भाग 38
राम तर घरी गेलेला होता... बाबाराव एकटेच उभे राहून बंगल्याच्या खिडकीतून पाहत विचार करत होते की
का गेला असावा सुंदर त्यांच्या घरी...?? मायरा आणि मोहित ठीक असतील ना....!!!
हजार प्रश्न उमटंत होते डोक्यामध्ये....
ते आता सकाळ होण्याची वाट पाहू लागले... एकदाचा राम सकाळी घरी आला की मग त्याच्याकडे हे सोपवून माहिती करून घ्यायची.... त्यांना आता काय झाले ?? हे माहित झाल्याशिवाय चैन पडणार नव्हते.
त्यांनी एकदाचा कॉल केला रामला तेव्हाच त्यांना समाधान वाटले...
तर त्यांच्या उघडकीस नवीनच माहिती आली...
रामचेही मोहित आणि मायरा यांच्या सुरक्षिततेकडे लक्ष होते.
बाबारावांना माहिती पडले की मोहित आणि मायरा पहाटे साडेतीन-चार ट्रेन ने शहराकडे गेलेले आहे... स्वतः कवडू त्यांना सोडून आलेला आहे स्टेशनवर.
त्यांच्या मनात आता प्रश्नांनी सरबत्ती केली होती...
सुंदर हा कवडूच्या घरी काय करण्यास गेला होता...???
मूळकाट खाटीक कुठे आहे....???
कुठे आहे मुळकाट खाटीक...??
हा दोन पावलं माझ्यापुढे तर नाही चालत आहे...???
शहरात तर नाही गेला हा....???
मोहित आणि मायरा च्या मागे तर गेलेला नाही....???
बाबाराव कडावर कड पलटत होते पण त्यांच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता.
......
दोघांनीही स्टेशनवर आल्यावर जी पहिली गाडी आली त्यात बसून घेतलं.... कारण त्यांनी सध्या ठरवलेच नव्हते की आपल्याला कुठे हे दोन दिवस घालवायचे आहे.....
ट्रेनमध्ये व्यवस्थित जागा मिळाली... पहाटेची वेळ होती त्यामुळे हलकी हलकी थंड वाऱ्याची झुळूक येत होती... दोघेही आरामशीर बसले.... तशी मायराला झोप लागली.....
या दोन-तीन दिवसात त्यांची चांगलीच धावपळ.... लग्नाचा घाट घातला होता त्यात... जरी मोठे धुमधडाक्यात लग्न झाले नसले तरी सारखी दगदग झाल्याने दोघेही थकलेले होते....
मायरा त्याच्या खांद्यावर मान ठेवून झोपल्यानंतर त्यालाही आपसूकच झोप येऊ लागली... सामान त्यांचे व्यवस्थित त्यांच्याजवळ ठेवलेले होते.... तोही मग तिच्या डोक्याला डोके लावून झोपी गेला....
दिवस उजाळायला लागल्यावर .... ते बसलेले होते तिथे तरुण मुला मुलींचा घोळका आला..... आणि येऊन समोरच्या सीटवर सर्व बसले... पाच जण होते त्यात दोन मुली तीन मुलं...
जवळपास मायरा आणि मोहितच्या वया एवढेच तेही असावेत.
त्यांची बोलण्याचे हसण्या खिदळण्याचा आवाज... त्यामुळे या दोघांचीही झोपमोड झाली.... डोळे उघडले... छान वारा सुटला होता... प्रसन्न वातावरण अगदी.... मोहित डोळे चोळत इकडे तिकडे बघू लागला... त्याच्या हालचालीमुळे मायरा सुद्धा उठली.
अंगाचे आळोखे पिळोखे देत... वाकडं तिकडं करत....
आळस देत मोहित ने घड्याळात पाहिलं तर सकाळचे साडेसात वाजले होते.
ट्रेन डोंगराळ भागातून चाललेली होती... मध्येच एखादा बोगदा लागत होता... अजूनही सूर्य देवाचे आगमन झाले नव्हते...
दोघेही आता शांतपणे बसून कधी खिडकीच्या बाहेर वातावरणाकडे तर कधी समोरच्या घोळक्याकडे पाहू लागले.
थोड्या वेळातच ते पाचही जण बोलके असल्यामुळे त्यांनीच मोहित आणि मायराशी बोलणं सुरू केलं...
तसं लवकरच मग.... हेही दोघे मोकळेपणाने त्यांच्याशी बोलू लागले....
मोहितला समजलं की हे सर्व फोटोग्राफर आहेत... त्यांच्याजवळ फोटोग्राफीचे सर्व सामान अत्याधुनिक दिसत होते...
सर्वांचे आपापले काम कॅमेरे त्यांच्या हातातच होते. बाहेर चांगले दृश्य दिसले की लगेच ते तीन-चार फोटो काढून घेत होते...
आता बाहेरील वातावरण अधिक गडद होऊ लागलं.. वारा
बोचरा होऊ लागला... पावसाची चाहूल होती ती ....
मोहित ने आजूबाजूला नजर फिरवली तसे चोहोबाजूंनी काळेभोर मेघ जमा होत होते.... आणि सोबत वारा सुद्धा होता... मध्येच एखादी पांढरी शुभ्र लकीर ढगांमध्ये चमकून जायची...
विजेचा आवाज अस्पष्टचा येत होता...
तो बाहेरच बघत होता... तर त्याला दूर वरून येणारा पाऊस दिसू लागला... काही क्षणात तो आपल्यापर्यंत जणू आता पोहोचेल असे त्याला वाटू लागले...
त्याचे हे वेळ विचार मनातच चालू ... शहारून त्याने मायराला कमरेवर हात ठेवून जवळ ओढून घेतले... तीही त्याच गोष्टीची वाट बघत असावी जणू याप्रमाणे त्याच्याजवळ चिपकून बसली.
असे हे वातावरण त्या पाचही फोटोग्राफर साठी जणू महत्त्वाचा खजिना..
ते वरचेवर क्लिक करत होते... तसेच त्यातल्या मुलींनी... मायरा आणि मोहितला असे एकमेकाला चिपकून बसलेले बघून...
त्यांचे काही कॅंडिड फोटो पण काढले.
ट्रेन पुढे चाललेली... दहा मिनिटाच्या अंतरावर पुढे गेल्यानंतर
हळूहळू सूर्य देवाचे दर्शन होऊ लागले... पाऊसही थांबला. आभाळ बऱ्यापैकी मोकळं झालं होतं...
आता डोंगरपायथ्याशी असलेली... एक कोणतेतरी गाव दिसू लागलं...
जे फोटोग्राफर मुलं मुली त्यांच्या बर्थ मध्ये बसलेले...
त्यांना समजलं होतं की मायरा आणि मोहित... हे दोन दिवस निवांत फिरायला आणि देवदर्शनाला निघालेले आहेत..
तेव्हा त्यांनी आपल्या सोबत चलण्याचा आग्रह केला ...
कारण.. ते ज्या गावात जाणार होते... तेथे सुद्धा...
प्रेक्षणीय स्थळे तर होतीच पण.. ऐतिहासिक मंदिर पण तेथे होती....
तसं मायरा आणि मोहितने मग त्यांच्यासोबत जाण्याचा निश्चय केला.
......
इकडे सकाळी सर्वत्र बातमी ... पार्वती आणि कवडू यांच्या मृत्यूची वार्ता संपूर्ण गावात पसरली....
जवळपास साडे सात ते आठच्या दरम्यान... एवढे उजाडले तरी कवडूच्या घरून... काहीच हालचाल दिसून आली नाही...
म्हणून कोणीतरी शेजारचं... दाराची कडी वाजवू लागलं... तरीही कोणताच प्रतिसाद नाही.... मग आजूबाजूचे लोकं जमली.... त्यांनी सर्वांमध्ये ठरवलेलं की आता दार खोलून पाहायचं....
पण तेवढ्यात... फौजदार साहेबांनी आपल्या ताफ्यासहित त्या एरियात प्रवेश केला.... त्यांची पोलीस ट्रॅक्स तिथे थांबल्याबरोबर लोकं मागे सरले.....
फौजदारापर्यंत बातमी बाबाराव यांनी पोहोचवलेली...
तसे तर फौजदार यांनाही त्यांच्या लक्ष ठेवणाऱ्या माणसाकडून समजलेले तर ......
घरात दोन्ही मृतदेह दिसून येताच फौजदारांनी वॉकी टॉकी वर
त्यांचे साध्या वेषातल्या पोलीसांना... नानाजी यांच्या घरावर लक्ष ठेवायला सांगितलेले.... त्यांना सुंदरला घरून बाहेर न जाऊ देण्याबद्दल ताकीद दिली...
.......
इकडे सुंदर ने घरी आल्यानंतर... मूळकाट खाटीक याला फोन केला... मायरा आणि मोहित बद्दल सांगायला... तर त्याला हे समजले की मुळकट खाटीक तर अगोदरच त्यांच्या मागावर त्या ट्रेनमध्ये मागच्या डब्यात बसलेला नजर ठेवून आहे...
तसा तो कुत्सितपणे विकृत हसू लागला.....
आणि निश्चिंत होऊन झोपला... कवडूच्या घरून बाहेर
निघताना कोणीतरी आपल्यावर.. हालचालीवर नजर ठेवून आहे.. यापासून सुंदर अगदी अनभिज्ञ होता....
" आपल्याला त्यांच्या घरून निघताना कोणीही पाहिले नाही.... कोणालाच काहीही माहित नाही.... आपण काम हुशारीने केलेले आहे कोणतिही अशी निशाणी आपण सोडली नाही की आपण कशात अडकू..."असाच सुंदर विचार करीत होता..
......
फौजदार साहेबांनी कॉल करून बाबाराव यांना कवडूची आणि पार्वतीची माहिती दिली....
त्यांनाही हळहळ वाटली... कितीही पटत नसलं ........तरी माणुसकी या नात्याने त्यांना कवडू आणि पार्वती यांच्यासोबत असं व्हावं.... तर त्यांना वाईट वाटत होतं....
आता मायराचं लग्न झाल्यापासून... नाही म्हटलं तरी कवडू आणि पार्वती हे तिचे सासू-सासरे.... आणि मोहित... त्यांचा एकुलता एक.... मन त्याला जावई मानन्यासाठी तयार नव्हते.
पण आता जावई तर तो झालाच होता.... त्याच्याबद्दल विचार करून त्यांना वाईट वाटत होते... कारण आता तो पोरका झाला होता..
.....
त्या दोन फोटोग्राफर मुली एक जुली आणि दुसरी शाला........मायरा आणि त्या दोघी ......एका बेंचवर
बसलेल्या होत्या....
मोहित त्या तिघांसोबत... कुठे राहण्याची सोय मिळेल काय यासाठी विचारपूस करायला गेला होता...??? मोहित जवळ फक्त फोन होता.... तोही त्यांनी स्विच ऑफ करून ठेवलेला.... आणि मायराचा असलेला तो छोटासा फोन... तो तिथेच कुलकर्णी बंगल्यात नेहमीच्या जागेवर तिने ठेवून दिला होता स्विच ऑफ करून....
दोघी शांतपणे बसलेल्या पण मायरा कावरी बावरी होऊन इकडे तिकडे पाहत होती... मोहित जवळ नव्हता तर तिला कसंबंसं होत होतं... तरी ती त्याला "त्याच्यासोबत येतो" असं म्हणत होती....
तिच्या मनाला काहीतरी विपरीत होणार आहे असं वाटत होतं... जीवाला एक विचित्र हुरहुर लागलेली तिच्या....
शालाने मायराच्या चेहऱ्यावरील कावरेबावरेपणा नीट निरखून घेतला आणि अतिशय हळूवार आवाजात म्हणाली...
"निवांत वाटत आहे ना इथे...,!! छान मस्त....."
तेवढ्यात जुली म्हणाली....
"ए... अगं... चला ना आपण काहीतरी खाऊ...!! हे चौघेही किती वेळ झाला येत नाही आहेत.... पोटात खूपच गुडगुडी होते आहे भुकेने...."
तेवढ्यात... ते चौघे गेलेल्या पैकी एक फोटोग्राफर परत आला... आणि म्हणाला...
"जुली...... तुम्हाला काही चहापाणी नाश्ता घ्यायचा असेल तर ते बघा तिकडे स्टॉल आहेत... तुम्ही नाश्ता करून या ......मी सामान सांभाळतो...."
त्याबरोबरच जुली उठली आणि... तिच्याबरोबर या दोघी पण उठल्या... प्रवाशांची गर्दी होती सर्वीकडे....
शाला म्हणाली...."जॅक... तुझ्यासाठी काय आणू का??"
त्याचे नाव घेतल्यावर मायराने एक नजर त्याच्याकडे बघितले...
त्याच्या अंगात टी-शर्ट आणि त्याने ब्ल्यू कलरची स्कीन टाईट जीन्स घातलेली होती.... केसांचा कपाळावर झूपका होता.
जॅक म्हणाला..."नको... तिघेही आले म्हणजे मी त्यांच्यासोबतच जाईन नाश्ता करायला..."
त्याने समजल्यानंतर त्याला पुढे निघाली ..शालाच्या मागे कळसुत्री बाहुली प्रमाणे मायरा चालू लागली...
तेवढ्यात जुलीने जॅकला लोचट नजरेने मायराकडे पाहताना पकडले .... तसं त्यांनी डाव्या हाताने केसांचा झोका कपाळावरून मागे सरकवत जुली कडे बघून एक डोळा बारीक केला आणि पुन्हा... मायरा समोर जात होती... तर तिची आकर्षक मागून दिसणारी फिगर तो ताडू लागला...
मायराची पाठ त्या दिशेने असल्यामुळे ती जॅक आणि जुली ची नेत्र पल्लवी पाहू शकली नाही....
दोघींच्याही मागे जुली फास्ट निघाली.... त्यांच्याजवळ जात जुली मायराला म्हणाली....
🌹🌹🌹🌹🌹