आयुष्य Monika Suryavanshi द्वारा महिला विशेष मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आयुष्य

 प्रत्येकाच आयुष्य सारख नसत.काहीच आयुष्य सोप असत तर काहीच कठीण.कोणाला जे पाहिजे ते मिळत तर काहीना खुप मेहणत केली तरी नाही मिळत. देवाकडे हात जोडुन बघत असतात तरी त्याची इच्छा पुर्ण होत नाही आणि काही देवाकडे बघत ही नाही तरी ते आनंदी असतात.काही काम करायच असेल किंवा घ्यायच असल कोणती गोष्ठ तरी त्या मुलीला सगळ्या ना विचाराव लागत. तीच्या मनासारख काही होत नाही तरी ती आनंदी असते.
 मुलीला एखादी गोष्ठ‌ नकोय हे ही न सागता कोणाला समजत नाही. तीने कुठे जायच ,कूठे नाही जायच,कोणाशी बोलायच ,कोणत्या महाविद्यालयात जायच,कोणासोबत लग्न करायच हे ही दुसरेच ठरवतात.खुप शिक्षण घेउन करणार काय घरातली काम . खरच स्री च आयुष्य एवढ वाइट असत.कधी कधी वाटत का मी मुलगी आहे . जगाला स्वातंत्र मिळाल पण मुलीणा नाही.
 माणसाला नशिबापेक्षा जास्त आणि वेळे च्या आधी काही भेटत नाही . पण एवढ ही नशीब वाईट नसाव कि वाटेल जगायला नको मराव, खरच मेल्यावर काय सगळे जण थोडे दिवस रडतात नंतर सगळे आपल्या कामात व्यस्त होतात.आपण सगळ्याचा विचार करतो पण आपला कोणी करत नसत. मनात गोष्ठी ठेवून फक्त त्रास होतो.आणि हा त्रास कोणाला सागण ही कठीण होत. काहीजण आयुष्य असतात पण आयुष्यात नसतात.हे वाक्य मनाला लागण्यासारख आहे.महत्वाचे असतात काही व्यक्ती पण आयुष्यात नाही.त्याच्या आठवणी सुंदर असतात  मुलीच असच असतात प्रेम निवडल तर कुटुंबाला विसराव लागत आणि घरच्याना निवडल तर प्रेम हातुन निसटत . एका स्री च आयुष्य सगळ्याची मन जपण्यात जात.स्री च्या आयुष्यात असा क्षण येतो कि सहण करण्याशिवाय पर्याय नसतो. सगळ सांभाळतात पण एक वेळ अशी येते कि स्वता ला साभाळण अवघड होत.त्या वेळी कोण्याचा तरी मिठीत रडाव वाटत पण रडलो आणि कमजोर आहे अस वाटल तर रडण्यासाठी ही आपल्या जवळचा खांदा हवा.
 मुली सगळ्याना समजूण सागतात धीर देतात.पण जेव्हा स्वताला समजावयची वेळ येते तेव्हा ते कठीण जात.आपण स्वप्न वेगळ बघत असतो पण आयुष्य वेगळ दाखवत.शेवटी काय आपल्या मनासारख सगळ व्हाव हा हट्ट सोडला कि सगळ्या गोष्ठी आपोआप छान‌ वाटतात .आणि मनाविरूध्य गोष्ठी होतायत हे पचवायला आणि पाहायला खुप धीर लागतो
 मुलीना जर आपल्या प्रेमा सबोत लग्न करायच असेल तर तुम्ही स्वताच्या पायावर उभे पाहिजे .फक्त एवढच कारण नाही तर कोणत्याहि गोष्ठी आपल्या मनासारख्या व्हाव्या अस वाटत असेल तर तुम्ही यशस्वी झाल्या पाहिज्या.काही मुलीना असते मोकळे पणा वाटेल ते करता येत पण सगळ्या च नाही त्यानी कुठे जायच,कुठे शिकायच आणि अभ्यास करून पुढे काय करायच सगळ बाकीचे लोक ठरवतात.तीला कोणी तीझी इच्छा विचरत नाही.
 मुलीना एक चावडी वरचा विषय झालाय . ती काय करणार काय सगळ बाकीचे लोक ठरवतात अस नाही कि ते ठरवू शकत नाही ते ही महत्वाचे असतात माणस पण तीला का विचरत नाही. मुली स्वातंत्र झाल्याच नाही . त्याना फक्त बधण न घालता विश्वास ठेवा मग ते कधीच चुकणार नाहीत.कारण जेवढ एखाद्याला बधण ठेवु तो तेवढा चुकतो
 आणि आयुष्यात अशा काही व्यक्ती भेटतात ज्याच्या बदल कोणाला काही सागता ही येत नाही आणि विसरताही येत नाही.आपल सगळ्याच आयुष्य खुप अवघड, कठीण आहे पाहिजे ते कधी भेटत नाही.सतत कोणती गोष्ठ भेटण्यासाठी रडाव लागत.तळमळ ,तडभड एवढच होत.
 सगळ्या मुलीच आयुष्य एक नसत . काही मुलीना सगळ न बोलता मनात आल कि भेटत आणि काही मुलीना कतीही रडाव लागल तरीही मिळत नाही.काही मुलीना हव ते करायला आकाशात सोडलेल असत आणि काही मुलीना पिंजर्यात बंद केलेल असत.काही मुली पैशाचा विचार न करता खर्च करतात आणि काही मुली कितीही बचत केली तरी मनासारख्या वस्तु भेटत नाही तडजोड करावीच लागते .असा सगळ्याच वेगवेगळं आयुष्य असत.आपल्या मनासारख झाल नाही भेटल‌‌ नाही कि कस वाटत हे ज्याच त्याला माहित असत.
पण आयुष्य आहे रडुन रडुन का होइना पण दिवस घालवावे लागतात.मरावस वाटल तरी तो विचार कुठेतरी बंद करुन आयुष्य घालवाव लागत.कधीतरी चागल होइल मनासारख होइल हे मनात धरून जगाव लागत.