नियती - भाग 32 Vaishali S Kamble द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

नियती - भाग 32







भाग 32



दोन्ही हातांनी त्यांनी धवल ला बदडायला सुरुवात केली....
तसेच त्याच्या हाताला पकडून खिचत 
"निघून जा... माझ्या घरातून आत्ताच्या आत्ता..."




असे म्हणून त्यांनी ढकलत ढकलत बाहेर दाराच्या घेऊन गेल्या... घराच्या बाहेर काढून टाकले आणि दार आत मधून लॉक केले.... दाराला टेकून आतमधून उभे राहिल्या..
तेवढ्यात त्यांच्या कानावर आवाज आला आणि.... त्या दिशेने त्या बघू लागल्या तर बाबाराव हे बेडरूम मधून बाहेर शेराला घेऊन येत होते ........




ते विचारू लागले...
"लीला ....दार का बंद केले आहे... खोल.."

.....






बाबाराव यांच्या बोलण्यावर लीला यांनी काहीही उत्तर दिले नाही आणि त्या दरवाजा तसाच बंद ठेवून... किचन कडे गेल्या...





लीला यांची वागणूक थोडीशी बाबाराव यांना विचित्र वाटली.... त्यांनी फारसं मनावर न घेता दरवाजाचा लॉक खोलला.. तर त्यांना बंगल्याच्या गेट बाहेर धवलची कार जाताना दिसली.....






तसे तर त्यांना अंदाज आला होताच...
काय झाले असेल....,??.....


रात्रीच जेव्हा धवल आला तेव्हाच त्यांनी त्याच्या असलेल्या परिस्थितीवरून ओळखले होते.... अंगावरचे कपडे जरी किमती असेल तरी चोळा मोळा झालेले होते..... त्याच्या.... शर्टचं कॉलर अस्ता व्यस्त असल्यामुळे एका कडेला दिसणारा लिपस्टिकचा डागंही सर्व सांगून जात होता....
त्यात आणखी कहर म्हणजे त्याच्या पॅन्टची अर्धवट खुली असणारी झिप....





आता बाबाराव यांना थोडेसे मनातून मोकळे वाटत होते...
काहीही झालं तरी त्यांची मायरा लाडकी .... आणि एकुलती एक मुलगी होती.





सुरुवातीला जेव्हा मायरा बद्दल कळले होते... तेव्हा त्यांना तिचा खूप राग आणि तिरस्कार वाटत होता... प्रतिष्ठा.. इज्जत... यासाठी ते ....तिचा जीवही घेऊ की काय असे त्यांना वाटत होते..... पण जसा जसा काळ पुढे चालला होता तसा तसा ...एक एक प्रसंग  घडत होते.... त्या त्या परीने त्यांचा राग आणि तिरस्कार थोडा थोडा कमी होऊ लागला होता....





तसे आताही त्यांना ते मान्य नव्हतेच... 
पण परिस्थिती बघता जे जे त्यांनी मायरासाठी... प्रयत्न केले होते.. ते ते प्रयत्न असफल ठरल्यामुळे...  ते मिळालेले स्थळं.... त्यांना बरेच काही शिकवून गेले होते.... म्हणून त्यांच्या विरोधामध्ये आता तो... पूर्वी 
जरबपणा जो दिसत होता तो काहीसा मावळला होता.





धवल कडून प्रस्ताव आल्यामुळे ते थोडेसे भांबवलेले होते... तेव्हापासून रात्री थोड्याश्या जड गेल्या होत्या.
डायरेक्ट नाकारावे तर लीलावर परिणाम होत होता...
हे एकदाच बरं झालं ...
सुंठी वाचून खोकला गेला......असं त्यांना वाटलं.
खूप खुश नव्हते झाले ....तरी पण समाधानी वाटत होते.





तिकडे बंगल्याच्या वरच्या रूममध्ये... उठलेल्या मायराने सुद्धा धवलच्या कारचा आवाज .... बेडवर आळसावून लोळत असताना.. ऐकला...





जेव्हा तिला तो आवाज दूर दूर जाताना जाणवला... तेव्हा तिने टक्कन डोळे खोलून अंगावरचे पांघरून फेकून दिले आणि पटकन उभी होऊन धावत बाहेर आली आणि पाहू लागली....





खरंच त्याची कार बंगल्याच्या दूर दूर जात आहे हे दिसले तसं तिच्या अंगी असलेला शीण क्षणात दूर झाला आणि ती जागेवर आनंदाने उड्या मारू लागली...





ती बाल्कनीत उड्या मारत असताना... 
धवल ची कार डाव्या बाजूने गेलेली आणि उजव्या 
बाजूच्या रस्त्याने आलेला राम बंगल्याच्या गेटमधून आत आला.





आत आल्यानंतर त्याची नजर वरच्या बाल्कनीकडे गेली तर..... तेथे त्याला मायरा सूर्यनमस्कार करताना दिसली.





कारण एका क्षणाअगोदरच मायराला  राम दिसला होता.
तसे ती आपला आनंद रामला दिसू नये म्हणून सूर्यनमस्कार करू लागली होती... तशी ही तिची वेळ सूर्यनमस्कार करण्याचीच होती.







बंगल्यात आल्यानंतर.... सकाळी न्याहारीची वेळ असल्यामुळे बाबाराव यांच्याबरोबर रामने सुद्धा न्याहारी घेतली... हा नित्य नियमच होता.
नंतर दोघेही निवडणुकीच्या कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यासाठी ते त्यांच्या स्पेशल खोलीत गेले....





रामलाही आताच त्याचा  चमचा असलेल्या एका गडी माणसाकडून समजले होते की लीला यांनी धवलला घरून हाकलून दिले....





कोण जाणे पण त्यालाही बरे वाटले ......धवलला मायराच्या आयुष्यातून लीला यांनी बाहेर काढले म्हणून...




लीला यांना तो आपल्या भावाचा मुलगा आहे.... जवळचा आहे.... त्याला जर आपली मुलगी दिली तर जवळ असल्यासारखीच राहील.... इथे काय न तिथे काय....??
म्हणून त्यांचे मन झाले होते की  मायराला आपल्या भावाच्या घरीच सून म्हणून पाठवावे.....





पूर्वी तो यायचा तेव्हा आत्या ...आत्या..... करत मागे राहायचा लीला यांच्या... रूबाबदार दिसायचा..... जबाबदारी सांभाळायचा... त्याच्याकडे पाहून लीलांना खूप छान वाटायचं... स्वतःला मुलगा झाला नाही तरी आपल्या भावाच्या मुलालाच मुलगा मानू लागल्या होत्या.
त्यांना मुलगा झाला नाही... याची नेहमी खंत वाटायची.
पण धवल घरी आला म्हणजे तेवढे दिवस त्यांना ती कमी वाटायची नाही...
आणि तेव्हाच त्यांनी ठरवून टाकले होते की मायराचं शिक्षण झालं की तिचे लग्न धवल सोबत करायचे. पण त्यांनी ती इच्छा बोलून दाखवली नव्हती.






आता थोड्या दिवसापूर्वी त्या हाच दृष्टिकोन घेऊन आपल्या भावाकडे मायराला घेऊन गेल्या होत्या.
लीला यांनी शब्द टाकण्याच्या अगोदरच त्यांच्या 
भावानेच धवल साठी मायराला विचारले आपल्या बहिणीला .. 






तेव्हा लीला ह्यांना काय उत्तर द्यावे काही सुचले नव्हते...???
त्यांनी हो पण म्हटले नाही आणि नाही पण म्हटले नाही.






त्या उत्तरच देऊ शकल्या नाही कारण त्यांना काहीतरी वेगळे जाणवले होते.





तेथे चार-पाच दिवस राहायचे उद्देशाने गेलेल्या तरी जेव्हा त्यांना धवल बद्दल.... थोडी शंका आली आणि आजूबाजूच्या लोकांची कुजबुज ही ऐकली तेव्हा
त्यांच्याने राहावले गेले नाही आणि दोन दिवसात 
परत आलेल्या मायराला घेऊन...

.....







इकडे स्पेशल खोलीत....
बाबाराव.......
"काय स्थिती आहे...??"






राम....
"सर्व आपल्या हातात आहे..... मालक..."






बाबाराव....
"त्याचा माज उतरवायला सांग चांगल्या रीतीने... आपल्या माणसाला...."





राम....
" जास्त चिरीकचिरीक करतोय ...मालक....आवाज निघणार नाही असा करून ठेवतो त्याला...  आपली आज्ञा असेल तर...!!






बाबाराव....
" नाही राम.... मला आता त्या पद्धतीने काही करायचं नाही... घातपात करायचा नाही कोणताच... हा पण... त्याला असं समजावं... की या बाबाराव बद्दल बोलताना विचार करून बोलला पाहिजे..."






राम...
"जी..."

नंतर त्यांनी काही महत्त्वाच्या गोष्टीवर चर्चा केली.
राम बाबाराव यांनी सांगितलेल्या कामासाठी निघून गेला आणि शहरात काही महत्त्वाचे काम असल्यामुळे बाबाराव सुद्धा कार घेऊन बाहेर गेले.

.....




.


एक गडी माणूस किचनमध्ये लीला यांना सांगायला आला की....

गावातील एका साईडला राहणारा जो भाग आहे ज्यामध्ये आर्थिक सुबत्ता नीटनेटकी आहे... त्यातील चार ते पाच स्त्रिया लीला यांना भेटण्यासाठी आलेल्या....






तेव्हा लीला यांनी....
"सर्व बायकांना बैठकीमध्ये बसव... मी आले.."

तो सांगत असतानाच मायरापण तेथे आल्यामुळे तिने संभाषण ऐकले....





लीला आणि मायरा यांची नजरा नजर झाली तर लीला तिच्याशी एकही शब्द न बोलता बेडरूम कडे नीटनेटके आणि फ्रेश होण्यासाठी गेल्या. जाता जाता त्यांनी गडी माणसाला चहा आणि बिस्किटे बैठकीमध्ये पाठव अशी
सूचना केली...





मायराला आपली आई आपल्याशी एकही शब्द बोलली नाही म्हणून वाईट वाटले... नाराज मनानेच ती किचनमध्ये जाऊन एक ग्लास गटागट पाणी प्यायली...
पोटात भूक तर जाणवत होती पण लीला ह्या तिच्याशी बोलल्या नाही म्हणून तिला काही खावेसे वाटत नव्हते.







किचनमध्ये असलेल्या डायनिंग टेबलवर फरसाण ठेवलेले होते ते मुठभर घेतले आणि चेअर ओढून बसून खाऊ लागली...

दोन घास खाल्ले पण तिचं मन अस्वस्थच होतं. तसेच ते तिने प्लेटमध्ये ठेवून दिले... हात धुतला.. वॉश बेसिन मध्ये.... आणि....

आपल्या आई-बाबांच्या बेडरूम कडे गेली....






शहरातून आली म्हणजे जास्तीत जास्त आई-बाबांच्याच बेडरूम मध्ये तिचा वावर राहत होता... पण यावेळी सर्व काही .... वेगळं झालं होतं.... बेडरूमच्या दारामध्ये एन्ट्री केल्यानंतर तिला असे वाटले ...आपण कितीतरी दिवसांनी आई-बाबांच्या रूममध्ये येत आहोत.....






या घडलेल्या एका गोष्टीने आपण आपल्या आई-बाबांपासून खूप दुरावले गेले आहोत याची तिला जाणीव झाली. विचार करून तिच्या हृदयात कळ गेल्यासारखी होऊन डोळे भरून आले.
आणि ती तशीच बेडरूमच्या दाराशी भिंतीला टेकून आपल्या आईकडे पहात उभी राहिली...






लीला यांना आरशात दिसत होते की मायरा रूमच्या दाराशी उभी आहे ...डोळे भरून पहात आहे....
पण त्या तरीही तिच्याकडे न वळता जणू तिच्याकडे आपले लक्षंच नाही याप्रमाणे आरशासमोर तयार होत होत्या...






मायराच्या डोळ्यांमधून कधी अश्रू बाहेर पडून खाली गळू लागले तिलाही कळले नाही...

आपली आई आपण एवढ्या वेळेपासून उभे आहोत तरी आपल्याकडे पहातही नाही... ही गोष्ट तिला खूप मनाला खाऊ लागली.....






आणि ती वळणार तर....
तिने पहिले... तिच्या कुर्त्याचा एक कोपरा शेरू तोंडात पकडून खेचत होता......





तसे मायरा त्याच्या तोंडातला आपला कूर्ता आपल्याकडे खेचू लागली....

इकडे मायरा अश्रू गाळत... डाव्या हातात ओढणी घेऊन डोळे पुसत उजव्या हाताने कुर्ता खेचत होती.... आणि शेरू.... रूमच्या आतल्या दिशेने... शेपूट हलवत गुरगुर करत खेचत होता....





तो काही मायराचा कुर्ता सोडायला तयार नव्हता...
आता रडता रडता किंचित चिडून मायरा पूर्वीपेक्षा जोर लावून कूर्ता खेचू लागली....

तेवढ्यात मायराला लीला यांचा आवाज ऐकू आला....


🌹🌹🌹🌹🌹