवले होते की मोहितला सुचले नाही तर आपण मात्र बोलायचेच....


मोहितला एकाएकी गोंधळल्यासारखे झाल्यामुळे आतून घाम फुटला आणि स्वतःला सांभाळण्यासाठी त्याने  सोफ्यावरील हात गच्च केले... आणि त्याने भिरभिरती नजर मायराकडे फिरवली.....


बाबाराव....
"ती येथेच आपल्या सोबत रूम मध्ये राहणार आहे... मी जे काही आज बोलणार आहे तिच्या समोरच बोलणार आहे...."

बाबारावांच्या तोंडून शांत स्वरात उद्गार निघाले. आणि स्वतःच्याच तंद्रीत असलेला  मोहित हे ऐकून दचकला.


त्याला अनामिक भीतीने आतून थरथर होत होती.....

यांना काही समजले तर नसेल ना...???
नक्कीच सर्व समजले आहे अगोदरच.... पण मला आता विचारले तर मी काय उत्तर देणार....???
हाच विचार त्याच्या डोक्यात सारखा सुरू होता.


बाबाराव आता बोलू लागले .....
" मोहीत... आता तू मोठा झाला आहेस. शिक्षणही 
झालेलं आहे. तू जर चांगला प्रयत्न केलास अजून ...शिक्षण केलंस ...परीक्षा दिलीस तर 
एक मोठा ऑफिसर होशील..... आणि तसेही या
गावात काय पडलं आहे...??? नंतर ऑफिसर झाल्यानंतर आपल्या आई-वडिलांना येथून घेऊन
शहरात जा आणि मस्त त्यांना आरामात बंगल्यात ठेव... आणि त्यांचं एवढ्या दिवसाचा त्याग जो आहे... 
त्याला फळ मिळू दे..."


रूम मधील मायरा , मोहित आणि राम तिघांनाही  विश्वास बसत नव्हता की बाबाराव असे  बोलत आहेत....

रामलाही जे ऐकत आहोत त्यावर अगदी अविश्वास वाटत होता.

मोहित तो तर गप्पच राहिला. काय बोलावे याचाच विचार करत होता... बोलण्यासाठी तो शब्दांची जुळवाजुळव करत होता पण ते जूळत नव्हते.....
भारावलेल्या अवस्थेत तो एकटक बघत होता....

बाबाराव....
"मोहीत .... मायरा माझी एकुलती एक मुलगी आहे... तुला ठाऊक आहे ना ......???"


मोहित...
"हो...."


बाबाराव....
"आमच्या घराण्याला इज्जत आहे .... पंचक्रोशीत मान मरातब आहे .... एका उच्च कुळाच्या पोरीला जाळ्यात पकडलं आहेस तू.... एक नावाजलेले गाजलेलं खानदान रसातळाला जाईल आपल्या अशा वागण्यामुळे... याची जाणीव तू स्वतः ठेवायला हवी होतीस."

मोहित त्यांच्याकडे केवळ वेड्यासारखा पहात होता...
एक तर  त्याला वडीलधाऱ्या माणसाला उलट बोलणे... त्याच्याने होत नव्हते..... ते त्याच्या स्वभावात नव्हतं.
तर मायराला राहवले नाही आणि 
ती म्हणाली...
"बाबा... तो माझ्या मागे लागलेला नव्हता..... मलाच तो आवडला सुरुवातीपासून... मीच त्याच्या मागे लागले.
तो नाही म्हणत होता तरी मी त्याला आपल्या प्रेमात पाडलं."

त्यावर बाबाराव नेत्रांमध्ये अंगार घेऊन यांनी उजवा हात दाखवून थांबण्याचा इशारा केला मायराला....
मायरा मग पुन्हा बोलत होती पण... बाबाराव यांनी जाळ भरलेल्या नजरेने तिच्याकडे बघितले...
मग मायरा मूग गिळून  चूप बसली....


बाबाराव.....
"मोहित मला माहिती आहे ...आमचं नाणं खोटं आहे...
दुसऱ्याला का दोष द्यावा ना....!!!
म्हणून मला तुझा राग येत नाही. मला माहित आहे तू तसा मुलगा नाही. आमचीच कार्टी तशी आहे. आता आम्ही तरी काय करू शकतो ना...!!! तिला गाय म्हशी सारखी गोठ्यात तर बांधून नाही ठेवू शकत...
हिचे आम्ही सेकंड इयरला असताना लग्न जमवले होते.
पण त्या माझ्या मित्राने हिच्या कृत्यामुळे लग्नाला नकार दिला... नंतर त्या नानाजी च्या मुलासोबत लग्न जोडले... तर बरं झालं की लग्न होण्याच्या अगोदर त्याची बदफैली लक्षात आली.... आणि हे लग्न रोखता आलं... आता हिच्या आईनं अंथरून पकडले आहे..."


ते एवढं सर्व मोहितला सांगत होते तर ...
मोहितला कळत नव्हते नेमकं त्यांना काय सांगायचं आहे कशासाठी ते एवढं सांगत आहेत... 

आणि हे काय ऐकतोय आपण ....??
की सेकंड इयरलाच मायराचे लग्न जोडून ठेवले होते.
हे  तर आपल्याला काही सांगितले नाही मायराने...

असा विचार करून त्याने मायराकडे नजर फिरवली...
तर बाबाराव म्हणाले....
"तिच्याकडे पाहून काय फायदा नाही..... तिलाही माहित नव्हते की .....मी तिचे लग्न जोडून ठेवले आहे."

मायरा म्हणाली.....
"पण बाबा...."

पुन्हा बाबाराव यांनी तिला हात दाखवून शांत केले तर .....मग आता ती तर शांत झाली पण ....
तिला राग येऊ लागला होता.....

बाबाराव पूढे बोलू लागले....
"फार मोठा जमीनदार म्हणून मला ओळखलं जातं. जिकडे नजर फिरवली तिकडे माझी जमीन दिसेल. निश्चित काही सांगता येत नाही किती जमीन आहे...
एवढी आमच्याकडे जमीन आहे.... आता तूच सांग अशा माणसाच्या पोरीशी लग्न करण्याची तुझी लायकी आहे काय....???"


बाबाराव यांनी असं म्हणताच मोहित त्यांच्याकडे बघू लागला थेट नजरेत... त्याला सुरुवातीला बोलायला सुचत नव्हते कारण बाबाराव यांना नेमकं काय म्हणायचं आहे...?? काय सांगायचं आहे ...??हे त्याच्या लक्षात येत नव्हतं....
तसा त्याचा स्वभाव अजिबात भित्रा नव्हता ... पण आतापर्यंत त्याने मुद्दा लक्षात घेतला नसल्यामुळे थांबलेला त्याचबरोबर वयस्कर माणसांना त्याला उलटे बोलणे येत नव्हते म्हणून तो शांत होता... पण जेव्हा त्यांनी त्याच्यावर वर्मावर ‌बोट ठेवले तेव्हा मात्र तो शांत राहू शकला नाही....

मोहित म्हणाला...
"पण मालक....."

त्याला बोलण्याच्या अगोदरच मायरा हीने पुढे येऊन म्हटले.....
"परिस्थितीचे भान त्याला अगोदरच आहे. त्यानेच मला हा आरसा अगोदर दाखवला होता पण मी असे काही मानत नाही....."


बाबाराव मोहित कडे पाहून म्हणाले..,..
"मग तू जेव्हा हिला परिस्थितीचा आरसा दाखवला तेव्हा काय म्हणाली ही मुलगी....."


तर त्यावर...........

.🌹🌹🌹🌹🌹