मृत्यु हा टाळता येणे अशक्य? Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

मृत्यु हा टाळता येणे अशक्य?

मृत्यू हा टाळता येणं अशक्य?

           सकाळी उत्साह होता. आपण सहलीला जाणार. मजा करणार. नवंनवं पाहायला मिळणार. आपल्या सवंगड्यासोबत गप्पा मारायला मिळणार. शिक्षकांसोबत नृत्य करायला मिळणार, भेंड्या खेळायला मिळणार, गाणी म्हणायला मिळणार. तीच ती शाळा असणार नाही. तोच तो कंटाळवाणा अभ्यास असणार नाही. निसर्ग रम्य वातावरण असेल आणि त्यात सर्वांना रमता येईल. 
         निर्वाणीलाही तेच वाटत होतं. तसाच विचार करुन तिही शाळेची सहल जाते म्हणून आईवडीलांच्या मागे लागून सहलीचं शुल्क भरलं. तिला काय माहीत होतं की आपण सहलीला जाणार व आपल्याला मृत्यू कवटाळेल. परंतु घात झाला. 
         निर्वाणी सरस्वती विद्यालयात शिकणारी दहावीची विद्यार्थीनी. तशी ती हुशारच होती. परंतु साधारण. तिचे वडील शिलानंद हे मोहगाव झिल्पीचे. गतकाळात ते माजी जिल्हा परीषद सदस्य राहिलेले. तशी त्यांची शेती मोहगाव झिल्पीला. शिवाय सहलीची बस मोहगाव झिल्पीतून जाणार असल्याचं कळताच ते तिला निरोप देण्यासाठी सहलीच्या थांबण्याचा स्थळावर आले. त्यांनी तिला पाहिलं. ती सुखरुप आणि आनंदी आहे याचा त्यांना आनंद झाला. तसा आनंद कोणत्या पित्याला होणार नाही. तसा त्यांनाही. त्यांनी तिला टाटा केला. मात्र त्यांना काय माहीत होते की तो तिला केलेला अखेरचाच टाटा ठरेल. त्यानंतर ते घरी आले. थोडे भावनाहिन झाले. त्यातच अर्धा तास गेला. गाडी झिल्पीवरुन निघाली होतीच. 
         गाडी झिल्पीवरुन निघाली. ती बोर धरणला जाण्यासाठी निघाली. परंतु बोर अभयारण्यात जाण्यापुर्वी पेंढरी घाट लागलं. जिथे उतार होता व चालकाला थोडं गतीनं वाहन चालवणं भाग होतं. कारण गती जर वाहनाला नसेल तर ती मागे जावून अपघात होवू शकतो ही भीती होती आणि गती जर असेल तर नियंत्रण सुटण्याचीही भीती होती. याचाच अर्थ असा होता की इकडे आड होती आणि तिकडे विहीर अशी अवस्था होती. मग काय चालकाने थोड्या गतीनंच वाहन चालवलं. तसं पाहिल्यास चालकानं या ठिकाणी अति दक्षतेनं वाहन चालवणं भाग होतं. परंतु कदाचीत तसं घडलंच नसेल व वेगावरील नियंत्रण सुटलं. बस नियंत्रीत झाली नाही व बस उलटून अपघात झाला. मग काय, निर्वाणीच्या डोक्याला मार लागला व ती जागीच गतप्राण झाली. 
         गाडी झिल्पीवरुन निघाली होती व अर्धाच तास झाला होता. वडील हायसे होवून घरी बसले होते. तोच फोन खटखटला. समोरुन आवाज होता.
          "हॅलो, अपघात झालाय. सहलीची बस आहे. सरस्वती विद्यालय लिहिलंय. त्यात एक मुलगी मरण पावलीय. कदाचीत ती आपलीच मुलगी आहे. परंतु विश्वास ठेवू नका आणि धीरही सोडू नका."
          समोरचा आवाज. तो आवाज ऐकताच शिलानंदच्या चेहर्‍यावर जो उत्साह होता. तो अचानक मावळला. त्या उत्साहावर विरंजण पडलं व त्याच त्याचक्षणी दुःखात रुपांतर झालं. वाटलं की कदाचीत हा फोन खरा ठरु नये. आपली मुलगी मृत ठरु नये. परंतु ते तरी काय करणार? शेवटी काळ जेव्हा येतो तेव्हा तो कोणालाच सोडत नाही. तसंच झालं. वडीलांचा त्या फोनवर विश्वास बसला नाही. परंतु जेव्हा त्यांनी प्रकरणाची शहानिशा केली. तेव्हा त्यांना त्या गोष्टीवर विश्वास ठेवावाच लागतो. तसाच विश्वास निर्वाणीच्या वडीलांनाही ठेवावा लागला. कालपर्यंत मायबापाच्या डोळ्यासमोर असणारी व बागडणारी निर्वाणी आज मायबापाच्या डोळ्यासमोर नाही. तिची आई मंजुषा घटनेच्या दिवशी धाय मोकळून रडली व बेशुद्ध झाली. भावालाही सदमा पोहोचलाच आहे. जो त्याच शाळेत सहाव्या वर्गाला शिकत आहे. 
          सहल....... सहल हा भाग शैक्षणिक दृष्टीनं अतिशय महत्वाचा भाग आहे. प्रत्यक्ष वर्गात शिकविण्यातून शिक्षकांना जे ज्ञान देता येत नाही, ते ज्ञान सहलीतून देता येतं. त्यासाठीच सहल आयोजन केलं जाते. परंतु सहलीतून प्रत्यक्ष जरी अनुभव देता येत असला तरी सहल ही एक जबाबदारीची गोष्ट आहे. याबाबतीत आणखी एक प्रसंग सांगतो. मी ज्या अध्यापक विद्यालयात शिकलो. तेथील आमच्या बॅचच्या पुर्वीची सहल ही गोव्याला गेली होती व त्या गोव्यात समुद्रात समुद्रलहरीचा आनंद घेत असतांना एक मुलगा त्या लहरीतच सामावला गेला. त्यामुळंच आमच्या महाविद्यालयात सहल बंदी होती. ती आमच्या काळात हटली. आमच्या काळात सहल आयोजित केली होती. परंतु विद्यार्थ्यांना ठासून सांगीतलं होतं की त्यांनी पाण्याजवळ अजिबात जावू नये. परंतु मुलंच ती. ती ऐकणार तेव्हा ना. मुलं त्या सहलीत एक नदी पार करीत असतांना शिक्षकांनी सांगीतलं होतं की पाण्यात जावू नये तरी ती नावेत बसली व नौकाविहार केलाच. मात्र सरस्वती विद्यालयाच्या मुलांसोबत हा जाणूनबुजूनचा प्रकार घडला नाही. अनवधानानं अपघात झाला. परंतु हा अनवधानानं अपघात झाला असं जरी वाटत असलं तरी तो अनवधानाचा अपघात नाहीच. चालकानं ही बस विद्यार्थ्यांची आहे असा विचार करुनच गाडी चालवायला हवी होती. वळण नियंत्रीत करण्याच्या स्थळावर सावधगिरीनं गाडी वळवायला हवी होती आणि एवढा धोकाच होता तर शाळेनंही त्या ठिकाणी सहल न्यायलाच हवी नव्हती. अशा जबाबदारीच्या सहली काढूच नये. 
         पुर्वी सहली जायच्या व सहलीत सरकारी बस ठरवली जायची. त्या बसमधून वाहतूक केल्यानंतर असं काही घडलंच तर नुकसानभरपाई मिळायची आणि शक्यतोवर असं घडायचं नाही. कारण सरकारी बसचे चालक हे बस चालविण्यात मातब्बर असायचे. त्यानंतर काळ बदलला तर त्यात खाजगी बसा आल्या आहेत साधारणतः सहलीत खाजगी बसचाही समावेश करण्यात आला. त्यानंतर सहल आयोजनात परवानगी लागते म्हणून खाजगी बसलाच जास्त प्राधान्य देण्यात आलं. आता दरवर्षी शाळेशाळेत सहली जातात. ज्यात आताच्या काळात खाजगी बसमधून सहलीचं आयोजन केलं जातं. त्याचं कारण असतं, दोन पैसे विद्यार्थ्यांचे वाचावेत हा उद्देश असतो. तसंच झालं. तसं पाहिल्यास खाजगी वाहनाचे चालक हे अतिआत्मविश्वासू असतात व या ठिकाणी चालकाचा अतिआत्मविश्वासच नडला नमस्कार अपघात झाला. बसचा वेगच अति असल्यानं चालकाचं वाहनावर असलेलं नियंत्रण सुटलं. ती स्थिती सरकारी बसमध्ये नसते. तिचा वेग हा बांधलेलाच असतो. 
        अलिकडील काळात रस्ते हे रुंद आहेत याची कल्पनाही सर्वांना आहे. असे असतांना वर्तमानपत्रातील बातम्यानुसार हा रस्ता अरुंद आहे, उतार आहे, वळण आहे, या भागात झाडे आहेत, त्यामुळंच वळण घ्यायला धोका आहे व इथे अपघाताच्या बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. मग असे असतांना व सगळीकडे रस्ते रुंद झालेले असतांना प्रशासनानं या भागातील रस्ते अरुंदच का ठेवले? हाही एक प्रश्न अपघाताच्या बाबींवर संशय व्यक्त करतो. तसं पाहिल्यास सदरील घटनेत प्रशासनाचं काय गेलं? गेलं त्या मायबापाचं, ज्यांची मुलगी घटनास्थळीच गतप्राण झाली. त्यांना कसं वाटत असेल, याची कल्पनाही करता येत नाही. शिवाय या घटनेत शिक्षीकेसह पन्नासपेक्षा अधिक विद्यार्थी जखमी आहेत. काहींना किरकोळ लागलं आहे तर काहींना गंभीर स्वरुपात दुखापत आहे. काहींवर आय सी यु मध्ये उपचार सुरु आहेत. 
          महत्वपुर्ण बाब ही की या घटना आहेत. या घटनेत आपण म्हणतो की अरुंद रस्ता होता म्हणून अपघात झाला. चालकानं बस बरोबर चालवली नाही, म्हणून अपघात झाला. समोर झाडं वाढलेली होती. त्यानं रस्ता दिसला नाही म्हणून अपघात झाला. अमूक गोष्टी पाळल्या नाही म्हणून अपघात झाला. तमूक गोष्टी पाळल्या नाही म्हणून अपघात झाला. हे जरी खरं असलं तरी याहीवर एक विधाता नावाची शक्ती आहे. यात एक बाजू बरोबर आहे की सहल जर नेली नसती व निर्वाणी त्यात गेली नसती व तिचा तिथे मृत्यूही झाला नसता. परंतु दुसरी बाजू पाहिल्यास असं दिसून येतं, जी गोष्ट विधाता आपल्या अंगावर येवू देत नाही. त्यादृष्टीनेच विचार केल्यास समजा निर्वाणीचा मृत्यूच ठरला होता काल. तर ती जरी सहलीला गेली नसती तरी तो झालाच असता. तो टाळता आला नसताच. त्याचं कारण म्हणजे निर्वाणीचं पृथ्वीतलावरील आयुष्य हे कदाचीत तेवढंच असेल. तिच्या आईवडीलांना सुख देणारं. कदाचीत हेच तिच्या आईवडीलानंही लक्षात घ्यावं. होणारी घटना होवून गेली. तिला टाळता आलं नाही. आता मात्र पश्चाताप होत आहे. तो होणारही आहे. वाटणार आहे की कदाचीत मी माझ्या मुलीला सहलीला पाठवलं नसतं तर असं घडलं नसतं. परंतु तसं काहीच नसतं. मरणं आणि जगणं आपल्या हातात नसतंच. तेच निर्वाणीसोबत घडलं. परंतु तसं जरी घडलं असलं तरी हे लक्षात घ्यावं की काळ जेव्हा येतो तेव्हा आपल्याला काहीच करता येत नाही. काळानं जर मृत्यू त्याच ठिकाणी लिहिला असेल तर तो त्याच ठिकाणी होईलच. आपली इच्छा नसतांना आपण तिथेच जाणार. त्यापुर्वी सहलीत असे मरण पावले असले आणि शाळेची सहल नेण्याची इच्छा जरी नसली तरी शाळा सहल आयोजित करणारच. शिवाय ज्या ठिकाणी मृत्यु ज्यांचा लिहिला असेल, त्यांना तिथंच मृत्यु येणारच. होणारी घटना ही आपण कितीही काही केले तरी टाळता येत नाही. टाळता येणं शक्य नाही. तेच निर्वाणीच्या बाबतीत घडलं. याचा अर्थ असा नाही की शाळेनं सहलीचं आयोजन करु नये. परंतु ते करीत असतांना अतिशय सावधगिरीचे रस्ते कसे आहेत, चालक कसा आहे, गाड्या कोणत्या आहेत, या सर्व बाबींचा विचार करुन आयोजन करावं म्हणजे झालं. अन् शेवटी काळच आहे. ज्या घटना घडायच्या आहेत. त्या घडणारच आहेत. कदाचीत बसमध्ये मुलाला शाळेत पाठवतांनाही घटना घडतातच. तशी सदरचीही घटना घडलेली आहे व आता त्यावर जास्त विचार करणे गरजेचे नाही. मात्र यावर आपण एक करु शकतो आणि करायला हवं. ते म्हणजे इश्वराजवळ प्रार्थना. ईश्वर निर्वाणीच्या आत्म्याला शांती प्रदान करो व तिच्या मायबापाला आणि परीवाराला तिचं दुःख शोषण्याची ताकद प्रदान करो म्हणजे झालं. जेणेकरुन त्यांना निर्वाणीचा झालेला अपघात विसरता येईल व नव्या स्वरुपातील नवं जीवन जगता येईल हे तेवढंच खरं. 

           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०