अनुबंध बंधनाचे. - भाग 20 prem द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनुबंध बंधनाचे. - भाग 20

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग २० )

प्रेम खिडकिमधून बाहेर पहात असतो. एवढ्या वर्षात तो खुप मुंबई फिरून झालेला असतो. पण त्याच मुंबईचे असे आकाशातुन दिसणारे दृश्य हे खरोखर विलोभनीय होते. 
मोठमोठ्या इमारती, अथांग पसरलेल्या समुद्राकडे तो टक लावुन पहात होता.


 काही क्षण तो हेही विसरतो की अंजली त्याच्या बाजुला बसली आहे, आणि तिचा हात त्याने अजुनही तसाच घट्ट पकडुन ठेवलेला असतो.

अंजली मात्र त्याच्याकडेच पहात असते. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तिला स्वतःला एक वेगळा आनंद देत होते. 
आता ते लोक आकाशात खुप वरती आलेले असतात. खिडकीतून बाहेर चोहीकडे फक्त आणि फक्त ढग पसरलेले दिसतात. जणु काही स्वर्गातून प्रवास करतोय असं त्याला वाटत होते. 

आयुष्यातल्या त्या पहिल्या वहिल्या अविस्मरणीय प्रवासाचा तो मनमुराद आनंद घेत होता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून अंजलीला पण खुप छान वाटत होते. 

थोड्या वेळाने तो भानावर येतो. आणि बाजुला बसलेल्या अंजलीकडे पाहतो. ती टक लावुन त्याच्याकडेच पहात असते. तो हळुच तिचा पकडेला हात सोडवत बोलतो.

प्रेम : अरे....सॉरी...😊 अशी काय बघतेय. 🤔

अंजली : काही नाही...😊

प्रेम : सॉरी...पण थोड्या वेळासाठी मी विसरलोच होतो सर्व....😊

अंजली : अच्छा.... कसा वाटला हा अनुभव...😊

प्रेम : खुपच छान... बाहेर बघ ना... किती सुंदर दृश्य आहे.😊

अंजली : मला वाटतं... बाहेरच्या पेक्षा जास्त सुंदर हे दृश्य आहे. माझ्यासाठी....😊

प्रेम : अच्छा... जास्त होतंय ना...जरा...😊

अंजली : आजिबात नाही... आणि ते काय असतं ते तुला कळणार पण नाही. 😊

* अंजली त्याचा आणि स्वतःचा सीट बेल्ट खोलते. पुढच्या सीट वरून मॉमचा आवाज येतो.

मॉम : प्रेम... आर यु ओके ना...😊

प्रेम : हो... मॉम... आय एम फाईन...👍🏻

मॉम : मग कसा वाटतोय फर्स्ट फ्लाईट जर्नी.😊

प्रेम : खुपच छान एक्सपीरीअन्स...😊

मॉम : अच्छा... गुड... एन्जॉय...👍🏻😊

प्रेम : येस मॉम....😊

*प्रेम आणि अंजली बोलत असतात. थोड्या वेळाने ब्रेकफास्ट ची ट्रॉली घेऊन एक एअर होस्टेस त्यांच्याजवळ येते. अंजली दोघांच्याही समोरच्या सीट ला असलेला ट्रे खाली घेते. आणि ते स्नॅक्स आणि पाणी बॉटल त्यावर ठेवते.

अंजली : चल खाऊन घे आता...😋

प्रेम : हे काय... फ्री असतं का...😊

अंजली : तु नको ना तो विचार करू, आधी खाऊन घे. 😊

*असं बोलुन ती दोघांचेही बॉक्स ओपन करते. आतमध्ये एक व्हेज रोल, सॉस चे पॅकेट, आणि एक छोटा केक असतो. तो रोल ओपन करून ती त्याला देते. आणि स्वतःही खायला घेते. प्रेम एक घास खातो....

प्रेम : अरे व्वा... छान आहे. आणि गरम पण आहे. इथेच बनवतात का...?😋

अंजली : अरे.... ते रेडी असतात, इथे फक्त गरम करून देतात.😊

प्रेम : अच्छा... असं आहे का...,? मला वाटलं त्या मुली आहेत त्याच बनवत असतील. 😊

अंजली : पागल... काहीही काय बोलतो. त्या फक्त सर्व्ह करतात. 😊

प्रेम : अच्छा... पण छान आहे ना त्यांचे काम... रोज विमानातून प्रवास... तोही फ्री...😊

अंजली : हो...ना... 😊 तु खा पटकन चल. 😊

* अंजली केक उचलते आणि त्याला भरवते. 

प्रेम : ओए... तुझा तु खा ना...😊

अंजली : हो... खातेय... आता जरा जास्त टेस्टी लागेल. 😋

* असं बोलुन ती तोच केक स्वतः खाते.

प्रेम : अच्छा... असं आहे का... मग माझा केक पण....😋

अंजली : अच्छा....😊

* त्याच्या बॉक्स मधला केक उचलतो आणि एक घास तिला भरवतो. आणि बाकीचा खायला लागतो.

प्रेम : वाऊ... हा तर अजुनच टेस्टी लागतोय. 😋

अंजली : गप्प बस... आणि हळू बोल...😊

* दोघेही ब्रेकफास्ट संपवतात. साधारण एक सव्वा तासाचा प्रवास त्यांच्या गप्पांमध्ये कधी संपतो ते कळत सुद्धा नाही. विमान आता गोव्यात आलेलं असतं. सीट बेल्ट लावण्यासाठी अनाउन्समेंट होते. दोघेही सीट बेल्ट लाऊन घेतात. फ्लाईट थोड्याच वेळात गोव्याच्या एअरपोर्ट वर लँड होणार होती. जसजसे विमान खाली येत होते, तसे खिडकीतून बाहेर आता गोव्याचा सुंदर नजारा पहायला मिळत असतो. प्रेम ते सर्व न्याहाळून पहात असतो. 



लँडिंग च्या आधी अनाउन्समेंट होते. प्रेम पुन्हा एकदा अंजलीचा हात पकडतो. विमान खाली उतरताना पुन्हा एक वेगळी फिलिंग येत होती. जी त्याने यात्रेमधल्या आकाश पाळण्यात अनुभवली होती. तसाच काहीसा हा अनुभव होता. 

फ्लाईट रन वे वरती लँड झाली होती. हळू हळू स्पीड कमी होत होता. पुढे जाऊन ती एका जागी टर्न घेऊन थांबते. सर्वजण आपापल्या बॅग वगैरे काढून बाहेर पडत होते. इथे मात्र विमानातून पायऱ्या उतरून खाली जायचे होते. सर्वजण खाली उतरतात. प्रेम आजूबाजूला उभ्या असलेल्या इतर विमानाकडे कुतूहलाने पहात असतो. त्याच्याकडे पाहून मॉम बोलतात.

मॉम : मग...प्रेम...कसा वाटला प्रवास...😊

प्रेम : खूपच छान वाटलं... मज्जा आली. 😊

मॉम : बरं... चला... अजुन लगेज घ्यायचं आहे. 

* तिथून ते आत येतात. पुढे एका सरकत्या बेल्ट वरून बॅग येत असतात. थोड्या वेळाने त्यांचे लगेज पण येते. ते काढून ट्रॉली वर ठेऊन ते एअरपोर्ट च्या बाहेर पडतात. 

दुपारचे १२ वाजलेले असतात. मॉम कोणाला तरी कॉल करतात. थोड्याच वेळात तिथे एक कार येते. त्यातुन एक मुलगा उतरतो. मॉम ला हाय करून बॅग वगैरे डिकी मधे ठेऊन देतो. 
मॉम प्रेम ला पुढे बसायला सांगतात. आणि गाडी तिथून निघते. वाटेत....

मॉम : प्रेम.... हा शुभंकर... माझ्या मोठ्या भावाचा मुलगा. ट्रॅव्हल्स चा बिजनेस आहे त्याचा गोव्यात. 

* प्रेम त्याच्याकडे पाहून त्याला हाय करतो. आणि तोवर अंजली बोलते...

अंजली : भाई.... आणि हा माझा बेस्ट फ्रेंड प्रेम....😊

शुभंकर : अरे व्वा... छान नाव आहे. 😊

* प्रेम हसत त्याच्याकडे पाहतो. गाडीमध्ये मॉम आणि शुभंकर यांच्यात गप्पा चालु होतात. मधेच प्रेम, अंजली पण त्यांच्यात सामील होतात. साधारण एक दिड तासात ते लोक त्यांच्या गावी पोचतात. 


एका खेडेगावातील एका घरासमोरील अंगणात गाडी थांबते. घरातुन एक बाई हातात पाण्याचा तांब्या आणि काहीतरी घेऊन गाडीजवळ येतात. त्यांच्यापाठोपाठ एक जोडपे पण येते. प्रेम अंदाज लावतो. ती अंजलीची आजी आणि मामा मामी असावेत.

सर्वजण खाली उतरतात. अंजलीच्या आजीचे डोळे भरून आलेले असतात. त्या हातातील वस्तू सर्वांच्या डोक्यावरून पायापर्यंत फिरवतात आणि बाजुला नेऊन टाकतात. 
तिची मामी तिच्या छोट्या बहिणीला उचलुन कडेवर घेते. 

आज्जी दोघींच्या गालावर हात फिरवत त्यांच्या गालाचा मुका घेतात. आणि मॉम ला पण जवळ घेऊन विचारपुस करतात.

प्रेम हे सर्व कुतूहलाने पहात असतो. मॉम त्यांच्या आईला प्रेम बद्दल सांगतात तशा त्या त्याच्याजवळ येतात आणि त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात. प्रेम लगेच खाली वाकून त्यांच्या पाया पडतो. 
' छान आहे ग लेकरू... असं म्हणत त्याला जवळ घेतात. 

निरपेक्ष भावनेने केलेलं ते प्रेम पाहून, प्रेम पण थोडा भाऊक होतो.
 गाडीतून सामान बाहेर काढून ते घेऊन सर्वजन घरात जातात. 

जुन्या पद्धतीचे मोठे असे कौलारू घर पण अगदी छान रित्या ठेवलेलं. अशा घरात ते प्रवेश करतात. 

बाहेरच्या सोप्यात एक मोठा लाकडी पाळणा बांधलेला असतो. तिथून आत गेल्यावर एक शहरी हॉल सारखे वाटावे असे दोन लाकडी सोफे. समोरच्या भिंतीला मोठा एल इ डी टीव्ही. अजुनही पुढे काही रूम होत्या. 

प्रेम आत येऊन सोफ्यावर बसतो. समोर अंजलीचा मामा आणि शुभंकर बसलेला असतो. मॉम त्यांच्या आईसोबत आत जातात. अंजली आत जाऊन एक पाण्याचा ग्लास आणुन देते.
 तेवढ्यात मॉम बाहेर येतात आणि प्रेमच्या बाजुला बसतात. त्याची ओळख अंजलीच्या मामा सोबत करून देतात. थोडा वेळ गप्पा मारतात. तोच मामी बाहेर येऊन बोलतात.

मामी : हात पाय धुवून घ्या... मी जेवायला वाढते. 😊

मॉम : प्रेम जा तू फ्रेश होऊन ये...😊

प्रेम : हो... पण कुठे जायचे...?😊

मॉम अंजलीला आवाज देतात आणि प्रेमला मागे घेऊन जायला सांगतात. अंजली त्याला घेऊन घराच्या मागच्या बाजूला येते. 
तिथे टॉयलेट आणि बाथरूम अगदी शहरातल्या सारखं बनवलं होते. 
प्रेम फ्रेश होत असतो, तोवर अंजली टॉवेल घेऊन येते. आणि त्याला देत बोलते.

अंजली : कसं वाटलं माझ्या आज्जीचे घर...😊

प्रेम : खुपच छान आहे... आणि किती शांत वाटतं इथे. 😊

अंजली : हो... ना... मला पण आवडतं इथे राहायला. 😊

प्रेम : अच्छा.... तु तर बोलत होती, मला नाही जायचं गावी.....🤨😊

अंजली : अरे... म्हणजे... ते....😊

प्रेम : काय ते.....😊

अंजली : काही नाही... 😊 तु चल लवकर आत. जेवायला वाढलंय. 😊

प्रेम : बरं चल... पण मला कपडे चेंज करायचे आहेत. जीन्स घालुन नाही जेवता येणार. 😊

अंजली : बरं चल... तिकडे, बॅग ठेवलेत त्या रूम मधे चेंज कर. 😊 

* अंजली त्याला त्या रूम मधे घेऊन जाते. 

प्रेम : तु पण थांबणार आहेस का इथेच. मी चेंज करतोय. 😊

अंजली : मग काय झालं... थांबले तर... तुला काही प्रॉब्लेम आहे का...😊

प्रेम : मला लाज वाटते... असं मुलीसमोर कपडे चेंज करायला...😋

अंजली : हो... का... बरं जाते....कर पटकन, बाहेर वाट बघतायत सर्व...😊

* ती बाहेर निघुन जाते. प्रेम चेंज करून बाहेर येतो. बाजूच्याच रूम मधे जेवायला घेत असतात. तिथे तो जातो. ताट वाढून ठेवलेले असते. त्यात भरपूर पदार्थ असतात. फ्राय केलेली मच्छी, जवला, एका वाटीत रस्सा, पापड, भात, आणि तांदळाची भाकरी.
ते सर्व पाहूनच त्याच्या तोंडाला पाणी सुटते. तो जाऊन ताटावर बसतो. बाजुला मामा आणि शुभंकर बसलेले असतात. 

मामा : बाळा लाजु नको हा... पोटभर जेव आणि काय लागेल ते मागुन घे....😊

प्रेम त्यांच्याकडे पाहून होकारार्थी मान हलवत जेवायला लागतो. मधे मधे मॉम पण येऊन त्याला तेच सांगतात. इतकं चवदार आणि टेस्टी जेवण तो खुप दिवसांनी खात असतो. अगदी न लाजता तो पोटभर जेवतो. आणि बाहेर येऊन बसतो. 

शुभंकर जेऊन गाडी घेऊन निघुन जातो. मामा आणि तो सोफ्यावर बसुन गप्पा मारत असतात. आत अंजली आणि आज्जी, मॉम, मामी, तिची छोटी बहीण फ्लोरीना जेवत असतात.

जेवण झाल्यावर मॉम आणि त्याच्या आई पण बाहेर येतात. पुन्हा सर्व गप्पा मारत बसतात. 
अंजली बाजुलाच एका टेबल वर बसुन टीव्ही बघत असते. तिचे अर्धे लक्ष प्रेमवरच असते.

दुपारचे चार वाजुन गेलेले असतात. मामा सर्वांना आराम करा थोडा वेळ असं सांगुन कुठे तरी बाहेर निघुन जातो. थोड्या वेळात मामी पण तिथे येतात आणि पुन्हा त्यांच्या गप्पा रंगतात. 
प्रेम त्यांचं बोलणं फक्त ऐकत असतो. 
रविवारी त्यांच्या जवळच्या नातेवाईकाचे लग्न असते. त्याबद्दल काहीतरी बोलत असतात. 

दुसऱ्या दिवशी शनिवार असतो. त्याच दिवशी ते सर्वांना घेऊन गोवा फिरायचा प्लॅन करतात. शुभंकर ला तसे कळवतात. आणि मोठी गाडी घेऊन उद्या सकाळी लवकर बायकोला घेऊन ये असं सांगतात. प्रेम तिथेच यांचं बोलणं ऐकत बसलेला असतो. त्याला पाहून मॉम बोलतात.

मॉम : प्रेम... अरे... कंटाळला असशील, आतमध्ये जाऊन थोडा आराम करतो का...?

प्रेम : नाही... नको... मी आहे इथेच...😊

मॉम : अरे तसं नाही... आमच्या गप्पा काही लवकर संपणार नाहीत. तु बोअर होशील. त्यापेक्षा थोडा वेळ आराम कर. 😊

प्रेम : बरं ठिक आहे...😊 

* तो आतल्या रूम मधे जाऊन तिथे बेडवर जावून बसतो. तेवढ्यात अंजली तिथे येते.

अंजली : हाय... काय करतोय....?😊

प्रेम : अरे... तु का इथे आलीय...?😊

अंजली : मग कुठे जाऊ...🤔 जहां आप, वहां हम .... 😋

प्रेम : अच्छा... डायलॉग मारून झाले. 😊 बाहेर त्यांना काय वाटेल. तु इथे का आलीय...🤔

अंजली : ओए... किती टेन्शन येतं ना तुला...😊 घाबरु नको..., मॉम बोलली आत जाऊन बोलत बस प्रेम सोबत म्हणुन आले... कळलं. 😊

प्रेम : अच्छा... मग ठिक आहे. 😊

अंजली : पाहुण्यांना एकटं कसं सोडणार ना, 😊 खातिरदारी नको का करायला. 😊

प्रेम : हो... का... 😊 पण छान वाटले. सर्वांना भेटून, खुप प्रेमळ लोकं आहेत. 😊

अंजली : तुला एक सांगू प्रेम....😊

प्रेम : काय... बोल ना...🤔

अंजली : मला अजुनही विश्वास बसत नाही की, तु इथे आहेस माझ्यासमोर...😊

प्रेम : खरच का...😊 मग विश्वास बसण्यासाठी काय करावं लागेल. 😊

अंजली : (हात पुढे करत) एक चिमटा काढ ना....😊

* प्रेम तिच्या हाताला जोरात चिमटा काढतो तशी ती ओरडते. बाहेर मॉम ना पण ऐकू जातं... त्या तिथुनच बोलतात.

मॉम : अरे... झाली का तुमची भांडणं सुरू इथे पण....😊 अंजु काय झालं...झोपू दे त्याला जरा वेळ तु बाहेर ये बघू...😊

अंजली : व्वा... हे बरं आहे... 😏 झोपा मिस्टर... . मी चालले बाहेर. 😔

* ती बाहेर जायला निघत असते तोच, प्रेम तिचा हात पकडतो. आणि जिथे चिमटा काढला होता तिथे अलगद किस करतो. अंजली लाजून त्याच्या हातातुन हात सोडवत बाहेर निघुन जाते. प्रेम थोडा वेळ तिथेच पडुन राहतो. 
संध्याकाळी चहा वगैरे घेऊन मॉम सोबत गावातील एका महादेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येतो.

रात्रीचे सर्वजण एकत्र जेवण करून खुप वेळ गप्पा मारून उशिराच सर्व झोपतात. दुसऱ्या दिवशी सकाळी गोवा फिरायचा प्लॅन असतो. 

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️