अनुबंध बंधनाचे. - भाग 25 prem द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनुबंध बंधनाचे. - भाग 25

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग २५ )

आज प्रेमचा वाढदिवस होता. आजपर्यंत मित्रांसोबत खुप वेळा पार्ट्या करून वाढदिवस साजरा करत होता. पण गेल्या दोन तीन वर्षापासून त्याचा वाढदिवस अगदी स्पेशल सेलिब्रेट होत होता. कारण आता त्याच्या आयुष्यात अंजली होती.

यावेळी तिने काहीतरी वेगळं ठरवलं होतं. त्यासाठी आधीपासूनच तिने सर्व प्लॅनिंग करून ठेवले होते. आणि प्रेमला त्या दिवशी सुट्टी घ्यायला सांगितली होती. यावेळी मॉम ना सुध्दा खरं तेच बोलुन म्हणजे, "प्रेमचा वाढदिवस आहे, आणि मी त्याच्यासोबत गेट वे ला जाणार आहे, आणि येताना शॉपिंग पण करून येईन" असं बोलून त्यांच्याकडून परमिशन पण घेतली होती. मॉम नी तिला काही पैसे पण दिले होते, त्याच्यासाठी छान काहीतरी गिफ्ट घे...म्हणून. 

प्रेम आज लवकरच उठला होता. अंघोळ वगैरे आवरून निघायची तयारी चालु होती. आज साठी त्याने छान व्हाइट शर्ट आणि ब्ल्यू जीन्स घेतली होती. ते कपडे घालुन तो तयार झाला. हलकासा परफ्यूम मारून, केस वगैरे नीट करत आरशात स्वतःला पुन्हा पुन्हा पहात होता. कारण ही तसे होते, खुप दिवसांनी आज अंजलीसोबत पुर्ण दिवस घालवायला मिळणार होता. त्या खुशीने त्याचा चेहरा पण फ्रेश दिसत होता. 🥰

 ताईला आधीच सांगितलेलं होतं मित्रांसोबत बाहेर जाणार आहे, म्हणून ताईने तेव्हाच औक्षण करून घेतलं. तिला येतो म्हणुन तो त्यांनी ठरवलेल्या ठिकाणी पोचला.

अंजली आधीच तिथे येऊन त्याची वाट पहात उभी होती. आज तिने छान व्हाइट पर्पल कलरचा ड्रेस घातलेला असतो. हलकासा मेकअप, ड्रेसला मॅच होणारी ज्वेलरी, हातात छान असं ब्रेसलेट वगैरे घालुन ती आली होती. आज नेहमीपेक्षा ती खूपच सुंदर दिसत होती. 

एवढे दिवस प्रेमच्या सहवासात राहून, त्याला काय आवडतं, काय नाही आवडत, हे सर्व तिने जाणुन घेतलं होतं. प्रेमला जास्त मॉडर्न कपडे आवडत नाहीत, जास्त मेकअप केलेला आवडत नाही. त्यामुळे जेव्हा जेव्हा त्याला भेटायची तेव्हा या गोष्टी नेहमी तिच्या डोक्यात असायच्या. आणि आज तर स्पेशल दिवस होता. म्हणुन खास त्याला आवडेल अशी तयारी करून ती आली होती.   

प्रेम समोरून तिला पहात तिच्याकडे येत होता... तिला पाहून तो पण तिच्यात हरवून गेला होता, तो जवळ येताच तिने त्याला रस्त्यावरच मिठी मारत बर्थडे विश केलं. प्रेम थॅन्क्स बोलत तिला मिठीतुन सोडवत बोलतो.

प्रेम : ओय... कंट्रोल... आपण पब्लिक प्ले्स मधे आहोत. 😊 

अंजली : असु दे ना... मग काय झालं... फक्त मिठी मारलीय... खरं तर जरा वेगळ्या प्रकारे विश करायचं होतं... पण आत्ता इथे नको... पब्लिक प्लेस....😋

प्रेम : अच्छा... झालं तुझं...😊

अंजली : अरे... नाही अजुन... आत्ता तर सुरुवात झालीय.😊 अजुन पुर्ण दिवस बाकी आहे. 😋

प्रेम : अंजु...😊

अंजली : हो...ना... किती आतुरतेने वाट बघत होती या दिवसाची...😍

प्रेम : अंजु...पण एक गोष्ट सांगू...आज खुप सुंदर दिसत आहेस तू...👌🏻🥰

अंजली : अच्छा... खरच का...🥰 थॅन्क्स...पण माझं सुंदर दिसणं हे सर्व फक्त आणि फक्त तुझ्यासाठी....कळलं. 🥰

प्रेम : अच्छा... बरं... आता तरी सांगशील काय प्लॅन आहे आजचा...😊
अंजली : हा... आजचा प्लॅन तर खुप वेगळा आहे. आणि तु मला प्रॉमिस केलं आहेस त्यामुळे, आज मी बोलेल ते सर्व तुला ऐकावं लागेल. कळलं...😊

प्रेम : अरे... म्हणजे नक्की काय...?🤔

अंजली : ते... मी सांगते ना... हळू हळू...😊

प्रेम : बरं...ओके... आता इथून कुठे जायचं आहे. 😊

अंजली : जिथे मी घेऊन जाईन तिथे... 😊 आणि आज तु नाही पण नाही बोलू शकत. 😊 येशील ना...😋

प्रेम : अच्छा... ठिक आहे. चल आता निघुया...😊

अंजली : बरं चल... 😊

* असं बोलुन ती स्कुटी वर बसते. त्याला मागे बसण्याचा इशारा करते. तसा तो पण मागे बसतो. 
दोघे तिथून निघतात आणि जवळच असलेल्या साईबाबा मंदिराजवळ पोचतात. 
ती स्कुटी पार्क करते. प्रेम खाली उतरतो. मंदिराबाहेर एका हाराच्या स्टॉल वरून एक मोठा हार आणि नारळ वगैरे घेऊन ते दोघे मंदिरात प्रवेश करतात. 
आतमध्ये जातानाच अंजली खांद्यावरील ओढणी डोक्यावर घेत मंदिराच्या उंबरठयाच्या पाया पडते. एका हातात हाराचे ताट घेऊन. दुसऱ्या हाताने प्रेमचा हात पकडत ते दोघे बाबांच्या मूर्तीसमोर उभे राहतात. 
हातातील ताट पुजाऱ्यांना देत. दोघेही हात जोडून साईबाबांना नमस्कार करतात. 
अंजली मनातल्या मनात बाबांना फक्त एकच मागणं मागते, त्याला दिर्घ आयुष्य मिळण्यासाठी साईबाबांना प्रार्थना करते. आयुष्यात त्याला जे हवं आहे ते सर्व त्याला मिळू दे. आणि माझ्या अखेरच्या क्षणापर्यंत तो माझ्यासोबत राहूदे. 

बाबांचं दर्शन घेऊन ते बाहेर येतात. अंजली हाराचे पैसे देते. स्कुटी जवळ येऊन डिकिमधून एक पिशवी बाहेर काढून प्रेम जवळ देते. 
त्यामधे काही स्नॅक्स चे बॉक्स होते. मंदिराच्या बाहेर बसलेल्या लोकांना ते प्रेमच्या हातून द्यायला सांगते. 

तिथून निघताना डिकी मधील पर्स उघडून त्यातले काही पैसे काढते. मी पर्स डिकी मधेच ठेवतेय अस बोलुन ते पैसे प्रेम जवळ देते. 
 मग ते दोघे तिथून निघतात. अंजली स्कुटी चालवत असते. प्रेम मागे बसून फक्त तिला पहात असतो. अंजलीच्या या अशा वागण्यातून ती अजूनच जास्त प्रेमच्या हृदयातील स्थान घट्ट करत जात होती.
अंजली पुढे जाऊन एका हॉटेल जवळ स्कुटी थांबवते. दोघे खाली उतरून हॉटेल मधे येतात. समोर तिची मैत्रीण मेघना आणि एक मुलगा उभा असतो. त्यांना पाहून प्रेमला थोडं टेन्शन येतं. अंजली त्याच्याकडे पाहून डोळ्याच्या पापण्या बंद करून रिलॅक्स व्हायला सांगते. 
टेबल जवळ आल्यावर मेघना प्रेमला हात मिळवत बर्थ डे विश करते. तो तिला खुप वर्षापासून ओळखत असतो. पण अशी समोर भेट कधीतरीच होत होती. तिला हे सर्व माहीत होते. हे त्यालाही माहीत होते. तेवढ्यात अंजली प्रेमला त्या दुसऱ्या मुलाची ओळख करून देते.

अंजली : प्रेम... हा सॅड्रिक...इन शॉर्ट... सिद... मी तुला खुप वेळा याच्याबद्दल बोलली होती ना, तोच हा... माझा सर्वात पहिला मित्र, भाऊ, एवरीथींग....माझ्यासाठी सतत पाठीशी उभा राहणारा....म्हणजे माझी सपोर्ट सिस्टीम....😊 तसं तर दोघांनाही एकमेकांबद्दल सर्व माहीत आहे पण आज पहील्यांदा अशी समोर भेट होत आहे तुमची. 

* तिचे बोलुन झाल्यावर सिद पण त्याला हात मिळवत बर्थ डे विश करतो. चौघे टेबलवर बसतात. बाजूला वेटर उभा असतो. त्याला सर्वजण आपापल्या ऑर्डर देतात. 
अंजली पेपर डोसा ऑर्डर करते. प्रेमसाठी मेदू वडा सांबार सांगते. मेघना आणि सिद उत्तप्पा ऑर्डर करतात. ऑर्डर येईपर्यंत यांच्या गप्पा चालु होतात.

मेघना : प्रेम ... खरं तर आज तुझा वाढदिवस आहे. आज हा विषय नाही काढायला पाहिजे पण राहवत नाही म्हणून बोलते.... बोलू ना.😊

प्रेम : हा... बोल ना... नो प्रॉब्लेम...😊

मेघना : प्रेम... मला हे माहीत नाही की तु तुमच्या रिलेशनशिप मधे किती सिरियस आहेस. पण एक गोष्ट आहे, अंजू तुझ्या बाबतीत खुप म्हणजे, जरा जास्तच सिरियस आहे. हे पुढे जाऊन खुप कठीण होणार आहे पण, तु तिची साथ कधीच सोडू नकोस, नाहीतर वेडी होईल हि मुलगी... कारण गेली चार पाच वर्ष मी ते सर्व जवळुन अनुभवलं आहे. तिच्यासाठी तिचं जग म्हणजे फक्त तु आहेस, म्हणून मी मुद्दाम हे तिच्यासमोरच तुला बोलतेय. प्लिज तिला त्रास होईल असे काही करू नकोस एवढच सांगायचं होतं तुला.
कारण... मेरी आधी जान है ओ... शायद इसलिए उसकी तकलीफ मै तो सेहन नहीं कर पाऊंगी....😊
* असं बोलुन ती समोर बसलेल्या अंजलीचे गाल ओढते. 🥰 अंजली तिच्याकडे पहात बोलते.

अंजली : मेघा.... तुला पण आजच हे सर्व बोलायचं होतं का...🤔

मेघना : हो... माहीत आहे मला, आज त्याच्यासाठी खास दिवस आहे. पण जे मी बोलले ते पण त्याच्या लक्षात राहिलं पाहिजे ना...😊

प्रेम : हो..... नक्की लक्षात राहील. मी अजुन तरी एवढ्या पुढचा विचार केलेला नाही. पण, एवढं प्रॉमिस नक्की देतो की, तिला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करेन मी. 😊

मेघना : दॅट्स गुड...👉🏻😊 तसे आम्ही आहोतच. काहीही झालं तरी... हो ना सिद...😊

सॅड्रिक : हो... नक्कीच आहोत. अजुन तरी खुप वेळ आहे त्या गोष्टीला, पण मला फक्त हिच्या डॅडचे टेन्शन येतं. मॉम कशीही तयार होईल, नाही झाली तरी मी कन्वेंस करेन. पण डॅड..... ते कधीच तयार होणार नाहीत. आणि त्यांच्या समोर माझंही काही चालत नाही. 😔

अंजली : सिद... प्लिज आता जाऊ दे ना हा विषय... की आत्ताच लग्न लावायला निघालात तुम्ही...😊

मेघना : बरं ओके... बघु ते वेळ आल्यावर काय करायचं... आत्ता तरी मला खुप भुक लागलीय. 😋

* वेटर सर्व डिश टेबलवर ठेऊन निघुन जातो.

सर्वजण खायला सुरुवात करतात. अंजली तिच्या डिश मधील एक घास प्रेमला भरवते. ते पाहून मेघना हसत हसत बोलते.

मेघना : हाय..... किती प्रेम ते...🥰 कधी काळी हा घास फक्त आमच्या हक्काचा असायचा... बस् एक बॉयफ्रेंड काय मिळाला, भुल गयी बचपन की दोस्ती....😭

अंजली : ओय... नौटंकी, बस झाली नाटकं... हे... घे... तुझ्यासाठी पण आहे. 😊

* असं बोलुन ती मेघा आणि सिद ला पण एक एक घास भरवते. ब्रेकफास्ट करत ते लोक गप्पा मारतात.
 थोड्या वेळाने वेटर बिल घेऊन येतो आणि टेबलवर ठेऊन निघुन जातो. सिद ते बील द्यायला पॉकेट मधून पर्स काढत असतो तेवढ्यात अंजली बोलते...

अंजली : अरे... थांब आज तुझा वाढदिवस आहे का... हि ट्रीट प्रेम कडून आहे, मग बिल पण तोच पेड करणार....

* असं बोलुन ती प्रेमला बील पे करायला सांगते. मंदिरातून निघताना तिने तिच्या पर्स मधुन पैसे काढून प्रेम कडे का दिले हे त्याच्या आत्ता लक्षात येते.
तो पर्स काढून बील पे करतो. सर्वजण हॉटेल मधुन बाहेर पडतात. अंजली स्कुटीची डिकी उघडुन त्यातुन पर्स काढून घेते आणि चावी मेघनाला देते. ती चावी घेत मेघना बोलते.

मेघना : मग आजचा प्लॅन काय आहे...😊 आणि किती वाजेपर्यंत याल मॅडम... नाहीतर मॉम मला कॉल करतील.

अंजली : डोन्ट वरी... मी बोलले आहे मॉम ला, प्रेमसोबत जातेय म्हणुन... कळलं. 😊

मेघना : अच्छा... म्हणजे एक बाजु तरी क्लिअर आहे. फक्त डॅड चा प्रॉब्लेम आहे. 😊

अंजली : ओय... बस् आता... खुप बोलली निघा आता तुम्ही...😊

मेघना : अरे हो... निघतोय, किती घाई झालीय तुला... नक्की कुठे जाणार आहात. सांग तरी, आम्ही नाही येणार, कबाब मे हड्डी बनायला, 😋 फक्त माहीत असावं म्हणुन विचारतेय. 😊

अंजली : अगं... तसं काही नाही, इथुन बांद्रा चर्च मधे, तिथून फॅशन स्ट्रीट, शॉपिंग करून रिटर्न... ओके...😊

मेघना : बस्... एवढाच प्लॅन आहे...🤔

अंजली : होय.... झालं का तुझं... चौकशी करून आता निघ. 😊

मेघना : हो... बाई... जाते. सिद... चल रे बाबा, आपण निघू...यांना खुप घाई झालेली दिसतेय...😊

* असं बोलुन ते दोघेही तिथून निघतात. मेघना अंजलीची स्कुटी घेऊन जाते. 
ते दोघे तिथून टॅक्सी करून बांद्र्याला जायला निघतात. टॅक्सी मधे ती प्रेमला अगदी बिलगुन त्याच्या कुशीत बसलेली असते.

अंजली : प्रेम.... गप्प का आहेस, बोल ना. 😊

प्रेम : काय बोलू... 😊

अंजली : अच्छा... काहीच नाही का बोलायला. 😊

प्रेम : तसं काही नाही...😊

अंजली : मग... काय झालं...🤔

प्रेम : अरे... मघाशी मेघना बोलली, त्याचा विचार करत होतो. खरच पुढे सर्व नीट होईल ना...

अंजली : प्रेम.... आत्ता नको ना तो विषय, ते बघु तेव्हा, तसंही तुच नेहमी बोलतो ना... जास्त पुढचा विचार करून आत्ताचा क्षण वाया घालवू नये, मग... आत्ता तु काय करतोय. 

प्रेम : बरं ओके... मग बोल मला का नाही सांगितलं आधी, आजच्या प्लॅन बद्दल...🤔

अंजली : असच... तुला सरप्राइज होते ना, पण मेघामुळे सांगावं लागलं. 😊

प्रेम : अच्छा... एवढाच प्लॅन आहे ना, की अजुन काही... 😊

अंजली : हो... अजुन खुप आहे...😊

प्रेम : काय... 🤔

अंजली : सांगते... नंतर... आधी तिथे पोहोचू मग...😊

प्रेम : बरं ओके...😊

* तासाभरात ते दोघेही बांद्र्याच्या माऊंट मेरी चर्च जवळ पोचतात. टॅक्सीतून उतरून ते दोघे बाहेरच असलेल्या एका शॉप मधून कँडल आणि एक छानसा फ्लॉवर बुके घेऊन चर्च मधे जातात.
अंजली त्याचा हात हातात घेऊन पुढे जाते. तिथे तो बुके देऊन त्याच्या हाती एक कँडल देते. दोघेही ती 🕯️ पेटवून तिथे ठेवतात. 
अंजली समोर असलेल्या मदर मेरीकडे पहात मनातच काहीतरी प्रे करते. 
दोघे मागे येऊन तिथल्या बेंच वर बसतात. थोड्या वेळाने अंजली पुढे जाऊन तिथे असलेल्या फादर सोबत काहीतरी बोलुन परत येते, आणि प्रेमला घेऊन त्यांच्याकडे जाते.
फादर त्याच्या डोक्यावर हात ठेवून काहीतरी प्रे करून त्याला आशीर्वाद देतात. आणि तिथून बाहेर पडतात. 

बाहेर आल्यावर प्रेम कडून त्याचा मोबाईल मागुन घेते आणि पर्स मधुन एक छोटीसी डायरी काढून त्यातील एक नंबर डायल करते. आणि थोडं बाजुला जाऊन बोलते. 
तिचे बोलुन झाल्यावर ती प्रेमला मोबाईल परत करते आणि दोघेही खाली उतरून समुद्राच्या किनारी येतात. थोडा वेळ तिथे बोलत बसतात. अंजली लांबुनच त्याला शाहरुख खानचा मन्नत बंगला दाखवते.
थोड्या वेळाने दोघे तिथून टॅक्सी करून निघतात आणि एका मोठ्या हॉटेल मधे येतात. खाली उतरून टॅक्सीवाल्याचे पैसे देऊन, हॉटेलच्या आत प्रवेश करतात. 
प्रेमला काही कळत नाही, तो फक्त तिच्यासोबत चालत असतो. आत आल्यावर ती प्रेमला तिथेच असलेल्या सोफ्यावर बसायला सांगते. स्वतः रिसेप्शन काउंटर वर जाऊन तिथे असलेल्या लेडीज सोबत बोलून परत येऊन प्रेमच्या बाजुला येऊन बसते. तिच्याकडे पहात प्रेम तिला बोलतो...

प्रेम : अंजु... कुठे आलोय आपण. काय चाललंय...🤔

अंजली : हो... हो... कळेल ते, सरप्राइज आहे ना मग कसं सांगणार आधीच....😋

प्रेम : अच्छा... सरप्राइज आणि इथे, अजुन कोणी येणार आहे का इथे भेटायला. 😊

अंजली : नाही... आता कोणी नाही येणार, आत्ता फक्त तु आणि मी दोघेच असणार...🥰

प्रेम : काय..... काय बोलतेय काहीच कळत नाही. 🤔

अंजली : कळेल...कळेल... थोडा वेळ थांब. 😊

ते दोघे बोलत असतात तेवढ्यात एक मुलगा तिथे येतो, आणि अंजलीला बोलतो, "मॅडम डन... 👍🏻 प्रेमला सोबत घेऊन अंजली त्या मुलासोबत आतमध्ये जातात. एका रुमजवळ आल्यावर तो मुलगा डोअर ओपन करतो. दोघे आत जातात पण,आतमधे सर्वत्र अंधार असतो. अंजली प्रेमला तिथेच उभा रहायला सांगते, डोअर बंद करून ती स्वतः आत जाते. आणि लाईट स्विच ऑन करते.
प्रेम आतील नजारा पाहून थक्क होऊन जातो. सर्व रूम व्हाइट आणि पिंक कलर च्या बलून ने सजवलेला असतो. डोअर पासून आतपर्यंत गुलाबाच्या पाकळ्या पसरलेल्या असतात. बाजुला खुप सारे बलून असतात. 
ती पुढे जाऊन तिथे असलेला साऊंड सिस्टीम ऑन करते. त्यावर छान असे गाणे चालु होते...

🎶 आए हो मेरे जिंदगी में,
    तुम बहार बन के,
मेरे दिल में यूंही रेहना,
  तुम प्यार प्यार बन के...🎶

गाणे चालु असतानाच अंजली प्रेमचा हात पकडून त्याला आत घेते. आणि त्याला मिठी मारते. एका हाताने ती तिथे असलेली एक दोरी खेचते. आणि दोघांच्याही अंगावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव होतो. 
प्रेम हे क्षण फक्त अनुभवत असतो. त्याच्यासोबत काय घडतंय यावर त्याचा विश्वास बसत नाही. 
अंजली त्याला घेऊन पुढे येते. आणि मस्त फुलांनी आणि बलून ने सजवलेल्या बेडवर त्याला बसवते. जवळच असलेल्या टेबलवरील फ्लॉवर पॉट मधुन एक गुलाबाचे फुल घेते आणि प्रेमच्या समोर घुडघ्यावर खाली बसते. एका हाताने ते गुलाबाचे फुल त्याला देत बोलते.

अंजली : हॅप्पी बर्थडे जानु....🌹

* ते फुल स्वीकारत प्रेम उभा राहतो, ती पण ऊठुन उभी राहते. दोन्ही हातांनी तिचे गाल ओढत, तिच्या डोळ्यांत बघत तो तिला बोलतो.

प्रेम : थँक्यु वेरी मच... फॉर धिस वंडरफुल सरप्राइज. 🥰

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️