आक्तेचा धनी Ankush Shingade द्वारा तत्त्वज्ञान मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आक्तेचा धनी

आक्तेचा धनी       मयतीची सर्व तयारी झाली होती.बाबुरावनं अंत्यवीधीची सर्व तयारी करण्यात काईबी कसर सोडली नोयती आन् आतं आक्ता उचलली जाणार होती.एवळ्यात बाब्याचा आवाज आला.      "थांबा,मी आक्ता पकडीन."       संबंध नातेवाईकांनं इकडं तिकडं पाह्यलं.त्याईले आश्चर्य वाटलं.बाबुराव असा का बोलते असंही त्याईले वाटलं.त्याचं कारणही तसंच होतं.        बाब्याचा आंतरजातीय लगन होता.त्याले जातीपातीशीन लेनदेन नोयती.पण आंतरजातीय असुनबी त्यानं सास-याची सेवा केली होती.खरं तं तोच आक्तेचा धनी होता.त्याचा जसा आवाज आला.तसे नातेवाईक मणाले.        "तुमी पोरगा होये का?आमच्या समाजात पोरगाच आक्ता पकळते.तुमी नाय पकडायची आक्ता."        बाब्याच्याच घरुन मैयत निघत होती.आक्ता कोणीबी पकडो.पण त्याच्या मेवण्यानं जे काई या दरम्यान कृत्य केलं होतं.ते कृत्य त्याच्या समाजासमोर उघड कराचं होतं.पैसा तं सोडा......साधी सेवा बी मेव्हण्यानं केली नोयती.आन् आज आक्तेसाठी तो कसा पुळं आला याचं आश्चर्य त्याले वाटलं होतं.         बाबुचं लगन अगदी थाटामाटात पार पडलं होतं.सुखी संसार चालला होता.अशातच बाबुचे सासरे त्याच्या घरी राहाले आले होते.ते रडत होते.कदाचित सुनेनं त्याईचा फार मोठा अपमान केला होता.तो त्यांईले सहन न झाल्याने ते अगदी दुःखी अंतकरणातुन बाबुकडे आले होते. दोन तीन दिसानंतर हा परकार माईत झाल्यानं बाब्यानं सास-याले घरीच राहाले सांगतलं.        सासरे बाबुकडं रावू लागले होते.त्याईले अगदी चांगली वागणूक बाबू देत होता.ते बी सन्मानानं राहात होते.एवळ्यात सासरेसाहेबाची परकुती बिघडली.ते एवळी बिघडली का ते खाटल्यावरच राहायचे.       दिवसंदिवस परकुती गंभीर होत चालली होती.सासरे सुधरुन पुन्हा स्थावर होतील याची काईबी चिन्ह दिसत नोयती.पोरगा काई आतंपर्यंत आला नोयता.मणुन आतं अंतीम समयी त्या पोरानं आपल्या बापाले भेट द्यावी असं बाबुले वाटत होतं.मणुन बाबुनं अशोकले फोन लावला.मणाला,       "तुमचा बाप बहुत बिमार हाये तुमी या."       मेवण्यानं आवाज आईकला.आन् सांजच्याले तो बापाले भेटाले आला.बापाले लय बरं वाटलं.आपला पोरगा भेटाले आल्याचा बराच आनंद झाला.पण क्षणातच तो मावळला.कारण तो पोरगा आल्या पावली परत गेला.         मयना होत आला होता.आतं तब्येत चांगलीच बिघडली होती.अंतीम श्वास चालु झाला होता.आक्सीजन आन् बीपी शुन्यापर्यंत येवुन ठेपलं होतं.दिड दिस झाला होता.तरीबी जीव जात नोयता.अशातच बाबुरावची मेव्हणी मणाली,      "दाजी,माह्या बापाले दवाखान्यात न्या.कदाचित आमचा बाप सुधरन.आमी तुमचे उपकार कधी इसरणार नाय."         बायकोबी मणत होती का माह्या बापाचा जीव वाचवा.दोघीबी बयनी बापाचा जीव वाचवासाठी बाबुरावले पारथना करत होत्या.धडपडत होत्या.खरं तर त्याईले बाप पाह्यजे होता.घरदार इस्टेट नोको होती.        सास-यानं घरदार बांधलं होतं.मोठी टोलेजंग इमारत उभी होती.त्या टोलेजंग इमारतीमंधी पोरगा राहात होता.मालमत्ताबी खात होता.आपल्या बापानं आपल्याले लायन्याचं मोठं केलं हे गोष्ट तो इसरला होता.खरं तं बापाचं पालनपोषन कराची जिम्मेदारी त्याचीच होती.पण तो काई बी सेवा करत नोयता.बाप मातर पोराचसाठी हळहळत होता.        आज अंतीम समयी त्या टोलेजंग इमारतीतच मरणाची इच्छा बाळगुन होता तो जीव.पण तो तरी का करन.त्याच्या हातात पोराच्या घरी जाणे नोयते.पोरगा एक बी शबद काळत नोयता का मी मा बापाले मा घरी नेतो.तुमी मले काई पैसा द्या.बाब्याले वाटत होतं का त्यानं अंतीम समयी त्याले न्यावं.सास-याची अंतीम इच्छा पुरणं व्हावी.पण त्याच्याबी हातात काई नोयतं.       सास-यानं अंतीम श्वास घेतला होता.त्याची अंतीम इच्छा पुरी झाली नोयती.मरणापुरवी त्यानं डोळ्यातुन अश्रु पाडले होते.रडता रडता त्याले मृत्यू आला होता.        बाब्या इचार करत होता का जो बाप माह्या वंशाचा दिवा होईन मणुन गर्भ तपासुन तो भ्रुण जर पोरीयचा असन तं तिची हत्या करते.आन् पोरगा असन तं त्याले जपुन ठेवते.का तर मायबापाची सेवा करायसाठी नाय तं फक्त इस्टेटीसाठी आन् त्याचं आडनाव चालवासाठी.खरंच मायबापाच्या या इचाराले तिलांजली द्याची येळ हाये.पण देणार कोण?खरंच पोरायपरस पोरगीच बरी. का तर ते बापाची सेवा तं करुन राह्यली.आन् मणुन मले बी साथ द्या लागन.         बाब्या बायकोले साथ देत होता.कालपासुन तं आजच्या अंतीम टप्प्यापर्यंत.कधी कधी बायकोबी बापाची सेवा करतानी चिडचिड करुन बाब्याले बोलायची.पण तिचा राग न मानता बाब्या तो तरास समजून घेवुन तिले बोलत नोयता.तो शांत राहायचा.       आज सासरा जीवंत नोयता.पण त्याईची आठव बाब्याले येत होती.त्यानं फक्त अगदी निःस्वार्थ हेतुनं आन् दिलखुलासपणान सास-याची सेवा केली होती.तसाच पैसाबी लावला होता. खरंच का तो आक्तेचा धनी नोयता का?तरीबी आजच्या या जातीवादी समाजानं चालीरीतीच्या बंधनातून त्याचा अधिकार नाकारला होता.          अंकुश शिंगाडे नागपुर     ९९२३७४७४९२©®©