अनुबंध बंधनाचे. - भाग 26 prem द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनुबंध बंधनाचे. - भाग 26

अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग २६ )

आज खुप दिवसांनी दोघांना हवा तसा एकांत मिळालेला असतो. प्रेम अलगद तिला मिठीत घेतो. दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारतात. 💞 थोडा वेळ तसेच उभे असतात. अंजली हळुच त्याच्या कानात बोलते.

अंजली : आय लव्ह यू... प्रेम... हा क्षण माझ्यासाठी खुप स्पेशल असतो नेहमीच. तुझ्या मिठीत आल्यावर स्वर्गसुख मिळाल्यासारखे वाटते. हेच माझ्यासाठी सर्वात मोठं सुख आहे. 

प्रेम : अच्छा... मला पण काहीसं असच वाटतं. 🥰

अंजली : हो... का... 😍

प्रेम : हो... खरच... खुप छान वाटतं. तुझ्या मिठीत असताना सर्वकाही विसरून जातो मी... 😊

अंजली : अच्छा... मग असच रहायचं का...😋

प्रेम : हो... चालेल मला...😊

अंजली : अच्छा... बरं ओके. तु बोलशील तितका वेळ राहू असच ओके. इथे दुसरं कोणी नाही आपल्याला पहायला. 😊

* तेवढ्यात डोअर बेल वाजते. दोघे मिठीतुन वेगळे होतात. एकमेकांकडे पाहून हसतात. अंजली डोअर ओपन करते. 
वेटर एका ट्रॉली मधे छान सजवलेला🎂 केक घेऊन आलेला असतो. सोबत एक 🍾 वाइन ची बॉटल आणि दोन🥂 ग्लास पण असतात. तो ट्रॉली घेऊन आत येतो. आणि ट्रॉली तिथे ठेऊन निघुन जातो. अंजली डोअर बंद करून प्रेम जवळ येते. 

प्रेम : ओय... काय आहे हे... एवढं सर्व कधी प्लॅन केलं तु, आणि कसं काय...🤔😊

अंजली : हो... हो... सांगते सर्व, आधी केक कापून घेऊ मग नंतर बोलू ओके.😊

* असं बोलुन अंजली केक सोबत आणलेली कँडल पेटवते🕯️, बाजूला एका टेबल वर साऊंड सिस्टम चालु असतो. तिथे जाऊन कॅसेट चेंज करते. आणि गाणे चालु होते...

🎶 बार बार दिन ये आये,
      बार बार दिल ये गाये
      तू जिये हजारो साल,
      ये मेरी है आरजू .....
      हैप्पी बर्थडे टू यू.....
      हैप्पी बर्थडे टू यू...🎶

* अंजली प्रेमचा हात पकडुन त्याला ट्रॉली जवळ घेऊन येते. तिथे असलेली सुरी त्याच्या हातात देत त्याला केक कापायला सांगते. प्रेम एका हाताने सुरी घेतो, अंजलीचा एक हात पकडुन तिच्या हातात सुरी ठेवतो. दोघे मिळुन कँडल वर फुंकर मारून ती विझवतात. आणि दोघे मिळुन केक कापतात. केक कापताना अंजली स्वतः पण तेच गाणं गुणगुणत असते. 
अंजली केकचा एक छोटासा तुकडा कापुन हातात घेते 🍰 आणि प्रेमला पुन्हा विश करत त्याला तो घास भरवते. प्रेम त्यातील थोडासा भाग खाऊन उरलेला केक अंजलीला भरवतो. 🍰
अंजली तिथेच त्याला विश करत पुन्हा मिठी मारते. ट्रॉली वरील टिशु पेपर घेऊन दोघेही हात पुसत एकमेकांकडे पहात असतात.

प्रेम : मला वाटलं नव्हतं तुझ्या सरप्राइज मधे एवढं सर्व प्लॅन असेल. आता तरी सांगशील हे कसं आणि कधी ठरवलं, कोणी दिली तुला ही आयडिया. 😊

* अंजली ट्रॉली मधील वाइन दोन्ही ग्लास मधे भरून एक ग्लास त्याच्या हातात देते. आणि त्याला 🥂 चिअर्स करते. दोघेही वाइन पित बोलतात. 

अंजली : ॲक्च्युली मी हा प्लॅन कॉपी केलाय. 😊

प्रेम : कॉपी...🤔 म्हणजे नक्की काय...🤔

अंजली : अरे माझे अंकल इथेच राहतात. त्यांच्या मुलाची एक गर्लफ्रेंड आहे. लास्ट मंथ मधे त्याने तिचा बर्थ डे असाच प्लॅन केला होता . तेव्हाच मी ठरवलं होतं. तुझा बर्थ डे पण असाच आणि इथेच सेलिब्रेट करायचा. 😊

प्रेम : अच्छा... म्हणजे तु पण आली होतीस तेव्हा...?

अंजली : हो... बोलवलं होतं त्याने, तेव्हाच निघताना इथल्या हॉटेल मॅनेजर सोबत बोलली आणि कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेतला होता. दोन दिवसांपूर्वी मी येऊन गेली इथे. 😊

प्रेम : अंजु.... पण काय गरज होती, एवढं सर्व करायची. 😊

अंजली : का... तुला नाही आवडलं का...😔

प्रेम : अरे... मी तसं नाही बोलत... खरं तर मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की, माझा वाढदिवस इतका छान आणि अशा प्रकारे कधी साजरा होईल. 

अंजली : मग.... आत्ता झाला ना...प्रत्यक्षात...😊

प्रेम : हो... थॅन्क्स फॉर इवरीथिंग...😊

अंजली : ओय... थॅन्क्स काय... हे सर्व फक्त तुझ्यासाठी नाही, त्याच्यात माझा पण स्वार्थ असतो. कारण तु हॅप्पी तर मी पण हॅप्पी. 😍

प्रेम : मी खरच खुप लकी आहे, कारण तु माझ्या आयुष्यात आल्यापासुन माझं आयुष्य पूर्णपणे बदलुन गेलं आहे. 😊

अंजली : ओय... हा माझा डायलॉग आहे, तु कॉपी केला ना... खरं तर तु माझ्या आयुष्यात आल्यापासुन माझं आयुष्य खूप सुंदर झालं आहे.🥰

प्रेम : बरं...ओके... 😊

* अंजली एका डिश मधे थोडासा केक काढून घेते. आणि त्याला भरवत बोलते.

अंजली : प्रेम... तुला माहितीये आज गॉड कडे मी काय मागितलं असेल...😊

प्रेम : अच्छा... काय मागितलं बरं...🤔

अंजली : हेच की, इथुन पुढच्या आयुष्यातील हा दिवस आपण आपण असाच एकत्र सेलिब्रेट करायचा आहे मला तुझ्यासोबत...😊

प्रेम : अच्छा... म्हणजे वर्षातून फक्त एकच दिवस...😊

अंजली : अरे तसं नाही रे... काहीही काय बोलतो. मला हे बोलायचं आहे की....😊

प्रेम : हो... हो... कळलं. त्याची इच्छा असेल तर, तु जे मागितलं ते नक्कीच तुला मिळेल. 😊

अंजली : बस्..... बाकी काहीच नको आहे, मला माझ्या आयुष्यात, फक्त तु आणि तूच हवा आहेस. 😊

प्रेम : ओके..... मॅडम.... 😊

अंजली : बरं चल सेलिब्रेट करू...🥰

प्रेम : अच्छा... मग आता काय करतोय...🤔

अंजली : अरे... तसं नाही. 😊

प्रेम : मग कसं...?🤔

अंजली : थांब सांगते....😊

* अंजली तिथून साऊंड सिस्टम कडे जाते, आणि कॅसेट चेंज करते. त्यावर गाणे चालु होते...

🎶 तुम से मिल के,
     ऐसा लगा तुम से मिल के,
     अरमां हुये पुरे दिल के....   
     ऐ मेरी जान-ए-वफ़ा,
     तेरी मेरी... मेरी तेरी, 
     एक जान है,
     साथ तेरे रहेंगे सदा, 
     तुम से ना होंगे जुदा,
     तुम से मिल के,
     ऐसा लगा तुम से मिल के...
     अरमां हुये पुरे दिल के...🎶

* ती प्रेमच्या समोर हात करत बोलते...😊

अंजली : चल आता सेलिब्रेट करू....💃🕺💞

प्रेम : ओय...या गाण्यावर...😊 पण मला नाही येत नाचता...😊

अंजली : मी आहे ना... मी शिकवते चल... खुप सिंपल स्टेप आहेत....🥰

प्रेम : हो,का... बरं चल...😊

*अंजली प्रेमचा एक हात पकडुन स्वतःच्या कमरेभोवती ठेवते आपला हात त्याच्या पाठीवरती ठेवत, त्याचा दुसरा हात हातात घेत त्याला फूट स्टेप करून दाखवते. 
प्रेम पण ती सांगते तसे स्टेप करत असतो. हळू हळू त्याला पण जमायला लागतं. 
अंजली स्टेप बाय स्टेप त्यात बदल करत होती. प्रेम पण तिला छान प्रतिसाद देत होता. 
दोघे एकमेकांच्या डोळ्यात पहात डान्स करत होते. बॅकग्राऊंडला गाणे चालुच होते.

🎶 मेरे सनम, तेरी कसम,
 छोड़ेंगे अब ना ये साथ,
ये ज़िन्दगी, गुज़रेगी अब,
हमदम तुम्हारे ही साथ,
अपना ये वादा रहा,
तुम से ना होंगे जुदा....
तुम से मिलके,
ऐसा लगा तुम से मिलके,
अरमाँ हुए पूरे दिल के.....

मैने किया, है रात दिन, 
बस तेरा ही इन्तज़ार,
तेरे बिना आता नहीं, 
एक पल मुझे अब क़रार,
हमदम मेरा मिल गया, 
हम तुम ना होंगे जुदा....

तुम से मिलके, 
ऐसा लगा तुम से मिलके,
अरमाँ हुए पूरे दिल के.....
ऐ मेरी जाने वफ़ा, 
तेरी मेरी मेरी तेरी, 
एक जान है......
साथ तेरे रहेंगे सदा, 
तुम से ना होंगे जुदा,
तुम से मिल के, 
ऐसा लगा तुम से मिल के,
अरमाँ हुए पूरे दिल के....🎶

* हळू हळू वातावरण रोमँटिक होत चालले होते. अंजली कधी त्याचा हात उंच करून, त्याच्या बोटाला पकडुन स्वतःभोवती गोल फिरत होती, तर कधी एक हात पकडून दूर जाऊन गोल फिरत त्याच्या जवळ येत होती.
सर्व कसं अगदी फिल्मी वाटत होते. 

शेवटी अंजली त्याच्या गळ्यात दोन्ही हात टाकते. प्रेम पण तिच्या कमरेवर हात ठेवून नाचत होता. नाचता नाचता प्रेम थोडा खाली वाकून तिला अलगद उचलुन घेतो आणि गोल फिरवतो.
तो तिला हळु हळु खाली उतरवत असतो. त्याच वेळी अंजली त्याच्या कपाळावर किस करते.😘 प्रेम तिला अजुन थोडी खाली सोडतो, मग ती त्याच्या दोन्ही गालावर किस करते. आणि दोन्ही हात त्याच्या चेहऱ्यावर ठेवत त्याच्या ओठांवर आपले ओठ ठेवते. 

तिला हवा तसा प्रतिसाद देत प्रेम अलगद खाली उतरून तिला मिठीत घेतो. जसजसा वेळ पुढे जात असतो तसा तो तिला अजुन घट्ट मिठीत पकडुन ठेवतो. खुप वेळाने तो जेव्हा भानावर येतो. तेव्हा मिठीतुन अंजलीला सोडवत स्वतः तिच्यापासून थोडा दूर होतो.
अंजली फक्त त्याच्याकडे पहात त्याच्याजवळ येत त्याचे दोन्ही हात पकडून बोलते.

अंजली : प्रेम... काय झालं...😊

प्रेम : काही नाही...😊

अंजली : नक्की....😊

प्रेम : हो.....😊

* अंजली त्याच्याजवळ जाऊन त्याला मिठी मारत त्याच्या कानाजवळ बोलते...

अंजली : प्रेम... एक विचारू तुला...😔

प्रेम : हा... बोल ना...!

अंजली : लास्ट टाईम पण गावी गेलो होतो तेव्हा पण असच झालं होतं ना...😔

प्रेम : हा.....

अंजली : ठिक आहे... तेव्हाचे मी समजु शकते. आपण घरी होतो. थोडी रिस्क होती तेव्हा..... पण आज इथे आपण दोघेच आहोत. मग का थांबवलं स्वताला तु....😔

प्रेम : अरे..... तसं काही नाही...😊

अंजली : मग कसं आहे...🤨 आता तेच लेक्चर पुन्हा ऐकवणार आहेस का...? खुप घाई होतेय, अजुन वेळ आहे या सर्व गोष्टींना, वगैरे, वगैरे....

प्रेम : अंजु..... 😊

अंजली : प्रेम... प्लिज... बस् झालं आता... मलाच गिल्ट वाटते मग...😔

प्रेम : सॉरी.....😔

अंजली : प्रेम एक सांगु... मी मनाने शरीराने सर्वस्वी फक्त तुझी आहे आणि अखेरपर्यंत तुझीच असणार आहे. जसा माझ्या मनावर तुझा हक्क आहे, तसा माझ्यावर पण तितकाच तुझा हक्क आहे. 😔

प्रेम : अरे... हो... माहीत आहे मला...पण...!

अंजली : पण बिन काही नाही... मला या बाबतीत अजुन काही लेक्चर ऐकायची इच्छा नाही. कारण आजचा दिवस माझ्यासाठी खुप स्पेशल आहे. आणि या दिवशी मला तुझ्यासोबत एकरूप होऊन जायचं आहे. कोणतंच बंधन नको आहे मला आपल्यात आता...कळलं...😔

* प्रेम तिच्या पाठीवरून हात फिरवत बोलतो...

प्रेम : अरे... हो... किती बोलते...😊

अंजली : मग काय करू... नेहमी लेक्चर देत असतो. 😊 बरं चल एक गंमत दाखवते. 

* असं बोलुन त्याला बेड जवळ नेते...स्वतः बेडच्या दुसऱ्या बाजूला जाते. बेडवर एक ब्लँकेट अर्ध्यापर्यंत अंथरलेले असते. ते त्याला त्याच्या बाजूने हळुच उचलायला सांगते. आणि आपल्या बाजूने पण उचलुन अलगद खाली घेतात. 
त्या ब्लँकेट खाली गुलाबाच्या पाकळ्यांनी "I💘U" असं डिजाइन केलेलं असतं. प्रेम ते पाहून अजुन सरप्राइज होतो. ती त्याच्याजवळ येते आणि बोलते... 

अंजली : कसं वाटलं...🥰

प्रेम : खुपच छान... सुंदर...👌🏻

* अंजली त्याला बेडवर बसवत बोलते...

अंजली : एक मिनिट बस इथेच... 😊

प्रेम : ओय... अजुन काही बाकी आहे का...😊

* तेवढ्यात अंजली तिच्या पर्स मधुन एक छोटासा बॉक्स काढते. त्यामधे एक गोल्डन रिंग असते. 💫 ती घेऊन त्याच्याजवळ येते आणि त्याच्या पायाजवळ गुडघे टेकून बसते. त्याचा हात हातात घेत त्याच्या एका बोटामध्ये ती अंगठी घालते आणि त्याच्या बोटांवर किस करत त्याला बोलते....

अंजली : हे माझ्याकडून तुला वाढदिवसाचे छोटंसं गिफ्ट...आणि हो... ही रिंग मी का देतेय समजलं ना... इथुन पुढे तु फक्त माझा आणि माझाच आहेस... ओके... नेहमी घालुन ठेव, तिला पाहिल्यावर तरी माझी आठवण येत राहील तुला... 😋 पुन्हा एकदा तुला वाढदिवसाच्या खुप खुप खुप..... शुभेच्छा. 🥰

प्रेम : अंजु..... काय हे... गरज होती का एवढं सर्व करण्याची. 😊

अंजली : हो... तर... मला नक्कीच होती. आणि त्याचे कारण तुला चांगलेच माहीत आहे. हो... ना... 😍

प्रेम : हो... कळलं ते... अजुन काही बाकी आहे का, किती सरप्राइज देणार आहेस एकदम....😊

* ती ऊठुन त्याच्या समोर उभी राहते. दोन्ही हातांनी त्याचा चेहरा पकडुन त्याच्या कपाळावर किस करत बोलते...

अंजली : मी तुला अजुन काही देऊ शकते की नाही मला माहीत नाही, पण.... माझं आयुष्य पण तुला लाभु दे....😊

* प्रेम वरती मान करून थोडा भाऊक होऊन तिच्या डोळ्यांत पहात असतो. तसाच तिच्या कमरेभोवती हात टाकत तिला मिठी मारतो. अंजली त्याच्या केसातुन हात फिरवत आपल्या डोळ्यातील अश्रू पुसत असते. तेवढ्यात प्रेम बोलतो....

प्रेम : थैंक्स... अंजु....थैंक्स फॉर एवरीथिंग. मला माहित नाही मी हे सर्व डिजर्व करतो की नाही, पण खरच तु माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं. अजूनही मला हे सर्व स्वप्न आहे की काय असच वाटतं.😌

* अंजली त्याच्या केसातुन हात फिरवत हळुच त्याची मान स्वतःकडे करत बोलते... 

अंजली : ओय... परत माझा डायलॉग कॉपी केला ना...😊 आणि हा... तु खुप छान आहेस प्रेम... आणि तु खुप काही डिजर्व करतो. कदाचित ते सर्व द्यायला मी कुठे कमी पडायला नको, एवढाच प्रयत्न करते मी...😊

* प्रेम ऊठुन उभा राहतो. अंजलीच्या कपाळावर किस करतो, तिला उचलुन घेतो आणि बेडवर आणुन ठेवतो. तो तिच्याकडे पहात असतो. अंजली पण टक लाऊन त्याच्याकडे पहात असते. दोघे एकमेकांच्या नजरेत हरवून जातात. 
आता फक्त त्यांचे डोळे बोलत असतात. 
प्रेम हळुच तिचे गाल ओढत तिच्या जवळ जात अलगद तिच्या ओठांवर ओठ ठेवतो. अंजली स्वतःहून त्याला प्रतिसाद देत त्याच्या मिठीत सामावून जाते. 
दोघे एकमेकांना घट्ट मिठीत घेऊन एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करत असतात. 
गुलाबांच्या सुगंधी पाकळ्यांनी सजलेल्या बेडवर प्रेमाची बहार फुलत चालली होती. 
आज प्रेम स्वताच्या मनावरील बंधन हटवून सर्वस्वी तिच्यात हरवून गेला होता. 
तिने पण पूर्णपणे स्वतःला त्या सुंदर विश्वात झोकुन दिले होते. 
खऱ्या अर्थाने आज ते दोघे एकरूप झाले होते.

💞

दुपारचे साडे चार वाजले होते. बेडवर दोघे एकमेकांच्या मिठीत होते. अंजलीने डोळे झाकले होते, प्रेम तिच्या विस्कटलेल्या केसांच्या बटांना चेहऱ्यावरून तिच्या कानामागे नेत तिला बोलत होता. 

प्रेम : अंजु..... चल उठ.., घरी नाही जायचं का...?😊

* अंजली त्याच्या कुशीत शिरत बोलते...

अंजली : थांब ना अजुन थोडा वेळ... असं वाटतं हा क्षण इथेच थांबून रहावं, खरं तर आज मला असं वाटतं की मी आज पूर्णपणे तुझी झालीय...😊

प्रेम : अरे... असं काय करते... उशीर होईल मग घरी जायला...😊

अंजली : होऊ दे... मी सांगुन आलीय मॉम ला...😊

प्रेम : अच्छा... काय सांगून आलीय...😊

अंजली : हेच की, आज मी तुझ्यासोबत आहे म्हणुन....😋

प्रेम : अच्छा... म्हणजे मॉम मला ओरडतील मग... हो... ना...😊

अंजली : ते... तु बघ...😋

प्रेम : ओय... मला नाही ओरडा खायचा, चल उठ...मॉम नी विचारलं तर... एवढा वेळ काय करत होतात म्हणून तर...?

अंजली : तु सांग काय सांगायचं ते... मला काय...😋

* प्रेम तिची मान वरती करत तिचे दोन्ही गाल ओढत तिला बोलतो...

प्रेम : सांगेन मी तुझ्यामुळे उशीर झाला म्हणुन, चल बोलत होतो तरी ऐकत नव्हती. 😊

अंजली : चालेल... सांग... 😊

प्रेम : काय मुलगी आहे... चल आता खुप झाले उठ ना...😊

अंजली : अशी कशी उठु...😋

प्रेम : म्हणजे...🤔

अंजली : अरे.... तु डोळे बंद कर आधी...😋

प्रेम : अच्छा... ओके... केले बंद, उठ आता. 😊

* अंजली तिथून उठत असते. प्रेम हलकेसे डोळे उघडुन तिला पहातो, तशी ती ब्लँकेट ओढून घेते.

अंजली : चीटिंग नाही करायची... मला माहित आहे तू बघतोय. 😊

प्रेम : बरं... ओके... नाही पहात, तु आवर लवकर, उशीर होतोय....

* असं बोलुन तो दुसऱ्या कुशीवर होतो. तशी अंजली पटकन उठून बाथरूम मधे जाते. ती गेल्यावर प्रेम पण बेडवरून उठून निघायची तयारी करतो.
थोड्या वेळात अंजली फ्रेश होऊन बाहेर येते. मग प्रेम पण जाऊन फ्रेश होऊन बाहेर येतो.
अंजली बेल वाजवुन हॉटेल मधील मुलाला तो केक आणि पर्स मधुन काही पैसे काढून देते. तो ट्रॉली घेऊन निघुन जातो. 
अंजली डोअर पुढे करून आरशासमोर केस विंचरत असलेल्या प्रेमला पाठीमागून येऊन मिठी मारते. 
प्रेम मागे वळुन तिच्याकडे पहात बोलतो...

प्रेम : अरे... काय झालं...😊

अंजली : काही नाही...😔

प्रेम : (तिला मिठीत घेत) नक्की....😊

अंजली : माहीत नाही काय चूक काय बरोबर, पण आत्ता घरी जायचं म्हटल्यावर थोडी धडधड होतेय. मॉम.....😢

प्रेम : अरे... रिलॅक्स... काही नाही झालंय, हे सर्व इथेच डोक्यातुन काढून टाक... कळलं.

अंजली : हा...😔

प्रेम : बरं चल निघायचं ना आता...😊

अंजली : हो... चल...😊

प्रेम : बरं सांग... आता इथुन घरीच जायचं ना, की अजुन काही...😋

अंजली : ते मी सांगते चल...😊

प्रेम : बरं ओके...😊

* ते दोघेही तिथून बाहेर येतात, अंजली रिसेप्शन काउंटर वर जाऊन पेमेंट करते. आणि दोघे तिथूनच जवळ असलेल्या एका रेस्टॉरंट मधे येतात. टेबलवर बसत अंजली प्रेमला विचारते...

अंजली : बोल काय खाणार आहेस तू... 😊

प्रेम : जे तु खाणार तेच...😊

अंजली : अच्छा... माझं तर पोट भरलं आहे. 😊

प्रेम : हो... का... तसं तर माझं पण पोट भरलं आहे. 😊

अंजली : असं कसं... काहीतरी खावच लागेल. 😊

प्रेम : बरं ओके... तु मागव थोडंसं काहीतरी...😊

* अंजली वेटरला एक चायनीज डिश ऑर्डर करते. दोघे बोलत असतात, तेवढ्यात वेटर ती डिश आणून टेबलवर ठेऊन निघुन जातो. अंजली चमच्याने त्याला एक घास भरवते. प्रेम पण तिला भरवतो. थोड्या वेळाने अंजली ज्यूस पण मागवते. ते संपवून दोघेही तिथून बाहेर पडतात. अंजली त्याच्या हाताला पकडुन चालत असते. तेवढ्यात प्रेमच्या मोबाईल वर मॉमचा कॉल येतो. अंजली त्याच्या हातातुन मोबाईल घेत बोलते. 

अंजली : हाय... मॉम... बोल...😊

मॉम : अरे कुठे आहात, झाली की नाही शॉपिंग वगैरे...😊

अंजली : अगं नाही अजुन... आत्ताच तर आलोय इकडे. 😋

मॉम : म्हणजे... एव्हढा वेळ का झाला. 🤔

अंजली : अरे... पिक्चर बघायला गेलो होतो ना, मेघा आणि सिद सोबत. म्हणून इकडे यायला उशीर झाला. 😋

मॉम : बरं ओके... काही खाल्ले का...😊

अंजली : हो लंच केला थोड्या वेळापूर्वी. थोडी शॉपिंग करून चर्च मधे जाऊन येईन, थोडा लेट होईल, चालेल ना मम्मा...😋

मॉम : बरं ओके... त्याला आवडत असेल तर जा... पण डॅड घरी यायच्या आधी घरी ये म्हणजे झालं. 😊 आणि हो... पैसे दिलेत ना, बघ त्याला काय आवडतं ते, शर्ट वगैरे, किंवा जीन्स, छान असं काहीतरी घे. 

अंजली : हो... मम्मा... आता ठेऊ का...?

मॉम : बरं ठेव... आणि लवकर आलात तर त्याला घरी घेऊन ये. 😊

अंजली : हो... बघते.... आता ठेवते... बाय...😊

* असं बोलत ती कॉल कट करून मोबाईल प्रेमकडे देते. मोबाईल घेत प्रेम तिच्याकडे पहात राहतो...😊

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️