अनुबंध बंधनाचे. - भाग 32 prem द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अनुबंध बंधनाचे. - भाग 32


अनुबंध बंधनाचे.....🍁
( भाग ३२ )

काल रात्री घडलेल्या घटनेमुळे अंजली रात्रभर झोपली नव्हती. इकडे प्रेमची स्थिती काही वेगळी नव्हती. तो पण हाच विचार करून रात्रभर झोपला नव्हता. 
या दिवसाची पहाट जरा वेगळीच होती. पुढे काय होणार होते याची दोघांनाही भीती वाटत होती.
सकाळी उठल्यावर प्रेम सर्व आवरून घराबाहेर पडला. आणि जवळच असलेल्या साई बाबांच्या मंदिरात जाऊन त्यांचे दर्शन घेऊन तो तिथेच एकांतात विचार करत बसला होता. आज दसरा असल्यामुळे त्याला सुट्टी होती. आणि आज देवीचे विसर्जन होते. त्यामुळे संध्याकाळी पुन्हा तिकडे जावं लागणार होतं. 
पण कालच्या घटनेमुळे तिकडे जावं की नको, असा विचार त्याच्या डोक्यात येत होता. 
अंजलीच्या घरी खुप काही झाले होते. काल रात्री तिच्या डॅड नी तिच्या मॉमला घडलेला सर्व प्रकार सांगितला होता. आणि या सर्वाचा दोष ते तिच्या मॉमलाच देत होते.
 "नको त्या लोकांना जवळ केल्यामुळे आज हे सर्व पहायला मिळत आहे. आपल्या लाडक्या लेकीला समजवा. हे जे काही मी पाहिलं आहे, ते पुन्हा घडणार नाही याची काळजी घ्यायला सांगा, मला तो मुलगा पुन्हा कधी तिच्यासोबत दिसला तर त्याचे परिणाम खुप वाईट होतील. या सर्वातून बाहेर पडुन जरा अभ्यासावर लक्ष द्यायला सांगा." 
असं खुप काही बोलुन ते पहाटेच आवरून घराबाहेर पडले होते.
घडलेल्या प्रकारामुळे रात्री खुप वेळ विचार करून अंजलीला पहाटे थोडा वेळ झोप लागली होती. डॅड निघुन गेल्यावर मॉम सरळ जाऊन अंजलीच्या बेडरुमचा दरवाजा ठोठावतात. 
त्या आवाजाने अंजली घाबरतच उठते. मॉम चा आवाज ऐकुन ती हळूच दरवाजा खोलते. मॉम आत येताच ती मॉम ला घट्ट मिठी मारून रडु लागते.
मॉम पण थोडा वेळ तिला तशीच मिठीत घेऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिचे सांत्वन करत होत्या.
त्यांच्या मिठीत ती हुंदके देत रडत होती. तिला तशीच जवळ ठेवत मॉम तिला विचारतात.

मॉम : बाळा...! काय झालंय रात्री...? मला नीट सांगशील का. ? 

अंजली : काही नाही...!😥

मॉम : बेटा...! प्लिज...! बोल काहीतरी, आपण दोघी फ्रेंड्स पण आहोतच ना...! आणि तुच मला प्रॉमिस केलं होतं की, तु सर्व काही माझ्याशी शेअर करणार म्हणुन..., मग आता का नाही...? प्लिज बोल बाळा. मला कळणार कसं...? काय झालं आहे ते...?

अंजली : सॉरी मॉम...! मी चुकले.😥 मी खुप काही लपवलं आहे तुझ्यापासून, पण आता अजुन नाही लपवू शकत. 😥😥😥

* असं बोलुन ती अजुनच रडु लागते. मॉम तिला थोडंसं बाजूला करत तिचे डोळे पुसतात आणि तिला बेडवर बसवतात आणि स्वतःही तिच्या बाजुला बसतात. तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिला जवळ घेत तिला विचारतात.*

मॉम : बोलशील आता काय झालंय....,?

अंजली : मॉम...! सॉरी...पण, माझं प्रेम वर खुप प्रेम आहे. आणि मी त्याच्याशिवाय नाही राहु शकत. 😥😥😥 मला खरच माफ कर, पण हेही तितकंच खरं आहे. 😥😥😥

* असं बोलुन ती पुन्हा मॉम ला मिठी मारते आणि रडायला लागते. *

मॉम : हो...! बाळा कळतंय ते मला, आणि मला हे आधीपासून माहीत होतं. मी आई आहे तुझी, एवढी गोष्ट पण समजु शकत नाही का...? पण...., काल रात्री तुझे डॅड खुप रागात होते, मलाही खुप काही बोललेत...! असं काय झालेलं रात्री ते मला जरा नीट सांगशील का...? 
* अंजली रात्री घडलेला सर्व प्रकार मॉमला सांगते.
 अंजली : डॅड नी मला आणि प्रेमला एकत्र पाहिलं, तो निघायच्या वेळी मी त्याला हग केलं तेव्हाच डॅड आमच्या मागे उभे होते. ते प्रेम कडे आणि माझ्याकडेही रागात पहात होते. आणि मला तिथून घरी घेऊन आले. येताना सुध्दा ते माझ्याशी काहीच बोलले नाहीत. मॉम मला डॅड ची खुप भीती वाटतेय. 😥 काय करतील, काय होईल, काहीच कळत नाही. 😥 

मॉम : ( तिला धीर देत ) हे बघ बाळा, काही होणार नाही. ते काही करणार नाहीत. ओके...! तु घाबरु नकोस बरं...! मी आहे ना....! मी समजावेन त्यांना.

अंजली : मॉम...! प्रेम खरच खुप चांगला आहे ग...! आणि ते तुलाही माहीत आहे ना...! मला नाही कळलं की, मी कधी त्याच्यात एवढी गुंतत गेले. मला नाही माहित हे चुकीचं आहे का ते...! पण हो..., मी नाही राहु शकत त्याच्याशिवाय...! 😥 प्लिज तु काहीतरी कर ना. 🙏🏻 

मॉम : हो...! बेटा...! कळतंय मला...! पण मलाही आत्ता काही सुचत नाही. 

अंजली : मॉम...! डॅड कुठे गेलेत, आज तर सुट्टी आहे ना....! ते प्रेमला तर भेटायला गेले नसतील ना...?😥 त्याला काही करणार तर नाहीत ना...?😥

मॉम : अरे...! जरा शांत हो...! असं काहीही नसेल. वॉक ला गेले असतील. तु नको ते विचार मनात आणु नको... कळलं...! 

अंजली : मॉम...! मला खरच खुप भीती वाटतेय ग..!😥 मला माहित आहे मी चुकलेय....!😥 पण मी काय करू तु सांग ना....? 😥

मॉम : तु आधी शांत हो...! आणि आजिबात घाबरु नको, मी आहे बोलली ना तुझ्यासोबत....!

अंजली : थॅन्क्स मॉम...! आय लव यू...!😞 पण डॅड ना कसं फेस करू मी, याची भीती वाटतेय...!😞

मॉम : हे बघ...! मी सांगते तेवढच कर, काही झालं तरी त्यांना हे कळता कामा नये की, तुम्ही दोघे रिलेशन मधे आहात. त्यांनी जरी विचारले तरी, आम्ही फक्त फ्रेंड्स आहोत एवढच सांगायचं.... कळलं...! बाकी मी बघते.

अंजली : मॉम...! मला प्रेमची खुप काळजी वाटतेय, तो पण टेन्शन मधे असेल...! काय विचार करत असेल काय माहित.😞 तु बोल ना त्याच्याशी, मला काही सुचत नाही, काय बोलु त्याला...!

मॉम : ठिक आहे...! मी बोलते त्याच्याशी...! ओके.

* मॉम प्रेमला कॉल लावतात... प्रेम मंदिरात बसलेला होता. मॉमचा कॉल आलेला पाहून तो अजुनच टेन्शन मधे येतो.... त्या विचारात तो भीतीने कॉल रिसिव्ह न करताच ठेऊन देतो. 
कॉल न घेतल्यामुळे अंजलीला अजुन त्याची काळजी वाटू लागली होती. तिने पुन्हा त्याला कॉल केला. तरीही प्रेम ने तो कॉल रिसिव्ह नाही केला. कारण त्याला मॉम सोबत काय बोलायचे हे सुचत नव्हते. 
त्याला हे मात्र कन्फर्म झाले होते की, अंजलीच्या घरी काहीतरी नक्कीच घडले आहे. 
आता काय करावं हे त्याला कळत नव्हते, या सर्वात एकच व्यक्ती त्याला मदत करू शकतो तो म्हणजे आरव. त्याने आरव ला सर्व काही सांगायचे ठरवले, आणि त्याला कॉल लाऊन मंदिरात बोलवून घेतले.
आरव पण घाईतच तिथे पोचला. प्रेमने घडलेली सर्व हकीकत त्याला सांगितली. 
आरव त्याला धीर देत बोलला...

आरव : तु काही काळजी करु नको. तुला काही होणार नाही, मी आहे ना...! बाकी बघु काय होईल ते. तु आजिबात घाबरु नकोस. तु एकदा तिथे नक्की काय झालं आहे ते बघ...! म्हणजे आपल्याला अंदाज येईल सर्व गोष्टींचा...! कॉल कर तु तिला....!

प्रेम : पण मी काय बोलू तेच कळत नाही, दोन मिस कॉल येऊन गेलेत त्यांचे. तिथे नक्की काय झाले आहे काय माहीत.

आरव : ठिक आहे ना...! तु कॉल कर, जे काही झालं असेल,,,, निदान कळेल तरी.

प्रेम : ओके...! मी कॉल करून बघतो.

* असं बोलुन तो अंजलीच्या घरी कॉल लावतो. रिंग होताच अंजली कॉल रिसिव्ह करते. *

अंजली : हॅलो...! प्रेम कसा आहेस तु....?😞

प्रेम : मी ठिक आहे...! तु कशी आहेस ? आणि घरी सर्व ठिक आहे ना...! डॅड काही बोलले का...?

अंजली : प्रेम...!😥 माहित नाही पण, डॅड ना हे सर्व आवडलेल नाही, माझ्याशी काहीच बोलले नाहीत. पण मॉम ला खुप काही बोललेत. मला पण खरच काही सुचत नाही....! तु मॉमशीच बोल ना...!😥

* असं बोलुन ती मॉम ला फोन देते....

मॉम : प्रेम....! कसा आहेस तु....?

प्रेम : मॉम सॉरी...! मी चुकलोय, मला माफ करा. 🙏🏻 

मॉम : प्रेम....! अरे ....! ठिक आहे ना, मला या गोष्टीची कल्पना होती. जे झालं ते झालं...! पण तु काळजी करु नकोस. आपण यातुन काहीतरी मार्ग काढू.

प्रेम : मॉम......! तुम्हाला कसं सांगायचं तेच कळत नव्हते, खुप वेळा प्रयत्न केला पण नाही बोलू शकलो.

मॉम : प्रेम....! अरे या गोष्टी सांगितल्यावरच कळतात असं असतं का ? मी आई आहे ना तिची...! मग मला याची जाणीव झाली नसेल का... सांग बरं....?

प्रेम : माहीत नाही पण नकळतपणे हे सर्व झालं, मी काही चुकीचं केलं आहे आणि तुमचा विश्वास मोडला, असच वाटत आहे. खरच... सॉरी...!🙏🏻

मॉम : प्रेम...! अरे ठिक आहे ना, पण आत्ता तु जरा माझं ऐकशील का...? 

प्रेम : हा...! बोला ना...!

मॉम : अंजुच्या डॅड ना फक्त संशय आहे की तुम्हां दोघांमध्ये असं काहीतरी आहे. त्यामुळे आत्ता फक्त यातून बाहेर कसे पडता येईल त्याचा विचार करू. आणि ते अंजुला पण असे काही बोलले नाहीत. फक्त माझ्याशी बोललेत. आणि तिला तुझ्यापासून दूर राहायला सांग एवढच बोललेत. 

प्रेम : म्हणजे...! आता....?

मॉम : अरे...! ऐक तरी...! तुम्ही दोघे सध्या तरी थोडे दिवस तरी एकमेकांना भेटू नका. पुढे बघू काय ते.

प्रेम : पण...! मॉम...! पुढे काय ? मला माहित आहे, अंजु अजुन खुप लहान आहे, तिच्यासाठी मी कितीही दिवस थांबायला तयार आहे, पण शेवटी काय,,,,,? डॅड ना हे कधीच मान्य होणार नाही. हे मलाही माहित आहे आणि तुम्हालाही.,,,,मग ?

मॉम : प्रेम....! अरे...! तु खरं प्रेम करतो ना तिच्यावर....! मग नको असे निगेटिव्ह विचार करू. पुढे जे होईल ते चांगलच होईल, असा विचार करू ना आपण...! आणि त्यासाठी आत्ता काहीतरी निर्णय घ्यावाच लागेल ना राजा...!

प्रेम : ठिक आहे मॉम...! मग तुम्हीच सांगा काय करायचं ते, तुम्ही बोलाल ते मी करायला तयार आहे.

मॉम : ओके...! मग आता काही दिवस तरी तुम्ही भेटू नका. मी तिलाही समजावते. थोडे दिवस त्रास होईल. पण हे करावं लागेल. सध्या तरी हा एकच मार्ग आहे.

प्रेम : ठिक आहे....! नाही भेटणार मी तिला, जोपर्यंत तुम्ही सांगत नाही तोपर्यंत. मी प्रॉमिस देतो तुम्हाला. फक्त तिला नीट समजवा तुम्ही...! जरा हट्टी आहे ती, लवकर ऐकत नाही.

मॉम : अच्छा...! म्हणजे एवढं ओळखायला लागला आहात...! पण हे विसरू नको, माझी मुलगी आहे ती...!😊

प्रेम : सॉरी.... मॉम...! पण आमच्यामुळे तुम्हाला खुप ऐकुन घ्यावं लागलं असेल. 

मॉम : अरे....! आता ते जावू दे...! हे बघ आता ती पण माझ्या समोर आहे, काय ठरवलं आहे ते दोघांनीही लक्षात ठेवा. पुढचे काही दिवस तु तुझ्या कामात आणि फॅमिली कडे लक्ष दे, आणि अंजु अभ्यासात लक्ष देईल. कळलं...! 

प्रेम : हो... मॉम...! तुम्ही बोलाल तसं.,..! पण एक रिक्वेस्ट आहे. आम्ही भेटू शकत नाही पण कॉल वर तरी बोलू शकतो ना...?

मॉम : हो....! पण....! तेही जरा कमी करायला हवं, कधीतरी ठिक आहे. 

प्रेम : ओके मॉम...! मग मी आत्ता बोलू शकतो तिच्याशी....?

मॉम : अरे.....! आत्ताच तर बोलले ना कधीतरी म्हणून...! पण ठिक आहे...! हे घे बोल...😊

* असे बोलून त्या अंजुकडे फोन देतात आणि किचन मधे जातात.... फोन कानाला लावताच अंजु रडायला लागते....😥😥😥 

प्रेम : अंजु...! अगं...! असं काय करतेय...? तु रडु नको प्लिज.....! मॉम आत्ता काय बोलल्यात ते ऐकलं नाहीस का...? थोड्याच दिवसाचा प्रश्न आहे. पुढे होईल सर्व ठिक. 

अंजु : प्रेम....! तुला वाटतं, सर्व ठिक होईल पुढे ... ?
कारण मला खुप भिती वाटतेय. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय....!😥

प्रेम : अरे हो...! मी पण नाही राहु शकत तुझ्याशिवाय कळलं...! पण आत्ता आपल्याला मॉम जे सांगत आहेत ते करायला हवं. 

अंजली : पण... प्रेम...! मी तुला भेटल्याशिवाय...!😞

प्रेम : बघ...? पुन्हा तेच...? अरे काही दिवसांचा प्रश्न आहे, थोडे दिवस तरी आपल्याला हे करायला हवं. पुढे होईल सर्व ठिक.  

अंजली : काही ठिक होणार नाही प्रेम...! तु डॅड ना ओळखत नाहीस. मला त्यांचीच भीती वाटते. ते काय करतील माहित नाही. 😞

प्रेम : हे बघ अंजु...! थोड्या दिवसांचा प्रश्न आहे, त्यांच्या डोक्यातून हे सर्व निघून जायला हवं, त्यासाठी थोडा वेळ तर लागेलच, आणि आपण दोघे मिळुन तसा प्रयत्न करू... कळलं....!

अंजली : ते ठिक आहे रे बोलायला, पण मी तुला भेटल्याशिवाय कशी राहू...? 😥 

प्रेम : अरे.....! थोडे दिवस फक्त...! मॉम बोलतात तसं, तु जरा तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे. स्वतःचे माईंड थोडे डायवर्ट कर. 

अंजली : ठिक आहे प्रेम...! मी प्रयत्न करेन नक्की, पण मला थोडा वेळ तरी लागेल ना, यासाठी...! तोपर्यंत तरी कधीतरी आपण भेटू शकतो ना...?

प्रेम : हो...! पण...! कधीतरीच, आत्ता तरी पुढचे काही दिवस आपण नाही भेटणार आहोत. हे तु मनाला समजव,,,, कळलं....!

अंजली : ओके...! मी प्रयत्न करेन. 😥. 

प्रेम : गुड गर्ल...!😊

अंजली : बरं ऐक ना...! आज संध्याकाळी तु देवीच्या विसर्जन ला येणार आहेस ना...?

प्रेम : मी नाही येणार आज...!

अंजली : का...? 😞

प्रेम : आत्ताच तर ठरलंय ना आपलं, भेटायचं नाही म्हणुन...! मग लगेच विसरली....?

अंजली : अरे पण मी असं कुठे बोलतेय की, तु मला भेटायला ये म्हणुन... ! दरवर्षी येतोसच ना...! विसर्जनासाठी, तसाच या वेळी पण ये...! निदान त्या निमित्ताने तुला मन भरून पाहता तरी येईल...!😞

प्रेम : पण मी नाही येणार या वेळेस, हे मी आधीच ठरवलं आहे. 

अंजली : प्रेम प्लिज....🙏🏻 फक्त आजचा दिवस, मी तुला रिक्वेस्ट करते हवं तर....! प्लिज ये ना...!😞 नंतर तु बोलशील तसच मी वागेन... प्लिज..! 🙏🏻😞

प्रेम : बरं ठिक आहे....! मी येईन, पण माझ्याजवळ किंवा माझ्याशी बोलायला यायचं नाही तिथे तु. 

अंजली : हो...! चालेल मला...! पण तु आज काहीही करून येणार आहेस, आणि मला तुला लांबूनही पाहताना तितकच छान वाटतं....!🙂

प्रेम : बरं ओके...! आता मी ठेवतो... बाय.

अंजली : हो...! आणि ऐक ना...! आय लव यू...! माय स्वीट हार्ट 😘 मी वाट बघतेय...! बाय... टेक केअर.

* असं बोलुन ती फोन ठेऊन देते, आरव त्यांचे हे बोलणे ऐकत असतो. त्याच्या सर्व लक्षात येते. तो प्रेमला बोलतो....

आरव : तु एक काम कर...! संध्याकाळी जा तु विसर्जनला. 

प्रेम : टेन्शन आलंय रे... !

आरव : कसले टेन्शन...? तिच्या बापाचे...?

प्रेम : खरं तर हो....! जरा रागीट स्वभावाचे आहेत. 

आरव : नको टेन्शन घेऊ...! मी आहे ना...! 😊 तुझ्या केसाला पण धक्का लागुन देणार नाही मी... कळलं.
आणि बिनधास्त रहा, थोडे दिवस जावू देत, मग बघु आपण काय करायचं ते....! चल आता निघुया.😊

* त्याला धीर देऊन दोघेही घरी येतात. 
प्रेम संध्याकाळी छान तयार होऊन मित्रांसोबत देवीच्या विसर्जनासाठी जायला निघतो. 
तिथे पोचताच त्याचे लक्ष वरती बाल्कनीत उभ्या असलेल्या अंजलिकडे जाते. दोघेही एकमकांकडे पहात असतात. मनात खुप काही बोलायचं असतं पण ते आता फक्त दोघांच्या डोळ्यातून व्यक्त होत होतं. नकळत त्या भावना अश्रुंच्या रूपाने अंजलीच्या डोळ्यांतुन ओघळु लागतात. ती हळूच ओढणीने डोळे पुसत त्याच्याकडे पाहत राहते. 
प्रेम तिला पाहून थोडा भाऊक होतो, आणि तिच्यावरून नजर हटवत तो दुसरीकडे निघुन जातो.
विसर्जन ची तयारी झालेली असते, देवीची मूर्ती मंडपातून बाहेर काढून ती रथावर ठेवलेली असते. 
इकडे बेंजो पण तयार असतो. हळू हळू देवीची मिरवणूक तिथून निघते. अंजली तिच्या फ्रेंड सोबत त्या मिरवणुकीत सामील होऊन नाचत असते. मधेच त्या एकमेकांची नजरानजर होत असते. पण तिचे डॅड ही त्या मिरवणुकीत सहभागी झालेले असल्यामुळे ती थोडी घाबरूनच होती. 
मिरवणुक सर्व नगरातून फिरून शेवटी विसर्जनाच्या ठिकाणी खाडीवर पोचते. देवीची आरती पूजा वगैरे झाल्यावर विसर्जन होते. पुढे सर्व काही ठिक होऊ दे असाच आशीर्वाद मागत दोघेही देवीला निरोप देतात.
देवीचे विसर्जन होते... प्रेम तिथून जायला निघतो, तो ऑटो मधे बसताना अंजली त्याच्याकडे पहात होती. माहित नाही पुन्हा कधी त्याला बघता येईल या आशेने....
प्रेम तिथून निघुन घरी येतो. आज दसरा असल्यामुळे चाळीमध्ये सगळीकडे सोने म्हणजेच आपट्याच्या पानाचे एकमेकांना वाटप करण्यात येत होते. मित्र मंडळी नातेवाईक, शेजारी... एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देत होते. 
प्रेम मात्र वेगळ्याच विचारात हरवून गेला होता...
आता पुढे काय होईल...आयुष्यात पुन्हा कधी अंजलिशी भेट होईल...? का आजची शेवटची भेट होती... ? अशा विचारांमध्ये तो हरवुन जातो. ती रात्र दोघांनाही नीट झोप देऊ शकली नाही. 

क्रमशः ~~~~~~~~~~~~~~~✍️