विनोद कसा असावा Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

विनोद कसा असावा

विनोद पचवायची ताकद असावी. तरच विनोद करावा          विनोद...... विनोदाबद्दल बऱ्याचशा लेखकांनी अनेक गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. तसे विनोदाचे अनेक प्रकारही सांगीतले आहेत. तसं पाहिल्यास आचार्य अत्रेंनी विनोदाबद्दल बरंच काही सांगितलेलं आहे.          विनोद हा सर्वश्रुत आहे व विनोद हा सर्वश्रेष्ठही आहे. विनोद आहे म्हणून माणसाला आनंदमयी जगता येतं. जीवन हे कंटाळवाणं वाटत नाही. एक प्रकारचा विरंगुळा विनोदामुळं निर्माण होतो.           विनोदाबद्दल आणखी सांगायचं झाल्यास ज्याला विनोद आवडतो, त्याच्याशीच विनोद करायला हवा. ज्याला विनोद आवडत नाही. त्याच्याशी चुकूनही विनोद करु नये.         विनोदाबद्दल सांगायचं झाल्यास काही लोकं हे विनोदाला प्राधान्य देत असतात. ते विनोद करतात  कारण विनोदात आपल्याला आनंद मिळवून देण्याची तेवढी बरीच शक्ती असते. परंतु हे जरी खरं असलं तरी विनोदाच्या या प्रवासात काही काही लोकं हे विचित्र असतात. ते विनोद करतात. परंतु इतरांनी त्याच्यासोबत केलेला विनोद त्यांना आवडत नाही. याबाबतीत एक प्रसंग सांगतो. एका महिलेनं दुसर्‍या महिलेची मस्करी करीत तिला चिडवलं, अर्थात विनोद केला, स्वतःला आनंद मिळावा म्हणून. त्यानंतर ज्या महिलेशी तिनं विनोद केला. ती महिलाही तिच्याशी विनोदाच्याच भाषेत बोलली. परंतु त्याचं तिला फार वाईट वाटलं व ती म्हणाली की मी तुमच्याशी गंमत केली होती. त्यावर उत्तर देत ती महिला म्हणाली की मिही तुमच्याशी गंमतच केली. परंतु त्यात संभ्रम निर्माण झाल्यानं त्याचं रुपांतर वादात झालं. प्रसंग होता, एका महिलेचं घर की तिचं दुसर्‍या ठिकाणी आणखी एक घर असल्यानं ती महिला त्या घरात राहात नव्हती. ती सायंकाळी आपल्या घरी आली. ते पाहून एक महिला मस्करी करीत म्हणाली,         "तुम्हाला वेळ काळ काही राहात नाही काय? केव्हाही इकडे येता."          ते त्या महिलेचं बोलणं. त्यावर दुसरी महिला उत्तर देत म्हणाली,           "मी काही तुमच्या घरी आलो नाही."          त्यावर पहिली महिला म्हणाली,            "मी तुमच्याशी हुज्जत करीत नाही. तुम्ही उलट बोलत आहात. अशानं तुमच्याशी कोण बोलेल."          त्यावर दुसरी म्हणाली,           "मी काही निमंत्रण दिलं नाही बोलायचं."           ते त्यांचे शब्द. शब्दानं शब्द वाढत गेले व वाद निर्माण होवू लागला.            विनोद अवश्य करावा. परंतु जो विनोद करीत असेल, त्यानं ज्यासोबत बोलतांना तो विनोद करीत आहे. त्यांच्याकडून कोणत्याही स्वरुपाच्या प्रतिक्रिया आल्यास त्या पचविण्याची ताकद असावी. तरच विनोद करावा. अन्यथा विनोदच करु नये. कारण ज्यांचा आपण विनोद करीत असतो. त्या व्यक्तीचा प्रत्येकवेळेस मुड काय असतो. हे आपण जाणत नाही. अन् अशानं मग अकल्पीत आंतरक्रिया घडून येतात  ज्याची परियंती वादात होते. मग विनोदावरुनच चक्कं भांडणं होतात.         विनोद हा स्वाभाविक विनोद असतो. तो अगदी सहज होवून जातो कधीकधी. कधी विनोदात काही डावपेचही असतात. जसे एखाद्या व्यक्तीची कुरापत काढायची असेल तर विनोदाचा आधार घेतला जातो. ज्याला हाशा हाशा दात पाडणे म्हणतात. यात शब्द तर लागणार नाहीत. परंतु बोलले जाईल व अपमान करता येईल. असा बेबनाव असतो. आजकाल असे प्रकार जास्त चालतातच. ज्यातून कधीकधी महाभयंकर राग जन्म घेत असतो.            विशेष सांगायचं म्हणजे विनोद हा स्वाभाविक असतो व तो सहज घडतो. परंतु हे जरी खरं असलं तरी विनोद हा वेळ काळ पाहून करावा. तसाच विनोद हा प्रसंग पाहून करावा. जर एकादा व्यक्ती मरण पावला असेल आणि त्या ठिकाणी आपण विनोद करीत म्हटले की बरं झाला तो व्यक्ती मरण पावला तर. तर त्यावेळेस कुटूंबियांना राग येणे स्वाभाविक आहे. त्या ठिकाणी विनोदाचं रुपांतरण मारपीटीतही होवू शकते. मग मयत राहिली जागच्या जाग्यावर. कधीकधी एखाद्याच्या मनाची अवस्था जर बरोबर नसेल तर विनोद हा त्याच्या मनातून तिरस्कार बाहेर पाडणारा ठरु  शकतो. जरी विनोद हा आनंद निर्माण करणारा, जीवनाला कंटाळवाणं न करणारा असेल तरीही.           विनोद  करावा. कारण विनोदाशिवाय जगणं कठीणच आहे म्हणून. विनोद  खरंच मनाला शांती प्रदान करीत असतो. परंतु याचा अर्थ असा नाही की विनोदानं कोणाचं मन दुखावेल. जर  आफण केलेल्या त्या विनोदातून कुणाचं मन जर  दुखत असेल तर असा विनोद करु नये. कारण विनोद जसा आयुष्यातला आनंदाचा क्षण आहे. तसाच तो दुःखात लोटवणाराही क्षण आहे. यात शंका नाही.           अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०