अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग १९ )
गावी जायचा दिवस आलेला असतो. ठरल्याप्रमाणे प्रेम वाटेत त्यांना भेटणार असतो. त्या दिवशी लवकर ऊठुन तो तयारी करायला लागतो.
घरी ताईला सांगितलेलं असतं, मित्राच्या गावी चाललोय म्हणून, छान असे नवीन कपडे घालतो. काही कपडे बॅग मधे घेतो. सर्व तयारी करून बॅग घेऊन देवाच्या पाया पडून तो घरातुन ताईला येतो असं बोलुन निघतो.
ठरलेल्या वेळेच्या आधीच तो तिथे येऊन थांबतो जिथे मॉम नी त्याला थांबायला सांगितले होते.
इकडे अंजली आणि तिची छोटी बहीण मॉम सोबत एका कार मधुन निघालेले असतात. पुढे जे होणार होते ते, अंजलीसाठी मोठे सरप्राइज होते.
खरं तर तिला पुढे बसायचं होते. पण मॉम तिला मागेच बस म्हणुन सांगतात.
थोड्या वेळात ते लोक तिथे पोचतात जिथे प्रेम उभा असतो. मॉम ड्रायव्हर ला गाडी थोडी साइड ला घ्यायला सांगतात.
अंजलीचे बाहेर लक्ष नसते. ती तिच्या बहिणीसोबत मस्ती करत असते. तेवढ्यात प्रेम पुढचा दरवाजा खोलून ड्रायव्हर च्या बाजुच्या सीट वर बसतो.
अंजली मान वर करून त्याच्याकडे बघतच राहते....🤨 तेवढ्यात मॉम बोलतात.
मॉम : अरे... प्रेम बरं झालं तु इथेच भेटला. 😊
* अंजलीला अजुनही काही कळत नसतं, नक्की काय चाललं आहे ते, प्रेम तर त्याच्या गावी जाणार होता आज, मग हा इथे कसा...🤔 ती हा विचार करत असतानाच प्रेम तिच्या चेहऱ्यासमोर हात फिरवतो,✋🏻आणि तिला बोलतो......
प्रेम : हाय... अरे काय झालं...,?😊
अंजली : तु इथे काय करतोय...?🤔 तु तर गावी जाणार होतास ना आज....?🤨
प्रेम : अरे हो.... जाणार आहे पण उद्या रात्रीची बस आहे.😊
अंजली : मग आता इथे कसं काय...,? आता कुठे चाललाय तु बॅग घेऊन...🤔
प्रेम : अरे मुंबईत माझी एक बहिण राहते ना तिच्याकडे चाललोय, तिथुनच उद्या रात्री गावी जाणार आहे. मॉम ना कॉल केला तर बोलल्या आम्ही पण निघालोय, मग तु ये, ड्रॉप करतो तुला तिकडे....😊
अंजली : अच्छा....🤨 हे कधी ठरलं...🤔 आणि मला काहीच माहीत नाही. 😔
मॉम : अरे... सकाळीच त्याचा कॉल आलेला तेव्हा बोलणं झालं आमचं...😊
अंजली : मग मला का बोलली नाहीस हे...🤔
मॉम : तु तयारी करत होतीस ना... मग मी पण विसरले घाईत....😊
अंजली : ( थोडी रागातच ) हो...का...🤨
मॉम : बरं चला निघुया... उशीर होतोय आपल्याला...🤔
*गाडी तिथून निघते. ड्रायव्हर च्या समोरील आरशात प्रेमला अंजली दिसत असते. अधुन मधुन तो तिला पहात असतो.
पण ती प्रेमला असं अचानक पाहून ती खुश पण झालेली असते, आणि थोडा राग पण आलेला असतो. थोड्या अंतरावर गेल्यावर मॉम बोलतात....
मॉम : प्रेम... किती दिवस राहणार आहेस गावी....? 😊
प्रेम : तसं काही फिक्स नाही, गेल्यावर बघु, दहा पंधरा दिवस तरी...😊
* तो असं बोलल्यावर अंजली रागातच डोळे मोठे करत आरशात त्याला बघते.🙄
मॉम : अच्छा... एवढे दिवस सुट्टी मिळाली तुला ऑफिस मधुन...?😊
प्रेम : सुट्टी तर एक आठवड्याची आहे, पण गावी गेल्यावर लवकर यावस वाटत नाही. 😊
* पुन्हा अंजलीने त्याच्याकडे पाहिले.🙄
अंजली : अच्छा... एवढं आवडतं का तुला गाव....🤨
प्रेम : हो... मग... माझं बालपण गावीच गेलं, त्यामुळे सर्व मित्र वगैरे भेटतात, छान वाटतं, दिवस कसे जातात ते कळतच नाही. 😊
अंजली : अच्छा...🤨 मग तिकडेच का रहात नाही. 😏
प्रेम : काय करणार... मजबुरी आहे, जॉब साठी इकडे रहावं लागतं. 😊
अंजली : हो... का... 😏
* त्यांचं बोलणं ऐकून मॉम मधेच बोलतात...
मॉम : अरे... असे भांडताय काय...😊
अंजली : मी कुठे भांडतेय...विचारलं फक्त 😔
मॉम : अगं... गावची ओढ वेगळीच असते, ती त्यालाच कळते. जो तिथे खुप वर्ष राहिलेला असतो. 😊
अंजली : अच्छा... मग तु पण गावीच होतीस ना आधी...?🤨
मॉम : हो... म्हणून तर बोलतेय... तुला नाही कळणार ते... हो ना प्रेम...😊
प्रेम : हो... ना... शहरातील दमट वातावरणात वाढलेल्या मुलांना गावच्या मोकळ्या हवेची किंमत काय कळणार.....😊
अंजली : हो... हो... कळलं, टोमणे नको मारू 😏
प्रेम : अरे पण मी तुला कुठे बोलतोय...?😊
अंजली : मग... दुसरं कोणी आहे का इथे...🙄 तुम्ही दोघेही गावी राहिलेले आहात ना...😏
प्रेम : असं काही नाही... मी असच बोलत होतो. 😊
अंजली : राहु दे... कळलं ते...😏
मॉम : अरे.... तुम्ही पुन्हा चालु झालात...😊 कसे मित्र आहात रे, नुसते भांडता...🤔
प्रेम : तुम्हीच बघा मॉम आता... हिच सारखी भांडण करते. 😊
अंजली : ओय... काहीही बोलू नको, मी नाही भांडत, समजलं ना... तुच वाद घालतो उगाच...😏
प्रेम : अच्छा... 🤔 मॉम तुम्हीच सांगा आता कोण भांडण करतं....😊
मॉम : अवघड आहे बाबा... असे भांडत राहिलात तर कशी टिकेल तुमची मैत्री...😊
अंजली : मॉम... मी बोलले ना, मी नाही भांडण करत याच्याशी, हाच काहीतरी बोलतो आणि मग मला राग येतो.😔
मॉम : बरं बाई...ओके, तु गूड गर्ल आहेस, माहीत आहे मला.😊 पण आता तो विषय जाऊ दे. आपण दुसरं काहीतरी बोलूया.😊
* गाडीमध्ये गप्पा चालु असतात, त्यामधे ते लोक कधी एअरपोर्टवर पोचतात त्यांनाच कळत नाही. प्रेमला हे माहीत नसते की ते लोक फ्लाईट ने गोव्याला जाणार आहेत,
तिथे पोहोचेपर्यंत त्याच्या डोक्यात एकदाही हा विचार आला नाही. मॉम नी पण त्याला याबाबत काहीच कल्पना दिली नव्हती.*
मॉम : अरे... आलो पण आपण... प्रेम तुला उतरायचं होतं ना वाटेत. 😊
प्रेम : अरे हो... पण कळलच नाही बोलता बोलता...😊
मॉम : बरं चल आपण आधी खाली उतरू, मग आम्ही आत गेल्यावर तु जा इथुन,... चालेल ना...,?😊
प्रेम : आ...... हो...हो... चालेल. 😊
* ते सर्व गाडीतुन उतरतात सामान बाहेर काढून घेतात. मॉम अंजलीला तिच्या छोट्या बहिणीसोबत तिथेच थांबायला सांगतात. ट्रॉली घेऊन यायच्या निमित्ताने प्रेमला थोडे बाजुला घेऊन जातात पर्स मधुन त्याच्या हातात फ्लाईट चे तिकीट देत बोलतात.
मॉम : प्रेम... ऐक आता, आम्ही आधी आत जातो. तु आम्हाला बाय केल्यासारखे करून मग थोड्या वेळाने तु ये... चालेल. 😊
प्रेम : मॉम.... तुम्ही बोलतात ते सर्व ठिक आहे. पण मी माझ्या लाईफ मधे पहिल्यांदा एअपोर्टवर आलोय. आत काय करतात, कसं कुठे जायचं मला काहीही माहीत नाही. 🤔
मॉम : अरे...हो... माहित आहे मला तुझी ही पहिली वेळ आहे, पण काहीच अवघड नाही कळलं. मी सांगते सर्व...😊
* मॉम त्याला सर्व सविस्तर माहिती देतात, आतमध्ये गेल्यावर काय करायचं त्याची, आणि मग दोघे ट्रॉली घेऊन परत तिथे येतात.
अंजली : मॉम... किती वेळ... ट्रॉली आणायला. 🤔
मॉम : अरे असच... बोलत होतो ना... बरं चला जाऊ आपण...😊
* प्रेम त्यांना बॅग वगैरे ट्रॉली वर ठेऊन देतो. ते लोक आत जाण्यासाठी गेट वर जायला निघतात.
प्रेम : बरं ओके... नीट जा, हॅप्पी जर्नी...👍🏻😊
अंजली : थँकयु.... 😊 तु पण नीट जा, काळजी घे गावी. 😊
मॉम : प्रेम... चल... बाय... नीट जा तु पण. 👍🏻😊
प्रेम : हो... तुम्ही पण काळजी घ्या. 😊👍🏻
* असं बोलुन मॉम अंजली तिच्या छोट्या बहिणीसोबत आतमध्ये जातात. प्रेम तिथेच बाहेर उभा असतो. अंजली पुन्हा पुन्हा मागे वळुन त्याच्याकडे पहात असते.
प्रेम बाहेर उभा राहुन हाच विचार करत असतो, खरं तर त्याने कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की, आपण कधी विमानाने प्रवास करू.
आणि आज अचानक मॉम ने त्याला दिलेलं हे खुप मोठे सरप्राइज होते त्याच्यासाठी...
मॉम का एवढं करत आहेत माझ्यासाठी...? किती विश्वास आहे त्यांचा माझ्यावर... आणि मी काय करतोय... पुढे जाऊन त्यांना जर हे कळलं तर काय होईल...😔
खुप गोष्टी डोक्यात येत होत्या, काही क्षण असेही वाटलं की, इथुनच परत घरी निघुन जावं. पण मॉम ना काय वाटेल... त्यांना काय सांगायचं... असं अचानक परत कसं जाणार...😔
बघु पुढे जे होईल ते... असा विचार करून तो मॉम ने सांगितल्याप्रमाणे आपले ओळखपत्र आणि तिकीट दाखवुन आत मधे एंट्री करतो.
आयुष्यात पहिल्यांदा तो एअरपोर्ट वर आलेला असतो. आत मधे जाताच तिथला नजारा पाहून दंग होऊन जातो. पुढे पुढे चालताना तो इकडे तिकडे पहात राहतो.
मोठमठ्या ब्रँड चे कपड्यांचे शॉप, रेस्टॉरंट, कॉफी शॉप, तो झगमगाट... त्याचं लक्ष वेधुन घेतो.
फ्लाईट चे तिकीट हातात घेऊन तो त्या विमान कंपनीच्या काउंटर वर जातो. तिथे तिकीट दाखवतो व बोर्डिंग पास घेतो. तिथेच त्याच्या बॅग चे वजन करून त्याला टॅग लाऊन बॅग परत दिली जाते. बॅग मधे जास्त काही वजन नसल्यामुळे तो स्वतःजवळ ठेऊ शकत होता.
त्यांना विचारून तो पुढे सिक्युरिटी चेकिंग ला जातो. तिथे बॅग तसेच मोबाईल व बेल्ट उतरवून सिक्युरिटी चेक केलं जातं. बोर्डिंग पास वर सिक्युरिटी चेक चा स्टॅम्प घेऊन तो विचारत विचारत पुढे त्या गेट कडे जायला निघतो, जिथुन विमान टेक ऑफ होणार होते.
खुप वेळ चालायला लागतो. पुढे आल्यावर त्याला तो गेट नंबर दिसतो. लांबुनच पाहतो तर वेटींग एरिया मधे मॉम त्याचीच वाट पहात उभ्या असतात. अंजली आणि तिची बहीण तिथेच खाली खुर्चीवर बसलेल्या असतात. त्यामुळे अंजलीला प्रेम आलेला दिसत नव्हते.
मॉम तिथुनच हाताने इशारा करून मागेच बसायला सांगतात. मग प्रेम तिथेच मागे एका खुर्चीवर बसून राहतो.
थोड्या वेळाने चेक इन अनाउन्समेंट होते आणि गेट ओपन केले जाते. फ्लाईट ची वेळ झालेली असते. सर्वजण ऊठुन लाईन लाऊन हळू हळू त्या गेट मधुन आत जात असतात.
मॉम, अंजली आणि तिची बहीण पुढे असतात. प्रेम खुप मागे असतो. लाईन पुढे पुढे जात असते. प्रेम तिकीट काढून हातामध्ये घेतो. विमानाच्या गेट जवळ तिकीट चेक करून तो आत मधे एंट्री करतो.
विमानात आल्यावर जणु काही स्वप्नात असल्यासारखं त्याला वाटतं. अजूनही त्याला स्वतःला विश्वास बसत नव्हता की आपण विमानात आहोत.
तो जरा गोंधळुन जातो. त्याचं पुढे लक्ष जातं. मॉम त्याला हाताने इशारा करून पुढे बोलवत असतात. त्यांना पाहून तो पुढे जातो.
अंजलीचे इकडे लक्ष नसते, ती खिडकीतुन बाहेर काहीतरी पहात बसलेली असते. तेवढ्यात प्रेम तिथे पोचतो. मॉम इशाऱ्यानेच त्याला त्याची सीट दाखवतात. बरोबर त्यांच्या मागची विंडो सीट असते. बॅग वरती ठेऊन तो हळुच जाऊन त्या सीटवर बसतो.
मॉम तिथेच उभी असलेल्या एका एअर होस्टेस सोबत काहीतरी बोलुन मग अंजलीला बोलतात...
मॉम : अंजु... बाळा इकडे बघ ना, तुझ्यासाठी एक सरप्राइज आहे. 😊
अंजली : हा.... आत्ता... इथे काय सरप्राइज देणार आहेस. 🤔
मॉम : हो... इथेच... खुप छान सरप्राइज आहे , आणि मला माहित आहे, तुलाही आवडेल ते. 😊
अंजली : मॉम... काय हे... नीट सांग ना काय सरप्राइज आहे ते...😔
मॉम : अच्छा... बघायचे आहे का तुला...?😊
अंजली : मॉम.... प्लिज सांग ना आता...🤨
मॉम : बरं .... जरा ऊठुन मागच्या सीट वर बघ....😊
* अंजली उठते आणि मागे वळुन पाहते, प्रेमला असं समोर पाहून तिला धक्काच बसतो. थोडा वेळ तिला काय बोलायचं हे ही सुचत नाही.
मॉम : अंजु.... काय झालं... शॉक....😊 आवडलं का सरप्राइज....,😊
अंजली : ( प्रेमकडे पहात) तु कसा काय इथे...? 🙄
प्रेम : कसा काय म्हणजे...?😊
अंजली : अरे.....नक्की काय चाललंय तुमचं, मला काहीच कळत नाही. 🤨
प्रेम : कुठे काय चाललंय...? मी पण चाललोय गोव्याला...😊
अंजली : काय...? 🤔
प्रेम : हो.... मग काय असच येऊन बसलोय का इथे...😊
अंजली : ( दोघांकडे पहात) हे सर्व तुम्ही आधीच प्लॅन केले होते ना....😔
* प्रेम आणि मॉम तिच्याकडे पाहून हसायला लागतात. 😆😆
मॉम : अगं... हो... हेच तर सरप्राइज होते. ,😆
अंजली : मग मला आधी का नाही सागितलं. 😔
प्रेम : अच्छा... सरप्राइज सांगुन देतात का...🤔
अंजली : ओह माय गॉड....🤦😊
प्रेम : काय झालं... आवडलं नाही का...🤔 जाऊ का परत... अजुन टेक ऑफ नाही झालं. 😊
अंजली : तु आता गप्प बस रे... नाहीतर मार खाशील. 😊
प्रेम : अरे बाप रे... इथेच अशी बोलतेय, हिच्या गावी पोचल्यावर काय होईल माझं....😔😊😋
अंजली : प्रेम..... बस् ना आता, खुप बोलला. तुम्ही ना मला वेड्यात काढलं. एवढं सर्व झालंय आणि मला काहीच कसं कळलं नाही. 😔
मॉम : मास्टर प्लॅन होता... मग कसं कळेल. 😊
अंजली : खरच तुम्ही दोघेही ग्रेट आहात. 🙏🏻😊
प्रेम : म्हणजे काय... आहोतच... हो ना मॉम. 😊
मॉम : हो...तर... 😊
अंजली : हे सर्व कधी प्लॅन केलं तुम्ही...🤔
मॉम : बरं... ते सर्व नंतर बोलू, प्रेम पहिल्यांदा विमानाचा प्रवास करतोय. तु बस मागे त्याच्यासोबत गाईड म्हणुन...😊
अंजली : अच्छा... 😊 हो जाते...😊
मॉम : पण त्याला विंडो सीट दे, त्यासाठी भांडू नको. 😊
अंजली : मॉम.... 😊 नाही भांडणार ओके...😊
मॉम : बरं ओके...नीट सांग त्याला सर्व....😊
अंजली : हो...हो... तु बस आता, सीट बेल्ट लावुन घे दोघी पण....👍🏻
* असं बोलुन ती प्रेमच्या बाजुच्या सीट वर येऊन बसते. आणि त्याला त्याचा सीट बेल्ट लावायला मदत करते. स्वतःही सीट बेल्ट लावते. समोर एक एअर होस्टेस त्याचं प्रात्यक्षिक करून दाखवत असते, प्रेम तिकडे पहात असतो. अंजली हळुच त्याच्या गालावर हात ठेऊन त्याची मान स्वतःकडे वळवते, आणि बोलते.
अंजली : ओ मिस्टर... मी आहे ना ते सर्व सांगायला...😊 तुमची पर्सनल गाईड. 😊 मग तिकडे बघायची काय गरज आहे. 😏
प्रेम : अरे हो... पण ती किती छान समजावून सांगते. बघ ना ...😊
अंजली : हो...का... मग तिला बोलवू का, मदत करायला तुझी...,🤨
प्रेम : हो.... चालेल ना....😋
* अंजली जोरात त्याला चिमटा काढते, तसं प्रेम हळुच ओरडतो, ते मॉम ला ऐकु जाते. मॉम तिथुनच बोलतात.
मॉम : अरे.... काय झालं....🤔
अंजली : मॉम काही नाही, ते बेल्ट मधे बोट सापडलं त्याचं....😋
प्रेम : नाही मॉम.... ही खोटं बोलतेय, चिमटे काढतेय मला.... 😔
मॉम : झाली का तुमची भांडणं सुरू, अजुन फ्लाईट टेक ऑफ पण नाही झालय. 😊
प्रेम : बघा ना मॉम... पोहोचेपर्यंत माझं काही खरं नाही...😊
* अंजली त्याच्या तोंडावर हात ठेऊन बोलते.
अंजली : आता गप्प बसशील जरा....🤨
प्रेम : मी गप्पच आहे... तुझं काय चाललंय. 😊
अंजली : खरं तर... राग पण येतोय आणि...😊
प्रेम : आणि काय....🤔
अंजली : काही नाही....😊
प्रेम : नक्की.... काही नाही...,😊
अंजली : थँक्यू वेरी मच... या नकळत दिलेल्या गोड सरप्राइज बद्दल. 😊
प्रेम : अच्छा...,😊 मग त्यासाठी मॉम ला थँक्यू बोल, कारण हा सर्व त्यांचा प्लॅन आहे. 😊
अंजली : ते तर मी बोलणारच आहे, पण खरच मी शब्दात नाही सांगु शकत. आत्ता या क्षणी मी काय फील करतेय ते...😊
प्रेम : अच्छा... मग कसं सांगशील....🤔😋
अंजली : प्रेम.... मस्करी करू नको, खरच बोलतेय मी, असं वाटतं स्वप्नात आहे. 😊
* असं बोलुन ती त्याचा हात हातात घेत त्याला हळुच बिलगते. प्रेम हळुच तिच्या कानात बोलतो.
प्रेम : स्वप्नसुंदरी स्वप्नातून बाहेर या, समोरच्या सीट वर मॉम आहेत. 😋
अंजली : हो... माहित आहे मला...पण तिला कसं काय दिसेल. 😊
प्रेम : अच्छा... हे जरा जास्तच होत नाही का...🤔
अंजली : हो...का... मग जे तुम्ही केलं ते...😊
प्रेम : ते... तुझ्यासाठी सरप्राइज....😊 आवडलं ना...😊
अंजली : हो... खुपच आवडलं....😊
* फ्लाईट टेक ऑफ होणार होते. हळू हळू ते रन वे वर येते. विमान टेक ऑफ घेत होते, त्यावेळीच नकळत प्रेम ने अंजलीचा हात घट्ट पकडला होता. त्याच्यासाठी हा पहिलाच अनुभव होता. जसजसे विमान वरती जात होते तसे त्याला पोटात गोळा आल्यासारखे वाटू लागत होते.😊

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️