कार्यकर्त्यांची उपेक्षा व्हायला नको Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

कार्यकर्त्यांची उपेक्षा व्हायला नको

राजीनाम्याचं असंही कारण ; पार्टी दखल घेईल काय?           *आज कार्यकर्त्यांची चांदी झाली आहे असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. ज्या भागातील उमेदवाराला मंत्रीपद मिळालं. मात्र ज्या भागात मंत्रीपद मिळालं नाही. त्या भागातील कार्यकर्त्यांना दुःख झालेलं आहे व त्यांनी राजीनामे फेकलेले आहेत. ही घटना नागपूरात खुद्द मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसच्या भागात घडलेली आहे. पुर्व नागपुरातील महायुतीचे उमेदवार कृष्णा खोपडे हे अतिशय जास्त मताधिक्यानं निवडून आलेत. तरीही मंत्रीपद मिळालेलं नाही. नागपुरात असलेल्या पुर्व नागपूर या क्षेत्रात राजीनामास्र घडलं. आपल्या उमेदवाराला मंत्रीपद न मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले. हे राजीनामास्र मंत्रीपद मिळावं यासाठी आहे. मात्र कालांतरानं उमेदवार हा मंत्रीपद मिळाल्यावर याच कार्यकर्त्यांना विसरेल. ज्यांनी राजीनामास्र उगारलं, आपल्या उमेदवाराला मंत्रीपद न मिळाल्यानं. मात्र असं जर घडलं तर कालांतरानं मंत्रीपद तर सोडाच, पार्टीही राहात नाही. यात शंका नाही.*          आज भाजपाची हवा आहे. कारण कार्यकर्ते भरपूर आहेत. नव्या जुन्या कार्यकर्त्यांची फौज घेवून पार्टी निवडणूक लढते. त्यातच कामाच्या जोरावर पक्ष निवडून येत असून निवडून यायचं आणखी एक कारण योजना देणे आणि विकास करणे. हा विकास सर्वांगीण स्वरुपाचा आहे. परंतु असं असलं तरी कार्यकर्त्यांविणा कोणतीच निवडणूक लढता येत नाही. शिवाय कार्यकर्ते हे काही कुणाचे बांधील नसतात की ते एकाच पार्टीत राहतील. ते बदलत असतात. अन् कार्यकर्ते टिकू शकतात. जेव्हा त्यांचा यथोचीत सन्मान होतो तेव्हा. जेव्हा त्यांचा सन्मान होतो, तेव्हाच ते टिकतात. कालच्या कॉंग्रेस पार्टीचं असंच झालं. काल कॉंग्रेसची हवा होती, तेव्हा काही कार्यकर्त्यांकडे नेत्यांचं दुर्लक्ष झालं. त्यांचा आत्मसन्मान दुखावल्या गेला व त्याचा परिणाम हा झाला की जे दुखावल्या गेले. त्यांनी भराभर राजीनामे फेकले. तेच कार्यकर्ते कालांतरानं भाजपात आले व आज भाजपाची जणू लहर निर्माण झाल्यागत भाजपा सत्तेत आली.        कार्यकर्ते राजीनामे देतात, जेव्हा निवडणूक लढवत असतांना तिकीट मिळत नाही तेव्हा. काही कार्यकर्ते हे राजीनामे देतात, पक्षानं आपल्या उमेदवारावर वा आपल्यावर अन्याय केला तेव्हा. हे राजीनामे काही लोकं आपल्या स्वार्थापोटी फेकतात. वाटतं की आपल्यावर वा आपल्या उमेदवारावर अन्याय व्हायला नको. परंतु जेव्हा आपलाच उमेदवार आपल्यावर मंत्री बनल्यावर अन्याय करतो. तेव्हा अनेकांना विचार येत असतो. त्यातच राजीनामास्र ही कृती घडत असते.          निवडणूक ही कार्यकर्त्यांच्या भरवशावर लढली जात असते. यात काही कार्यकर्ते हे पक्षनिष्ठ व इमानदार असतात. त्यांच्या भरवशावर कित्येक निवडणुका लढल्या जातात. परंतु कार्यकर्ता हा शेवटपर्यंत कार्यकर्ताच असतो. त्याला तिकीट मिळतच नाही आणि पक्षही किती जणांना तिकीट देणार. पक्ष हा त्याच त्या व्यक्तीला तिकीट देतो. जो निवडून येत असतो. दुसरं म्हणजे पक्ष त्यालाही तिकीट देतं, जो दिग्गज व्यक्ती पक्षांतर करुन पार्टीत येतो. मात्र कार्यकर्त्यांना कार्यकर्तेच ठेवतो. अशातच काही निराश झालेले कार्यकर्ते पार्टी सोडतात व स्वस्थ बसतात. काही कार्यकर्ते पार्टी सोडतात व ते दुसर्‍याच पक्षात जावून मोठे होतात. काही पक्षनिष्ठतेनं पार्टी सोडत नाहीत. ते कार्यकर्ते म्हणून काम करीत असतात व शेवटपर्यंत आशा करीत मरण पावतात. मात्र पक्ष त्या जुन्या असलेल्या कार्यकर्त्यांना विसरतो. ज्याच्या भरवशावर तो मोठा होतो. तो पक्ष त्याच लोकांवर विश्वास करतो, त्यांनाच भाव देतो. जे संधीसाधू असतात. जे स्वार्थ दिसल्यास पार्टीत येतात. अन् स्वार्थ नसल्यास पार्टी सोडतात. पक्षानं अशाच सर्व जुन्या असलेल्या लोकांचा शोध घेवून, नव्हे तर त्यांची दखल घेवून यथोचीत सन्मान सोहळा घ्यावा. जेणेकरुन आज असलेल्या कॉंग्रेससारखी उद्या अवस्था होणार नाही.          महाराष्ट्र राज्याची निवडणूक झाली व या राज्यात काही उमेदवार भरघोस मतानं निवडून आले. काही उमेदवार भरघोस जरी नसले तरी त्यांनी परंपरा राखत जास्तीत जास्त वेळा निवडणुकीत निवडून येण्याचा मान राखला. तसेच काही लोकं हे मागील काही मात्री मंत्र्याचे नातेवाईक ठरले. हीच गोष्ट लक्षात घेवून मंत्र्यांचा शपथविधी पार पडला व काहींच्या गळ्यात चक्कं फुलांचाच हार पडला तर काहींच्या वाट्याला फुलांची पाकळीही आलेली नाही. वाटत होतं की आपला उमेदवार एवढ्या प्रचंड बहुमतानं निवडून आला. ही त्याची अमूक अमूक वेळ आहे. मंत्रीपद मिळेलच. परंतु मंत्रीपद ही काही बाजारात मोलभावात मिळण्यासारखी वस्तू नाही की केव्हाही गेल्यास ती विकत घेवून घरी आणता येईल. मंत्रीपदांची संख्या ही सिमीत आहे व ती सर्वांनाच देता येत नाही. ती विशिष्ट लोकांनाच देता येते. जे त्यात बसतात. जसे, त्यांचं कार्य, वजन, मागील काळातील अनुभव, शिक्षण इत्यादी गोष्टी विचारात घ्याव्या लागतात.          सध्याच्या काळात निवडणुकीत निवडून आलेले असेही लोकं आहेत की त्यांना धड शपथही घेता येत नाही. काहींचे उच्चारही बरोबर नाहीत. काही लोकं शिकलेले नाहीत. कार्यकर्त्यांशी काही लोकं नीट बोलत नाहीत. विचार येतोय की ते कसे निवडून आले असावेत. परंतु लाडक्या बहिणींची कमाल. या निवडणूकीत तो उमेदवार शिकला आहे की नाही हे पाहिलं नाही. तो काम करणार की नाही वा तो यापुर्वी मदतीला धावून आला की नाही हेही पाहिलं नाही. तो उमेदवार आपल्याशी कसा वागतो हेही पाहिलं नाही. मग काय पाहिलं? पाहिली ती महायुती. तो महायुतीचा उमेदवार आहे ना. मग काहीच पाहायची गरज नाही. कारण महायुती ही आपल्याला निश्चितच पंधराशे रुपये महिना देईल. तशीच त्यात वाढही करेल. ज्यात महायुतीचे उमेदवार हे विजयी झाले. त्यातच कार्यकर्तेही जाम खुश झाले. ही खुशी तेव्हापर्यंत टिकली. जेव्हापर्यंत मंत्रीपदाची घोषणा झाली नाही. अन् जेव्हा मंत्रीपदाची घोषणा झाली. तेव्हा मात्र कार्यकर्त्यांचे चेहरे पडले व त्यांनी राजीनामास्र उगारले.            हे राजीनामास्र नागपूरात घडलं. खुद्द मुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्याच कार्यक्षेत्रात. पुर्व नागपूरात अतिभव्य मताधिक्यानं व तेही सलग चवथ्यांदा निवडून निवडून येण्याचा मान राखलेल्या नागपूरच्या कृष्णा खोपडे नावाच्या उमेदवाराला मंत्रीपद मिळालं नसल्यानं जनता नाराज झाली. ज्यांनी ज्यांनी त्या नेत्याला भरघोस मतदान दिलं. त्यातच त्या उमेदवारांचे कार्यकर्ते लोकांच्या घरी गेले. त्यांना समजावून सांगितलं की आपल्या उमेदवार किती चांगला व किती वाईट आहे. तसं पाहिल्यास वाईट तर कुणी सांगितलंच नसेल. त्याचाच परिणाम असा झाला की हा उमेदवार हा अतिशय भव्यदिव्य मतानं निवडून आला. मग साहजीकच वाटणार की आता आपल्या वाट्याला मंत्रीपद मिळणार. परंतु मंत्रीपद नाही मिळालं व  येथील कार्यकर्त्यांना ते मंत्रीपद न मिळणं एकप्रकारे अन्यायच वाटला व त्यांनी राजीनामास्र उगारलं की त्यातून तरी सरकारला जाग येईल.          ते कार्यकर्ते. ते आपल्या नेत्यांवर प्रेम करणारे कार्यकर्ते. ते कार्यकर्ते राजीनामे देवो की आंदोलनं करो. परंतु कितीही काही केलं तरी मंत्रीपद हे तुर्तास तरी मिळू शकणार नाही. कारण परिक्षा झाल्यावर व परिणाम घोषीत झाल्यावर क्षणातच काहीच करता येत नाही. कारण परिणामात नापास असल्यास त्याला जादूची कांडी फिरवल्यागत नापासचे पास करता येत नाही. त्यासाठी वेळ ही जावीच लागते. नापास झाल्यावर पुन्हा फॉम भरावाच लागतो. सतत निरंतर अभ्यास करावाच लागतो. त्यानंतर काही काळानं परिणाम येतो. त्यात पास झालेलं दिसतं. मंत्रीपदातही असंच होईल. काळ जावा लागेल. परीश्रम अर्थात काम करावे लागतील. तरंच जनता ओरडेल. उमेदवारासाठी जनता ओरडणं हा मंत्रीपदाच्या कारकिर्दीतील नव्हे तर मंत्रिपद मिळविण्याच्या अभ्यासाचा एक भागच. शिवाय जो मुलगा रडेल, त्यालाच आई दूध देते. भूक लागली असा अंदाज घेवून. जो भूक तहान सहन करतो, त्याला काहीच मिळत नाही. ही राजीनामास्र घटनाही काहीशी अशीच आहे. भूक लागली आहे, आई जेवन दे. असं दाखविणारी कृती. कदाचीत या कृतीनं भविष्यात फरक पडू शकतो. कारण ही मंत्रीपदं फक्त अडीच वर्षासाठीच आहेत. कालांतरानं भविष्यात अडीच वर्षानंतर त्याच राजीनामास्र कृतीच्या अनुषंगाने मंत्रीपद मिळू शकते. हे नाकारता येत नाही. कारण पार्टीलाही भीती राहू शकते की असंच जर घडत गेलं प्रत्येक क्षेत्रात आणि एखाद्या उमेदवाराला मंत्रीपद मिळालं नाही तर तिथेही राजीनामास्र घडेल व पार्टीजवळ निवडून येण्यासाठी कार्यकर्तेच मिळणार नाहीत. कारण कोणतीही निवडणूक ही कार्यकर्त्याविणा लढता वा लढवता येत नाही. आज त्याच अनुषंगाने मंत्रीपद आणि राजीनामास्र.          आज बर्‍याच जणांना मंत्रीपदं मिळालेली आहेत. ते जाम खुश आहेत. परंतु त्यांना एक सुचना आहे की जेव्हा केव्हा मंत्रीपद मिळते, तेव्हा काही उमेदवार हे आपल्या राजीनामास्र कार्यकर्त्यांना विसरतात. कालच्या नाराज असलेल्या कार्यकर्त्यांनाही विसरतात. हे बरेचदा घडलेले आहे व हेही घडलेले आहे की जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवार विसरतातच. त्यावेळेस हा विचारही करीत नाहीत की हे आपले त्या काळातील कार्यकर्ते आहेत. ज्यांच्यामुळं काल नगरसेवक बनता आलं होतं. अन् आज आमदार व आता मंत्रीदेखील. ते जर नसते तर माझी ओळख कोणालाच झाली नसती व आज मी या मंत्रीपदावरही पोहोचलो नसतो. आज ते इतर कोणत्याही पक्षात का असेना, कालचे माझे कार्यकर्ते आहेत. मला या पदापर्यंत पोहोचविणारे कार्यकर्ते आहेत. खरं तर अशा मंत्र्यांनी त्या कार्यकर्त्यांचा शोध घ्यावा. हवं तर त्या कार्यकर्त्यांसाठी एखादा समारोह आयोजीत करावा. विशेष निमंत्रणं पाठवावीत. हे कार्य निदान पाचवर्षातून एकदा तरी पार पाडावं. याला कृतज्ञता संमेलन असं नाव देता येईल. म्हणावं की हा जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मानसोहळा. तुम्ही कोणत्याही पार्टीत असा. तिथेच राहा. कार्य करा. तुम्ही होता म्हणूनच मला इथपर्यंत पोहोचता आलं. नाहीतर कदाचीत मी काल जिथं होतो, तिथंच राहिलो असतो. आज मला मंत्रीपद मिळवता आलं नसतं. मी तुमचे देणे लागतो. त्यामुळंच मला तुमचा गौरव करायचा आहे. तुम्ही याल अशी आशा बाळगतो.          ही गोष्ट प्रत्येक मंत्र्याने प्रत्यक्षात करायला हवी. जुन्यांचाही सन्मान करायला हवा. जेणेकरुन त्याचा परिणाम असा होवू शकेल की कार्यकर्ते मग ते इतर पार्टीत का असेना, त्यांनाही वाटेल की आपला नेता हाच होवू शकतो. जो जुन्यांचाही सन्मान करतोच. तेव्हाच मंत्रीपद टिकून राहू शकेल व उमेदवारांच्या मताधिक्यात वाढ होईल. शिवाय पार्टीलाही प्रथमस्थानावर राहता येईल यात नाही.          आज जेही कोणी मंत्री बनलेत. त्यांच्या मताधिक्यात तेवढी काही वाढ नाही. आज जर आपण मंत्रीपद मिळाल्यानंतरही कालच्या जुन्या असलेल्या कार्यकर्त्यांना विसरत असेल तर हीच जनता उद्या पक्षाला जागा दाखविल्याशिवाय सोडणार नाही. दखल घेतल्या गेली नाही तर हेच कार्यकर्ते उद्या दुसर्‍याच एखाद्या पार्टीत जातील व त्याच पार्टीला मोठे करतील. त्यातच भविष्यात विद्यमान पार्टीचं प्रथमस्थान घसरेल हेही तेवढंच खरं. असं होवू नये म्हणून पार्टीनं नव्या जुन्या कार्यकर्त्याची दखल घेणं गरजेचं. कारण त्यांच्यामुळंच पार्टी प्रथमस्थानावर उभी आहे.           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०