Featured Books
श्रेणी
शेयर करा

क्रीपि फाईलज - खरी दृष्य भीतीची ... - सीजन 1 - भाग 22

सत्यकथेचे नाव-  महाशिवरात्री स्पेशल  महादेवाचा महिमा..

   तर मित्रांनो सदर सत्यअनुभव  घडला तो काळ आहे   सन   2000 ते 2001  

     माझ्या मामांचे नाव मंदार जाधव आहे, त्यांचे 
मित्र  समिर  कामत ह्यांच्या परिवारांसमवेत ही सत्यघटना घडली आहे. 

       तर या पाहुयात काय घडलं होत समिररावांच्या परिवारा समवेत! .. 

    समिर चिंतामण कामत वय वर्ष चौथीस , ते पेशाने टैक्सी चालक होते.  त्यांच्या परिवारात त्यांच्या धर्मपत्नी माधुरी समिर कामत वय वर्ष एकतीस , आणी एक अकरा वर्षाचा मुलगा अमर असा तिकडी परिवार  होता.   
त्यांचे आई- वडिल वारुन सहा वर्ष झाली होती.

       समिररावांचा अकरा वर्षाचा मुलगा अमरला आज  रविवार  असल्याने शाळेतून सुट्टी होती. 

        सुट्टी असल्याने  आज अमरच्या सर्व मित्रांच
क्रिकेट खेळण्याच प्रोग्राम ठरला होता.. 

        क्रिकेटच मैदान म्हंणायला  गावापासून  जरा दूर दहा- वीस मिनिटांच्या अंतरावर होत.   

        क्रिकेटच मैदान गोल असून, मैदानाच्या अवतीभवती रानासारखा भाग होता , डोंगर होते , आणी डोंगरांवर उन्हाच्या तपकिरी ऊष्णप्रकाशाने 
सुकून गेलेली  तपकीरी पानांची झाडे दिसत होती.. 

        जिकडे नजर जाईल.- तिकडे फक्त आणी फक्त          
झाडेच झाडे नजरेस पडत होती. 

        आकाशात उगवलेल्या सुर्याच्या प्रकाशात सर्व
मुल क्रिकेट खेळत होती..

      आताला पाच वाजले होते , उन्हाचा पारा कमी झाला होता, पण  प्रकाश मात्र भरपूर होता.. 

     सर्व मुले अंडरआर्म पद्धतीच क्रिकेट खेळत होते.. 
    मैदानावर अमरची बैटिंग सुरु होती, अमरच्याच वयाचा त्याचाच एक मित्र बॉलिंग करत होता.. 

        अमरच्या मित्राने अमरच्या दिशेने बॉल 
फेकला आणि अमरने तो  आपल्या  चाणाक्ष नजरेने चोखपणे हेरुन शरीरात असलेल्या सर्व शक्तिला एकवटून बैटमार्फफ वेगाने दूर टोलावला 

   गोल राखाडी रंगाचा  टेन एक्स नावाचा तो चेंडू हवेतून वेगाने अंतर कापत,  दूर दूर जात थेट डाव्या बाजुला असलेल्या गर्द झाडीतल्या झाडांच्या गर्दीतच कोठेतरी  खाली जमिनीवर पडला.. 
        
   सर्व मुलांनी   बॉल  ज्या दिशेला गेल होत , ती दिशा पाहिली होती  !  

     अमरच्या एक दोन मित्रांनी अमरला दोन-तीन शिव्या दिल्या आणि एकसाथ सर्वजन बोल शोधायला निघाले.. 

        अमर सुद्धा आपल्या मित्रांसोबत बॉल शोधायला निघाला.. 

        सर्वमुल झाडांच्या गर्दीत घुसले होते ,
अवतीभवती तीच ती उन्हामुळे करपून गेलेली- तपकीरी पानांची झाडे उभी दिसत होती..  

        तर कोठेकोठे काही झाडांना पान सुद्धा.. नव्हती, आणी अशी बिन पानांची झाड काळ्याशार खोडांसहित , अंगावर वाकड्या तिकड्या , चेटकीणीच्या भयाण हाताच्या धारधार नखांच रुप घेऊन जागेवर उभी होती.. 

        मुलांच्या पायाखाली जमिनीवर दगड गोटे,झाडांच्या फांदीवरची सुकून  खाली पडलेली पाने त्या पानांचा खच साचला होता , त्याच पानांवर मुलांची पावले पड़ताच पानांच खच खच असा विचीत्र आवाज व्हायचा,  होत होता .! 

        सर्वमुले राखाडी रंगाचा तो टेनएक्स चेंडू शोधत होते , अवती भवती असलेल्या झुडपांवर बैट, काठी हातात जे काहीअसेल त्याने झुडप बाजुला सारुन बॉलचा शोध घेत होते..  
     पन बॉल काही मिळत नव्हता..!  आणी ज्याचा बॉल आहे तो अमरला धमकावत होता , की बॉल मिळाला नाही तर पैसे तुझ्याकडूनच घेईन..! 
        
बॉल शोधता शोधता  पावणे सहा व्हायला आले होते, 
आकाशातला सुर्य आता मावळतीकडे झुकत होता ..       

        डोंगर दरीतून खाली खाली जाणारा सुर्यनारायण 
एक शेवटचा कटाक्ष ह्या भुतळावर टाकत होता..

     शेवटी एका दूरच्या डोंगराच्या पाठीमागे सुर्यास्त झाला ,  

        हळू हळू वातावरणात अंधारुन यायला लागल,       
जऊळ पडल्यासारख अंधार पसरु लागला.. 

        त्या गढुळ वातावरणात ती रानातली          
स्तबध उभी  झाडे जणु त्या मुलांना रोखून पाहत होती- 

        जणु त्यांच्या हदीत आलेले हे मानवी अंश, त्या अंशांची उपस्थिती त्यांना खटकत होती. 

       रानात  उभा प्रत्येक झाड आपल्या गर्भात एक गुढ घेऊन उभा असल्याचा भास होत - होता..  

        अमर आपल्या मित्रांसारखाच बॉलचा शोध घेत होता ,  

        आपल्या मित्रांपासून जरा दुर येऊन एकटाच तो बॉलचा शोध घेत होता.. 
       त्याच्या हातात तीच बैट पकडलेली होती..
       
      वातावरणात अंधारुन आल होत, अवतीभवती उभी निर्जीव झाडे जणू जिवंत झाल्यासारखी भासत होती. 

        अकरा वर्षाचा अमर आपल्या टपो-या डोळ्यांनी
आजूबाजूला पाहत बॉलचा शोध घेत होता.. 

        तोच जरा दुर त्याला एका झाडाखाली बॉलसारखच सफेद सफेद काहीतरी दिसल ..

        लहानग्या अमरच्या बाळमनाने  त्या वस्तूला खेलण्यातल बॉलच समजल होत. 

        पन ती वस्तु  , बॉल नव्हती !  
       ते काहीतरी वेगळंच होत .       
या पाहूयात काय होत ते !

     समोर  एक दहा फुट उंचीच काटकुळ झाड होत ,  त्या झाडावर नक्कीच विज कोसळली होती..

        कारण ते  पुर्णत झाड़ काळकुट्ट होत, झाडाच्या वाकड्या  तिक्ड्या काटकुळ्या फांद्या  चेटकीणी सारख्या स्टेच्यु होऊन  समोरच्याला घाबरवत आहेत अस वाटत होत..

        आणी त्याच खोडाच्या   सुकलेल्या झाडाखाली 
एका केळीच्या हिरव्या पानावर  तो उतारा मांडला होता .. 
      होय उताराच !  
       त्या केळीच्या पानावर  एक मोठ्या लाडू एवढ्या तांदळाचा गोळा होता -  

        बाजुलाच एक  लालमातीच्या वाळूपासून बनवलेली 10 इंचलांबीची बाहुली होती.. 

        गोळसर डोक  होत, हात पाय मईत चित्तेवर झोपवतात तसे शरीरास समांतर होते.

      बाहुलीच्या डोळ्यांच्या जागी दोन काळे मणी अडकवले होते, तोंडाच्या जागी एक काळसर रेघ ओढली होती - आणी त्याच कालसर रेघेने टोकदार पिशाच्छी दातांचा टोकदार जबडा रेखाटला होता.. 

        त्या बाहुलीच्या छातीवर मधोमध , एक टाचणी 
टोचली होती, तश्याच टाचण्या दोन्ही पायांवर , दोन्ही हातांवर - आणी एल कपाळाच्या मधोमध टोचलो होती  

        बाहुलीच्या बाजुलाच कालेशार बिब्यांची माळ होती-    एक पिवळ्या रंगाचा हळद कुंकू वाहिलेला लिंबू सुद्धा तिथे होता..  

        आणी एक शेवटची घटका मोजत असलेली 
उदबत्ती बाजुलाच जळतांना  दिसत होती..
   त्या उदबत्तीतून सर्पासारखा नागमोडी पांढरट धुर बाहेर निघत होता..   

        अमरच्या बाळमनाला हे काय आहे हे ठावूक नव्हत , त्या बिचा-या मुलाने आपल्या हातातली बैट जमिनीवर ठेवली- दोन्ही हात वाढवून  डाव्या हातात तो तांदळाचा गोळा  पकडला, आणी उजव्या हातात ती लालमातीच्या वाळूपासून बनवलेली आनिष्ट, काळ्या जादूई शक्तिच्या विधीसाठी वापरली जाणारी बाहुली पकडली..   

        अकरा वर्षाचा अमर उत्सुकतेन भरलेल्या
नजरेने त्या अभद्र वस्तूना हातात घेऊन नेहाळत होता.. 

        पन असमंजस  अमरला ह्याची कल्पना नव्हती.      
  की  आपण हातात पकडल आहे ते काय आहे?       
  त्याच्या बुद्धीला अद्याप ह्या वस्तूंची खरी ओळख  नव्हती... जाण नव्हती.    

        अमर एकटक त्या बाहुलीला आणी त्या गोळ्याला नेहाळतच होता.. 

        की तेवढ्यात मागून  अचानक एक ओळखीचा आवाज आला.

        " ए अमर ..!"  आवाज येताच  अमरने घाबरुन मागे वळून पाहिल..  
  
मागे अमरचा त्याच्याच वयाचा मित्र उभा होता , 
       
   अमरने त्याचे दोन्ही हात मागे लपवले होते..
  ज्याने त्याच्या मित्राला अमरच्या हातात काय  आहे हे दिसण शक्य नव्हत.. 

        "  अमर अरे एकटाच  ईथे काय करतोयस " 
अमरच्या मित्राने विचारल.
         त्यावर अमरने मी बॉल शोधत आहे अस म्हंटल. 

        " अरे बॉल भेटल पन, सगळी मुल घरी जायला निघालीयेत आणी मी तुला नेहायला आलोय चल !"     
अमरचा मित्र म्हंटला. 

        अमरने फक्त होकारार्थी मान हळवली..
   व चल अस म्हंटला.

        तेवढ्यात न जाणे कस पन, अमोलच्या      
उजव्या हातात असलेल्या त्या बाहुलीची एक टाचणी 
त्याच्या पंज्यात घुसली- 

     टाचणीच्या टोकदर सुईने , चामडी फाटली जात हातातल लालसर रक्त त्या लालमातीच्या आनिष्ठ , काळ्या जादूई शक्तिच्या विधीसाठी वापरल्या जाणा-या बाहुलीला लागल... 
      लालमातीच्या त्या बाहुलीला ते रक्त चिटकल गेल... 

        ती लालरंगाची बाहुली सोनेरी रंगाच्या प्रकाश किरनांणी दोन सेकंदासाठी ऊजळून निघाली- आणी पुन्हा पहिल्यासारखी झाली ... 

        अमरने ती बाहुली आणी तो भाताचा गोळा , पुन्हा त्याच झाडाखाली फ़ेकला..! 

       आणी आपल्या मित्रासोबत घरी निघुन गेला.
   
        परंतू लहानग्या अमरच्या हातून  अनाहूत , नकळत पणे  घडलेल्या ह्या क्रियेचा नक्की पुढे जाऊन , त्यालाच नाही तर त्याच्या परिवरालाही काय भोग भोगाव लागणार होत , ह्याची कोणाला शुन्यमात्र कल्पना नव्हती..! 

     सुर्य मावळतीला निघुन गेला होता - संध्याकाळ झाली होती.. ! 

      लहानगा अमर आपल्या घरी आला , त्याच घर म्हंणायला प्रथम एक मोठा हॉल, हॉल मध्ये प्रवेश करतानाच्या दरवाज्या पुढेच दहा पावलांवर अजुन एक दरवाजा होता , तिथे एक खोली होती, दरवाज्यापासून उजव्या बाजुला  भिंतीवर चौकोनी आकाराचा विटांपासून बनवलेला देव्हारा होता..
त्या देव्हा - यात एक लालरंगाचा कपडा अंथरलेला आणी त्यावर  विठ्ठल- रुख्मिणी मातेची,  श्रीपती बाबा महाराज महालुंगे, आणी महादेवांची कैलासा वर  पार्वतीमातेसमवेत बसलेली  तसबिर होती, आणी त्या दोघांमधोमध श्रीगणेश बसले होते. 

        देव्हा-यासमोर माधुरीबाई हात जोडून उभ्या होत्या,   

        माधुरीबाई सात महिन्याच्या गर्भवती होत्या,
पोटाच भाग वर आल होत.

             सर्व देवांच्या तसबीरीसमोर सोनेरी रंगाचा दिवा तेवत होता.   दिव्याची पिवळसर वात वाकडीतिकडी झुलत  जळत होती... 

        तिचा प्रकाश देवांच्या चेह-यावर पसरलेला,  
पन त्या पिवळसर उजेडात देवांच्या तसबीरी हळक्याश्या  कालसर  दिसत होत्या, जणू देव नाराज झाले असावे, किंवा हा कसलातरी संकेत असावा.

        माधवीबाईंच्या मनाला ते दृष्य विचलीत करत होत..! मनात काळजीपूर्वक, भीतिदायक अश्या भावनांचा उदय होत होता.. 

        काहीतरी भयंकर घडण्याच्या मार्गावर असल्याची मनाला जाणिव होत होती.. 

        माधुरीबाईंनी देव्हा- यावर एक अगरबतीचा पुडा ठेवला होता , तो हातात  घेतला , त्यातून दोन काळ्या रंगाच्या सडपातळ अगरबत्त्या बाहेर काढल्या..   

        दिव्याच्या वातीवर त्या पेटवल्या, मग हाताच्या हवेने विझवल्या..! 

        त्या देवांसमोर गोल गोल फिरवल्या..- 
आणी तेवढ्यात  माधुरीबाईंच्या कानांवर ती हाक आली..

        " आईsss..!" माधुरी बाईंनी आवाजाच्या दिशेने पाहिल- समोर अमर उभा होता. 

        माधुरीबाईंच सर्व लक्ष त्याच्याकडे होत , आणी पेटलेल्या अगरबत्तींचा हात देवांसमोर फिरत होता , तोच  नकळत  अगरबत्तींच्या धक्क्याने  देवांसमोर पेटलेला दिवा सांडला.. 

    दिव्यात जळणारी वात झपकन विझली..     पिवळसर तेल देव्हा-यात पसरल. 

      माधुरीबाईंच्या चेह-यावर  मोठ अपशकून झाल्यासारखे भाव पसरले होते.. 

        त्यांनी लागलीच देवघर स्वच्छ केल, खालचा लाल रंगाचा कापड बदल्ला, दुसरा ठेवला आणी पुन्हा देवघरात देवांच्या तसबिरी मांडळ्या..  

    एन   दिवेलागणीच्या समई  आपल्या हातून हे काय अनर्थ  घडले  , माधुरी बाईंनी पुर्णत मनाने देवांची माफी मागितली.

        " हे विठू- रुख्मीणी आई, श्रीपती बाबा, महादेवा माझ्याकडून चुकून , नकळत हे झाल आहे, मला माफ करा आणी माझ्या घरावर कोणतही संकट येणार असेल तर त्या संकटापासून आमच रक्षण करा!" 

माधुरीबाईं देवांसमोर हात जोडून म्हंटल्या. 

     व त्यांनी वळून दरवाज्यात पाहिल, जिथे अमर उभा होता.  पन आता तिथे कोणीही नव्हता. 

क्रमशः सत्यकथेचे नाव-  महाशिवरात्री स्पेशल  महादेवाचा महिमा..

       समिररावांचा अकर