एक अनोखी भेट Monika Suryavanshi द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

एक अनोखी भेट

 नात्यात भेट होण गरजेच आहे हे मला त्या वेळी समजल.भेटुन बोलता येत सगळ ,मन मोकळ करता येत ,भावना समजतात आणि प्रेम ही वाढत.एखाद्याचा स्वभाव आपल्याला आवढत नाही पण त्याच्या सोबत वेळ घालवला तर नक्किच ती व्यक्ती ही आवढते आणि स्वभाव ही. आम्ही खूप दिवसानी भेटलो पण जायच कुठे समजत नव्हत.आणि त्याने माझी एक इच्छा पुर्ण केली.मला देवस्थानावर जायला आवढतच पण आपल्या जोडीदार सोबत जाण ही भावना खुप वेगळी आहे .तो मला पाली ला घेउन गेला.माझी खुप इच्छा होती.तिकडे पोहचलो आणि देवळात गेलो . देवा समोर जोडीने जाण सुंदर भावना आहे ही.देवाला हात जोडुन त्याला आनंदात ठेव हेच बोलत होती.दोघ पण एकमेकांना मागत होतो.हे न सागताही समज होत.देवळात‌ सोबत डोक ठेवण हे मला खुप आनंद देत होत.तस त्याने मला कायमच आनंदात ठेवलय.जे पाहिजे ते दिल.देवळातुन आम्ही बाहेर आलो आणि त्याने विचरल काय खाणार आहेस का? हि काळजी, हे विचरण आपल्या आईवडीला नंतर नशीबाने भेटतात.तीकडुन‌ आम्ही त्याच्या महाविद्यालयात गेलो ,एकादा मुलगा मुलीला तिकडे घेउन गेला कि मुलीच्या सगळ्या शंका दुर होतात कारण त्या वेळी आपल्याला समजत ती व्यक्ती फक्त आपल्यावर प्रेम करते.त्याने मला त्याच पुर्ण महाविद्यालय दाखवल ,मित्राना भेटवल . नंतर त्याने मला बस स्टॉप वर सोडल . मी बस मध्यें बसल्यावर तो गेला.

 त्या दिवशी मी खुप आनंदी होती. भेटुन आल्यावर वेगळीच चमक माझ्या चेहऱ्यावर होती .त्याचा सहवास खुप आवढतो मला घरी जाऊच वाटत नव्हत.एक नवीन आठवण आणि डोळ्यात पाणी घेउन जात होती.

 आपल्या आवढत्या व्यक्ती सोबत क्षण घालवा कारण ते कधी विसरु शकत नाही आणि आनंद खुप देतात.

भेटुन झाल्यावर घरी आलो कि दोघाच्याही मनात एक असत घरी समज नसेल ना ... घरचे काय बोलतील एवढा का वेळ लागला .... असा विचार करत असतो.पण घरी काहीही सागु भेट झाली बस ! कारण आपल्या प्रेमाला आपण खुप दिवसानी भेटलेलो असतो. आणि घरी आल्यावर आपल्या कपड्यातुन त्या व्यक्ती चा वास येतो.ती आजून आपल्या जवळ आहे असे वाटते. 

नंतर मग एकमेकांना विचरत बसलो ,कसा गेला दिवस. पण यात दुख ही वाटत कारण दिवस सपला आता नंतर कधी भेट होते काय माहित. प्रेम केलेल्या व्यक्ती ला समजत भेट किती महत्वाची आहे. 

त्याने मला विचरल जर आपल लग्न नाही झाल तर माझी आठवण येइल का? 

आता या वर काय बोलायच हा प्रश्न च बघुन डोळ्यात पाणी येत.पण मीही त्या उत्तर दिला आणि हे बघुन तो कधीच विसरणार माझ उत्तर 

आज तुझी आठवण येते

एकमेकांना भेटलो पण 

नशीबात नसल्याने वाटा 

वेगळ्या झाल्या आणि मार्ग बदला

चुकिच्या वयात बरोबर माणसावर प्रेम 

करायची शिक्षा मिळाली

आपली anniversary आठवली 

पुन्हा एकदा पण कधीच सोबत नाही celebrate झाली 

माझ्या कायम सोबत होता

एवढीच काही पावती राहिले 

मार्ग बदले पण आठवण यायची थांबली नाही तरी एकमेकाना भेटताही आल नाही

तु दिलेल्या वस्तु कडे बघुन काही हसता आल नाही

ठेवलेत अजुन सगळ जपुन ,फेकुन देता येत नाही आणि कोणाला दाखवताही येत नाही

दुसरी व्यक्ती आली तुझ्या आयुष्यात तरी माझी कमी भासले कारण माझही असच काही होणार आहे 

एवढ सगळ असुनही एक कमी इच्छा मात्र राहिली तुझ्या मिठीत मरायची 

खुप स्वप्न रगवले ते आता पुर्ण होणार नाही 

हेच ओझ घेउन आयुष्य ओझ घेउन काढणारा

हे बोलल्यावर तो सुध्दा गप्प झाला आणि डोळ्यात पाणी आल ,पण मी सागितल त्याला जे होणार नाही त्याचा विचार का करावा.होइल ना आपल पण लग्न कारण पाली ला जाउन मी खंडोबाला नवस केल्याय.